"थोडी आता दया करा"

"थोडी आता दया करा"

मठ्ठपण तुझे देवा/ म्हणे मनी भक्ती ठेवा!
महापुरे वृक्ष जाती/ लव्हाळ्याची काय क्षिती ?
कृपा तुझी अती झाली/ महाराची बाई मेली
ड्रोन हिंडते आकाशी/ लक्ष्य त्याचे आदिवासी
टाटा-बिर्ला फोफाविती / शेतकऱ्या नागविती
गरीबाच्या पाठी सोटा/ चलनाचा फुगवटा
धान्याचा जो पूर येई/ घेण्यासाठी पैका नाही
घट्टपण देगा देवा/ एकलेच आम्हा ठेवा
मिलिंद म्हणे दया करा/ "कृपादृष्टी" दूर सारा!

: मिलिंद पदकी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चार अपशब्द

(जसे:
दाखव विठ्ठला / तुझे देवपण
नाहीतर घण/ आहे माझा
: विंदा करंदीकर )

खुल्या नभाखाली/ उभा मी नागडा
बोल तो रांगडा / सुनावितो
असे काय मोठे / देवा तुवे दिल्हे?
आई-बाप नेले/ मृत्युलागी
साऱ्या सजीवांना / वेदना नि कळा
रक्त भळाभळा / वाहते ते
सर्वत्रही मृत्यू /घालितो थैमान
सोडीला हैवान / मोकळा तो.
धाडिले "प्रेषित"/म्हणे सात-आठ
त्याने काय झाट/ बदलले?
साऱ्या सजीवांना / बनविसी हीन
होती मग दीन/ पायी तुझ्या .
आम्हा सजीवांना / करी जे भिकारी
ब्रम्हाची शिसारी/ नाकी माझ्या
माझ्या आयुष्याचा / स्वामी मी बारका
"पोर तो पोरका" / तुझा नाही.
अटळ तो मृत्यू / सर्वांच्या राशीत
घाल ते कांशीत / जग तुझे!
चंद्र-सूर्य कांदे/ ठेचोनिया थेट
करतो ऑमलेट/ ब्रम्हांडाचे!

: मिलिंद पदकी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पिकले पान (एक गद्य कविता)

"पुस्तक उघडून तो म्हणाला तुझ्यासाठी तीन पाने आणली आहेत हे पहिले लालभडक जीर्ण सर्वात आवडते कारण मीही तसाच होत चाललो आहे पण अंत इतका सुंदर असेल तर काळजीचे कारणच काय दुसरे पान होते हिरवट-पिवळट हे माझे आत्ताचे रूप आहे हात लावून बघ दमट आणि दडस लागेल व तिसरे पान होते पूर्ण हिरवे रसरशीत ते बघतच मात्र ती रडू लागली व म्हणाली हे पान तुम्ही आणायलाच नको होते कारण हे बघून लोक तुम्हाला गलिच्छ म्हातारा म्हणून बडवतील वर्षे ओलांडून मागे जाता येत नाही वाईटही दिसते त्यापेक्षा मला ते पहिले तांबडे पान द्या त्यावर सुंदर गणपतीची मूर्ती काढते तिचे मनन व पूजन करा आयुष्य कसे संपले कळणारही नाही डोळ्यात पाणी आणून खिन्नपणे हळूहळू चालत तो घरी गेला."
: मिलिंद पदकी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

प्रतिक्रियांमध्ये बाकीच्या कविता देण्यामागचं कारण समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं करण्यामागची कारणीमीमांसा समजण्यासारखी आहे. कविता या प्रकाराला मिळणारा प्रतिसाद गद्य लिखाणापेक्षा कमी असतो. कवितांचा गुच्छ सादर केल्यास अधिक प्रतिक्रिया येण्याची शक्यता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कविता आवडल्या. जमेल तसा प्रतिसाद लिहितो.

एक सुचवणी : तुमच्या सभासदत्वाकरता तुम्हाला "मिलिंद" हे नाव निवडायचं असावं. ते पहिल्यांदा टंकित करताना बहुदा "ंइलिन्द" असं झालं असावं.

ंइलिन्द = Milind
मिलिंद = miliNd

टंकन सहाय्याकरता लिंक = http://www.aisiakshare.com/phonetic_help

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.