धुकं......... (१)

धुकं

आता फक्त एवढंच कर
उचलून घे पापण्या अलगद
येऊ दे हलकी तिरीप प्रकाशाची
तेवढ्याच त्या दोन झरोक्यातून .
आणि त्या चिमटीभर उबेने
विरघळेल बघ
दाटलेलं धुकं
तुझ्या माझ्यातलं .
ज्या धुक्यालाच
अजाणतेपणी
समजत होतीस
अंतर तुझ्या माझ्यातलं .
मग कर ना बस एवढंच आता
उचलून घे पापण्या
एवढ्याशाच का होईना .
आणि टाक विरघळवून
सारचं सारं ...तुझ्या माझ्यातलं ..!!!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

धुक्याची उपमा कुठल्या अर्थी वापरली आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

धुकं = गैरसमज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@सारीका : कवी अथवा लेखक आपली रचना लिहून ती लोकांना अर्पण करून टाकतो , मग ती रचना त्याची नसते आणि वाचणाऱ्याला संपूर्ण मुभा असते त्या शब्दांचे त्या वाक्यांचे अर्थ त्यांच्या परीने काढण्याचे . जेवढे वाचणारे तेवढे अर्थ निघू शकतात . कधीकधी तर परस्पर विरुध्द सुद्धा .
तर असो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे उत्तर सारीकाला दिले तेच तुम्हाला ही देते
.
कवी अथवा लेखक आपली रचना लिहून ती लोकांना अर्पण करून टाकतो , मग ती रचना त्याची नसते आणि वाचणाऱ्याला संपूर्ण मुभा असते त्या शब्दांचे त्या वाक्यांचे अर्थ त्यांच्या परीने काढण्याचे .
जेवढे वाचणारे... तेवढे अर्थ निघू शकतात . कधीकधी तर परस्पर विरुध्द सुद्धा .

आणि धुक्यापर जाऊ शकत असाल तर जा ..तिथे तुम्हाला तुमचे उत्तर सापडेल.
कविते मध्ये दोन अधिक दोन चार नसतात .

तर असो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी फक्त शंका विचारली होती. असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

कविता आवडली, विशेषतः 'चिमटीभर उबेने' ही प्रतिमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

सुंदर आहे कविता... छान...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

सुंदर...!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चन्द्रशेखर केशव गोखले