व्ह्यूफाईंडरमधून कोरीया

थंडी ओसरू लागल्यावर फिरायला घराबाहेर पडणे अधिक सुखावह होऊ लागले. तेंव्हा असेच एकदा संध्याकाळचे आम्ही फिरायला म्हणून बाहेर पडलो. वेगवेगळे रस्ते शोधून काढायची मला भारी हौस असल्याने नेहमीचा मुख्य रस्ता सोडून आम्ही एका आतल्या रस्त्याला लागलो. थोडे पुढे गेल्यावर अचानक आम्हाला एके ठिकाणी काही तंबूवजा स्टॉल्स निवासी संकुलाच्या मधल्या मोकळ्या जागेत घातलेले दिसले. जवळ जाऊन पाहिले तर अचानक एक बाजारच समोर उलगडला, हरतऱ्हेच्या घरगुती सामानाने, वस्तूंनी, भाज्या फळे आणि मांस-माशांच्या टवटवीत दुकानांनी सजलेला आणि गिऱहाईकांनी ओतप्रोत भरलेला। इतक्या दिवसांच्या एकसुरी थंड उदास विश्वातून एकदम जिवंत प्रवाही रशरशीत दुनियेत पोहोचल्याप्रमाणे झालं. रंगीबेरंगी कपड्यातली बरीच कोरीयन मंडळी त्याठिकाणी खरेदी विक्रीमधे मग्न होती. एरवी नुसत्या रस्त्यांनी दिसायचे ते नुसते लोक इकडून तिकडे जाणारे किंवा कशाच्या तरी प्रतिक्षeत असलेले लक्ष दुसरीकडेच असलेले. इथे मात्र तसं नव्हतं. बाजार हा इथला केंद्रबिंदू होता आणि त्याभोवती जमली होती माणसं नेमक्या हेतूने आणि म्हणूनच तो बाजार त्यांच्यात संचारला होता आणि सगळेजण तिथे संचारत होते, मुक्त मनाने. केवळ सामानाने लदबदलेला, काचेच्या बंदिस्त जगातला बिनचेहऱ्याचा तो नुसता मॉल नव्हता काही तर ते होते प्रत्यक्ष खळाळते जीवंत माणसांचे जग, सर्व तऱ्हेच्या आकार उकारांनी भरलेले आणि भारलेले, स्वागतशील आणि उबदार। बघणाऱ्याला खेचून घेणारे. मग आमचे पाय तिकडे न वळते तरच नवल...
त्या बाजारातून फेरफटका मारताना लक्षात आले की भाजीपाला, मांस मासे वगैरे अगदी ताजा माल आहे आणि विक्रेते देखील बहुधा स्वतःच उत्पादक असावेत इतक्या आत्मियतेने आणि लगबगीने विक्री करताना दिसत होते. पुठ्यांच्या चतकोरावर लिहून ठेवलेल्या किंमतींवर नजर टाकली तर वाटले सुपर मार्केटच्या मानाने जरा तरी कमीच असतील बहुधा. कारण एव्हाना मला कोरीयन महागाईचा दणका बसलेला होताच त्यामुळे त्या किरकोळ फरक असलेल्या किमती देखील मला खरेदीसाठी प्रोत्साहित करायला पुरेशा होत्या. चला, निदान इथे तरी काही आनंदाने खरेदी करता येईल हा दिलासाच माझ्या इतके दिवस धास्तावलेल्या मनावर फुंकर घालणारा होता। ऋतू बदलामुळे भाज्या आणि विविध प्रकारच्या मश्रुम्सची आवक झालेली दिसली. माझा प्रांत नसला तरी नजर वेधून घेणारा मांसाहारी विभाग देखील लक्षणीय दिसत होता. त्या क्षणी मग तमाम मांसाहार प्रेमी मित्रमंडळींची आणि त्यांच्या सुगरण आयांची विलक्षण आठवण झाली. वाटले त्यापैकी आत्ता इथे कुणी मंडळी असती तर खजीनाच समोर उघडून मांडल्यागत त्यांची अवस्था झाली असती, विशेषतः निटनेटकेपणे ओळीत मांडलेले मत्स्यावतराचे प्रकार बघून। मासे ही या समुद्राने वेढलेल्या देशाची खासियत असल्याचे वाचले होते ते आता प्रत्यक्षच समोर साकारलेले दिसत होते. विविध प्रकारचे मासे आणि ते सुध्दा इतक्या स्वच्छ परिसरात आणि मासळी बाजारातला कलकलाट नसलेल्या मात्र तरीही उल्हसित वातावरणात मांडून ठेवलेले पाहून आपल्याकडची तमाम मत्सप्रेमी जनता सदेह स्वर्गाला पोहोचली असती असेच राहून राहून मला वाटत होते. फुलांची तोरणे सजवावीत त्याप्रमाणे माशांची सुंदर तोरणं करून लावलेली स्टॉल्सच्या दर्शनी भागांवर दिसत होती आणि पाहताक्षणी नजरबंदी करत होती. माझ्यात नकळत "दळवी-पिंगे" तर संचारले नाहीत ना? कारण मला ठायी ठायी हरतऱ्हेची समुद्र रत्ने दिसत होती. कालवं, तिसरे, कोलंबी आणि दोन्ही हातांच्या तळव्यात मावणार नाहीत एवढाले खेकडे। त्यांची कदर करायला खरोखरच तशी योग्य व्यक्तीच तिथे हवी होती असे खूप वाटून गेले.

तर अशा त्या मनोवेधक बाजारात म्हणू ती दैनंदिन गरजेची गोष्ट मौजूद होती. नुसता भाजी बाजारच नव्हे, तर तयार कपडे, चपला बुटांपासून ते रजया, लोड उशांपर्यंतचे सगळे स्टॉल्स दिसत होते. फार बजबजपुरी मात्र नव्हती आणि तसा सगळा नेटका आटोपशीर मामला होता आठवडी बाजाराप्रमाणे. असे ते एकंदर माफक आणि बेतशीर प्रकरण असल्यामुळे माझ्या प्रकृतीशी अगदी सुसंगत होते म्हणूनच मला तो सगळा प्रकार बेहद्द आवडला. शिवाय मी विशेष खूष होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे तिथली स्वच्छता। उघड्यावर बाजात मांडला आहे म्हणून गलीच्छपणा नावालाही नाही. प्रत्येक विक्रेती किंवा विक्रेता देखील हातांवर प्लॅस्टिकचे मोजे चढवून पध्दतशीरपणे मालाची विक्री करत होता आणि टाकाऊ वस्तू व इतर कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट देखील बाजूलाच ठेवलेल्या खोक्यांमधे नेमके वर्गीकरण करून लागलीच लावत होता. एकंदरीत बऱ्यापैकी स्वच्छता तशी एरवी देखील दिसायची पण या प्रकारच्या बाजारात ती विशेष वाटली.
तसेच इथल्या विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर सुध्दा ग्राहकांबद्दल स्नेहाची आणि अगत्याची भावना होती, पिचलेला करवादलेपणा नव्हता. एरवी मॉल्समधून जाणवणारा कमावलेले उसने हासू किंवा परकेपणाची झालर ल्यालेला दिखाऊ उस्ताह नव्हता. अशा तऱ्हेचे मॉल्स आता आपल्याकडे पण पदोपदी दिसत असल्यामुळे कोरीयातल्या जंगी मॉल्सची मला नवलाई वाटली नव्हती. पण हे बाजार प्रकरण एकूण नवलाईचे वाटले खरे.
एका कोपऱ्यात "किमची" या कोरीयन राष्ट्रिय खाद्यपदार्थाचा स्टॉल दिसला. मुरवलेल्या भाज्यांच्या या पदार्थाला "किमची" म्हणतात आणि कोरीयन लोकांच्या रोजच्या आहारात त्याचे महत्व अनन्यसाधारण असते. पूर्वी हा पदार्थ घरोघर बनत असे पण आता बरेच जण तयार विकत घेतात त्यामुळे त्याची सर्वत्र खरेदी विक्री होत असते. म्हणूनच या बाजारातल्या किमची च्या स्टॉलवर गिऱ्हाईकांची झुंबड उडालेली होती. तिथे चाललेली विक्रेतीची लगबग अगदी पाहण्यासारखी होती. मला दिल्लीतल्या सरोजिनी नगर मार्केटमधल्या आणि हरिद्वारच्या गल्ल्यांमधे आणि गेला बाजार अगदी चिपळूणच्या बाजारपेठेत पाहिलेल्या लोणच्यांच्या दुकानांचीच आठवण झाली. तपशीलात काहीसा फरक असला तरीही एकंदर दृश्य सारखे होते. निरनिराळ्या प्रकारची किमची काचेच्या हांड्यांमधून मांडून ठेवलेली होती आणि बहुतांश स्त्री ग्राहक वर्ग अनुभवी व शोधक नजेरेने प्रत्येक प्रकार पारखून बघत होते आणि मालाच्या गुणवत्तेची मनःपूत खात्री पटल्यावर पसंत केलेला माल विक्रेतीशी गुजगोष्टी करत बांधून घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. एकीकडे ग्राहकांना हवा तो माल बांधून देत दुसरीकडे त्यांच्याशी हास्यविनोद करत विक्रेतीची लगबग सुरू होती. मधूनच एखाद्या आजीबाईंच्या पुडक्यात वजनापेक्षाही थोडा जास्तच ऐवज घालण्याची तिच्या सहज प्रेमळ कृतीने मला भूरळ घातली आणि माझे पाय पुन्हा यादिशेने नक्कीच वळणार हे मी समजून गेले.
कोरीयात आल्यापासून पहिल्यांदाच स्थानिक मंडळींचा इतका चैतन्यपूर्ण मेळावा जवळून पाहिल्याच्या आनंदात मग आम्ही परतलो. नंतर चौकशी केल्यावर आम्हाला समजले की तो एक आठवडी बाजारच होता आणि निरनिराळ्या वस्त्यांमधून आठवड्यातून ठराविक दिवशी असे बाजार भरतात. आमच्या घराजवळच्या त्या भागात दर गुरूवारी हा बाजार भरत असे. मग काय, पुढच्या बुधवारपासूनच मला तिथे पुन्हा जाण्याचे वेध लागले. नंतर मग अनेकदा मी त्या ठिकाणी निरनिराळ्या वेळी भेट दिली. बरेच फोटो काढले आणि रनिंग कॉमेंट्री देऊन एक फिल्म देखील काढली.
दर गुरूवारी सकाळी दहा वाजता येऊन ही सर्व मंडळी आपापल्या मालांचा स्टॉल थाटायची. मग दिवसभर तिथेच त्यांचा मुक्काम असायचा. एकीकडे विक्री आणि जेवणाची वेळ झाली की तेथेच बाजूला बसून जेवण, थोडीशी विश्रांती, अधून मधून मालाची उस्तवार चालायची. दुपारच्या वेळी गिऱ्हाईकांची गर्दी जरा ओसरायची मग पुन्हा पाचाच्या सुमाराला वर्दळ वाढायला लागायची ती सात वाजेपर्यंत सुरू असायची. साडेसातच्या सुमाराला मग बाजार बंद व्हायला लागायचा आणि प्रत्येक जण आपापला स्टॉल आवरून तिथली जागा आवरून झाडून स्वच्छ करून सगळं सामान टेंपोमधे भरून परत जायला निघायचे. थोड्याच वेळात मग तिथे सामसूम होऊन जात असे की इतका वेळ या ठिकाणी बाजार भरला होता याची शंका देखील येऊ नये. भोवतालच्या हिरवळीवर पडलेला कचरा नाही की कडेने फुललेल्या फुलांच्या ताटव्यातली फुले विखुरलेली नाहीत. सगळा दोन घडींचा डाव...
आजच्या जगातल्या वेगाने बदलत्या कधी बिचकवून टाकणाऱ्या स्वतःची ओळख हरवत चाललेल्या संस्कृतीतले हे काही दिलासा देणारे क्षण कायमचे स्मरणात राहिले. माणसांमधे खोलवर कुठेतरी जीवंत असलेल्या सहज प्रवृत्तींचे दर्शनच त्यातून झाल्यासारखे वाटले. मॉल्स काय कोरीयात चिक्कार होते आणि तिथे तर वस्तू विक्रीचे सत्र अहोरात्र दिवे जाळत सुरूच होते. पण ठराविक वेळी ठराविक ठिकाणी सामान्यांच्या गरजा भागवणाऱ्या वस्तूंची देवाणघेवाण करणारा हा आठवडी बाजार जुन्या नव्याची सांगड घालू पाहणाऱ्या समन्वयाचे प्रतीक वाटला. स्नेहार्द, अगत्यशील शिवाय कार्यतत्पर आणि दर्जेदार तसेच स्वतःचाच बाज सांभाळणारा, बाजारूकरणाच्या भाऊगर्दीतही वेगळा चेहरा असणारा.

field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

ऐसीअक्षरेवर स्वागत.

लेखन वाचून बाजाराचं चित्र डोळ्यासमोर आलं. पण तरीही हावरटपणाने फोटो दाखवा (आणि तुम्हाला चालणार असल्यास व्हीडीओही!) असं सांगावसं वाटतंय. भाजीची पिशवी भरल्यानंतरही रसरशीत वांगं दिसल्यावर चटकन उचलावसं वाटतं तसंच.

स्वच्छ बाजाराचं वर्णन वाचून कुठेतरी एक मजेशीर निरीक्षण वाचलं होतं ते आठवलं. भारतात पायात घालायच्या चपला वातानुकूलित दुकानात मिळतात आणि मटण, कोंबड्या रस्त्याच्या शेजारच्या दुकानात बाहेरच टांगलेल्या असतात.

किमची आवडलं का तुम्हाला? कोरियात कॉन्फरन्सला गेलेल्या माझ्या काही शाकाहारी आणि मांसाहारी मित्रांनी किमचीला चिक्कार नावं ठेवली होती. त्यामुळे माझ्या मनात थोडी शंकाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोटो खूप जास्त आहेत त्यामुळे नेमके शोधून इथे घालणे जरा वेळखाऊ काम आहे! पण जरा सवड झाली की अपलोड करते फोटोज. व्हिडिओ पण आहेत. त्याचा साईझ पाहून इथे देता येतोय का पाहाते. किमची कधी कधी छान लागतं! म्हणजे भुकेला कोंडा अशी वेळ असते तेव्हा आवडत असेल बहुधा! एकूण कोरियातलं खाण आपल्याला जरा जडच जातं.. भारतीय, खास करुन महाराष्ट्रिय चवींवर पोसलेल्या जीभेला!
मेदिनी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..

ऐसी अक्षरेवर स्वागत!
आगमन झोकात झालं आहे! एखाद्या स्थळाच्या वर्णनासोबत तिथल्या आपले वर्णन्ही आले की वाचताना वेगळाच आनंद मिळतो. अतिशय छान चित्रदर्शी आणि ओघवते वर्णन झाले आहे. माशांची तोरणे, समुद्रांतील इतर रत्नांचे फोटो तरी लावाच असे सुचवतो

येत रहा लिहित रहा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फोटोज टाकते...खूप जास्त आहेत! संपादक महोदयांनी निवडीला मदत केल्यास लवकर काम होईल! काय म्हणता प.पू.राजनजी?! :D>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..

एकदम चित्रमयी आणि जिवंत वर्णन केलं आहे तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो. अजून लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

लेख वाचून प्रतिसाद दिलात आवर्जून...धन्यवाद हा शब्द खूपच मद्दड आहे त्यामानाने!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..

छान. फोटो टाकाच...अन त्यातच युट्युबवर व्हीडीओ टाकुन इथे लिंकवा म्हणजे झालं.
फ्ली मार्केटसारखंच प्रकरण दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधा पण वाचनीय लेख. शब्दांचे अवडंबर न माजवता तुम्ही चित्र डोळ्यासमोर उभे केले. दळवी-पिंगे वगैरे संदर्भ, दिल्ली ते चिपळूण अशा बाजारांची तुलना हे सगळे अगदी घरगुती, हाताने धुतलेले लिखाण वाटले.
अवांतर पृच्छा अशी की तुमचे नाव इंग्रजीत का? संपादन मध्ये जाऊन ते देवनागरीत करुन टाका पाहू!
अतिअवांतर पृच्छा अशी की तुम्ही प्राध्यापक आहात का? असलात तर तुमचे नाव मराठीत करताना त्यात आणखी एक सूचना करती आली असती Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

नमस्कार सन्जोप राव (सन्जोप म्हणजे काय?)
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हाताने धुतल्यासारखे लेखन! काय उपमा दिली आहेत तुम्ही. पण त्याचा नेमका भावार्थ लक्षात नाही आला.
१)तुमच्या अवांतर पृच्छेचे निरसनः माझे इथले नाव इंग्रजीत का? ते मलाही नाही कळले नेमके. ते बदलून देवनागरीत कसे करायचे तेही नाही माहित! एकतर आधी लवकर खाते उघडले जात नव्हते. संचालकांच्या मदतीने ते उघडले आहे. आता काही बदल करायला गेल्यास दुसरेच काही घोळ नको म्हणून सध्या तसेच ठेवले आहे ते नाव इ.
२)अतिअवांतर पृच्छेचे निरसनः मी मुळीच प्राध्यापक नाही (विद्यार्थ्यांना सतत हकलत राहण्याच्या शिक्षक/प्राध्यापकांच्या पवित्र कर्तव्याला माझा लहानपणापासूनच सक्त विरोध आहे! मात्र तुमचा असा समज कशामुळे झाला असावा? असा विचार आता माझ्या मनात आला आहे!
- मेदिनी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..

हाताने धुतल्यासारखे लेखन! काय उपमा दिली आहेत तुम्ही. पण त्याचा नेमका भावार्थ लक्षात नाही आला.
जाऊ द्या हो. ग्रेस आठवावा.
विद्यार्थ्यांना सतत हकलत राहण्याच्या शिक्षक/प्राध्यापकांच्या पवित्र कर्तव्याला माझा लहानपणापासूनच सक्त विरोध आहे
खरेच. प्राध्यापकांच्या पवित्र कर्तव्याला माझाही विरोधच आहे.
मात्र तुमचा असा समज कशामुळे झाला असावा? असा विचार आता माझ्या मनात आला आहे!
काही खास कारण नाही. प्राध्यापक डॉक्टर हे ऐकायला बरे वाटते म्हणून.
सन्जोप म्हणजे काय?
काही नाही. ते एक नाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सहजसुंदर नि सरळ शैलीतिल वर्णन आवडले. या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठांमधील गलिच्छपणा विशेष जाणवला. जगातले सगळीकडचे सर्व काही शिकणारे भारतिय लोक स्वच्छता कधी शिकणार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्नेहांकिता, धन्यवाद. तुमचे म्हणणे खरे आहे. भारतातल्या बाजारपेठांमधली स्वच्छतेची सातत्यपूर्ण अनुपस्थिती काय वर्णावी? या पार्श्वभूमीवर कोरीयन बाजारांमधल्या स्वच्छतेने खरोखरच गहिवरुन येते मला नेहमी.
- मेदिनी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..

बाजारूकरणाच्या भाऊगर्दीतही वेगळा चेहरा असणारा (बाजार).

रोचक टिप्पणी. बाजार ते बाजारूकरण यातलं अंतर दाखवणारी. चांगलं लेखन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप आवडले कोरियन बाजाराचे लळीत...!!! आदितीची इच्छा पुरवा ही विनंती..!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चन्द्रशेखर केशव गोखले

आपले लेखन आवडले. कोरियात येणाऱ्या अनुभवांचे आणखी लेख येऊ देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रसाद, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. कोरियातल्या अनुभवावरच अजून एक पूर्वप्रसिद्ध झालेला लेख सध्या ऐसी अक्षरे च्या संचालकांकडे वाचनार्थ पाठवला आहे. ते बहुधा इथे प्रसिद्ध करतील. एकदम मारा नको म्हणून जरा..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेदिनी..