‘मॅनीज’ एक एप्रिलपासून बंद होणार

पुण्यातील ‘मॅनीज’ हे इंग्रजी पुस्तकांचे ६३ वर्षे जुने दुकान एक एप्रिलपासून बंद होत आहे. १९४८ मध्ये व्ही. जी. मणी यांनी 'मॅनीज'ची स्थापना केली होती. तेव्हापासून आजपर्यंत ‘मॅनीज’ने पुस्तकप्रेमींच्या मनात आपले एक विशेष स्थान निर्माण केले होते. संबंधित बातमी :
लोकसत्ता : ‘थोडे आँसू.. थोडे हासू’ च्या वातावरणात ‘मॅनिज’ ला अलविदा!
सकाळ : कॅम्पातील 'मॅनीज' बंद होणार

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अत्यंत दुखद बातमी!

मॅनीज च्या ठिकाणी काय येईल कोणास ठाउक. (फ्लिपकार्ट पूर्व काळात) पुण्यात इतिहास आणि समाजशास्त्रावरची दुर्मिळ इंग्रजी पुस्तकं मिळवण्याचं एकमेव स्थान होतं. इंटरनॅशनल पेक्षाही त्यांचा या विषयांचा स्टॉक खूप विविध आणि चांगला होता. तेथे एखादे पुस्तक घेऊन मग घरी परतण्या अगोदर कॉफी हाउस मध्ये बसून ते थोडावेळ संथपणे चाळणे, हे अगदी आनंदाचे रुटीन असायचे.

इंटरनॅशनल बुक सर्व्हिस किती दिवस टिकेल हे ही सांगणे कठीणच आहे. मालकांनीच काही वर्षांपूर्वी या बद्दल शंका व्यक्त केली होती - त्यांना आता झेपत नाही, मुलं परदेशात आहेत, त्यांना यात रस नाही, आणि बिल्डर मंडळी अगदी प्राइम जागेबद्दल उत्सुक आहेत. फ्लिपकार्ट वगैरेंचा धक्का ही नक्कीच बसला असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच एक चर्चा झाली. पुस्तकांविषयीच. मुंबईतील एका पुस्तक दुकानदाराने त्याच्या गोदामाची जागा आता शांतपणे बाहेर फुटपाथवर बसून काहीबाही विकणाऱ्या माणसांना भाड्याने दिली आहे. भाडं चांगलं मिळतं. त्यामुळं पुस्तकांच्या दुकानाच्या या गोदामात आता टीशर्ट, कसल्या गोण्या वगैरे दिसल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. Smile बिल्डर आणि प्राईम जागा हा तर त्यापुढचा मोठ्ठा मुद्दा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळाप्रमाणे बदलणार्‍या गोष्टींमधे स्थावर दुकान ही संकल्पना देखील बदलत आहे, फ्लीपकार्टसम आंतरजालीय दुकाने ही दूरदृष्टी असणार्‍यांसाठी एक संधी किंवा न बदलणार्‍यांसाठी तोटा आहे, फ्लीपकार्टवर हवे ते पुस्तक रास्त(!) दरात मिळाल्यास अप्पा बळवंत चौकात पार्किंची कटकट+दुकानदारांची असहकारीता(तुलनेने) सहन करुन घेणारे किती उरतील? हा काळ ओळखून कार्यव्यवस्थेत बदल करणे ह्या पुस्तक दुकानदारांना अवघड नाही, पण त्यासाठी आवश्यक स्वयंप्रेरणा त्यांच्याकडे नाही असे वाटते.

ऑनलाईन दुकान विरुद्ध स्थावर दुकान ही लढाई सर्वत्र आहे, अमेरिकेत स्वस्त/साधारण किरकोळ विक्री दुकानांत ग्राहक वस्तू हताळण्यास जातात पण तीच वस्तू स्मार्टफोनवरुन ऑनलाइन स्वस्त दरात मागवितात, त्यामुळे ही दुकाने शोकेस बनत चालली आहेत, त्याविरोधात स्थावर दुकांनांचे धोरण फारच कमकुवत वाटते, ह्याबद्दल अधिक इथे वाचवयास मिळेल.

मॅनीज किंवा इंटरनॅशनल बंद होणे अपरिहार्य दिसते, अर्थात चिकट पुणेरी दुकानदार ग्राहकाला तुच्छ लेखत जाळी-जळमटांमधे अनेक वर्षे काळाबरोबर न बदलता व्यवसाय करु शकतो, हा चिकटपणा/तुच्छपणा पुढील पिढीकडे नाही ह्याची हळहळ वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पार्किंची कटकट+दुकानदारांची असहकारीता(तुलनेने) सहन करुन घेणारे किती उरतील? हा काळ ओळखून कार्यव्यवस्थेत बदल करणे ह्या पुस्तक दुकानदारांना अवघड नाही, पण त्यासाठी आवश्यक स्वयंप्रेरणा त्यांच्याकडे नाही असे वाटते.<<

किंवा

>>चिकट पुणेरी दुकानदार ग्राहकाला तुच्छ लेखत जाळी-जळमटांमधे अनेक वर्षे काळाबरोबर न बदलता व्यवसाय करु शकतो, हा चिकटपणा/तुच्छपणा पुढील पिढीकडे नाही ह्याची हळहळ वाटते.<<

यात काहीसा तुच्छतावाद दिसतो. पण वर रोचना यांच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे किमान काही पुस्तकविक्रेत्यांच्या बाबतीत हे मुद्दे गैरलागू होतात. मी हे फक्त पुण्यापुरतंच किंवा मॅनीजपुरतंच म्हणत नाही. जगभरात अनेक ठिकाणी मला आलेला अनुभव असा आहे:

एखाद्या छोट्या पण मनापासून चालवलेल्या दुकानात मला माहीत नसलेल्या पण उत्तम अशा अनेक पुस्तकांचा आणि लेखकांचा शोध लागला. हे बार्न्स अँड नोबल किंवा बॉर्डर्ससारख्या बलाढ्य सुपरस्टोअर्समध्येही होत नाही आणि अ‍ॅमेझॉनवगैरेवरसुद्धा होत नाही. कारण अगदी साधं आहे - ग्राहकांनी जे विकत घ्यावं अशी या धंदेवाईक विक्रेत्यांची इच्छा असते, ते फारच सर्वसाधारण असतं; कारण ते अधिकाधिक ग्राहकांची रुची लक्षात घेणारं असतं. अशा ठिकाणी अशाच पुस्तकांना सामोरं जावं लागतं. माझ्यासाठी हा फार कंटाळवाणा अनुभव असतो. तुमच्या खरेदीचा इतिहास आणि तुमच्या श्रेणी वगैरे पाहून अ‍ॅमेझॉनवर तुम्हाला सुचवण्या केल्या जातात. त्यांचासुद्धा मी मुद्दाम अभ्यास केला, कारण त्यांततरी किमान डोकं चालवून अल्गॉरिदम तयार केलं असेल आणि त्याद्वारे मला काहीतरी नवीन आणि रोचक मिळेल अशी मला (भाबडी) आशा होती. पण लंडनच्या चेरिंग क्रॉसवरच्या किंवा पॅरिसच्या सीन नदीकाठच्या किंवा केंब्रिज (मॅसॅच्युसेट्स) इथल्या सेकंडहँड दुकानांमध्ये जे शोध लागले (आणि ती पुस्तकं ज्या किंमतींना मिळाली) ते अद्वितीय आणि अविस्मरणीय होते. हाच अनुभव जगभरात अनेकांना येत असतो असं दिसतं. उदाहरणार्थ, गेली काही वर्षं नाताळात 'टाईम्स लिटररी सप्लिमेंट' एक सदर चालवते. अशी दुकानं धुंडाळून त्यात मिळालेल्या खजिन्याविषयी (उत्तम पुस्तक; फारसं माहीत नसणारं; सहसा न मिळणारं; स्वस्तात) त्या सदरामध्ये सांगितलं जातं. नमुन्यादाखल गेल्या नाताळातले काही दुवे पाहा:

Perambulatory Christmas Books, 5th series, part VI
Perambulatory Christmas Books, 5th series, part VII
Perambulatory Christmas Books, 5th series, Part IX
Perambulatory Christmas Books, 5th series, part XI

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काळाची गरज ओळखून बदल केल्यास मॅनीज बंद होण्याची हळहळ रहाणार नाही, आज ना उद्या घरपोच सेवा देणारी आंतरजालीय दुकाने(अ‍ॅमेझॉन वगैरे) विदा/आत्त-विश्लेषण(Google Analytics) सुविधांचा वापर करुन तुम्हाला अपेक्षीत सेवा देखील देतीलच, दुकान बंद होण्यापेक्षा कमीत-कमी बदल करुन ग्राहकाला सोय उपलब्ध करुन देण्याची वृत्ती जाणवल्यास बरेच ग्राहक आपली लॉयल्टी सोडणार नाही असे वाटते.

अर्थात हा बदल सगळीकडे सरसकट होणे अपेक्षीत नाहीच पण काळाच्या ओघात तगून रहाण्यासाठी फक्त ग्राहकाची स्मरणरंजकता उपयोगी पडणार नाही, असे असते तर कॅफे लकी, मॅनीज बंद झाले नसते किंवा कधीतरी ईंटरनॅशनल, कॅफे गुडलक, गजानन भेळवाला, पुष्करणी बंद होणार ही चिंता लागून राहिली नसती.

दुकान बंद न करता इतर माध्यमातून ग्राहकाला एनेबल करणे हे अपेक्षीत आहे, कॅश-ऑन-डिलिव्हरी नको निदान उपलब्ध पुस्तकांची माहिती देणारी सारणी पुरवणे देखील ग्राहक टिकवण्यासाठी पुरेसे आहे, किमान अनुकूलनक्षमता टिकाव धरुन ठेवण्यास उपयोगी असेल.

पुणेरी दुकानदारांचा तुच्छतावाद हा विनोदाचा भाग होता, पण तो तुच्छतावाद तसाच रहावा किंवा वाढावा अशीच माझी वैयक्तिक इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>काळाच्या ओघात तगून रहाण्यासाठी फक्त ग्राहकाची स्मरणरंजकता उपयोगी पडणार नाही, असे असते तर कॅफे लकी, मॅनीज बंद झाले नसते किंवा कधीतरी ईंटरनॅशनल, कॅफे गुडलक, गजानन भेळवाला, पुष्करणी बंद होणार ही चिंता लागून राहिली नसती.<<

मुद्दा समजला, पण कॅफे लकीचा उल्लेख जरा अप्रस्तुत आहे - एका उद्दाम मंत्र्यानं गुंड सोडून ते बंद पाडलं अशी माहिती काही भरवशाच्या स्रोतांकडून ऐकली होती.

>>आज ना उद्या घरपोच सेवा देणारी आंतरजालीय दुकाने(अ‍ॅमेझॉन वगैरे) विदा/आत्त-विश्लेषण(Google Analytics) सुविधांचा वापर करुन तुम्हाला अपेक्षीत सेवा देखील देतीलच<<

आजही अ‍ॅमेझॉन Analytics वापरतं आहेच आणि त्यावर पुष्कळ पैसेही खर्च करतं आहे. तंत्रज्ञान कदाचित पुरेसं सक्षम असेलही किंवा पुढे होईलही, पण अ‍ॅमेझॉनसारख्यांची उद्दिष्टंच वेगळी आहेत असं आत्ता तरी दिसतं आहे. त्यामुळे माझ्यापुरतं बोलायचं तर चांगल्या प्रतीची सेवा आटत चालली आहे आणि जी सेवा बाजार गिळंकृत करते आहे ती फार कंटाळवाणी आहे असा मामला आहे; हे स्मरणरंजन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुद्दा समजला, पण कॅफे लकीचा उल्लेख जरा अप्रस्तुत आहे - एका उद्दाम मंत्र्यानं गुंड सोडून ते बंद पाडलं अशी माहिती काही भरवशाच्या स्रोतांकडून ऐकली होती.

असेलही, पण कालौघात तगुन रहाण्याची क्षमता विकसित करण्यामागे हा मुद्दा देखील आहेच पण ते इथे थोडे अवांतर होइल.

आजही अ‍ॅमेझॉन Analytics वापरतं आहेच आणि त्यावर पुष्कळ पैसेही खर्च करतं आहे. तंत्रज्ञान कदाचित पुरेसं सक्षम असेलही किंवा पुढे होईलही, पण अ‍ॅमेझॉनसारख्यांची उद्दिष्टंच वेगळी आहेत असं आत्ता तरी दिसतं आहे. त्यामुळे माझ्यापुरतं बोलायचं तर चांगल्या प्रतीची सेवा आटत चालली आहे आणि जी सेवा बाजार गिळंकृत करते आहे ती फार कंटाळवाणी आहे असा मामला आहे; हे स्मरणरंजन नाही.

सेवेचा दर्जा पुर्वी उत्तम होता हे ऐकवत नाही, पण ह्या नविन व्यवस्थांची मोनोपॉली (बाजार गिळंकृत करण्याची) वृत्ती नुसती कंटाळवाणी नाही तर त्रासदायक ठरू शकते ह्याबद्दल शंका नाही, ह्या सेवांपेक्षा अनेक पर्याय उपलब्ध असणारी बाजार-व्यवस्था तुच्छ वागणारी असेल तरी परवडते असे अनेक अनुभव आहेत हे मला पण मान्य आहे.

ग्राहकाचे पर्यायक्षेत्र संकुचित होत असल्यानेच तुच्छतावाद परवडला पण कॉड(CashOnDelivery) नको असे म्हणावेसे वाटते हे जरी खरे असले तरी ह्या न बदलणार्‍या व्यवस्थेचा आज-ना-उद्या नाश होणारच व या सगळ्याचा थोडा त्रासही होणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा समजला, पण कॅफे लकीचा उल्लेख जरा अप्रस्तुत आहे - एका उद्दाम मंत्र्यानं गुंड सोडून ते बंद पाडलं अशी माहिती काही भरवशाच्या स्रोतांकडून ऐकली होती.

छे... फारच हळवे बॉ तुम्ही. Wink
'उद्दामपणा आणि गुंड ही खरेदीची क्षमता असते, बंद पाडणं म्हणजे मालाच्या उठावासाठी केलेली कापणी, मळणी. यातून एका प्रकारे बाजार व्यवस्थेतील शक्तीच काम करत असतात. त्यानुसार लकीच्या मालकांना बाजाराने एक किंमत दिली. त्यापलीकडे किंमत वसूल करण्याची त्यांची क्षमता नव्हती. त्यामुळं त्यांनी तो विचार सोडून दिला असावा' - हे विश्लेषण एकदा ऐकलं होतं, त्याची आठवण झाली. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात जस्ट बुक्स सारख्या ग्रंथालयांची संख्या वाढत आहे, ही त्यातली समाधानाची गोष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणी मॅनीज मधे जाउन येणार असेल तर कृपया तिथे (अथवा पुण्यात अन्यत्र) मालगुडी डेज व स्वामी एन्ड फ्रेंड्स उपलब्ध असल्यास सांगावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म.. (पुन्हा एकवार!!!!) कालाय तस्मै नमः
एकुणच सर्वत्र कात टाकली जातेय हेच खरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मॅनीजच्या फक्त आठवणी राहणार याचं वाईट वाटलं... तिथूनच इंग्रजी माहितीपर पुस्तकं वाचायला सुरुवात झाली होती.. फार चांगलं होतं हे ठिकाण.. आता क्रॉसवर्ड आणि अन्य आली आहेत.. पण मॅनीजचा एक नॉस्टाल्जिया आहेच आणि राहणारच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून अजून आठवण झाली म्हणून विचारतो.

सेनापती बापट रोड (की लॉ कॉलेज रोड) जवळच्या ह अ भावे यांच्या वरदा बुक डेपोची परिस्थिती कशी आहे ? त्यांच्याकडे जुनी, दुर्मिळ मराठी पुस्तकं असतात म्हणून आवर्जून विचारतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वरदा प्रकाशन सेनापती बापट रस्त्यावर आहे. अजून तरी चालू असावं कारण त्यांची पुस्तकं प्रदर्शनांत किंवा दुकानांत नियमित दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडासा संबंधित मुद्दा. ऑनलाईन बुक स्टोअर्स भले स्वस्त पुस्तके देत असतील (किंबहुना विविध नव्यानव्या हाटेलात जाऊन चित्रविचित्र नावाचे पदार्थ किंमतीबद्दल काहीही विचार न करता पाचशेची नोट बेफिकिरीने देणारे लोक पुस्तकांमधे दहा रुपये डिस्काउंट साठी प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यातील पुस्तकांचे/अभ्यासाचे स्थान काय हे चटकन लक्षात येते, पण ते असो) परंतु मुळात अमुक एक पुस्तक विकत घ्यावे का याचा निर्णय करताना शिफारस नि रिव्यू (जे बहुधा फसवे असतात वा अनेकदा 'पेड' असतात) पुरेसे नसतात. स्वतः पुस्तक चाळणे हा त्याबाबत माहिती करून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असे निदान मी मानतो. अर्थात टाईम्स टॉप टेन मधलीच पुस्तके विकत घेणार्‍यांना हा प्रश्न नसावा. चार लोक वाचतात म्हणजे ते वाचण्यालायक आहे असा माझा समज नसतो. त्या पुस्तकाशी माझी स्वतःची नाळ जुळते का हे पाहणे मला तरी महत्त्वाचे वाटते. अजून तरी वर्चुअल बुक स्टोर्सनी हे मागवा-वाचा-परत करा तत्त्वावर चालू केलेले नाही. (चिंतूंनी उल्लेखलेल्या केंब्रिजमधे अशा स्वरूपाच्या डीवीडी लायब्ररीज मात्र पाहिल्या आहेत. डीवीडी पाहून झाली की त्याबरोबर दिलेल्या फोल्डरमधे टाकून UPS द्वारे पाठवून द्यायची. पोस्टेज त्यांचे.) आणि ही किमान गरज आहे. जोवर हे होत नाही तोवर ऑनलाईन बुक-स्टोर्स स्थावर दुकानांना मागे टाकून पुढे जाऊ शकत नाही. अर्थात एकुणच मेगा-मॉल अर्थव्यवस्थेमधे खुद्द प्रकाशक नि लेखक यांनाच परवडेनासे झाल्याने आवर्जून विकत घ्यावीत नवी पुस्तके - अर्थात दर्जेदार, कारण जालावरचा रतीब पाहता, नि पैसे 'घेऊन' प्रकाशन करणार्‍या तथाकथित प्रकाशकांची संख्या पाहता कामचलाऊ पुस्तकांचा तुटवडा पडणार नाहीच - मात्र कमी कमी होत जाणार असा अंदाज मात्र बांधता येईल. अर्थात एका ठिकाणी बांध पडलेले पाणी अन्य मार्गाने पुढे जाईल असा - भाबडा वाटला तरी - आशावाद आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

श्री.रमताराम यांच्या "ऑनलाईन बुक स्टोअर्स" मताबद्दल.

~ मी या सिस्टीमचा एक नियमित ग्राहक आहे. जसा पूर्वी स्थानिक पुस्तकालयांचा होतो [अजूनही आहेच], पण ऑनलाईनचा मला नेहमी सुखद अनुभव आला आहे. मी स्वतःहून 'मला अमुक इतके टक्के डिस्काऊंट दिले पाहिजे' अशी कुणाकडेच मागणी केलेली नाही. ऑनलाईन हव्या असलेल्या पुस्तकाची जी किंमत स्क्रीनवर दाखवितात तीमध्ये किती टक्के कमिशन आहे याच्याशी मला कर्तव्य नसते. पुस्तक मिळाले हेच महत्वाचे मानतो. र.रा. म्हणतात तसे रिव्हू फसवे असतात [किंबहुना पेडही असू शकतात, हे इतक्या वर्षाच्या अनुभवाने शिकलो आहेच] पण आता आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर आलो आहे की सत्यता आणि फसवेगिरी यांच्यातील सीमारेषा ओळखता येतात. त्यामुळे फसगतीचे प्रमाण अत्यल्प आहे असे म्हटले तरी चालते. ऑनलाईन बुक स्टोअर्स ग्राहकाप्रती दाखवित असलेली आस्था ही एक फार मोहक बाब आहे असे माझे अनुभवांती मत झाले आहे. दहा पुस्तकांची ऑर्डर बुक केली आणि त्यातील दोन उपलब्ध नसली तर तातडीने फोन येतो आणि अगत्याने 'उरलेली दोन पुस्तक आम्ही अमुकतमुक केन्द्राकडून मागवून घेत आहोत आणि ती इथे येताच तुमच्याकडे त्वरीत पाठवित आहोत...' असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा माझ्यासारखा घरबशा ग्राहक मनोमनी सुखावणारच. अशी सेवादेखील पुस्तक खरेदीची उर्मी वाढवते. कुरिअरचे पार्सलही इतके सुरेख असते की आतील पुस्तकाला हात लावताक्षणीच नवतेपणाचा जो अनुभव येतो त्याची तुलना पैशात करता येत नाही.

मी फ्लिपकार्टच्या नियमित यादीवरील ग्राहक जरी असलो तरी हे स्टोअर ज्या पुस्तकांना एक रुपयाही डिस्काऊंट देत नाही, ती पुस्तके मलाही त्याच किंमतीला मिळतात. मला जादाची सवलत दिली जाणार नाही, आणि हे मला भावते. ज्या पुस्तकांना डिस्काऊंट देऊच शकत नाही, त्याबद्दल {र.रा.म्हणतात त्याप्रमाणे दहा-वीस रुपयाच्या डिस्काऊंटसाठी वाद घालणे} तक्रार करणे योग्य नाही. उदा. रामचंद्र गुहा यांचे "Unquiet Woods" हे पुस्तक तुम्हाला त्याच्या दर्शनी किंमतीसच (रुपये ८९५/-) घ्यावे लागेल, एक रुपयाही डिस्काऊंट नाही. इथे वाद घालता येणार नाही.

तुलनेत स्थानिक पुस्तकविक्रेते (माझ्या दृष्टीने कोल्हापूरातील) अशी सेवा देत नाहीत. "जी आहेत ती पाहा.....", कुठेही कॅटलॉगिंग नाही, कुठेही कॅटेगरीजप्रमाणे पुस्तके रॅक्समध्ये लावलेली नाहीत, अमुक एक कादंबरी नाही तर ती मागवून घेऊ शकाल का, यावर चेहर्‍यावरील सुरकूतीही हलत नाही, मालकाच्या. प्रकाशन पद्धत नाही [म्हणजे मला फक्त 'राजहंस' वा 'पॉप्युलर' साहित्य पाहायचे असेल तर तशी सोय नसते], मालकाच्या पदरी कामाला असतात ती 'पोरे', त्यांच्यापैकी कुणीच पुस्तकविश्वात ट्रेन्ड नसतो, कुठेतरी झेरॉक्सच्या वा पावबटरच्या दुकानात काम करायचे तसे इथेही. एकाकडे एकदा 'मौज' दिवाळी अंक आला आहे का अशी पृच्छा केली तर उत्तर आले, "आवाज आहे, देऊ काय ?" असे उत्तर, म्हणजे त्याच्यासाठी 'मौज' या नावाचा अर्थ गंमत. गल्ल्यावर बसलेल्या मुलीला दहा टक्क्याचे गणित कळत नाही, 'भालचंद्र नेमाडे यांची पुस्तके कुठल्या रॅक्समध्ये आहेत ?" या साध्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नसते. असा सगळा आनंद आहे, तर मग पुस्तकाचे दुकान चालते कशावर ? तर ते माझ्यासारख्या फुटकळ वाचकावर नसून महाविद्यालये आणि हायस्कूल्स यांच्याकडून, तसेच झेड.पी.कडून येणार्‍या बिलावर. प्रकाशक डझनावरी झाले आहेत. ही मुजोर जमात तर नवोदित लेखकालाच सुरुवातीचे भांडवल घालायला लावते आणि प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांच्या थप्प्या अशा जिल्हावार पसरलेल्या दुकानाकडे 'खपल्यावरच पेमेन्ट' या तत्वावर पाठविल्या जातात.

पुण्याच्या ज्या "मॅनीज्" बाबत हा धागा आहे, तसा अनुभव मॅनीजच्या ग्राहकांना (इथे प्रतिक्रिया दिलेल्या सदस्यांनाही) पुण्यातील अन्य दुकानात आला आहे ? शक्यता फार कमी. अप्पा बळवंत चौकात शेकड्यांनी दुकाने आहेत, पण एकाही दुकानदाराच्या चेहर्‍यावर मला ग्राहकासाठी स्वागतस्मित दिसलेले नाही....हा गेल्या पंचवीस वर्षातील अनुभव आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही. आलेले गिर्‍हाईक कधी 'टळेल' याचीच घाई त्याना असते. असतील अपवादही, पण तो अपवादाचा नियम सिद्ध करण्यापुरताच.

त्यामुळे सध्या पुस्तकप्रेमीला 'ऑनलाईन' चा जेवढा आधार वाटतो तितका स्थानिक दुकानदाराचा बिलकुल वाटत नाही, वाटणारही नाही.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्याच्या ज्या "मनीज्" बाबत हा धागा आहे, तसा अनुभव मनीजच्या ग्राहकांना (इथे प्रतिक्रिया दिलेल्या सदस्यांनाही) पुण्यातील अन्य दुकानात आला आहे ? शक्यता फार कमी. अप्पा बळवंत चौकात शेकड्यांनी दुकाने आहेत, पण एकाही दुकानदाराच्या चेहर्‍यावर मला ग्राहकासाठी स्वागतस्मित दिसलेले नाही....हा गेल्या पंचवीस वर्षातील अनुभव आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही. आलेले गिर्‍हाईक कधी 'टळेल' याचीच घाई त्याना असते. असतील अपवादही, पण तो अपवादाचा नियम सिद्ध करण्यापुरताच.

मॅनीज वाल्यांच्या चेहर्‍यावरही कधी स्मित पाहिलेले आठवत नाही! पण त्यांच्या (खासकरून एक बाई असायच्या) तुटक बोलण्याची सवय सुद्धा झाली होती. अप्पा बळवंत चौकात मात्र अपवाद दोन आहेत - रसिक साहित्य आणि परेश एजन्सीज. रसिक वाल्यांनी मला संशोधनासाठी हवी असलेली पुस्तकं मिळवून देण्यात खूप मदत केली होती. बर्‍याच वर्षांनंतर एकदा दुकानात गेले असता "काय, झाली का पीएचडी?" असं ओळखून विचारलं ही होतं. आता तिथे ब्राउजिंग ची सोयही बरी आहे. परेश एजन्सीज चा मालक हा अ‍ॅमझॉनच्या "हे आवडलं असल्यास हे ही पहा" सेवेचा चालता बोलता प्रकार आहे - एखादे पुस्तक घेतले तर त्या सारखेच दहा सुचवतात, आपण नको नको म्हटलं तरी. गल्लीत समोरच मुतारी असल्यामुळे (प्रभात च्या बरोब्बर समोर) तिथे फार वेळ उभं मात्र राहवत नाही ही गोष्ट निराळी...

इंटरनॅशनल वाले बरीच वर्षे बाहेर राहणार्‍या ग्राहकांसाठी यादी घेऊन, पुस्तकं गोळा करून स्वत: पोस्टाने पाठवत असत. अनेकांसाठी त्यांनी अन्यत्र विकत घेतलेली पुस्तकंही त्यात सामिल करून एकाच पुडक्यात पाठविले. डेक्कन चे पोस्ट ऑफिस अगदी मागेच असले तरी या श्रमाचे त्यांनी वेगळे पैसे कधीच घेतले नाहीत. त्याच जागेत लेखकांचे जाहिर वाचन, सह्यांचा कार्यक्रम, इत्यादी करून नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचे उपक्रम राबवता आले असते असे वाटते, पण एकूणच एक उदासीनता, थकवा जाणवतात. असो.

मुसु, वरदा बुक्स बद्दल चर्चा येथे झाली होती. भाव्यांनी अलिकडेच त्यांचा पुस्तकांचा वैयक्तिक साठा मित्रांना वाटून द्यायचे ठरविले. मी ही त्या पुस्तक समुद्राच छान डुबकी मारून आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'परेश'वाल्याकडे राजेशला आलेला हा अनुभव मजेशीर आहे. मला परेशकडे आलेला अनुभव यापेक्षा बरा होता, पण त्या दुकानात पुन्हा जावंसं वाटलं नाही. पुण्यातल्या अत्रे चौकातल्या अक्षरधारामधे मालकांपेक्षा सेल्समनचा अनुभव चांगला होता. पण अडीच-तीन हजार खर्च केल्यानंतर मालकबाईही प्रेमळ झाल्या.
पण अक्षरधाराच्या लोकांनी मला दवणे आणि तत्सम लोकांची पुस्तकं विकायचा प्रयत्न केला होता. परेशवाल्याने मात्र 'त्या वर्षी' (का असंच कोणतंतरी चांगलं पुस्तक) काढून दिलं होतं.
रसिकवाल्यांनी दुपारी जेवणाच्या वेळेस (अक्षरशः) तोंडावर दार आपटून बंद केल्यामुळे तिथेही जाणं टाळायचे.
परेश दुकान आता एसी झाल्यामुळे (किंवा मी दुपारच्या टळटळीत उन्हाच्या वेळेत तिथे गेल्यामुळे असेल) वासाचा अनुभव नाही आला.

ठाण्याच्या मॅजेस्टीकमधे अगत्य तसं बर्‍यापैकी होतं; पुण्याकडून हरणार नाहीत निदान एवढ्याची काळजी घेतात. पण माहितीच्या नावाखाली ठणाणा आहे. मेघनाकडे कदाचित अद्ययावत माहिती असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ठाण्याचं मॅजेस्टिकः
एका फेरीत कधीही हवी ती सगळी पुस्तकं मिळत नाहीत. पण योग्य ती माहिती पुरवली, तर मागवून ठेवतात. आपण पुस्तक विकत घ्यावं, अशीच त्यांची इच्छा असते, यात तरी शंका नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"....अप्पा बळवंत चौकात मात्र अपवाद दोन आहेत - रसिक साहित्य आणि परेश एजन्सीज...."

~ देअर यू आर रोचना ! मी माझ्या प्रतिसादात हेच म्हटले आहे की, अपवादाचा नियम सिद्ध करण्यापोटीच असे एकदोन उदाहरणे पुण्यात सापडतील. 'रसिक' त्यापैकी एक. पण शनिपाराजवळील मॅजेस्टिकचा मला डोकेदुखीचा अनुभव आला आहे. "किरण नगरकरांचे सात सक्कं त्रेचाळीस तुमच्याकडे आहे का ?" या सरळसोट साध्या चौकशीला मला मिळालेले 'मॅजेस्टिक' उत्तर "आम्ही दुसर्‍याची पुस्तके विकत नाही." तेही माझ्याकडे न पाहता, खाली वाकून कागदावर पेन्सील फिरविता फिरविता. फाडकन मुस्काटात लावावी इतका संताप माझ्या मनी दाटला होता. परत तिथली पायरी कधी चढलो नाही. आणि आता तर ऑनलाईनमुळे कधी चढेन याची शक्यताही नाही.

कदाचित रसिक मध्येही असा अनुभव आला असता, आणि तुम्हाला आला नाही, याचे कारण 'स्त्री-दाक्षिण्य' नावाचा काहीतरी समाज प्रकार असतो इतपत जाणीव रसिक मॅनेजमेन्टला असावी. पण ते पुरुष ग्राहकाला तुसडेपणाचीच वागणूक देत असतील. कोल्हापुरातपण काही वेगळे चित्र नाही. आजकाल सगळ्या पुस्तकविक्रेत्यांचे ध्यान फक्त गाईडस, पाककौशल्य, सौन्दर्यसाधना आणि स्पर्धा परीक्षा पुस्तके विकण्याकडेच दिसत्ये. तोंडी लावण्यापुरते "ललित".

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या अनुभवाच्या खरेपणाबद्दल शंका न घेता तुमच्याशी असहमत. इंटरनॅशनल, रसिक यांचाच नव्हे तर अगदी ज्यांचे कोल्हापूरकर भाऊबंद कदाचित तुम्हाला वाईट अनुभव देऊन गेले त्या मेहतांचाही अनुभव अतिशय चांगला आहे. अगदी मराठी पुस्तके फारशी ठेवत नाही आम्ही असे म्हणत पॉप्युलरचे गाडगीळही उपलब्ध नसलेले पुस्तक आणून ठेवून आवर्जून फोन करून पुस्तक घेऊन जाण्याचे कळवतात. नवा गडी असलेले अक्षरधाराचे दालन तर या सार्‍यात आदर्श म्हणावे असे. पुस्तकांची उपलब्धताही बरीच आणि तिथला कर्मचारी वर्गही तत्पर आहे. रसिकमधे तर जणू माझं खातंच आहे. दर वेळी गेलो की नव्या आलेल्या पुस्तकातून मला विकत घ्यायला आवडतील अशा पुस्तकांचे अचूक रेकमेंडेशनही होते. किंबहुना या कारणामुळे आमच्या मित्राचेच ऑनलाईन स्टोर असूनही बहुतेक पुस्तक खरेदी दुकानातूनच होते माझी.

बादवे: रसिक नि मेहता त्यांचे मेम्बर झालात की सरसकट २०% सूट अक्रॉस द काउंटर देतात बरं का. त्यासाठी फ्लिपकार्टची गरज नाही. आणि शिवाय पोस्टाने येण्यातले धोके (एका मित्राला फ्लिपकार्ट्चा अतिशय वाईट अनुभव आला. चक्क फाटलेले पुस्तक आले होते. ते बदलून घेण्यात प्रचंड मनस्ताप झाला. त्याने फ्लिपकार्ट्च्या नावाने कानाला खडा लावला आहे.) नाहीत.

अवांतरः थोडासा पूर्वग्रहदेखील काम करत नाही ना हो? (ह. घ्यालच)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

र.रा. ~

रसिक आणि इंटरनॅशनल तसेच आणखीन् एकदोन ही सेवेच्या बाबतीत 'अपवादात्मक' असू शकतील असे मी प्रतिसादात म्हटले आहेच. मला तसा अनुभव आलेला नाही म्हणजे इतरानांही आलाच असेल असा माझ्या मताचा आग्रह नाही [रोचना याना 'रसिक' चा चांगला अनुभव आला आहे असे त्या म्हणतात, तर अदिती 'रसिक' बद्दल म्हणते "तोंडावर दार आपटून बंद केल्यामुळे तिथेही जाणं टाळायचे."]. शनिपाराची मला आलेल्या अनुभवाची पुढची पायरी मी इथे सांगत नाही. आपण नेहमी समोरासमोर भेटत असतोच, त्यावेळेच्या प्रवास-चर्चेसाठी 'मॅजेस्टिक' किस्सा राखून ठेवतो. माझे अनुभव हे "ग्रंथाली", "अक्षरधारा", "किताब कॉर्नर" आदीनी गावोगावी प्रदर्शने भरवून वाचकात पुस्तकप्रेम निर्माण करण्याच्या परंपरेपूर्वीचे आहेत. अक्षरधाराचा मलाही चांगलाच अनुभव आहे. काही कामानिमित्ताने एकदोन वर्षापूर्वी नागपूरला जाण्याचा योग आला होता. एक दिवस मोकळा मिळाला म्हणून तेथील मित्राच्या सल्ल्याने अंबाझरी मार्गावर असलेल्या 'फेमस बुक सेंटर' इथे गेलो. सायंकाळी ६ च्या सुमारास जितकी असणे अपेक्षित असते तितकी गर्दी तिथे होती. पण मी 'कोल्हापूर' हून आलो आहे हे मित्राने माझ्याविषयी सांगताच तेथील व्यवस्थापकाने मी शे-दोनशेची पुस्तके घेतली असली तरी अगदी व्हीआयपीसम ट्रीट्मेन्ट दिली, दहापंधरा मिनिटे गप्पा आणि चहाही झाला. इतकेच नव्हेतर माझा पत्ता त्यानी आपल्या डायरीत टिपून ठेवला. विशेष म्हणजे याच फेमस बुक सेंटरने गेल्या वर्षापासून कोल्हापूर-सांगली-इचलकरंजी भागात अक्षरधारासम पुस्तक प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली, त्यावेळी त्याबाबतचे पत्र मला आवर्जून पाठविले. हादेखील एक सुखद धक्का. असे अगत्य सर्वत्रच मिळत राहिले तर मग ऑनलाईनकडे फक्त दुर्मिळ पुस्तकांसाठीच माऊस जाईल.

पॉप्युलरच्या गाडगिळांचा तुम्हाला आलेला अनुभव कदाचित तुमच्या तिथल्या सततच्या वावरामुळेही निर्माण झाला असेल. पण 'मेहता....!!!" गॉश्श. सॉरी, इफ वुई आर टु डिफर ऑन धिस नेम, डिफर वुई मस्ट. मेहता दोन आहेत, एक 'सुनिल' इन पुणे आणि 'अनिल' इन कोल्हापूर. कोल्हापूरकरांविषयी मी इथे बिलकुल लिहिणार नाही, कारण मी लिहूच शकत नाही. पुण्यात स्थायिक झाल्यावर मेहताना तिथल्या मूळच्याच बलाढ्यांच्या तोडीस तोड होणे व्यवसायाच्या दृष्टीने गरजेचे असल्याने 'सेवे'त दर्जा ठेवणे केवळ अपरिहार्य होते, जे त्यानी केले. २०% मेम्बर्सला देतात, म्हणजे कुठल्यातरी एका नियमाच्या विळख्यात तुम्हाला जखडून ठेवणार हे क्रमप्राप्तच आहे. त्या २०% त ही ठराविक पुस्तके नसतात हा अनुभव कित्येकाना आला आहे.....म्हणजे ज्याला 'बेस्ट सेलर्स' म्हटले जातात अशी [याबद्दल 'पुस्तकविश्व' वर बरीच चर्चा झाल्याचे तुम्हाला दिसून येईल.]

'फ्लिपकार्ट' चा तुमच्या मित्राला वाईट अनुभव आल्याचे वाचून खेद झाला. मी फ्लिपकार्ट व्यवस्थापनाला [बंगलोर शाखेचे श्री.केशवा रेड्डी] स्वतंत्र मेलने याबाबत नक्की विचारणार, तितका माझा अधिकार जरूर आहे. पण असे असले तरी मी स्थानिक काऊंटर [मराठी] विक्रेत्यापेक्षा ऑनलाईनला नेहमी झुकते माप देईन.

[अवांतर : पूर्वग्रह पुस्तक खरेदीच्याबाबतीत का निर्माण व्हावेत ररा ? मी पुस्तक घेतो म्हणजे मोफत मागणी करत नसून काऊंटरवर कॅश मोजतो. मग मी तशीच सर्व्हिस अपेक्षिली तर ग्राहक म्हणून माझ्या हक्काचीच मी जाणीव करून देतो असेच म्हणेन.]

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्लिपकार्ट वगैरे चांगले आहेतच, यात प्रश्न नाही, अनेक वर्षं अ‍ॅमझॉनचा ही उपयोग झाला. पण जोवर दुर्मिळ मराठी पुस्तकं (अथवा अन्य भारतीय भाषांमधली) शोधून काढून देण्याची क्षमता या साइटींत नाही, तोवर त्यांची उपयुक्तता माझ्यासाठी तरी सीमितच आहे. "विशलिस्ट" वगैरे प्रकार सोडा, यांचे सर्च फंक्शन सुद्धा नीट चालत नाही.

उदा. सध्या कोलटकरांच्या "भिजकी वही" च्या शोधात आहे. माझ्या एका कलीग ना ते हवंय.
१) फ्लिपकार्ट वर कोलटकरांचे इंग्रजी लेखन उपलब्ध आहे. मराठी एकही नाही.

२) बुकगंगा वर कोलटकरांचे एकही पुस्तक नाही. पण कधीकधी लेखकाच्या नावाने शोध नाही लागला तरी शीर्षकावरून लागतो. तो ही नाही लागला. म्हटलं "प्रकाशन वर्ष" वरून पहावे. तर तसे सॉर्ट केल्यावर पुस्तकाच्या माहिती मजकूरात वर्ष दिसतच नाही! म्हणजे त्या सॉर्ट फंक्शनचा फारसा उपयोग होत नाही.

३) ईरसिक वर सुरुवातीला लेखकाच्या नावावरून शोधलं - कोलटकर रोमन अक्षरात (त्यांचाच तो डिफॉल्ट आहे). काही नाही. मग नागरीत लिहून पाहिलं. तर रोमन अक्षरात "कोलटकर अरुण ओ." असे साइटीनेच मला सुचविले. वा, म्हणून मी तो पर्याय निवडला. तर तब्बल ६९९ "अरुण" नाव असलेल्या लेखकांच्या पुस्तकांची यादी दिली. स्क्रोल करत करत मी शोधलं, तर कोलटकरांची दोन पुस्तकं दिसली. त्यांच्या नावावर पुन्हा टिचकी मारली, पण पुन्हा त्याच ६९९ पुस्तकांच्या यादीवर पोचले.

४) आता "भिजकी वही" गुगलून पाहिले, तर रसिक.कॉम च्या अमेरिकन डॉलर साइटवर हे पुस्तक दिसते, पण आउट ऑफ प्रिंट म्हणून. त्याच खाली ईरसिक.कॉम वरही आता ते मला दिसले, पण "कोलटकर" नाही, तर "कोल्हटकरांच्या" नावाखाली! इथे चिरिमिरी, काला घोडा पोएम्स ही आहेत. इथे मी पुस्तक कार्टात टाकले, पण ते उपलब्ध आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. पैसे भरण्याआधी मी त्यांना फोन लावल्यावर त्यांनी "प्रकाशकामुळे चुकीची माहिती दिली जाते, हे पुस्तक अवेलेबल नाही" असे सांगितले, आणि ईमेल ने क्वेरी पाठवल्यास शोध लावला जाईल असे आश्वासन दिले. ईमेल पाठवणे फुकट, आता पाठवून बघते.

सांगायचा मुद्दा हा, की राजेश यांना परेश एजंसीज येथे आल्यासारखाच हा "ऑनलाइन" ताप आहे - चकचकीतपणा जबरदस्त, चमकणारे बटन अन काय काय, पण अनेक प्रश्नांचे सरळसोपे उत्तरच नाही! शेवटी लोकप्रिय, सहज मिळत असलेल्या पुस्तकांना मोठी दुकानं काय, साइटी काय, त्रास नाहीच. वेगळंच काहीतरी शोधत गेलं तर दोन्हीकडे तापही आहेत, तसेच अनपेक्षित आनंदही आहेत.

आता पुण्याला पुन्हा जाईन तेव्हा इंटरनॅशनल मध्ये जोगळेकरांना सांगून ठेवीन - गावात ते सतत जात असतात, माझी विशलिस्टही घेऊन जातील... बघू कुठे गोदामात एखादी "भिजकी वही" सापडते का.

ता.क.: "भिजकी वही" ची प्रत कोणाला आढळल्यास, कोणी विकायला तयार असल्यास प्लीज मला व्य.नि. करा... (हे जालीय सर्च फंक्शन उपक्रम वरच्या "नशीबात नसलेली पुस्तके" धाग्यानंतर मला फार उपयोगी पडले आहे... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या ऑनलाइन तापाशी सहमत, तुम्ही नमूद केलेल्या काही ऑनलाइन व्यवस्था इन्फॅन्ट अवस्थेत आहेत, त्या कालपरत्वे विकसित होतील ह्याची काहीच हमी नाही पण आशा आहे.

फ्लिपकार्टचे WeRead चे संपादन भविष्यात उत्तम सेवा देण्याची आशा जागृत करणारे आहे, ऑनलाइन ताप अनुभवायला फार श्रम/वेळ लागत नाही हीच काय ती त्यांची बरी बाजू.

भिजकी वहीबद्दल - खुद्द प्रास प्रकाशन किंवा साहित्य अकादेमी च्या ग्रंथालयात ह्याबद्दल सर्वोत्तम माहिती मिळू शकेल(?) असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचना ~

"ऑनलाईन" आणि "दुर्मिळ - त्यातही मराठी - पुस्तके" या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते. एका मित्राला भेट देण्यासाठी शशी भागवतांचे 'मर्मभेद' आणि 'रत्नप्रतिमा' मला हवे आहेत. अजूनही मिळत नाही. मुळात मी काहीसा भटक्या प्रवृत्तीचा माणूस असल्याने ज्या गावी जाईन तिथे सर्वप्रथम कुठली चौकशी करीत असेन तर 'जुन्या पुस्तकांचा बाजार'. पण दुर्दैवाने आजच्या अतिवेगवान जीवनशैलीच्या गणितात जुन्या बाजाराची संकल्पनाही हळुहळू लुप्त होत चालली आहे. अर्थात अपवाद दिल्ली, मुंबई, कलकत्ता सारख्या मेट्रोनगरी. पण त्या ठिकाणी तर आपण साप्ताहिक भेटीसाठी जाऊ शकत नाहीच. छोट्या छोट्या शहरात कुठेतरी सिनेमा टॉकीजच्या मागील गल्लीत एखादा शमसुद्दीन काझी वा अंतोबा तांबट असे नाव धारण करणारा सत्तरीचा गृहस्थ शे-दोनशे पुस्तके घेऊन बसलेला आढळायचा. ते आता इतिहासजमा झालेत. अजूनही फुटकळ स्वरूपात आहेत, पण त्यांचा इंटरेस्ट फक्त मेडिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर अशा क्षेत्राशी संबंधित रेफरन्स बुक्स विक्रीतच दिसतो.

अशी दयनीय अवस्था असताना ऑनलाईनची मॅनेजमेन्ट तरी 'दुर्मिळ' बाबतीत काही लक्षणीय करू शकेल याची मला खात्री वाटत नाही. ते वगळता मात्र त्यांच्या सेवेबाबत माझी कसलीही तक्रार नाही. फ्लिपकार्ट तर ओळखदेख नसतानाही केवळ मोबाईल कन्फर्मेशनवर हजारो रुपयांची पुस्तके कुरिअरने तीन-चार दिवसात पाठवितात, अन् तेही सी.ओ.डी. तत्वावर. हे फार भावण्यासारखे आहे. बुकगंगा, रसिक अशी सेवा देत नाहीत. असो.

"भिजकी वही" बद्दल :

रोचना, 'भिजकी वही' माझ्याकडे आहे. दुर्मिळ आहे, त्याला कारण अशोक शहाण्यांची 'प्रास' पुस्तकांची दुसरी आवृत्ती काढण्यामागील उदासिनता [ते सेकंड एडिशनला 'दुसरी खेप' म्हणतात]. अर्थात पैशाचाही प्रश्न असणारच. पुस्तकांची निर्मिती खूप दर्जेदार असते, त्यामुळे आहे मागणी म्हणून आणा बाजारात अबक लेखकाचे पुस्तक असा प्रकार प्रासबाबत नसतो. माझ्याकडील भिजकी वहीची 'खेप' २००६ ची आहे. त्यानंतर तिसरी खेप झाल्याची माहिती नाही. माझ्याकडे असलेल्या या काव्यसंग्रहाची (२००६) किंमत ४५०/- आहे, म्हणजे मग आज एडिशन काढलीच तर ती ६००/- च्या खाली येणार नाही. पण काढतीलच याचे शाश्वती नाही.

तुमच्या मित्रांना भिजकी वही मधील काही संदर्भ लागतील तर मला जरूर विचारा. माझ्याकडील प्रत मी देऊ शकत नाही, याला कारण पुस्तक दुर्मिळ आहे म्हणून नव्हे तर ते मला अशाच एका अवलिया मित्राकडून भेट मिळाले आहे, आणि त्यामुळेही माझ्या दृष्टीने या काव्यसंग्रहाचे मोल खूप आहे.

"प्रास" ची वितरणव्यवस्था रसिककडे होती. तेथील श्री. शैलेश नांदुरकर यांच्याकडे फोनवरून 'भिजकी वही' च्या उपलब्धतेविषयी तुम्ही चौकशी केल्यास सध्याची पुस्तकाबाबतची वस्तुस्थिती समजेल.....मोबाईल ९८२३०५४५२०.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं बोलणं मधाशी नांदुरकरांबरोबरच झालं. त्यांचाच हा नंबर ईरसिक वर आहे, प्रकाशकाच्या चुकांबद्दल इ. त्यांनीच सांगितलं.

प्रास प्रकाशनाने सुद्धा "काळाची गरज" वगैरे लक्षात घेऊन आता "भिजकी वही" चे "ई-एडिशन" काढायला हरकत नाही, काय! Smile (ह.घ्या..)

असो. मी शोध चालू ठेवते. कुणा अंतोबा तांबट कडे पुन्हा गेलात तर पुस्तकाबद्दल माझ्यासाठी नक्की विचारा म्हणजे झालं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचना ~

"भिजकी वही" चे "ई-एडिशन" काढायला हरकत नाही"......
केवळ अशक्य असलेली ही घटना आहे. प्रासचे शहाणे मुळातच फारसे व्यावसायिक प्रवृत्तीचे गृहस्थ नाहीत असा त्यांचा 'बंडखोरी'चा इतिहास सांगतो. लिटल मॅगेझिन चळवळीचे ते एक अध्वर्यू होते आणि त्यांच्याभोवती जमलेली साठीच्या दशकातील नेमाडे, दिलीप चित्रे, भाऊ पाध्ये, तुळसी परब, रघू दंडवते, अरुण कोलटकर, मन्या ओक, वसंत गुर्जर आदी मंडळींचे साहित्य प्रकाशित करणे हेच त्यानी आपले परमकर्तव्य मानले. ठराविक प्रतींची आवृत्ती आणि ती खपवायचीही त्याना घाई नसायची [आजही नाहीच], त्यामुळे ही लेखक मंडळीच ते पुस्तक आपापल्या परिवारात हरेक प्रकारे कसे 'सर्क्युलेट' होईल हेच पाहात असत. त्यातल्यात्यात दिलीप चित्रे यानी काहीसा व्यावसायिकपणा प्रासला लावला असे म्हटले जाते.

आपल्या त्या साठीच्या परिघातून ही मंडळी कधीच बाहेर आली नाहीत. त्या काळातील प्रस्थापितांना शिव्या देत देत हे मोठे झाले आणि ही साठीत आल्यावर मग याना शिव्या घालणारी श्रीधर तिळवे सारखी पुढील पिढी आली.....ते थंड झाले, आता परत हेच अटळ चक्र या थोर्र थोर्र मराठी साहित्यात चालत राहील यात शंका नाही.

'सत्यकथा' बाबतची "ई" संकल्पना मी स्वतः भागवतांच्या आताच्या पिढीकडे मेलद्वारे विनंती करून सादर केली होती. आजच्या साहित्यावर मनापासून प्रेम करणार्‍या पिढीला 'सत्यकथा' चे सांप्रत मराठी भाषेत काय योगदान आहे याचा अभ्यास करता यावा यासाठी सर्व अंक नेटवर आणल्यास तो ऐतिहासिक ठेवा सर्वांना अभ्यासता येईल अशी त्या पत्रामागील भूमिका मी योग्यरितीने मांडली होती. अर्थात खटाववाडीकडून उत्तरापोटी एक माशीही आली नाही माझ्याकडे.

हीच परंपरा प्रासची आहे.

अशोक पाटील
{अंतोबा तांबट शोधणावळ जारी ठेवतो}

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी सहमत आहे अशोक काका Smile

मलाही ऑनलाईन खरेदीचाच अनुभव जास्त चांगला आहे.

त्यामुळे सध्या पुस्तकप्रेमीला 'ऑनलाईन' चा जेवढा आधार वाटतो तितका स्थानिक दुकानदाराचा बिलकुल वाटत नाही, वाटणारही नाही.

हे खूप पटले

पुस्तकांच्या खरेदीच्या बाबतीत थोडा माझा अनुभव सांगतो.

मी नियमितपणे भरपूर पुस्तके घेतली आहेत व आजही घेतो आहे. पण ऑनलाईन खरेदीइतका सुखद अनुभव प्रत्यक्ष खरेदीत क्वचितच मिळतो.
एखादे पुस्तक मागितले तर हे कार्ड घ्या आणि पुढच्या आठवड्यात फोन करा हे एवढ्या मक्खपणे सांगून दुकानदाराने पाठ फिरवल्याचेही अनुभव मी घेतले आहेत. असो.
ऑनलाईन खरेदीचा प्रमुख फायदा म्हणजे त्यांच्यापरिने ते रास्त किंमत देतात आणि मुख्य म्हणजे तेच पुस्तक ही गरज ज्याची आहे त्याच्यासाठी अशोक काका म्हणतात त्याप्रमाणे किंमत हा मुद्दा गौण ठरतो

मी एकदा इन्फिबिम.कॉम वर एका पुस्तकाची किंमत फ्लिपकार्ट पेक्षा कमी पाहिली व लगेच ती गोष्ट फ्लिपकार्टच्या निदर्शनास आणून दिली. एका दिवसांत त्यांनी त्यांची किंमत बदलली. त्यानंतर मी ते पुस्तक त्यांच्याकडून घेतले हा वेगळा विषय झाला. पण अशी ग्राहकोपयोगी सेवा द्यायला आपल्या मराठी पुस्तक विक्रेत्यांना का जमू नये? हा एक संशोधनाचाच विषय आहे.

दुसरा मुद्दा किंमतीचा
एक उदाहरण घेऊयात. बुकगंगा.कॉम यांच्याकडून मी नियमितपणे पुस्तके घेत असतो. पण १० % यापेक्षा कमी सवलत देणारच नाही. मग पुस्तक कोणते का असेना? हा त्यांचा पवित्रा ऑनलाईन खरेदीत त्यांच्या धंद्याला किती मारक आहे हे पुढील उदाहरणावरुन पटेल.
बुकगंगा.कॉम वर गो.स.सरदेसाई यांच्या 'मराठी रियासत' चे ८ खंड (मूळ किंमत - रु.५,५००/-) १० % सवलतीने रु. ४,९५०/- या दराने उपलब्ध आहे. हा पहा दुवा

दुसरीकडे फ्लिपकार्ट.कॉम सारख्या व्यावसायिक सेवा देणार्‍या साईट वर हीच रियासत ३०% सवलतीने रु. ३,८५०/- या दराने उपलब्ध आहे.

हा पहा दुवा
फ्लिपकार्ट कडून रियासत घेतली तर १,६५० रुपये वाचतात. आणि बुकगंगाकडून घेतली तर फक्त रु. ५५०/-
आता एक ग्राहक म्हणून तुम्हीच सांगा की रियासत तुम्ही कोणाकडून घ्याल?
फ्री शिपिंग दोघांचेही आहे, त्याउलट पॅकिंग हे फ्लिपकार्टचे जास्त सरस आहे. त्यामुळे घेतलेली पुस्तके उत्तम अवस्थेतच तुम्हाला मिळतील. तशी ती बुकगंगाकडूनही मिळतील. पण किंमतीतील तफावतीचे काय करणार?

असो...
मॅनीज कायमच मनात राहणार आहे. मॅनीज ला अखेरचा सॅल्यूट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<(इंटरनॅशनलमध्ये) पण एकूणच एक उदासीनता, थकवा जाणवतात.> रोचना.

इंटरनॅशनलचे उपेन्द्र दीक्षित हे माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडून अनेक पुस्तके विकत घेतली आहेत. पुढील पिढी ह्या व्यवसायात पडायला तयार नसल्याने केवळ वडिलांनी सुरू केलेले दुकान चालवायचे ह्या जिद्दीने दीक्षित स्वत: तेथे रोज उपस्थित असतात. त्यांचा सेवकवर्गहि तसाच committed आहे पण तेहि लोक जुने होत चालले आहेत.

दुकानाची जागा डे.जि. क्लबच्या मालकीची आहे ही बाबहि दुकानाची मालकी बदलण्याच्या मार्गातील एक अडचण आहे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याचे त्याचे अनुभव असतात. सिद्धांतीकरणाचा आग्रह कामाचा नाही.
फ्लिपकार्टचा माझा अनुभव चांगला आहे, ररांच्या मित्राचा वाईट. रसिकचा माझा अनुभव वाईट आहे, इतरांचा चांगला. इंटरनॅशनलचा माझा अनुभव वाईटच आहे, पण माझ्याच काही मित्रांची ती शिफारस असते.
तेव्हा पूर्वग्रह नकोच. एक मात्र निश्चित आहे - सरासरी पाहता मराठी माणसं उद्योग-व्यवसायात मागं असावीत ती अशाच कारणांमुळं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपचर्चेत आलेल्या काही मुद्यांशी सुसंगत असे मुद्दे असलेला एक लेख नुकताच वाचनात आला. दुवा: http://www.launch.co/blog/the-cult-of-amazon-prime.html

Once you're in the cult you're not leaving because leaving means you have the drudgery of having to drive to the store, finding the item you want, seeing if it's in stock and then dealing with the most horrifying experience of all: retail employees.

According to most Prime members I've talked to, one of the greatest joys of the cult membership is never again having to deal with an apathetic teenager or bitter baby boomer forced to work in retail.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बर्‍याच प्रतिसादात कोलटकरांच्या कवितासंग्रहांचा उल्लेख आला आहे म्हणून.

१. प्रकाशक पुढच्या आवृत्त्यांबाबत एवढे उदासीन का?
२. ईबुकांच्या जमान्याततरी या अडचणी कमी होतील का?
३. इथल्या (अमेरिकेत) विद्यापीठाच्या ग्रंथालयात गेले होते तेव्हा सहजच 'भिजकी वही' शोधलं. कोलटकरांचं तेवढंच होतं. निदान फोटोकॉपीतरी काढली असती. पण गेली काही वर्ष हे पुस्तक तिथून हरवलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती ~ [तू इथे मांडलेल्या शंका 'अवांतर' कॅटेगिरीतील नसून धाग्याच्या अनुषंगानेच आहेत.असो]

१. प्रकाशक पुढच्या आवृत्त्यांबाबत एवढे उदासीन का?
~ प्रकाशकांच्या दोन जाती आहेत (अ) पूर्णपणे व्यावसायिक. या गटात पॉप्युलर, देशमुख, कॉन्टिनेन्टल आणि मेहता येतात. २४ तास 'प्रकाशन' याच व्यवसायाला यानी वाहून घेतल्यामुळे यांची बांधिलकी प्रकाशन हा धंदा पूर्णपणे फायदेशीर कसा होईल याकडेच लक्ष देण्यात लागलेले असते. यात चुकीचे काहीच नाही, शेवटी त्यानी केलेली लक्षावधी रुपयांची गुंतवणूक ही काही केवळ 'माय मराठी भाषेच्या' वृद्धीसाठी बिलकूल मानत नाहीत हे लोक. बाजाराची चाहूल घेण्यासाठी यांच्याकडे प्रशिक्षित असे सीईओही असतात आणि कोणत्यावेळी कोणत्या लेखकाच्या पुस्तकांची नवी आवृत्ती काढायची, ती कशी खपवायची, त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यातील विक्रेते+दुकानदार कसे सांभाळायचे, कमिशन किती द्यायचे, विद्यापीठाच्या बीओएसवर "आपली" प्रा.मंडळी कसे विराजमान होतील यासाठी कोणता माणिकचंद जर्दा वापरायचा....अशा चाली [ज्या धंद्याच्या दृष्टीने सर्वमान्य आहेत] नेहमी यांच्या प्रांगणात आखल्या जातात. शिवाय 'अमुक एक लेखक सध्या बहरात आहे, मागणीचा आहे, तर त्याला दुसर्‍याच्या कॅम्पमधून पळवून आणण्यासाठी कोणते गिमिक्स खेळले गेले पाहिजेत' इकडेही या मंडळीचे लक्ष असते. (ब) या गटात 'हौशी प्रकाशक' असतात. याना पैशापेक्षा साहित्याशी असलेली बांधिलकी महत्वाची वाटते. म्हणजे पैसा तर हवा असतोच, पण ते त्यांचे अंतिम ध्येय नसते. यामध्ये मौज, प्रास, लोकवाङमय गृह, अशी मोजकी नावे येतात. ही मंडळी एका आवृत्तीतून खर्च बाहेर पडला की त्यावर समाधान मानतील. यांच्या यादीतील साहित्यिकाला मराठी वाचक डोक्यावर घेत असला तरी अशा लेखकाच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघायला वीस-वीस वर्षे लागू शकतील.....तरीदेखील ती निघेलच याची शाश्वती नसते. आठदहा लोक साहित्यावरील प्रेमापोटी एकत्र येतात, कुण्याच्यातरी टेरेसवर बसून चर्चा करतात, वह्यातून खरडलेल्या कविता, लेख, समीक्षा आदीचे वाचन, चहासिग्रेट्च्या सोबतीने होते {'रविकिरण मंडळ' चालीने}, मग त्यातल्यात्यात आर्थिक उलाढाली करणारा [अशोक शहाणे, दिपुचित्रे] पुढे येऊन कोलटकराच्या कविता पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो, तो यशस्वीही होतो, पण त्या यशाचा पाठपुरावा ही मंडळी 'व्यावसायिक दृष्टीने' करीत नाहीत. "काढले ना पुस्तक ! बास्स झाले...पुढचे पुढे !" यामुळेच पुढच्या आवृत्यासाठी बाजारात मागणी असली तरी ही मंडळी ढीम्म राहातात. शिवाय जिल्ह्यापातळीवरील दुकानदाराना मेहता भटकळ कुलकर्णी आदी मंडळी ४०% पर्यंत कमिशन देतात, लाखो रुपयांचे क्रेडिटही देतात, तसे 'ब' गटातील प्रकाशक करतात. मुळात आवृत्ती असते तीनशे ते पाचशे प्रतींची अन् कमिशन देणार जास्तीतजास्त १०%. खरेदी रोखीनेच व्हावी असा आग्रह. मग किरकोळ विक्रेता कशाला यांच्या मागे लागेल ?

माझ्याकडे जवळपास सर्व अरुण कोलटकर आहे, पण त्यापैकी एकही पुस्तक गावातील दुकानदाराकडे मिळालेले नाही....असेच कुणीतरी भेट म्हणून वा अन्य देवाणघेवाणीतून [म्हणजे 'माझ्याकडे पु.शि.रेग्यांची सावित्री आहे, त्याच्याबदल्यात नेमाड्यांची 'मेलडी' मला दे...' असा व्यवहार आम्हा मित्रात होत असतो.]

२. ईबुकांच्या जमान्याततरी या अडचणी कमी होतील का?
~ नोप, नो चान्स, अदिती. याबद्दल मी रोचनाला दिलेल्या प्रतिसादात सविस्तर लिहिले आहेच.

३. "...पण गेली काही वर्ष हे पुस्तक तिथून हरवलेलं आहे...."
~ हे हरवणे 'सोयिस्कर असते. अमेरिकेतच काय, पण अगदी कोल्हापुरातल्या 'नगर वाचन मंदिरातील' हरविलेल्या पुस्तकांची यादी पाहिलीस तर तुला दिसून येईल की, ज्या ज्या पुस्तकांना 'दुर्मिळ' गणले जाते, ती सारी पुस्तके पद्धतशीरपणे 'हरविली' जातात. एखाद्या सभासदाकडून पुस्तक हरविले गेले असेल तर त्या पुस्तकाच्या छापील किंमतीच्या दुप्पट रक्कम ग्रंथालयाने वसूल करावी असा दंडक आहे. ठीक आहे. माधव जूलिअन् यांचे 'सुधारक' नावाचे एक पुस्तक आहे, जे १९२८ साली प्रकाशित झाले. त्याची छापील किंमत होती अवघी दीड रुपया. माधवरावांवर पीएच.डी करणार्‍या एका विद्यार्थ्याने [जो पुढे शहरातील एका नामवंत महाविद्यालयात मराठीचा प्रा. झालाही.....हा माझ्या चांगल्या ओळखीचा होता, आजही आहेच] सदस्यत्व घेऊन 'सुधारक' घेतले....आणि कालांतराने त्याच्याकडून हे पुस्तक 'हरविले'. काय झाले ? त्याचे सदस्यत्व निलंबित झाले नाही, फक्त 'तीन' रुपयांचा दंड भरून घेतला, जो याने झटदिशी भरलाही. त्या पुस्तकाची आज कुठेही आवृत्ती नाही, आणि नगर वाचन मंदिराच्या कॅटलॉगमधून ते नाव कायमचे गायब. अरुण कोलटकरांच्या साहित्याविषयी असेच म्हटले जाते.

अमेरिकेन "पुस्तक हरविणे दंड पद्धती' विषयी काहीशी माहिती शोधलीस तर तुलाही अशीच पद्धत तिथेही आढळेल.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0