मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३५
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढील संवादाबद्दल ऐसीकरांचं मत जाणून घ्यायला आवडेल.
कसं काय वाटलं ते अवश्य कळवा.
( जोडपे शिनिअर शिटिझन आहे)
.
.
नवरा — गेल्या पन्नाससाठ वर्षात एक गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, आता सांगणार आहे ती .
बायको — कोणती ती?
नवरा — तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर.
बायको — इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?
आणि हे काय मला माहीत नव्हतं ?
नवरा — तरीही एकदा सांगावंसं वाटतं.
बायको — एक विचारु का ? रागवायचं नाही हं.
नवरा — विचार.
बायको — मला सवती किती होत्या!
नवरा — बापरे! आठवणीच्या मावळतीवर हे जुने जमाखर्च आता कसे लक्षात येणार? पण तुला एक सांगतो, तुला सवत कुणीही नव्हती. होत्या त्या फक्त माझ्या
मैत्रिणी होत्या.
बायको — मी मैत्रिण नव्हते ?
नवरा — तू बायको होतीस.
बायको — बायको मैत्रिण असू शकत नाही ?
नवरा — असू शकते, असतेही; पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. दिवाणखाना कमी असतो, पण देऊळ जास्त असते.
आकाश कमी असते, पण पृथ्वी अधिक असते.थोडक्यात, बायको हे एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी.
गलबत शिडं उभारुन सातासमुद्रात मुशाफरी करायला बाहेर पडतं.हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही.
या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळवा-याशी मुकाबला करावा, चंद्रचांदण्यांशी सोयरीक करावी. संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी.
जगणं असं असावं की पावला-पावलांवर मरणाशी मुलाखत व्हावी.परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहात असतं आपल्या बंदराकडे.
पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात, प्रशान्त पाण्याच्या गालिच्यावर विश्रांत होतं.
गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं...
अशी आहे बंदराची महती..
म्हणजे बायकोची....
म्हणजेच तुझी!
.
.
.
काहिंनी ह्याची बोळवण "पकाउ साला, लेक्चबाजी" , "शब्दबंबाळ" , "सावन की घटा गाणार्याचा म्हातारा झाला की सावन की घटा स्टाइल प्रवचन-उपदेश" अशी केली आहे. काहिंना हे काहीतरी अत्यंत सेन्सिबल, उच्च वगैरे वाटलं. तुमचीही मतं जाणून घ्यायला आवडेल.
सखाराम गटणे
असू शकते, असतेही; पण मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते. दिवाणखाना कमी असतो, पण देऊळ जास्त असते.
आकाश कमी असते, पण पृथ्वी अधिक असते.थोडक्यात, बायको हे एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी.
गलबत शिडं उभारुन सातासमुद्रात मुशाफरी करायला बाहेर पडतं.हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही.
या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळवा-याशी मुकाबला करावा, चंद्रचांदण्यांशी सोयरीक करावी. संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी.
जगणं असं असावं की पावला-पावलांवर मरणाशी मुलाखत व्हावी.परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहात असतं आपल्या बंदराकडे.
पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात, प्रशान्त पाण्याच्या गालिच्यावर विश्रांत होतं.
गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं...
अशी आहे बंदराची महती..
म्हणजे बायकोची....
म्हणजेच तुझी!
ही भाषा पुस्तकातच बरी!
असल्या भाषेत कुणी बोलत नाही आणि बोललेच तर, त्याला 'सखाराम गटणे' असे म्हणतात! ;)
जवळ जवळ प्रत्येकच धाग्यावर,
जवळ जवळ प्रत्येकच धाग्यावर, धाग्याचा विषय सोडुन काहीतरी वेगळ्याच प्रतिसादांची लाईन लागलेली असते. त्या प्रतिसादांचा धाग्याशी काही संबंधच नसतो. बर्याच वेळा एक एक ओळीचे चाट केल्या सारखे प्रतिसाद असतात. संपादक असे प्रतिसाद बाजुला काढुन एखाद्या कायम चालणार्या खरडवही सारख्या धाग्यावर का हलवत नाही?
त्या केसमध्ये मी पूर्णच असहमत
त्या केसमध्ये मी पूर्णच असहमत आहे. तिथे प्रतिसाद हलवायचं काही कारणच नव्हतं. एरवी इतके अवांतर प्रतिसाद हलवले जात नाहीत पण तोच प्रतिसाद हलवला गेला याचं कारण त्या एका संपादकाला आपला बायस नियंत्रणात ठेवता आला नाही इतकंच आहे. ती केस इतकीच माझ्या आरोपाची व्याप्ती आहे.
मग काय झालं शरीर बदललं तरी
:) मग काय झालं शरीर बदललं तरी आत्मा तोच असतो. ते गीतेतील काय श्लोक आहे -
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः||
____
साक्षी मुलीचे नाव :P
आदूबाळ तुम्ही नेहमी माझी विकेट घेता. माझ्या डोक्यात उशीरा प्रकाश पडतो.
काडी
ऐसीच्या नैसर्गिक पुरोगामी कलाच्या विरोधात वर्षभर इतकं टोकाचं लिहूनही संपादक इ इ लोक मधे पडले असं मला कधी वाटलं नाही.
तुमची गोष्ट वेगळी आहे हो! तुमचे किती किती म्हणून प्रतिसाद इतरत्र हलवत बसणार? आणि कुठेकुठे? आयुष्यभर तेच करत बसले तरी आयुष्य (आणि धागे) पुरणार नाहीत. संपादकांना काय इतर उद्योग, खाजगी आयुष्य वगैरे भानगडी नाहीत काय?
थोडक्यातच सांगायचे झाले, तर फ़टीग.
माझं मत
>> दिवाणखाना कमी असतो, पण देऊळ जास्त असते.
आकाश कमी असते, पण पृथ्वी अधिक असते.थोडक्यात, बायको हे एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी.
गलबत शिडं उभारुन सातासमुद्रात मुशाफरी करायला बाहेर पडतं.हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही.
या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळवा-याशी मुकाबला करावा, चंद्रचांदण्यांशी सोयरीक करावी. संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी.
जगणं असं असावं की पावला-पावलांवर मरणाशी मुलाखत व्हावी.परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहात असतं आपल्या बंदराकडे.
पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात, प्रशान्त पाण्याच्या गालिच्यावर विश्रांत होतं.
गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं...
अशी आहे बंदराची महती..
म्हणजे बायकोची....
म्हणजेच तुझी!
मध्यमवर्गीयांचे गंड ओळखून लिहिलेली टाळीखाऊ वाक्यं वाटतात. म्हणजे काय, तर दर्यात शिरणं, चंद्रचांदण्यांशी सोयरीक वगैरे सगळं काही आपण केलं असं आयुष्याच्या अखेरीला म्हणता यावं अशी इच्छा तर खूप असते, पण तसं काही केलेलंच नसतं. म्हणजे पराक्रम किंवा पराजय ह्यातलं काही तरी जमण्यासाठी जी बेदरकारी करावी लागते तीच कधी जमलेली नसते. शिवाय, आपण असं जगलेलो असू तरच आपण हीरो असू आणि अशा हीरोलाच बायकोवर आपलं प्रेम आहे हे म्हणायचा हक्क आहे अशीही काही तरी एक गैरसमजूत असावी. असं वाटणारे लोक प्रेक्षागृहात आहेत हे लक्षात घेऊन ही वाक्यं लिहिलेली वाटतात. मग ते लोक आपल्या बेदरकारीरहित आयुष्याच्या टोचणीसह इथल्या पतीला हीरो आणि पत्नीला हिरॉईन मानतात, आणि टाळ्यांचा कडकडाट करतात किंवा अश्रूभिजल्या नयनांनी आपल्या बायकोकडे स्नेहार्द्र कटाक्ष टाकतात.
श्रेणी
माझाच धागा असल्याने श्रेणी देता येत नाहिये.
पण थँक्स.
बाकीच्यांनो ,
होय. हा संवाद ढकलपत्रातून आला. त्यात हा 'नटसम्राट'मधील म्हणूनच दिला आहे.
मला आता नेमकी नटासम्राटची संहिता आठवत नाहिये; पण एकूण शैली पाहता; हे त्यातलं नक्कीच असू शकतं असं वाटलं.
लेखक :- वि वा शिरवाडकर.
चर्चेत भाग घेतलेल्या सर्वांचे आभार.
...
इन रेट्रोस्पेक्ट, असे म्हणता येईल खरे.
अर्थात, एके काळी, 'नटसम्राट'सारख्या नाटकांच्या हेडेज़मध्ये (आणि, इन्सिडेंटली, आमच्या तारुण्यात) असे वाटत नसे, आणि वाटलेही नसते, हेही तितकेच खरे. अर्थात, तेव्हा आम्हीही वेगळे होतो, आमचे वयही वेगळे होते, ज़मानाही वेगळा होता, आमच्या आजूबाजूचा माहौलही वेगळा होता आणि (मुख्य म्हणजे) आमचे कंडिशनिंगही वेगळे होते, हेही आहेच, त्याला काय करणार?
कालाय तस्मै नमः|
पुढील संवादाबद्दल ऐसीकरांचं
पुढील संवादाबद्दल ऐसीकरांचं मत जाणून घ्यायला आवडेल.
कसं काय वाटलं ते अवश्य कळवा.
काहिंनी ह्याची बोळवण "पकाउ साला, लेक्चबाजी" , "शब्दबंबाळ" , "सावन की घटा गाणार्याचा म्हातारा झाला की सावन की घटा स्टाइल प्रवचन-उपदेश" अशी केली आहे. काहिंना हे काहीतरी अत्यंत सेन्सिबल, उच्च वगैरे वाटलं. तुमचीही मतं जाणून घ्यायला आवडेल.
स्त्रीवाद्यांना आवडणार नाही. कारण फार पुरुषप्रधान बोल आहेत. बायकोवर प्रेम असणारांना (मंजे काही पुरुषांना) आवडेल. बाकी मनोबा, तू माझा एक प्रतिसाद नेहमी नेहमी पेस्टवत असतोस. हे घ्या अजोंचे स्त्रीविषयक बोल म्हणून. त्यात आणि इथे बरंच विचारात साधर्म्य आहे. (पण माझी भाषा किती दरीद्री आहे ते उघडं पडतं.)
नै
नै, तुम्ही म्हणता ते जरा अतिच असतं.
तुम्ही पुढील प्रतिसादाबद्दल बोलताय का ?
वरील धाग्याव्यतिरिक्त त्यांनी ह्यापूर्वी काही विधाने केली आहेत; त्याबद्दलही कुणी चर्चा केली तर बरं होइल.
************************अजोंची विधाने सुरु*******************************************************
.
.
वेल, जैविकतेच्या बाहेर, सामाजिक परिस्थीतींमुळे स्त्रीया अधिक बुद्धिमान असतात. त्या जास्त समंजस असतात. जास्त भावूक असतात. पुरुषांच्या तुलनेत त्या कमी दुष्ट असतात. पुरुषांसाठी तर त्या दुष्ट नसतातच म्हटले तर चालावे. त्यांना इगो कमी असतो. जनरली पुरुष कचरा करत असतात नि त्या तो सावरत असतात. एकूणात त्यांची मूल्येदेखिल पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात.
-------------
आता हे फरक असावेत का? तर हो. का? तर दोघांनी मिसळून जगाची नासाडी करायची ठरवली तर फारच फास्ट होईल. पक्षी कोण्या तरी एकाने शहाणपणाने घेतलेले बरे. जगातले सगळे अनावश्यक, नाशकारी वाद 'हे पुरुष' विरुद्ध 'ते पुरुष' असे आहेत. हे वाद मूर्खपणाचे आहेत हे कळण्याइतकं शहाणपण अगदी अशिक्षित स्त्रीला पण असतं.
--------
स्त्रीयांनीच पडती बाजू का घ्यावी? वेल, कारण तितकी मानसिक क्षमता पुरुषांत नसतेच. झळ लावून न घेता घर, समाज सावरून घेण्याची क्षमता स्त्रीयांत आहे. दुसरं म्हणजे चाणाक्षपणे त्या पुरुषांना कामाला लावून सगळी खरी सुखे भोगत असतात. त्या ज्या काही भूमिका घेतात त्याचा सारा भौतिक मोब्दला त्यांना इथेच नि लगेच मिळतो.
--------------
जगात नेहमीच एक सुप्त स्त्री राज्य असते.
भारतासारख्या पुरुषसत्ताक व्यवस्थेतीतही "खरी सत्ता" स्त्रीकडेच असते.
पारंपरिक व्यवस्थेत स्त्रियांवर अन्याय वगैरे होतो हे सगळं झूट है.
.
.
************************अजोंची विधाने समाप्त***********************************
मला तरी हे झकास विडंबन
मला तरी हे झकास विडंबन वाटतंय.
एखाद्या ग्रीक वगैरे ट्रॅजेडीत, किंवा एखाद्या महानायकाच्या तोंडी शोभणारी वाक्य सामान्य माणसाच्या संदर्भात टाकल्यावर कसं होईल? त्या टाईप.
छोट्याश्या कर्तृत्वाला अलंकारीक भाषेत बोलून दाखवलं की जसं विजोड वाटतं, तसं वर्णन वाटलं.
उदा. मूळ वाक्य-
"मी रक्ताच्या शिडकाव्यांनी शिंपलेलं हे जनमानसाचं रोप! अशा अनेकानंत बलिदानांनी आज त्याचा महावृक्ष झाला आहे!!
नवीन वाक्य -
"मी माझ्या रक्ताने सिंचलेलं हे होमलोन! माझ्या इ.एम.आयरूपी बलिदानांनी त्याचं आज ह्या घरात रूपांतर झालं आहे." इ.इ.
आणि बायकोला बंदर ही वपिष्ट उपमा वाटते.
खरे तर
वेल, चर्चा बरीच (चांगली) चाललीय, पण या निमित्ताने आणि मराठीभाषादिनानिमित्तानेही, मराठी भाषेच्या बदलत्या रूपावरसुद्धा चर्चा झाली असती तर औचित्यही जाणवले असते. असो.
धाग्यातील उतारा साहित्य-अकादमी-पारितोषिकविजेत्या 'नटसम्राट'मधला आहे आणि मुख्यत्वाने हीच कलाकृती कुसुमाग्रजांच्या ज्ञानपीठ पुरस्कारास कारणीभूत ठरली हे सर्वांना ठाऊक आहेच. हे नाटक 'किंग लिअर' या शेक्स्पीअरच्या अभिजात कृतीवर बेतलेले आहे हेही सर्वांनाच माहीत आहे. अशा क्लासिक् कृतींची भाषा कधीच जुनी होत नसते. आणि हे अन्य माध्यमांतील कलाकृतींनाही लागू आहे, उदा. रंगचित्रे, शिल्पे, वगैरे. या कृती त्या त्या परिप्रेक्ष्यातच (सोपा शब्द सुचवा बुवा) तपासायच्या असतात. अशी पल्लेदार वाक्ये लिहिणे (आणि रंगमंचावर ती तेव्हढ्याच ताकदीने सादर करणे) हा आदराचा विषय असतो. त्यामुळेच अनेक नामांकित अभिनेते 'हॅम्लेट' किंवा 'ऑथेल्लो' सादर करायला मिळावा म्हणून आसुसलेले असतात आणि म्हणूनच अशा साहित्यकृतींची नवनवी रूपांतरे अनेक भाषांतून अनेक कालखंडांतून निर्माण होत असतात. भय, संशय, तिरस्कार, वासना, प्रेम या मानवाच्या आदिम प्रेरणा ह्या कालातीत असतात, आणि त्या समर्थपणे व्यक्त करणारी कलाकृती प्रभावी, क्वचित कालातीत ठरते.
अशासारख्या कलाकृतींना अभिव्यक्तीचे स्थळकाळानुसार बदलणारे नियम लागू होऊ नयेत असे (आपले मला) वाटते.
अगदी. नटसंम्राट म्हणजे अगदी
अगदी. नटसंम्राट म्हणजे अगदी टीपिकल मध्यमवर्गीय ( बरोबर शब्द सुचत नाहीये ). उगाच मुख्य पात्राला सो कॉल्ड नटसंम्राट वगैरे दाखवले ( फक्त दाखवलेच ) आणि तोंडी मोठे आणि बंबाळ डायलॉग दिले म्हणजे ते नटसंम्राट किंवा कुठल्याच क्षेत्रातल्या संम्राटाचे नाटक होत नाही. अगदीच काहीतरी आहे.
क्या बात! जबरी प्रश्न
क्या बात! जबरी प्रश्न आहे!
[कुठेतरी वाचलं आहे, की] "वगळणे" / "नकार देणे" हा हुच्चभ्रूपणाचा पहिला विशेष असतो.
उदा.
- आम्ही नॉनव्हेज खात नाही
- आम्ही डनहिलशिवाय दुसरी शिग्रेट ओढत नाही
- आम्ही सकाळ वाचत नाही
- आम्ही "होणार सून मी या घरची" पहात नाही
त्यामुळे मठाबिठांत जे घडतं ते हुच्चभ्रूपणा-बाय-एक्स्क्लूजन या क्याटेगरीत मोडावं. आता ब्राह्मण आगोदरच त्या क्याटेगरीत जाऊन बसलेत म्हणून लेबल ब्राह्मणीकरणाचं चिकटलं आहे.
नॉट एक्झॅक्टली
नॉट एक्झॅक्टली , पण बरचसं तसं .
शिवाय त्या विशिष्ट बाबीमधील आनंद घेता येण्यासाठी कष्ट घ्यायला लागण्याची शक्यता बरीच असते.
एकप्रकारची कमावलेली आवड असते ती.
त्यामुळे ती कमी लोकांकडे असणार.
तुमचा त्या लोकांसोबत -- त्या फ्रिक्वेन्सीवाल्यांसोबत एक 'क्लब' बण्णार.
( ह्याच्याशी थेट संबंधित नै, पण तरी डोक्यात असलेलं :-
दारु कडू असते. मग पहिल्याप्रथम आदिम अवस्थेतील माणसाने दारु का प्यायली असावी असा प्रश्न मला नेहमीच पडतो.
पहिलाच थेंब कडू...यक्क थू...म्हणून त्यानं ते सोडून द्यायला हवं होतं. पुढचा आख्खा घोट कशापायी प्यायला असेल तो ?
)
ज्याचा जन्म हा कशाची कॉपी
ज्याचा जन्म हा कशाची कॉपी कींवा कशाचे तरी डेरीव्हेटीव्ह नाही ते अभिजात. जसे तामिळ ही अभिजात भाषा मानली जाते कारण तिचा जन्म संस्कृत मधुन झाला नाही. ( सध्या मराठीला पण अभिजात म्हणा असे चालु आहे ती गोष्ट वेगळी ).
शास्त्रीय संगीत अभिजात मानले जाते, पण सिनेमाचे नाही. कारण सिनेमाचे संगित हे कुठल्यातरी शास्त्रीय संगितावर उभारलेले असते.
अभिजात म्हणजे काय?
>> अभिजात म्हणजे काय ?
हा नवीन प्रश्न आहे, वरील एका चर्चेतून मनात आलेला. खवचट वाटू शकेल, पण मला व्याख्या अथवा अर्थ माहीत नाहीये. मी तो शब्द वापरतही नाही त्यामुळे. कळले तर योग्य जागी वापरता येईल.
हे एक उत्तर :
अभिजात साहित्य म्हणजे काय? - इति इटालो कॅल्विनो
संदर्भः बीफबंदी प्रश्नः मटण,
संदर्भः बीफबंदी
प्रश्नः मटण, तुकडे केलेले मांसखंड, शिजलेला पदार्थ यांपैकी प्रत्येक गोष्ट नुसती डोळ्याने पाहून ते गायीचे आहे की म्हशीचे ते सांगता येईल का?
बेकायदेशीर ठरवणारी जी ऑथॉरिटी असेल तिला हे नमुने लॅबमधे पाठवून नेमके कोणत्या लेव्हलपर्यंत खोलात तपासावे लागेल ? नुसते मायस्क्रोस्कोपिक निरीक्षण की डीएनए लेव्हल ?
की चव घेऊन कळत असावे?
जुनाच मुद्दा, नव्याने
जुनाच मुद्दा, नव्याने लिहितोय.
बलात्कार वगैरे केसेस मध्ये बचावाचे वकील पुढील चार मुद्द्यांकडे किंवा तत्सदृश गोष्टींकडे अंगुलीनिर्देश करु पाहतात :-
१.सदर स्त्री हीच कशी साली चारित्र्यहीन आहे.
२.इतक्या रात्री किम्वा अशा सुनसान जागी काय ती काय करत होती ?
३.तंग कपडे का घातले ?
४.शुद्धीवर नव्हती का ? दारु/अंमली पदार्थ प्यायली तर नसेल ?
.
.
आँ? हे काय आहे हो ?
आपण टोकाचं उदाहरण घेउया.
एखादी स्त्री वस्त्रविहीन अवस्थेत अगदि मोकळ्या रस्त्याच्या कडेला पडलेली आढळली.
कुठलाही भला माणूस काय करेल ? फार घाईत्/अडचणीत असेल तर गुमान आपल्या रस्त्याला चालू पदेल.
किंवा त्या वस्त्रविहीन मुलीला काही कापडचोपड हवे आहे का, किंवा काही अडचण आहे का हे तरी विचारेल.
किम्वा सिनिकल असेल तर हे असे नेमके कसे काय समोर आले म्हणून जरा बिचकेल.
म्हणजेच माणूस भला असेल तर वस्त्रविहीन अवस्थेतील स्त्रीसोबत गैरप्रकार करु इच्छिणार नाही.
का मग दिसली बाई की टाकली गाडित असले विचार करेल ?
म्हणजेच वस्त्रविहीन असतानाही हे मुद्दे लागू होउ नयेत; वरील चार मुद्दे तर त्यामानाने काहिच नाहित.
.
.
तरी हे बचावासाठी का वापरले जातात ?
हे मुद्दे मांडणारे एकप्रकारे "अशी एखादी बाई हाताला गावली तर नक्कीच रगडून काढू जोर्रात,तिघं चौघं मिळून " ह्याची कबुलीच देताहेत ना ?
हे हरामखोर पोटेंशियल गुन्हेगार नाहित का ?
ह्यांचं काउन्सिलिंग का होत नाही साला ?
.
.
खरे तर बचावाच्या वकीलानं हे मुद्दे मांडून एक प्रकारे बचाव दुबळा केलेला आहे.
ह्या असल्या बचावामुळेच आधीच हाय प्रोफाइल असलेल्या, सगळ्यांच्या नजरा असलेल्या केसमध्ये आरोपींना फाशी झाली.
माझ्यामते चांगला बचाव पुढील प्रमाणे ठरु शकला असता :-
"नुसती चूक नव्हे तर गुन्हा घडलेला आहे. त्याबद्दल तीव्र दु:खही आहे.
झाली गोष्ट पुन्हा मिळवता येणार नाही.
पण सुधारण्याची संधी द्यावी. काही वर्षांनी सजा भोगून आल्यावर आम्ही बदललेले दिसू.
असं आमचं बदललेलं असणं हेच समाजाच्या पुढे जाण्याचं लक्षण आहे.
शिवाय उर्वरित आयुष्य समाजोपयोगी कामी देण्यास तयार आहोत.
कृपया फाशी क्यान्सल करुन कैद देण्यात यावी. "
केसचे पूर्ण तपशील/कागदपत्रे मजकडे नाहित. पण "ह्यांनी काय युक्तीवाद केला असावा, ह्यांचा आशय काय आहे"
ह्याचा ढोबळमानानं अंदाज लावलेला आहे; वकीलांच्या बोलण्यावरून.
खरे तर बचावाच्या वकीलानं हे
खरे तर बचावाच्या वकीलानं हे मुद्दे मांडून एक प्रकारे बचाव दुबळा केलेला आहे. >> खरेतर 'बचाव दुबळा करणे' हाच उद्देश असेल 'त्या' वकीलांचा. मी ती डॉक्युमेंटरी पाहिली नाही.
बादवे बलात्काराला ७ वर्ष कारावास, बलात्कार आणि खूनला जन्मठेप ( १४ वर्ष ) आणि रेअरेस्ट ऑफ रेअर केस, अत्यंत ब्रुटलीटी असेल तर फाशीची शिक्षा होते. निर्भयाची केस अत्यंत ब्रुटलीटीमधे येते.
स्थानिक पाठभेद
जर कुटुंबात 'शंकर' ह्या नावाची एखादी (ज्येष्ठ) व्यक्ती असेल तर, असा स्थानिक पाठभेद होणे अगदीच अशक्य नाही.
कुणा 'गोळे' आडनावाच्या कुटुंबात गोळ्याची आमटी हा खाद्यपदार्थ लाडवाची आमटी ह्या नावाने ओळखला जात असल्याची कथा ऐकिवात होती!
प्रश्नचिन्हाशिवाय प्रश्न?
आम्ही इथे मनातले प्रश्न लिहावेत आणि कोणीही उत्तर देऊ नये?
फेसबूक स्क्रॉल करताना अचानक स्क्रीन रिफ्रेश होऊन टॉपवर जातो. मग पुन्हा बरंच शोधत मूळच्या जागी यावं लागतं. मी सेटींग मधे जाउण नेवर रेफ्रेश सिलेक्ट केलं तरी तेच
ह्याबद्दल म्हणताय का? मग त्यात प्रश्न कुठाय? नुसतीच माहिती दिसतेय.
बाकी माझ्याबाबतीत फेसबूक अकाउन्ट असून नसल्यासारखाच असल्यामुळे, माझा पास.
१. मनातला पहिला प्रश्न -
१. मनातला पहिला प्रश्न - प्रश्न हे नेसेसरीली प्रश्न चिन्हानेच विरामित होतात का?
२. मनातला दुसरा प्रश्न - फेसबूक पेज मी स्क्रोल करत खाली जात आहे तोपर्यंत खालीच जात राहावे, अगदी मधेच वर नव्या पोस्ट्ससाठी वर जाऊ नये यासाठी फेसबूकसोबत किंवा अॅपसोबत किंवा ब्रावझरबाबासोबत काय करावे?
पेन्शन फंड
दुसर्या एका धाग्यावर धनंजय यांच्या प्रतिसादात पेन्शनसाठी अंदाज करण्याविषयीचा मुद्दा होता त्यावरून मनात आलेला विचार.
सध्या रेल्वे वगैरे सरकारी खात्यांवर निवृत्त लोकांच्या पेन्शनचा खूप भार आहे असे म्हणतात. त्यावर एक उपाय आहे.
व्हॉट्सअॅप/फेसबुकवरील मेसेजेस मध्ये जे लोक आईबापांची महती, म्हातार्या आईवडिलांना विसरू नका अशा प्रकारचे दवणीय मेसेज फॉरवर्ड करतात त्यांना महिना पाच हजार रुपये खास "पेन्शन कर" लावावा व त्यातून निवृत्त कर्मचार्यांना पेन्शन देण्यात यावे. ;)
तुमचा मुद्दा लक्षणीय आहे.'I
तुमचा मुद्दा लक्षणीय आहे.
'I have no problem with god - it's his fan club that scares me' - असं काहीतरी म्हंटलेलं आहे.
पण माझी समस्या थोडी भिन्न आहे. जर फॅन क्लब समस्याजनक कारवाया करीत असेल तर गॉड त्याच्या फॅन क्लब ला rein-in का करत नाही ??
कोणत्याही आईवडीलांनी आजपर्यंत आपल्या मुलांना असे सांगितलेले नाही की तू माझ्या पाया पडू नकोस व मला देव मानू नकोस.
(मला थोडीशी चढलिये...)
[पीयर] प्रेशर अस्तंय दादा.
[पीयर] प्रेशर अस्तंय दादा. दवणीय मेसेजवाले सामाजिक [पीयर] प्रेशर निर्माण करतात. उदा. आईवडील हे देवच असतात, शिक्षकांप्रति आदर हवाच, भारतमातेच्या अभिमानाने उर भरून आलाच पाहिजे, वगैरे. विरोध वाक्यांना नाही, "च" ला आहे.
हे जितकं फॅनक्लबसाठी (मुलं) लागू आहे तितकंच गॉडसाठीही (आईवडील) लागू आहे. गॉडलाही [पीयर] प्रेशर असतंच की.
तुमच्यासारख्या इकॉणॉमिष्टाने "द सोशल डेडवेट कॉस्ट ऑफ दवणीय मेसेजेस" नावाचा पेपर लिहिला पाहिजे.
हा संवाद
हा संवाद ज्या 'नटसम्राट' नाटकांत आहे ते नाटक, त्याकाळीही मला आवडले नव्हते. अगदीच शब्दबंबाळ आणि कांगावखोर वाटले होते. आता फक्त या उतार्याबद्दलच बोलायचे तर तो स्त्रियांवर अन्याय करणाराच आहे. स्त्रियांनीच का बंदर होऊन एकाच ठिकाणी रहायचे ? हे सगळीकडे बारा गांवचं पाणी पिऊन येणार आणि बंदरात येऊन पडणार. मग यांची देखभाल त्या बंदराने करायची. एकदा ताजेतवाने झाले की परत हे उंडारायला मोकळे!
उगाच मोठ्या मोठ्या उपमा देऊन बायकोला भुलवण्याचे दिवस आता संपले आहेत.
मिस्प्लेस्ड अप्प्लिकेशन
रोमँटिक जागी रोमँटिक लिहितात. म्हणजे पुरुष बोलू लागला तर तो स्त्रीची खूप स्तुति करत सुटेल. मी चूका करत गेलो, तू कसे पदरात घेत गेलीस, इ इ. चढवून बोलायचे असते अशावेळी. "वैवाहिक जीवनातील स्त्री व पुरुष यांची तौलनिक भूमिका व पुरुषांचे श्रेष्ठत्व" इतकेच काय ते बायकोला (किंवा श्रोत्यांना) पटवून द्यायचे नसते. शिवाय - आपण जे अप्रत्यक्ष रित्या म्हणू इच्छिता - स्त्रीया घरात बसतात तेव्हा नरक सोसतात आणि पुरुष उपजिवीका कमवायला बाहेर पडतो ते सुखेनैव - हे वास्तव आहे काय?
-----------------------
एक उदाहरण घ्या. लोकशाही राजेशाहीपेक्षा श्रेष्ठ असते. मान्य. पण एक मूर्ख पंतप्रधान आणि महामूर्ख विरोधीपक्ष नेता असलेली लोकशाही एक सक्षम आणि महान राजा असलेल्या राजेशाही पेक्षा कुचकामी असू शकते. प्रत्येक जागी आधुनिक लोकशाही राजेशाहीपेक्षा श्रेष्ठ हा नियम लावता येत नाही. या नियमाने शिवाजी महाराजांची देखिल स्तुति करता येणार नाही. अरे, कोण तो शिवाजी, महान राजा महान राजा म्हणून जनतेला भुलवायचे दिवस गेले, त्या शब्दबंबाळ आणि कांगावेखोर शिवचरित्रापेक्षा देवेगौडांचे अध्ययन करा, ते शिवाजीपेक्षा कितीतरी महान, लोकशाही पद्धतीने पंतप्रधान झाला होते, लोकशाहीने देश चालवला त्यांनी, असे म्हणणार? तसेच स्त्रीवाद किंवा स्त्रीपुरुषसमतावाद अत्यंत महान असेल, पण ... पुरुषप्रधान संस्कृतीच्या घराचेही चलन परस्पर-सामंजस्यामुळं स्त्रीवादी घरापेक्षा श्रेष्ठ असू शकतं. (ऐसीच्या सदस्यांपैकी बरेच जण पुरुषप्रधान घरात वाढले असणार. आपल्या आईला वडीलांनी भुलविले, ते ही बुद्ध्या भूलविले अशी बहुतेकांची धारणा असावी काय?) अशा महान घराबद्दलच्या महान ललित साहित्याचा तत्कालिन समाजरचना समजून न घेता अवमान करणे दुर्दैवी आहे. (नाझी जर्मनीत सुद्धा शिंडलर होता, ही तर "पुरुषप्रधान संस्कृती" आहे, "पुरुषाय कृते" संस्कृती नाही.) प्रामाणिक भावनांना भूलथापा म्हणणे कितपत योग्य आहे?
--------------------------------
बाय द वे, मोठाल्या उपमा देऊन आईला भुलवण्याचे दिवस चालू आहेत? मातांना समाज, घर आणि बाळे भलवून कष्टवतात हे निर्विवाद?
-----------------------

नवरा — असू शकते, असतेही; पण
.... एक पफ.. एक मिनिट थांबून वाटल्यास दुसरा पफ..