छत्रीखालचं बालपण
मी "ऐसी" चा सभासद झाल्यापासून उत्तम लेख आणि उत्तम कविता वाचायला मिळू लागल्या आहेत. पण फक्त आस्वाद घेणे यावर समाधान मानण्याची प्रकृती नसल्याने मी कधी काळी जुळवलेली कविता इथे पोस्त करण्याचे धाडस करत आहे. सांभाळून घ्यावे.
छत्रीखालचं बालपण
===============
मुसळधार पावसात
खिडकीसमोर बसून
आठवणींचे कण गोळा करताना
हमखास सापडणारा एक कण….
म्हणजे आपलं ‘छत्रीखालचं’ बालपण….
पावसाळ्यात रोज सकाळी
शाळेत जायची इच्छा नसतानाही
आजोबांची जड काळी छत्री घेऊन
चिखलातून वाट काढ़त जात
छोट्या रंगीबेरंगी छत्र्यांमध्ये मिसळणारं….
आपलं ‘बुजलेलं’ बालपण….
खूप पाऊस पडल्याने
शाळेला सुट्टी मिळाली,
तर लपाछपी खेळताना
तीच काळी छत्री उघडून
त्यामागे बिनधास्त लपणारं….
आपलं ‘खट्याळ’ बालपण….
दप्तराच्या ओझ्यासोबत
छत्रीची वेगळी पिशवी वागवणारं,
आणि वर्गाबाहेर ठेवल्यामुळे
वेंधळ्यासारखी छत्री विसरल्यावर
आईचा मार खायला लावणारं….
आपलं ‘भिजलेलं’ बालपण….
कल्पना
:)
कल्पना छाने.
लेखन/प्रतिमा/प्रतिके किंचित अमॅच्युरीश/ओव्हरयुज्ड आहेत, पण ते असायचेच. इथे कुठे सगळे प्रोफेशनल लिहितात!
तेव्हा बिंधास्त लिहा. फिकर नॉट! :)
अजून येऊ द्या! वाचायला आवडेल.