Skip to main content

म्हातारी ग मैना


लांब सडक केंसावरी
हात फिरविला तिने
विग खाली पडली.


दर्पणात छवी पाहुनी
जोरात ती हसली
कवळी खाली पडली.



उचलताना कवळी
चष्मा पडला खाली
दिसे केवळ अंधार.


म्हातारी ग मैना
कर भक्तीचा शृंगार
झाला फिका संसार.

अजो१२३ Mon, 23/02/2015 - 16:03

In reply to by विवेक पटाईत

म्हातार्‍या मैनांना कोssssणी वाली नाही. पण विवेककाका स्त्रीयांना असं डिचवणं बरं नव्हे. सुंदर असणे, सुंदर दिसणे, सुंदर मानले जाणे त्यांच्या दृष्टीने फार गरजेचे असते. शिवाय तारुण्य कंपनीला दिल्यावर म्हातारपण देवाला देणे खूपच अन्यायकारक आहे.

ऋषिकेश Mon, 23/02/2015 - 16:16

मला कविता आवडली.

--

जालावर युट्युबवर महान मुलांचे "मामाच्या गावाला जाऊयाचे" एक अ‍ॅनिमेटेड रुपांतर आहे, त्यात मधल्या म्युझिक पीसच्या वेळी गाडीतील वार्‍याने एका व्यक्तीचा विग उडतो म्हणून शेजारील आजोबा त्यांना हसतात, तर फार हसल्याने त्यांची कवळीही खाली पडते नी मग अख्खा डबा त्यांना हसतो असा एक प्रसंग दाखवला आहे.

वरील कविता वाचताना का कोण जाणे ते चित्रीकरण आठवले :)

धनंजय Mon, 23/02/2015 - 20:32

In reply to by ऋषिकेश

मला कवितेतली कल्पना आवडली होती. काही कारणाने "आवा चालली पंढरपुरा" आठवली (त्यात कल्पना थोडी वेगळी आहे, पण नको त्या तपशिलांत गुंतलेल्या बाईने या क्षणभंगुर गोष्टींतून मन काढावे, त्याचे विनोदी वर्णन आहे, हे साम्य).

परंतु येथील लय, यमकांची योजना वगैरे मला भावली नाही, पण तसे तडक सांगावेसे वाटण्याइतकी नावडलीही नाही.

परंतु आता कवीला सांगावेसे वाटते, की याबाबत लक्ष देऊन रचना थोडी नेटकी केली, तर कल्पना खुलून येईल.

उदाहरणार्थ :

> लांब सडक केंसावरी
> हात फिरविला तिने
> विग खाली पडली.

ऐवजी

> लांबसडक केसांवरती
> हात फिरविला तिने
> विग सटकली खाली.

असे थोडे शब्द बदलले, मागे-पुढे केले, तर. विशेषतः शेवटच्या ओळीतील मात्रांच्या वा खटक्याच्या लयीत काहीतरी सुधरते.

धनंजय Tue, 24/02/2015 - 23:56

In reply to by धनंजय

(तुकाराम गाथा, क्रमांक ४१९८)

परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ॥१॥
आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥
ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥२॥
माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥३॥
वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥४॥
उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥५॥
भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥६॥
भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥७॥
सून ह्मणे बहुत निकें । तुह्मी यात्रेसि जावें सुखें ॥८॥
सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥९॥
सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥१०॥
सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे॥११॥
अतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं॥१२॥
मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥१३॥
तुका ह्मणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥१४॥

-----
तसे बघितले तर "मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर" ही प्रेमळ ओळ आहे.

वृन्दा Mon, 23/02/2015 - 20:00

दरबार जुना, हंड्या-झुंबर नवं,
मध्यान रातीला लावा अत्तरदिवं
अंग अनंग मी रंग खेळते
केसामध्ये मरवा ...
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा ;)

https://www.youtube.com/watch?v=dm0AsKChSAA

मनीषा Mon, 23/02/2015 - 20:25

स्वतःचं वय लपविण्यासाठी धडपडणारी लोकं पाहिली, की त्यांची कीव येते .

स्वतःचं वाढतं वय, आणि अपरिहार्यंपणे येत जाणारं वृद्धत्व कसं स्विकारायचं, ज्या योगे तुमचं जगणं स्वतःबरोबर इतरांसाठी सुद्धा आनंददायक होऊ शकेल, या संदर्भात 'एजिंग ग्रेसफुली' .. असा एक लेख वाचल्याचे स्मरते ..

वृन्दा Mon, 23/02/2015 - 21:37

In reply to by मनीषा

खरं तर वय वाढत जातं तसे आपण अधिकाधिक समृद्ध होतो अन अधिकाधिक चांगल्या रीतीने प्रेम करु शकतो याचे मुख्य कारण "we get more & more comfortable in own skin."
तरुण मुला-मुलींचा हेवा वाटण्याऐवजी मला त्यांच्या immaturity चेच वाईट वाटते. अर्थात ते देखील वयाने वाढतील & they will claim their rightful ripeness हेही तितकेच खरे आहे.
पण तारुण्यात काही खास आहे असे अजिबात वाटत नाही.

बॅटमॅन Mon, 23/02/2015 - 21:41

In reply to by वृन्दा

पण तारुण्यात काही खास आहे असे अजिबात वाटत नाही.

तुम्ही तरुण असाल हो. आमच्यासारख्या क्वार्टरलैफक्रैसिसग्रस्तांचे काय? साला आम्हांला तर आजही (कोणे एकेकाळी इ.) वय वर्षे २० असताना कसे बकाबका वाट्टेल ते अन वाट्टेल तितके विथ इम्प्युनिटी खाऊ शकत होतो आणि हलक्या वजनामुळे आरामात ट्रेकिंग करू शकत होतो त्याच्य आठवणीने गहिवरायला होतं.

वृन्दा Mon, 23/02/2015 - 21:46

In reply to by बॅटमॅन

अरे बॅट्या गद्धेपंचविशी मस्त एन्जॉय कर अन खरं सांगते रे बाबा - समाजाला फाट्यावर मारुन, एन्जॉय कर. Have memories rather than regrets. ;)

वृन्दा Mon, 23/02/2015 - 22:02

In reply to by वृन्दा

तरुण मुला-मुलींचा हेवा वाटण्याऐवजी मला त्यांच्या immaturity चेच वाईट वाटते.

वरील विचाराचीच एक करॉलरी आहे - Many times I wonder what kind of lady will my daughter become? How effectively will she handle situations, crisis, love, heartaches, obsessions, blessings & sorrows that come her way .
अन मला वाटतं अरे आपण जे पडत, धडपडत शिकलो, शिकतो आहोत ते तिला readymade spoon-feed नाही करता येणार का?

अन मग वाटतं तसं करता न येणे हेच बरोबर आहे.Let her EARN her peace of mind, courage & her rightful maturity. It will be far sweeter :)

अजो१२३ Tue, 24/02/2015 - 11:02

In reply to by मनीषा

स्वतःचं वय लपविण्यासाठी धडपडणारी लोकं पाहिली, की त्यांची कीव येते.

आपलं वैगुण्य लपवावं वाटणं मनुष्यसुलभ नाही का?
उदा. "तुम्ही ५० चे आहात. चक्क चक्क ३५ चे वाटता." हे वाक्य प्रचंड सुखावह आहे. सुखाने म्हातारपण काढण्यातल्या मंत्रांमधील एक मंत्र तरूण दिसणे हा देखिल असू शकतो.

अजो१२३ Tue, 24/02/2015 - 13:04

In reply to by अर्धवट

नै हो. तसं नव्हतं म्हणायचं. समजा माझे दात म्हातारपणाने गेले नी मी कवळी लावली. कीव का यावी? तेच मी म्हातारा नाही पण २० वर्षाचा असतानाच अर्धवटरावांनी मला जबरदस्त ठोसा लावून माझी बत्तीसी पाडली. समजा मग मी कवळी लावली. कीव का यावी? मानवजातीची लक्षणीय प्रगती होत असताना साधने उपलब्ध असतील तर त्यांचा उपयोग करणे कीवास्पद कसे असे वाटले म्हणून लिहिले.

अजो१२३ Tue, 24/02/2015 - 13:26

In reply to by अर्धवट

हीच प्रवृत्ती असेल तर उद्या "अखंड तारुण्य आणि अनंत आयुष्य" प्राप्त करून देणार्‍या औषधाचा जो शोध लागेल त्यावर हे लोक तूटून पडतील. ते औषध वापरणारांची कीव करत सुटतील. हे थोडे विचित्र वाटते. इतकेच काय मी क्ष पेक्षा हळू चालतो म्हणून मी बाईक वापरली तरी कीव करतील. याला मर्यादा नको का?
==================
"हा" म्हणजे बत्तीसी तोडायचा? (काय काय मनीषा बाळगून असतात लोक !!! अहो, प्रतिगामीपणा केव्हाचा सोडलाय मी, आतातरी आपलासा करा.)

अर्धवट Tue, 24/02/2015 - 14:11

In reply to by अजो१२३

मनीषा बाळगून नव्हतो हो पण पूर्वकल्पना आणि इच्छा नसतानाही असा अचानक बहुमान मिळाला की त्याचे मोल नक्कीच जास्त नाही का ;)

तुम्ही प्रतिगामी असतानाही आपलेच होतात की, केवळ तुम्ही प्रतिगामी आहात (म्हणजे काय आहात कोण जाणे, पण ते एक असो) म्हणून तुमच्याशी कधी मी भांडल्याचे मला आठवत नाही, मुद्द्यांवरून भांडलो असेन.

मनीषा Tue, 24/02/2015 - 15:51

In reply to by अजो१२३

हीच प्रवृत्ती असेल तर उद्या "अखंड तारुण्य आणि अनंत आयुष्य" प्राप्त करून देणार्‍या औषधाचा जो शोध लागेल त्यावर हे लोक तूटून पडतील. ते औषध वापरणारांची कीव करत सुटतील
औषध वापरणार्‍यांची काय कीव करणार. ? असं काही खरच झालं तर काहींची आयुष्यं नक्की केविलवाणी होतील . कारण कधी ना कधी काही विविक्षित माणसं जातील या आशेवर ते जगत असतात. आता आशाच नाही तर नुसत्या रिकाम्या कल्पना असून काय उपयोग? आणि मग मनीषा तरी कशाची असणार्‍?

अजो१२३ Tue, 24/02/2015 - 16:16

In reply to by मनीषा

कारण कधी ना कधी काही विविक्षित माणसं जातील या आशेवर ते जगत असतात.

अखंड तारुण्य आणि अनंत आयुष्य असणारी मंडळी (किंवा इतरही?) कोणी जातील या आशेवर जगतात? म्हणजे काय? अजिबात कळलं नाही.

वृन्दा Tue, 24/02/2015 - 20:37

In reply to by अजो१२३

मला कळलं पण पटलं नाही. मनुष्य जाण्याची इच्छा करणे हीन वाटते त्यापेक्षा स्वतः स्वतंत्र, मुक्त होणे, स्वतःच्या कृतीची, परीणामांची जबाबदारी घेणे हे डिग्निफाईड वाटते.
परत लिहीते - कोणी तरी जाण्याची इच्छा करणेसुद्धा हीन आहे.

मनीषा Tue, 24/02/2015 - 21:32

In reply to by वृन्दा

इतक्या एक्साइट होऊ नका चिऊताई ...
इथे कुणी कुणाच्या मर णाचे चिंतन करत नाही .
पण आधीचे पासिंजर गाडीतून उतरले नाही तर पुढच्यांना जागा कशी मिळणार?
त्यांनी कायम लटकत रहायचे की काय?

मनीषा Tue, 24/02/2015 - 15:33

In reply to by अजो१२३

स्वतःचं वाढतं वय, किंवा वॄद्धत्वं ज्यांना वैगुण्यं वाटतं त्यांची कीव वाटते हो.
कवळी लावणे वय लपविण्यासाठी नसते असं वाटतं .
तरूण दिसणं सुखावह असू शकतं , पण त्या साठी स्वतःच वय नाकारायची गरज नसते. इतकच

विवेक पटाईत Tue, 24/02/2015 - 21:11

प्रतिक्रिये बाबत धन्यवाद, एका माणसाची विग खाली पडली आणि ही कल्पना सुचली. बाकी तरुण दिसण्याचा प्रयत्न करणे काही गुन्हा नाही. प्रत्येकालाच सदैव चिरतरुण राहावासे वाटते. बर्याच काळ मी ही आपल्या पांढर्या केसांना रंगवीत असे. गेल्या दोन वर्षांपासून बंद केले आहे.(पांढरे केस पाहून मेट्रोत बसायला जागा मिळण्याची शक्यता जास्त). असो.

ॲमी Wed, 25/02/2015 - 08:47

रोचक प्रतिसाद आहेत.
दरवर्षी झाडांची जुनी पानं गळून नवीन, कोवळी पालवी फुटते तसे सापाखेरीज इतर कोणत्या प्राण्यांसोबत होते का?

शहराजाद Wed, 25/02/2015 - 09:23

In reply to by ॲमी

माझी त्वचा वर्षभर थोडीथोडी गळत असते. थोडीथोडीच गळत असल्याने दिसण्यात येत नाही. हिवाळ्यात जरा जास्त गळती असते तेव्हा कधीकधी आंघोळीच्या वेळी टावेलाने घासून उरलीसुरली कात काढण्यात येते. कोवळ्या पालवीसारखी आतली नवी त्वचा वर येईपर्यंत निबर झालेली असते त्यामुळे विशेष फरक दिसत नाही.

पटाईत काका, कविता आवडली.

ॲमी Wed, 25/02/2015 - 10:13

In reply to by शहराजाद

हा हा हा :-D.
विग, कवळी वगैरे पर्याय उपलब्ध आहेत पण सुरकुत्यांच काय करायच विचार करत होते. बोटोक्सचा पर्याय आहे. पण त्यापेक्षा सरळ कात टाकून नवीन मऊमऊ त्वचा मिळाली असती तर बरं झालं असतं :-P. तुम्ही म्हणताय तसं थोड्या प्रमाणात होतं ते; पण नोटीसेबल नसतं ना :-(