'पानसिंग तोमर' उर्फ छा गये इरफान!

'एके काळचा नॅशनल चॅम्पियन परिस्थितीमुळे डाकू बनतो' अशी एका ओळीची गोष्ट. साधारण 'अ‍ॅन्ग्री यंग मॅन' फॉर्म्युलाची कहाणी. असा सिनेमा २०१२ साली चांगला ‍‌का वाटावा, अशी शंका मनात असूनही 'पानसिंग तोमर' पाहायला गेलो त्याचं मुख्य कारण म्हणजे इरफान आणि इरफानच. वेगवेगळया भूमिकांत आपली छाप पाडणारा हा गुणी नट याही वेळी कमाल करून जातो. आर्मीत दाखल होतानाचा पानसिंगचा किंचित गावंढळपणा आणि तरीही त्यातून दिसणारी त्याची जिगरबाज वृत्ती इरफाननं मस्त खुलवली आहे. वरिष्ठांना सडेतोड उत्तरं देऊन अचंबित करणारा पानसिंग उभा करताना त्यात इरफान आपल्या व्यक्तिरेखेच्या पुढच्या बंडखोरीची चाहूल देतो. अगदी बायकोबरोबरच्या प्रेमप्रसंगातही आपल्या व्यक्तिरेखेचं बेअरिंग व्यवस्थित सांभाळतो. थोडक्यात, इरफानच्या चाहत्यांनी आणि ज्यांना तो आवडत नाही अशांनीही पाहायला हवा असा हा सिनेमा आहे.

इरफानच्या अभिनयाला पूर्ण वाव देणारं कथानक आहे आणि इरफाननं त्याला पूर्ण न्याय दिला आहे असं असूनही चांगला चित्रपट पाहिल्याचा अनुभव मिळायला तेवढं पुरेसं नसतं. दिग्दर्शक, पटकथालेखक, छायालेखक, इतर नट असे अनेक घटक त्यामागे असतात. तिथे 'पानसिंग' कितपत यशस्वी ठरतो ते पाहू.

भारतीय सिनेमात पूर्वी एक आय.एस.आय. ब्रँड असायचा. त्याची काही वैशिष्ट्यं म्हणजे:

  • नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी, स्मिता पाटील, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, अमरीश पुरी असे नट घ्यायचे;
  • अन्यायाची कहाणी घ्यायची; शक्यतो खेड्यातली, पण शहरातलीसुद्धा चालेल; सामाजिक आशय हवा;
  • जमलं तर तेंडुलकरांची पटकथा घ्यायची; एखादी गाजलेली कथा घ्यायची; किंवा सत्यघटनेचा आधार घ्यायचा;
  • हिंदी सिनेमातली झगझगीत, गुळगुळीत प्रकाशयोजना वापरण्याऐवजी नैसर्गिक प्रकाश आणि कमी मेकप वगैरे वापरून सिनेमाला 'ऑथेंटिक लूक' द्यायचा;
  • एन.एफ.डी.सी.कडून पैसे घ्यायचे;
  • वगैरे, वगैरे.

    असे आय.एस.आय. ब्रँडचे सिनेमे पारितोषिकं वगैरे मिळवत. कधी ते चांगले असत, पण कधी भयाण म्हणता येतील इतके वाईट असत.
    असो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत आय.एस.आय.नं प्रमाणीकरणाचे निकष बदलले आहेत. त्यानुसार -

  • मुख्य भूमिकेत सध्याचे आय.एस.आय. नट हवे तर घेता येतात - म्हणजे इरफान, माही गिल, के.के., कोंकणा, अभय देओल वगैरे. - पण ते घ्यायचं बंधन नाही. मुख्य नियम म्हणजे भूमिकेला साजतील असे एन.एस.डी.तले वगैरे कसदार नट घ्यायचे. 'पान सिंग' यात चांगलाच पास होतो. पानसिंगची मुलाखत घेणारा पत्रकार, त्याचे आर्मीतले वरिष्ठ, प्रशिक्षक, गावकरी, डाकू साथीदार वगैरे लोक खास आपापल्या भूमिकेला शोभतील असे आहेत. सिनेमा त्यांच्यामुळे वास्तवदर्शी वाटतो.
  • गोळीबंद पटकथा. मुख्य विषयापासून सिनेमा कुठेही ढळत नाही. चार आण्याच्या कोँबडीत भसाभस पाणी घालण्याचे उद्योग आय. एस. आय.ला आता खपत नाहीत. यातही 'पानसिंग' पास होतो.
  • वास्तववादी पण तडाखेबाज संवाद – ज्या स्थळाकाळात आणि सामाजिक स्तरात सिनेमा घडतो त्याला साजेसे संवाद, त्यातल्या स्थानिक लहेजाच्या गमती, व्यक्तिसापेक्ष फरक, आर्मीचा प्रभाव अशा सर्वाची अनुभूती देणाऱ्या संवादांमुळे पानसिंग पाहायला मजा येते.
  • शैलीदार 'लुक' – निव्वळ वास्तवदर्शी छायाचित्रणापेक्षा आजकाल शैलीदार छायाचित्रणातून सिनेमाला वैशिष्ट्यपूर्ण लूक दिला जातो. 'पानसिंग'मध्ये वापरलेले डोळे दिपवणारे झगझगीत उनपिवळे रंग आणि त्यातल्या व्यक्तिरेखांचे काळेभोर रापलेले रफ-टफ चेहरे यांचा परस्परविरोध चंबळच्या खोऱ्यात घडणाऱ्या कथानकाला शोभतो.
  • या सर्वाचं श्रेय अर्थात दिग्दर्शक-लेखक तिगमांशु धुलियाला द्यायला हवं. याशिवाय अनेक छोट्या छोट्या गोष्टी रोचक पद्धतीनं येत राहतात. पानसिंगची मुलाखत घ्यायला पत्रकार जातोय या सुरुवातीच्या प्रसंगात अमिताभचं पोस्टर दिसतं. अ‍ॅन्ग्री यंग मॅन' फॉर्म्युला कुठून उसना घेतला याची जणू पावतीच दिग्दर्शक देत असतो. आईस्क्रीम खाताना पानसिंग इंग्रजांना दुवा देतो तेव्हा गंमत वाटते, पण आईस्क्रीमविषयीच्या पानसिंगच्या स्मृती काय आहेत ते लक्षात येतं तेव्हा आपण आपोआप अंतर्मुखसुद्धा होतो.

    मग सिनेमा निर्दोष आहे का? तर अगदी तसंही नाही. रचना काहीशी सपाट वाटते. कथानकातले उतारचढाव पडद्यावर आणताना त्यांची लय इतकी समसमान नको होती असं वाटतं. मेलोड्रामा टाळण्याच्या हेतूमुळे कदाचित ते सपाट झालं असावं. सिनेमातल्या अनेक गोष्टींवर 'बँडिट क्वीन'चा प्रभाव जाणवतो. शेखर कपूरला 'बँडिट क्वीन'वर धुलिया सहाय्य करत होता हे समजल्यावर त्यामागची गोम कळते. 'पानसिंग' काही त्या तोडीचा मात्र नाही.

    पण अशी किरकोळ गालबोटं सोडून द्यावी आणि एकदा हा रसरशीत 'पानसिंग' जरूर पाहावा अशी आमची थोडक्यात शिफारस.

    जाता जाता: आता तिगमांशुचा 'हासिल' किंवा 'साहिब बीवी अ्ौर गँगस्टर' पाहायला हवा.

    field_vote: 
    3.75
    Your rating: None Average: 3.8 (4 votes)

    प्रतिक्रिया

    समीक्षा आवडली. गेल्या आठवड्यातच हा सिनेमा पहायचे मनात आले होते, पण 'कहानी' मुळे बजेट कोसळले. या आठवड्यात तशी भीती नाही. 'एजंट विनोद' रिलीज होतो आहे, त्यामुळे भीती नाही. 'मसाला' रिलीज व्हायच्या आधी हा सिनेमा पाहून घेतो. एरवीही इरफान आवडतोच.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

    शैलीबदल आवडला. परीक्षण उगाच वाचलं. आता इथे चित्रपट मिळवणे आले. (श्रेयअव्हेर - परा) इरफान फारच आवडतो. लाईफ इन अ मेट्रोमुळे फारच जास्त आवडतो.

    'साहिब, बीबी और गँगस्टर'बद्दल आधीही चांगलेच रिपोर्ट्स ऐकून होते, पण का कोण जाणे दुर्लक्ष केलं.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    ---

    सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

    पाहायचा आहेच.

    'साहिब, बीबी...' जरूर पाहा. अतिशय सुंदर चित्रपट आहे. किंबहुना तो पाहिल्यामुळेच धुलियाच्या आगामी चित्रपटांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. 'हासिल' बद्दल मात्र माहीत नाही.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    'समरुची' मित्रांकडूनही या चित्रपटाची स्तुती ऐकली होती तेव्हापासून लिस्टवर आहे. मात्र 'कहानी' कानामागून आली ..मात्र तोमर थेट्रातून उतरायच्या आत पहायला हवा

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    - ऋ
    -------
    लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

    हासिल पहिला २/३ भाग फारच चांगला आहे; इरफानला मी प्रथम त्या सिनेमात पाहिले होते. पण शेवट कुंभ मेळ्यात नेऊन फारच फसला होता. गँग्स्टर वाला नाही बघितला.
    चलो, हम इरफान के फॅन हैं ही (नेमसेक पाहिल्यावरच त्याचे जबरदस्त चाहते झालो होतो), अब यह पिच्चर भी देखेंगे.

    असे आय.एस.आय. ब्रँडचे सिनेमे पारितोषिकं वगैरे मिळवत. कधी ते चांगले असत, पण कधी भयाण म्हणता येतील इतके वाईट असत.

    हाहा, अगदी पटले. यातील "भयाण" चित्रपटांचे एखाद दुसरे उदाहरण द्या की....

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    << चलो, हम इरफान के फॅन हैं ही >>

    इरफान च्या चाहत्यांनी (आणि इतरांनीही) बघायलाच हवा असा चित्रपट म्हणजे "राईट या राँग".

    << यातील "भयाण" चित्रपटांचे एखाद दुसरे उदाहरण द्या की.... >> तेंडूलकरांच्या पटकथेवरचीच दोन ढळढळीत उदाहरणं आहेत - कमला आणि अर्धसत्य.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    चेतन सुभाष गुगळे
    भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
    Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

    रॉबर्ट डी नीरो सारखे अभिनयातील अष्टपैलुत्व आजच्या ज्या एकमेव हिंदी अभिनेत्याकडे आहे त्या इरफान खानच्या चित्रपटाबद्दल वाचायला नक्कीच आवडत असते, आणि श्री.चिंजं यांचा हा 'पानसिंग' देखील त्याच धाटणीतील आहे. संवाद बोलणारा इरफान खान आणि डोळ्यांनी बोलणारा इरफान खान ही दोन्ही रुपे फार भावतात. अभिनय तो करत आहे हे कधीच जाणवत नाही.

    चित्रपटांपूर्वीही माझ्या स्मरणात आहे त्याची छबी आहे ती कुमारी एकता कपूर यानी 'केकेके' चा मारा टीव्हीवर करण्यापूर्वीच्या काळातील "स्टार बेस्टसेलर्स" नावाची प्रत्येकी एक तासाची मालिका. जवळपास २०-२५ एपिसोड झाले होते [एकाचा दुसर्‍याशी संबंध नव्हता] आणि मला वाटते काही एपिसोड्स 'पानसिंग' चे दिग्दर्शक तिगमांशु धुलिया यानीही हाताळले होते. पैकी एक आठवणीतील म्हणजे खुद्द इरफान खानचा किराणा माल विक्रेत्याच्या भूमिकेतील. याला वाटत असते की अपंग घरमालकाची [अन्नू कपूर] तरणीताठी देखणी बायको आपल्यावर खूश आहे, आपल्याला पटविण्याच्या प्रयत्नात आहे. पण प्रत्यक्षात खुद्द इरफान पत्नी अखेरीस व्यभिचारी असल्याचे सिद्ध होते आणि तिचे हे वर्तन इरफानला कसे सांगावे या प्रयत्नात अन्नू कपूर आणि त्याची बायको असतात. अभिनयाची शर्यतच होती या चार पात्रांत.

    'पानसिंग तोमर' नक्कीच पाहाणार.

    [अवांतर : पॅरालल सिनेमाचा लेखाजोखा घेताना श्री.चिंजं यानी वापरलेले "पण कधी भयाण म्हणता येतील इतके वाईट असत" हे वाक्य त्या चळवळीवर काहीसे अन्यायदर्शक आहे असे व्यक्तीशः मला वाटते. बंगाली मल्याळी बाजूला ठेवू, पण हिंदीत ज्याला प्रायोगिक म्हणता येतील असे जवळपास सर्व चित्रपट मी पाहिले आहेत. त्यात "भयाण" गटात बसू शकेल असा एकही नाही. अर्थात हे माझे मत आहे.]

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    चित्रपट मस्तच आहे. आजच्या भाषेत बोलायचे म्हणजे 'हटके' आहे.

    कालच मूव्हर्स अँड शेकर्सला तिग्मांशु धुलियाची छोटीशी मुलाखत शेखर सुमनने घेतली. तिग्मांशुला १५ वर्षापासून हा चित्रपट बनवायचा होता. आपला पहिला चित्रपट हाच असावा अशी देखील त्याची इच्छा होती. बँडेट क्विनच्या वेळेसच आपण इरफानला ह्या चित्रपटाविषयी बोललो होते असे तिग्मांशुने सांगितले.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
    Only Fairy Tales Have Happy Endings ...
    आमची राज्ये :-
    राज्य १
    राज्य २

    उत्तम चित्रपट! इरफान ने व्यक्तीरेखेचा इनोसन्स मस्त पकडून ठेवलाय शेवटपर्यंत.
    तिगमांशूचा "साहब, बिवी और गँगस्टर" पण झक्कास आहे.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    हा चित्रपट मी पाहिलाय
    जबरदस्त डिटेलिँग केलय
    तिँगमाशुने
    त्यासाठी पैकीच्या पैकी मार्क्स त्याला
    इरफानबद्दल प्रश्नच नाही
    पानसिंग तोमर जगलाय तो
    तरुण पानसिँग ते मध्यमवयीन पानसिँग ताकदीने ऊभा केलाय त्यान
    देश के लिए भागा तो किसीने ध्यान नही दिया
    अब बागी बन गया तो पेपरमे नाम आया हे वाक्य ज्या तिरकसपणाने तो म्हणतो त्याला तोड नाही

    चित्रपटाची भाषा सुरुवातीला मला कठीण वाटली पण नंतर पकड घेतली
    एकदरीत एकदा पाहावा असाच चित्रपट आहे

    तिगमाशूचा चरस हा चित्रपटही पहावा असा आहे

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    .

    .

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    --मनोबा
    .
    संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
    .
    memories....often the marks people leave are scars

    'पानसिंग तोमर' उर्फ छा गये इरफान!- यातच खर सगळ आलय.
    तुमचे लेख वाचनीय असतात. लेखन सुरु ठेवा. नवी माहिती मिळते.
    सोनाली

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    एका शब्दपेक्षा दोन बरे.

    >>पॅरालल सिनेमाचा लेखाजोखा घेताना श्री.चिंजं यानी वापरलेले "पण कधी भयाण म्हणता येतील इतके वाईट असत" हे वाक्य त्या चळवळीवर काहीसे अन्यायदर्शक आहे असे व्यक्तीशः मला वाटते. <<

    काही चित्रपट वाईट असल्यामुळे सबंध चळवळ वाईट असा त्याचा अर्थ मला अभिप्रेत नाही. कोणतीही गोष्ट फॉर्म्युला बनली की मग त्यात हिणकस येतंच. तसं ते या चळवळीतसुद्धा आलं होतं एवढंच म्हणायचं आहे.

    >>हल्ली माझ्या मित्रमंडळित उगीचच इरफानच्या चित्रपटाला गेल्यावर जबरदस्तीने त्याला चांगले,अप्रतिम, युगानुयुगातून येणारा एकमेव नेत्रदिपक वगैरे वगैरे सिनेमा म्हणण्याचा आग्रह केला जातो.<<

    शक्य आहे. 'पानसिंग' अप्रतिम किंवा नेत्रदीपक असण्याचा दावा मी अजिबातच केलेला नाही. उलट 'आय. एस. आय. ब्रॅन्ड'मध्ये प्रमाणीकरण अपेक्षित आहे. आजचा बरा सिनेमा सर्वसाधारणतः जी वैशिष्ट्यं घेऊन येतो तीच 'पानसिंग' घेऊन येतो. 'बँडिट क्वीन' तत्कालीन प्रवाहापेक्षा वेगळा होता. 'पानसिंग'बाबत तसं म्हणता येत नाही. याचा अर्थ सिनेमा वाईट आहे असा नाही, पण तो युगप्रवर्तक नक्कीच नाही.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    - चिंतातुर जंतू Worried
    "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
    भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

    चित्रपटाला श्रेणी देत जा बरं -
    तीन स्टार - बघायला हरकत नाही
    चार स्टार - जरुर बघा वेळ मिळाला की
    पाच स्टार - चला उशीर करु नका

    पण चिंजं हे एखाद्या सिनेमात किमान दम असल्याशिवाय थेट परिक्षण लिहीत नाहीत असा अनुभव आहे त्यामुळे एकदा बघायला हरकत नाही असा असावा, असो बघेन सध्या ह्या सिनेमाला अडीच ते तीन जंतू स्टार असावेत असे वाटतेय.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    अडीच ते तीन जंतू स्टार असावेत असे वाटतेय.

    स्टार हा शब्द अनावश्यक वाटतो आहे.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    ---

    सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

    नेहमीप्रमाणेच उत्तम परीक्षण! सिनेमा नक्कीच पाहवासा वाटतो आहे,
    स्वाती

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    >>पुढच्या वेळ पासुन चित्रपटाला श्रेणी देत जा बरं <<

    चित्रपट परीक्षणांमध्ये श्रेणीव्यवस्था मला तितकीशी प्रिय नाही. निखळ मनोरंजन करणाऱ्या 'दबंग'ला केवळ तो पुरेसा 'उच्चभ्रू' नाही म्हणून कमी स्टार देणं मला आवडणार नाही. याउलट 'उच्चभ्रू' सिनेमांमध्ये सत्यजित राय आणि मणि कौलचे सिनेमे परस्परांहून खूपच वेगळे (आणि तरीही आपापल्या परीनं चांगले) आहेत, अन् 'मनोरमा सिक्स फीट अंडर' त्या दोहोंहून वेगळा (पण चांगला) आहे. या सगळ्यांना एक श्रेणीपद्धती लागू करणं मला काहीसं निरुपयोगी वाटतं. त्यापेक्षा लिहिलं आहे ते काळजीपूर्वक वाचलं तर ज्याला जे भावेल ते तो पाहू शकतो.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    - चिंतातुर जंतू Worried
    "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
    भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

    श्रेणी व्यवस्था म्हणजे बहुदा उच्च, कनिष्ठ अशी समजत आहात. तसेच गंभीर आर्ट फिल्म, मसाला बाजारु फिल्म समजत आहात.

    मी म्हणालो की चित्रपट तुमच्या मते लगेच्या लगेच बघण्याजोगा आहे की निवांत इतका निवाडा/रेटींग्/श्रेणी द्या. त्या संबधीत श्रेणी.
    तीन स्टार - बघायला हरकत नाही
    चार स्टार - जरुर बघा वेळ मिळाला की
    पाच स्टार - चला उशीर करु नका

    बाकी सिनेमा बघणे व आवडणे ही ज्याची त्याची... Smile

    बादवे ते आय एस आय ब्रँड विवेचन आवडले.

    जाताजाता - तुम्ही न बघीतलेले असे हिंदी. फ्रेंच, तसेच अवॉर्ड विनिंग कोणते सिनेमे आहेत का हो? Wink

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    प्रस्तुत सिनेमा परवा बघणेंत आला. जंतू यांच्या परीक्षणाला दाद देतो. कळावे.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

    हात्तिच्या, हा चित्रपट बघितल्यावर इतका इंप्रेस (इरफान आणि तिग्मांशु मुळे) झालो होतो की त्याचे परिक्षण टाकायचे मनात होते.
    पण चिजंचे परिक्षण त्याआधि आले आणि एकदम झक्कास आले. मनातले विचार एकदम प्रगट झाल्यासारखे वाटले.

    जाता जाता: आता तिगमांशुचा 'हासिल' किंवा 'साहिब बीवी और गँगस्टर' पाहायला हवा.

    पानसिंग पहाच्या आधि होमवर्क म्हणून 'हासिल', 'साहिब बीवी और गँगस्टर' आणि बॅन्डिक्ट क्वीन बघून घेतला होता.
    चिजं, 'साहिब बीवी और गँगस्टर' पहाच. सध्याच्या घडीला काही खास प्रयोगशील दिग्दर्शकांमध्ये तिग्मांशु मोडतो.

    आणि इरफान बद्दल काय बोलणे, हा माणूस फक्त डोळ्यांच्या सहाय्याने प्रसंग जिवंत करतो नव्हे तो डोळ्यांनी बोलतो. त्याच्या डोळ्यांचा फार छान वापर केला आहे तिग्मांशुने.
    थोडक्यात ज्यांनी अजुन बघितला नाही हा सिनेमा त्यांनी जरूर बघाण्याचे करावे Smile

    - (तिग्मांशुचा पंखा) सोकाजी

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0

    इरफान एक उत्तम अभिनेता आहे...त्याचा अभिनय मला आवडतो.
    पिच्चरसुद्धा भारी आहे.

    • ‌मार्मिक0
    • माहितीपूर्ण0
    • विनोदी0
    • रोचक0
    • खवचट0
    • अवांतर0
    • निरर्थक0
    • पकाऊ0