मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३४
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रकुलगुरू म्हणजे नक्की कोण? काय जबाबदाऱ्या असतात? गेल्या काही दिवसांत दोन-तीन ठिकाणी ह्याबद्दल वाचले. मला ह्यापूर्वी फक्त कुलगुरू आणि कुलपती (हे बहुतेक राज्यपाल असतात) ही पदे माहीत होती.
प्रति-कुलगुरू ?
ते कदाचित 'प्रो-वाईस्-चॅन्सलर' चे मराठीकरण असावे. प्रति-कुलगुरू असे अपेक्षित असावे, असा अंदाज.
म्हणजे टेंपरवारी पदभार सांभाळणारे कुलगुरू.
(खरे तर प्र-कुलगुरू म्हणजे कुलगुरूपेक्षा एक पायरी वर असा तार्किक अर्थ होतो. अध्यापक-प्राध्यापक, आचार्य-प्राचार्य, इ.)
बिगरतज्ज्ञ कयास
लोणकढे तूप म्हणजे शुद्धतेची खात्री असलेले तूप. औपरोधिक प्रयोग की थापेची शुद्धता (म्हणजे सत्याचा अंश शून्य) हे खात्रीलायक आहे.
थापाड्या थापा सांगतो, थापांत खोटेपणावर व्याज अशी नाटकीयता असते. खोटारडा खोटे बोलतो, ते सत्य नसते, इतकेच. इंग्रजीत "tall tales" आणि "lies" यांच्यात जो फरक असावा, तोच अनुक्रमे "थापा" आणि "खोटे" यांच्यात असावा.
लोणकढे
लोणकढे तूप म्हणजे लोणी कढवून केलेले तूप. शब्दाचा उगम बघितलेला नाही पण साधारणतः १९३०-४० च्या आगेमागे लोणकढ्या शुद्ध तुपाला पर्याय म्हणून वनस्पतितूप बाजारात आले. त्या काळात फेरीवाले घरोघर लोणी-तूप विकत. वनस्पतितुपाहून आमचे तूप वेगळे आहे, शुद्ध लोण्यापासून कढवलेले आहे असे ते सांगत. अर्थात बरेच वेळा लोणकढे तूप ही थापच असे. त्यात भेसळ निघे.
जाताजाता : लोण्याचेही अनेक प्रकार असत. बेळगावी, खान्देशी, कोईम्बतुरी अशी नावे असत. खान्देशी लोणी चांगले समजले जाई. केळीच्या कोवळ्या पानात लोणी बांधून देत. खान्देशात केळ्यांची लागवड इतपत जुनी आहे की काय माहीत नाही. पण कोणेएकेकाळी मुंबईत केळी म्हटल्यावर ती वसईचीच असत. जळगावची केळी मुंबईत खूप उशीरा आली असावीत.
अमुक वजनाचे लोणी कढवल्यास त्यातून अमुक वजनाचे तूप निघाले पाहिजे असा ठोकताळा असे. (अजूनही असणारच,पण आता त्याची गरज पडत नाही.) त्यानुसार अपेक्षेइतके तूप निघाले नाही की मग फसले गेल्याची जाणीव होई. अर्थात हे नेहमीचेच असे. किराण्याच्या वाण्याने फसवले तरी ते गोड लागत असे तसेच हे. 'हात मेल्या' अशी शिवी द्यायची आणि पुन्हा त्याच वाण्याकडे जायचे हे ठरलेलेच असे.
ता.क. अजूनही कित्येक ठिकाणी लोणी कढवून केलेल्या तुपाला लोणकढे तूपच म्हणतात. वनस्पतितूप येण्याआधीच्या काळात तुपाल वेगळे विशेषण देण्याची गरज भासली नसावी. तूप म्हणजे एकच तूप, लोणकढे तूप.
आस्पेक्ट रेशिओ (आरे)आणि
आस्पेक्ट रेशिओ (आरे)आणि संस्थळाची फोटो दाखवण्याची क्षमता याबद्दल कोणी सांगेल का ? आता वेगवेगळे आरे वापरण्याचे पर्याय असलेले चांगले मोबाइल कैमरे मिळत आहेत तर कोणता आरे वापरावा ?प्रश्न योग्य ठिकाणी सरकवला तरी चालेल.
लोणकढीबद्दल लोणी कढवून निवळून घेतल्यावर पातेल्यात राहिलेल्या थोड्या तुपाचा {आणि त्याबरोबर बेरीही असते} वापर करण्यासाठी त्यातच जिरे आणि पातळ ताक टाकून बरेच उकळले की बेरी सुटते, पातेले साफ होते आणि कढीही होते ही लोणकढी.
थोड्या तुपाचा {आणि त्याबरोबर
थोड्या तुपाचा {आणि त्याबरोबर बेरीही असते} वापर करण्यासाठी त्यातच जिरे आणि पातळ ताक टाकून बरेच उकळले की बेरी सुटते, पातेले साफ होते आणि कढीही होते ही लोणकढी
वा! हे माहीत नव्हते. फारच उत्तम उपयोग आहे बेरीचा. आम्ही साखर घालून लालसर बेरी खायचो. काय मस्त लागायची.
दिवाळ्याचा अर्ज मागवून ठेवा आत्ताच!
सुदैवी असलात, तर उपयोगास येईल.
बोले तो, तुम्ही असा धंदा सुरू केलात, तर मुळीच चालणार नाही. कारण तुम्ही कोणीही नाहीत, फडतूस आहात, नगण्य आहात, तुम्हाला प्रतिष्ठा नाही. उलटपक्षी, एखाद्या मोठ्या देवस्थानाने नाहीतर धर्मपीठाने असे काही केले, तर त्यांचा जबर धंदा चालेल, आणि त्याकरिता तुमचे मात्र भांडवल (एकेए गुळाचा गणपती) होईल.
साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी एका वेड्याने असाच प्रयोग करून पाहिला होता. खिळ्यांनी ठोकून घेऊन मरावे लागले बिचार्याला. नंतर मग त्याच्याच नावावर (आणि त्याच्याच मेल्या जिवावर) नेमका तुम्ही म्हणता अगदी तस्सा धंदा काढून वेगळीच मंडळी गबर झाली.
(हं, त्याने पापे डोक्यावर घेण्याचे दरडोई पैसे मागितले नव्हतेन. कारण तो फडतूस होता, आणि त्याला बिझनेस नॅक अजिबात नव्हती. आणि एकट्याने व्यवस्थेला टक्कर देण्याच्या खुळचट कल्पना घेऊन चालला होता. पण पैसे न मागताच जर खिळे ठोकून घेऊन मेला, तर पैसे मागितले असतेन तर अशा फडतूसाचे काय हाल झाले असते, विचार करा. प्रस्थापितांना इतरांची काँपिटीशन कधीच आवडत नसते. त्यापेक्षा प्रस्थापितांची एजन्सी घेतली असतीन, तर नुसत्या कमिशनवर कुठल्या कुठे गेला असता. दक्षिण कोरिया, सिंगापूरसारखा!)
तेव्हा पहा बुवा विचार करून! किंवा काढायचाच असला धंदा, तर स्वतःचा स्वतंत्र लघुउद्योग नका काढू, कोणा प्रस्थापिताची फ्रँचाइझ वगैरे घ्या. म्हणजे ऐश करता येईल.
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा. कसें?
इसिस ?
मध्यपूर्वेतला सध्याचा पावर गेम असा दिसतो :-
शिया राजघराणे असल्याने सिरिया-इराण मैत्री. सिरिया-इराण ह्यांना रशियाचा पाठिंबा.
सिरियन सरकार उलथवून पाहणारे काही हिंसक बंडखोर गट. ह्यातला सर्वात आघाडीचा इसिस.
पण इसिसने सिरियन सरकारला दणके देतानाच शेजारच्या अव्यवस्था माजलेल्या इराकमधीलही काही भागावर कब्जा केला.
म्हणून ह्या इसिसविरोधात इराक सरकार आहे. इजिप्त, जॉर्डन, लेबेनॉन ह्यातल्या प्रत्येक देशाने इसिसवर हल्ले केलेत.
हे देश अमेरिकेच्या सांगण्याबाहेर नाहित. स्वतः अमेरिका इसिसविरुद्ध आहे. सौदी घराण्याला हे आपला इलाखा घेतील का काय ही भीती.
त्यामुळे सौदी अरेबिया-- त्या भागातील सर्वात श्रीमंत व आकार, आंतरराश्ट्रिय कॉण्टॅक्ट्स वगैरेनीही मोठा देश ह्यांच्या विरुद्ध आहे म्हणे
म्हंजे आख्खी अमेरिका लॉबी इसिसविरोधात, अॅण्टीअमेरिका लॉबी ( रशिया -इराण वगैरे ) विरोधात.
तरी हे इतक्या काळापासून लढताहेत.
हे कसं शक्य आहे ? नक्की कोणते अंडरकरंट्स असावेत जे ह्यांना मदत करताहेत ?
ही लोकं शस्त्रं कुठून आणताहेत ?
सतत लढायला ह्यांना पैसे कोण देतय ?
लढत असताना ह्यांच्या खाण्याची सोय काय ? (सगळेच शेजारी ह्यांच्या विरुद्ध आहेत. आणि ह्यांचा स्वतःचा एरिया तुफान हाणामारीमुळे उध्वस्त झाला असणार.)
नक्की काय भानगड आहे.
धाग्यांचे खरडफळे कुठे होतात
धाग्यांचे खरडफळे कुठे होतात बे? उगा कायतरी बोलतो :-P.
खरडफळा किंवा वाहता धागा पर्याय मीदेखील सुचवलेला काही दिवसांपुर्वी. खफ फक्त सदस्यांकरता होइल. वाहता धागा वाचकांनादेखील पाहता येइल. ५० एक प्रतिसादांची क्षमता पुरेल वाटते. किंवा दररोज रात्रौ १२ला क्लिअर करायचं आणि त्याचवेळी दिनविशेषदेखील बदलायच ऑटोमेटीक ;-).
आणि त्याच धर्तीवर, ज्येष्ठ
आणि त्याच धर्तीवर, ज्येष्ठ बँक कर्मचार्यांच्या कपाळावर आठ्या पडतात (सतत) कारण - कसलं डोंबलाचं कारण, काहीही कारण नसतं, उगा माज आणि चिडचिड करत असतात. अता तर काय म्हणे बँक कर्मचार्यांचे पगार वाढवणार, पण तरीही ह्यांच्या चेहर्यांचे भाव (एक्सप्रेशन वाले भाव) मात्र काही वाढणार नाहीत...
हा प्रश्न रास्त आहे. शहरात
हा प्रश्न रास्त आहे. शहरात जास्त पक्षी मेलेल्या अवस्थेत दिसत नाहीत.
जंगलात एकूण इतर प्राणीही कमी वेळा मढ्याच्या अवस्थेत शिल्लक दिसतात. तेही बहुतांश मोठ्या आकाराचे.
पक्ष्यांबाबत:
अ. पक्षी आजारी अथवा वयस्क झाला की फक्त मांजर नव्हे तर इतर खूप खूप वेगळाले टपलेले शत्रू तो पक्षी मरेस्तोवर थांबत नाहीत. नीट उडता येत नाही असे झाले की ते दुबळे पक्षी ईझी प्रे म्हणून आधीच बळी पडून खाल्ले जातात.
ब. तरीही एखादा नैसर्गिक मेला तर त्याला खाणारे इतर पक्षीच खूप असतात. मांजर हा एक शेवटच्या ओप्शन्सपैकी आहे.
कावळे, किनारपट्टी भागात गल्स, माळांवर खोकड, तरसे असे भरपूर इम्मिजिएट टेकर्स असतात. मुंग्या आणि किडे हे अंडरएस्टिमेटेड अंडरटेकर्स आहेत पण खूप उरक असलेले.
मोठ्या प्राण्याचे बायोमास जास्त असल्याने थोडावेळ तरी ते शिल्लक दिसतात. लहान पक्षी हा जवळजवळ बाईटसाईझ असतो त्यामुळे तो रस्त्याकडेला पडलेला दिसण्याइतका टिकत नाही.
आपण फार घनगंभीर, विद्वान,
आपण फार घनगंभीर, विद्वान, प्रकांड पंडीत, उच्चभ्रू, शिस्तबद्ध, अभ्यासू, शांत, प्रगल्भ, सभ्य, सज्जन, इ इ आहोत असे इंप्रेशन ऑफिसमधे द्यायचे असेल तर काय काय करावे? आपण तसे रतिभरही नसताना काही जास्त करायला लागेल का? शिवाय असं इंप्रेशन देणं (असणं देवाला वाहिलं) कठीण असतं का? काही सोपे सोपे उपाय आहेत का? असं असायला काही सवयी हळूहळू चालू करता येतील काय? त्या कोणत्या?
कमी बोलण्याने मदत होईल. पण
कमी बोलण्याने मदत होईल. पण सोबतच जे कै बोलत आहोत ते त्या श्रेणीचे देखिल वाटले पाहिजे हे महत्त्वाचे. ते कसं करावं? तोंडातून गंभीर कै फुटतच नसलं तर? माझ्याभोवतीचे अनेक लोक आपले ऑफिसकार्य अत्यंत गंभीरपणे करत असताना दिसताना. पण मला कामात गंभीर कै दिसतंच नै.
मुख्य म्हणजे हापिसात फार कमी
मुख्य म्हणजे हापिसात फार कमी बोलायचे. जे बोलायचे ते थेट साहेबाशीच. हसणे तर वर्ज्यच. जेवायला, चहा प्यायला एकट्याने जावे. हवे तर सोबत एखादे जाडेसे पुस्तक बाळगावे. अधूनमधून, क्वचित कधीतरी हापिसात उशिरापर्यंत थांबावे. फार वेळा असे करायची गरज नाही. फक्त आपण थांबल्याचे किमान ३ माणसांच्या लक्षात येईलसे पाहिले पाहिजे. या प्राथमिक पायर्या. या जमल्या, तर मग पुढचे तुम्हांला आपोआप जमेलच. ;-)
अतिशय असहमत याने अजोंना हवे
अतिशय असहमत
याने अजोंना हवे आहे ते इंप्रेशन अजिबात जमणार नाही. उलट माणूसघाणा/तुसडा अशी इमेज होईल.
===
उलट सगळ्यांशी नीट बोलावे. आपले उच्चपदस्थ सोडल्यास इतरांशी अतिशय चांगले संबंध ठेवावेत व त्यांच्याशी कामाव्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीवर बोलावे. वेळप्रसंगी शक्य असल्यास त्याचेही एखादे काम करून त्यांना आपल्या बाजुने करून घ्यावे
मग उच्चपदस्थांसोबतच्या अशा मिटिंगांमध्ये (विशेषतः जिथे आपल्यावर काम येणे कठीण आहे) तिथे मोठ मोठे फंडे द्यावे आणि त्याच मिटिंगमध्ये सगळ्यांसमोर ते काम एखाद्याच्या गळ्यात अडकवूनही टाकावे, आणि वर "मी हे नक्की करवून घेईन" असेही सांगून कामाची ओनरशिप मात्र स्वतःकडे ठेवावी.
इतरांशी संब़ध चांगले असल्याने तो ही हे हसत हसत करेल. ओनरशिप तुमची असल्याने क्रेडीट तुम्हाला मिळेलच. :)
असो.
मुख्य म्हणजे हापिसात फार कमी
मुख्य म्हणजे हापिसात फार कमी बोलायचे.
हे अवांतर बोलण्याबद्दल म्हणता येईल. पण मिटिंगा लिड करताना बोलावेच लागते.
जे बोलायचे ते थेट साहेबाशीच.
माझं रिपोर्टींग मॅनेजिंग डायरेक्टरला आहे. त्याच्यापेक्षा मोठा साहेब कंपनीत नाही. त्याच्यासोबत जितकं जास्त बोललं तितकं जास्त काम मिळतं. अशा लोकांचं एकेक वाक्य म्हणजे एकेक असाईनमेंट असते. म्हणून मी त्याच्यासमोर बोलतच नाही शिवाय तो देखिल शक्य तितके कमी बोलेल अशी काळजी (मी) घेतो. पण तरीही लोक मला फार छछोर समजतात. छछोर नैतर मग "अज्ञानी बालक" समजतात. म्हणे प्रगल्भ लोकांचे एक लूक्स असतात.
जेवायला, चहा प्यायला एकट्याने जावे.
जेवायच्या वेळी कँटीन खचाखच असते. चहा टेबलावर मिळतो.
हवे तर सोबत एखादे जाडेसे पुस्तक बाळगावे.
ही जनरली असतातच. पण टेंडर्स , इ. काही भयप्रद टायटल्स सजेस्ट करता आली तर पहा.
उशिरापर्यंत थांबावे.
हे पण नेहमीचे आहे. खूप लोक उशिरा थांबतात. शनिवारी येतात. रविवारी येतात. म्हातार्या बॉस लोकांची लेकरे त्यांची वाट नै पाहत. मग असतात पडीक ऑफिसात. त्यांना बीट करणे असंभव. एरवीच हे खूप काम देतात. गेल्या एका मंगळवारी सुट्टी होती. दिवसभर काम चाललेले. काल, परवा अनुक्रमे १२ आणि ६ तास घरून काम!!! त्याचा मेल १५-२० जणांना. पण कोणाला कौतुक नाही.
हो पण
माझं रिपोर्टींग मॅनेजिंग डायरेक्टरला आहे.
हो पण कंपनीत एकूण लोक किती आहेत, कंपनीचा आकार काय आहे हेही महत्त्वाचं आहे. माझा मित्र एका बुटिक कंपनीत काम करतो. आणि सांगतो की मी डायरेक्ट सीईओला रिपोर्ट करतो. तिथं सगळ्या कर्मचाऱ्यांची मिळून संख्या २०. त्यातले १६ जण सीईओला रिपोर्ट करतात.
सायटींचा चॉइस
आपण फार घनगंभीर, विद्वान, प्रकांड पंडीत, उच्चभ्रू, शिस्तबद्ध, अभ्यासू, शांत, प्रगल्भ, सभ्य, सज्जन, इ इ आहोत असे इंप्रेशन ऑफिसमधे द्यायचे असेल तर काय काय करावे?
पहिली गोष्ट म्हणजे ऑफिसातून ऐसी, मिपा वा तत्सम सायटी बघणे बंद करा. स्क्रीनवर कायम एखादी आकडे भरलेली एक्सेल शीट उघडून ठेवा (आकडे कसले आहेत ते महत्वाचे नाही).
नेटवरून बघायच्याच असतील तर एकॉनॉमिक टाईम्स, बिझनेस स्टॅन्डर्ड अशा सायटी उघडून ठेवा (अधून-मधून, कायम नाही). बरं, त्या सायटी वाचायलाच पाहिजेत असे काही नाही. नुसत्याच उघडून ठेवा.
अरुण जोशींसाठी काही उपाय. १.
अरुण जोशींसाठी काही उपाय.
१. शुक्रवारी कॅज्युअल ड्रेस घालून जायला परवानगी असते. पण कधीही फॉर्मल ड्रेसमध्येच जावे.
२. व्हॉट्स अॅपवर जोक येतात ते कधीही फॉरवर्ड करू नयेत. म्हणजे तुमच्याकडून ऑफीसच्या लोकांना कुठलाही जोक पाठवला जायला नको. पाठवलाच तर इंटेलिजंट / मॅनेजमेंट जोक पाठवावा.
आणखी आठवले तर सांगतो.
(१) आपण जोवर कंपनीत आहोत तोवर
(१) आपण जोवर कंपनीत आहोत तोवर "त्या" कंपनीच्या सहकार्यांना फेसबुकवर कधीही अॅड करु नका. कारण आपण किती वेळ फेसबुकवर असतो ते त्यांना कळतं.
(२) आल्यावर "हाय", निघताना "बाय" करायचं नाही कारण जेव्हा नातं बिनसतं तेव्हा आपल्याला तसं वागता येत नाही. अन आपणच अपेक्षा वाढवून ठेवल्या असल्याने, ते लोकांच्या लक्षात येतं.
दोरीमुळे नियमित रिदम
दोरीमुळे नियमित रिदम येण्यासाठी एक साधन मिळतं आणि दोरीत न अडकता आणि पाऊल न चुकता सही टायमिंगने उड्या मारणे या कृतीत एक मनोरंजक समाधान मिळतं की जे नुसतं अनियमित उड्या मारुन मिळत नाही. शेवटी रिच्युअल्स, कर्मकांडं सगळीकडे आहेतच कारण ती विशिष्ट काहीतरी क्रमाने अन नियमाबरहुकूम केल्याचा फील देतात.
कॉलिंग पी डी विणा.
कॉलिंग पी डी विणा.