Skip to main content

फ्रेंच लेखनपद्धती व उच्चार

et al फ्रेंच वाटत नाही, लॅटिन असावा - Et Tu Brute वाला.

बाकी फ्रेंच उच्चारांचे काही नियम ध्यानी घेतले, तर बव्हंशी गाडी धकून जाते. (कॉलिंग चिंजं!). एक मुख्य नियम म्हणजे, फ्रेंचमध्ये शेवटचा consonant बव्हंशी सायलेंट असतो. त्याला काही अपवाद आहेत, ते म्हणजे c, r, f, l हे शेवटी आल्यास. ('केअरफुल' हे mnemonic लक्षात ठेवावे.)
ते आले की शेवटच्या consonant चा उच्चार होतो*.

*अर्थात, या अपवादासही अपवाद आहेत, पण तिथवर बुडी न मारता हा उथळ पाण्याचा (सायलेंट) खळखळाट :).

===

व्यवस्थापकः या विषयावर अधिकाधिक चर्चा व्हावी या उद्देशाने मुळ धाग्यापासून हा प्रतिसाद स्वतंत्र धागा म्हणून वेगळा करत आहोत. या निमित्ताने, फ्रेंच लेखनाचे व त्याच्या उच्चाराच्या विविध नियमांची, उदाहरणांची चर्चा इथे करता येईल.

अनुप ढेरे Wed, 15/04/2015 - 13:33

जालावर देख्या. et al फ्रेंच नाहीये. पण et हा शब्द फ्रेंचमध्ये आहे त्याच अर्थाने.

नितिन थत्ते Thu, 16/04/2015 - 11:31

Champs Elysees चा उच्चार कुठल्या अँगलने शॉन्ज एलिजे होतो ते कळत नाही. आणि Fish = Ghoti म्हणून इंग्रजीला हिणवतात.

बॅटमॅन Thu, 16/04/2015 - 12:13

In reply to by नितिन थत्ते

आपण अगोदर इंग्लिश शिकल्याने अमुक एका अक्षरचिन्हाचा उच्चार इंग्लिशपेक्षा वेगळा होऊ शकतो हे आपल्याला ऑड वाटतं इतकंच. आता स्पॅनिशमध्ये नाही का j चा उच्चार ह होतो (किमान काही ठिकाणी इफ नॉट ऑलवेज़) - उदा. सॅन जोस्/जोसे नसून ते सॅन होजे आहे.

नंदन Thu, 16/04/2015 - 12:32

In reply to by बॅटमॅन

बहुतेक इंग्रजीप्रमाणे इतर भाषांतील शब्द सहज न स्वीकारल्यामुळे असेल, पण फ्रेंच उच्चारांचे नियम तुलनेने अधिक स्पष्ट आहेत.

'शॉन्झेलिझे'चे फ्रेंच स्पेलिंग Champs-Élysées असे आहे.
आघात असणार्‍या e चा उच्चार (é) 'ए' असा होतो + दुसरा शब्द स्वराने सुरू होत असल्याने पहिल्या शब्दातील एरवी अनुच्चारित असणार्‍या शेवटच्या s ची त्या स्वराशी संधी होऊन त्याचा उच्चार केला जातो.
शाँ + एलिझे = शॉन्झेलिझे.

(अजून एक उदाहरण म्हणजे les enfants - ले + आँफाँ = लेझाँफाँ)

नंदन Thu, 16/04/2015 - 12:46

In reply to by बॅटमॅन

होय. फक्त दोन्ही ठिकाणी अनुस्वार.
p-en = पाँ
ch-ant = शाँ (t अनुच्चारित)
(स्वरापाठोपाठ लगेच m/n आल्यास त्या स्वराचा उच्चार सानुनासिक होतो.)

नंदन Thu, 16/04/2015 - 13:05

In reply to by गवि

मुदलात Champs म्हणजे शाँ कसे?

सोयीसाठी आपण Champचे तुकडे पाडून पाहू. ( शेवटी Champ = शेत/फिल्ड).

Ch हा Digraph आहे. अर्थात एक ध्वनी दर्शवण्याचाठी दोन चिन्हं. (उच्चार च असो वा श). am चा सानुनासिक (किंचित कोकणी) आँ होतो. आता हा समुच्चय (Ch+am) म्हणजे एक कॉन्सोनंट झाला. त्याचा उच्चार शाँ.

दुसरा कॉन्सोनंट p. शेवटच्या कॉन्सोनंटचा उच्चार करायचा नाही असा नियम असल्याने त्याचा उच्चार केला जात नाही. पण जर हा p शेवटचा कॉन्सोनंट नसता तर त्याचा उच्चार नेहमीप्रमाणे झाला असता. उदा. Champions = शॉम् - प्याँ.

* आता यात, एकवचनी आणि अनेकवचनी शब्दांचा सारखाच उच्चार होतो ही गोम आहे. पण तत्पूर्वी येणारे आर्टिकल्स (ल/ला/ले) तो घोळ दूर करतात.
उदा. le champ (ल शाँ) = the field; les champs (ले शाँ) = the fields.

गवि Thu, 16/04/2015 - 13:08

In reply to by नंदन

हे उत्तम समजावलेत. यावरुन इतके समजले की इंग्लिशचा चष्मा घालून त्याच्या संकेतांमधे बसवून फ्रेंच उच्चारांचे तर्क करायला जाऊ नये.

आता इतके समजून घेऊनही जाताजाता am = आँ आणि Champions = शॉम् प्याँ? म्हणजे ion म्हणजे पण आँ च?!

बादवे नंदनप, शेवटचे व्यंजन उच्चारायचेच नाही तर भाजीत व्यंजन घातल्याप्रमाणे ते का घातलेले असावे? आणि ऐसेच एखादे घालायचे असेल तर नेमके कोणते घालायचे ? p, t, s, z की काहीही मनास येईल ते? त्याचाही सिग्निफिकन्स असेल ना?

-गविप

नंदन Thu, 16/04/2015 - 13:13

In reply to by गवि

यावरुन इतके समजले की इंग्लिशचा चष्मा घालून त्याच्या संकेतांमधे बसवून फ्रेंच उच्चारांचे तर्क करायला जाऊ नये.

तंतोतंत!
(वो शाँ कुछ अजीब थी, ये शाँ.... ;))

म्हणजे ion म्हणजे पण आँ च?!

छे, तो 'य' आला की जास्तीच्या i मुळे उच्चारात. इंग्रजी violence प्रमाणे. ग्लायडिंग स्वर किंवा Diphthong यांच्या उच्चारांतही फ्रेंचमध्ये अधिक सुसूत्रता आहे.

नंदन Thu, 16/04/2015 - 13:24

In reply to by नंदन

शेवटचे व्यंजन उच्चारायचेच नाही तर भाजीत व्यंजन घातल्याप्रमाणे ते का घातलेले असावे? आणि ऐसेच एखादे घालायचे असेल तर नेमके कोणते घालायचे ? p, t, s, z की काहीही मनास येईल ते? त्याचाही सिग्निफिकन्स असेल ना?

शेवटची व्यंजनं ही लॅटिनोद्भव आहेत. ती तिथे होतीच, फक्त फ्रेंचांनी त्यांचे नाव टाकले :)
मुळात लॅटिन ही फोनेटिकच होती - स्पेलिंगं राहिली, उच्चार (बदलत) गेले!
'शाँ'चेच उदाहरण घ्यायचे, तर स्पॅनिशमध्ये ते campo (काम्पो) होते. (कॅम्पिंग, कॅम्पस यांची हीच जननी).

ऋषिकेश Thu, 16/04/2015 - 13:19

In reply to by गवि

स्वैर अंदाजः शेवटचे व्यंजन हे गाडीच्या डब्याला पुढे दुसरा डबा जोडायचाच झाला तर हुकची सोय असावी म्हणून असावे. म्हणजे Champ मध्ये p बिनकामाचा असला तरी champion मध्ये त्याचा उच्चार होतो.

फ्रेंच भाषेबद्दल घनघोर अज्ञान असूनही हे इतके आगाऊ आणि अनभ्यस्त मत दिले आहे की खरं तर चुल्लुभर पाण्यात उडी मारालया हवी मी! पण या अज्ञानामुळे चिडून/भडकून कोणी पुण्यात्मा (फ्रेंचाच्या बाबतीत नंदन एकटाच इथे पुण्यात्मा नाही, अजून किमान ३ आहेत) नियम मराठीत समजावेल असे दिवास्वप्न बघतो आहे.

नंदन Thu, 16/04/2015 - 13:29

In reply to by ऋषिकेश

फ्रेंचाच्या बाबतीत नंदन एकटाच इथे पुण्यात्मा नाही, अजून किमान ३ आहेत

...बरोबर! ;)

(बाकी एका पुण्यात्माला ऑलरेडी साद घातली आहे वर)

नंदन Thu, 16/04/2015 - 16:08

In reply to by गवि

बराच कीस काढला ह्या शब्दाचा. कोणी आवरा म्हणण्यापूर्वी, हा माझ्याकडून शेवटचा प्रतिसाद म्हणून थांबतो -

१. champ = field (पक्षी: मैदान/शेत/मोकळी जागा) हे वर पाहिलंच आहे. मैदान गाजवणारा तो champ-ion, मैदानात मुक्काम ठोकणारे camp-ers आणि कॉलेज ग्राऊंड या अर्थी campus हे वरकरणी विभिन्न वाटणारे शब्द यातूनच यावेत, हे रोचक आहे.

शिवाय हा दुवा पाहिला तर, त्याचे प्रोटो-इंडो-युरोपियन मूळ हे kampos = "a corner, cove," असे सांगितले आहे. 'कंपू'च्या कोनाड्याला हे किती फिट्ट बसणारं आहे, नै? ;)

२. Champion च्या फ्रेंच उच्चाराचा अजून एक दाखला म्हणजे तुर्की भाषेने हा शब्द फ्रेंचकडून उसना घेऊन त्याचे उच्चाराप्रमाणे बदललेले स्पेलिंग - şampiyon (ş = उच्चारी 'श').

Day3_Istanbul_Ankara 104

(आता त्यातले kokorec म्हणजे काय ते आपापल्या जबाबदारीवर गूगलून पहावे. विशेषतः शाकाहारी पुनर्जन्मकांक्षींनी ;))

मिहिर Thu, 16/04/2015 - 13:13

In reply to by नंदन

पण जर हा p शेवटचा कॉन्सोनंट नसता तर त्याचा उच्चार नेहमीप्रमाणे झाला असता.
les champs (ले शाँ)

? इथे p चा उच्चार नको मग?

नंदन Thu, 16/04/2015 - 13:32

In reply to by मिहिर

इथे p चा उच्चार नको मग?

बहुतेक उच्चारात केवळ सिंग्युलॅरिटी विचारात घेतली जात असावी.

P.S. ;) - हा केवळ माझा तर्क आहे

अनुप ढेरे Wed, 15/04/2015 - 12:11

et al म्हणजे 'आणि बाकिचे'. त्या उच्चार एट असा नसावा. नुसता ए असा असावा कारण et म्हणजे फ्रेंचमध्ये आणि. त्या फ्रेंच शब्दाचा उच्चार नक्की 'ए' असाच आहे.

गवि Wed, 15/04/2015 - 12:15

In reply to by अनुप ढेरे

हेच हेच.. हीच माहिती पाहिजे आहे व्हायला. फ्रेंच वगैरेवरुन आलेले उच्चार तर थरकाप उडवतात. शेनिन ब्लँक वगैरे असा अस्सल देशी उच्चार करुन वाईन मागितली जाते (इथे भारतात देणार्‍यालाही शेनिन ब्लँकच माहीत असल्याने अडत नाही, पण युरोपात जाणे झाल्यावर भयंकर अडचण.)

'न'वी बाजू Thu, 16/04/2015 - 16:26

In reply to by नंदन

याचे उत्तर स्वच्छ मराठीत "काही पांढरे, काही काळे, काही पिकलेले, काही गळलेले" असे काहीसे देता यावे, नाही?

गवि Thu, 16/04/2015 - 16:29

In reply to by नंदन

इडियॉसिंक्रसीज म्हणजे हे असे नियमात न पकडता येणारे गुण का?

मराठी या बाबतीत फ्रेंचशी स्पर्धा करु जाईल तर प्रवेश फेरीतच बाद होईल का? मराठीत किमान नमुन्यापुरते तरी आहेत का हे असे घोळ?

बॅटमॅन Thu, 16/04/2015 - 16:35

In reply to by गवि

प्रत्येक भाषेचे घोळ वेगळ्या प्रकारचे. मराठीतले अनेकवचनाचे नियम, निर्जीव वस्तूंनाही लिंग लावायचे नियम बघा. च, ज, झ यांच्या दोन उच्चारांत फरक दाखवायची सोय नसल्यामुळे नवख्यांचा उडणारा घोळ बघा. पुण्याचा आणि पुण्ण्याचा या उच्चारांतील फरक न दाखवल्यामुळे होणारा घोळ बघा.

नाही म्हणायला लिपीसंबंधित घोळ पाहिजे असतील तर मोडी लिपीइतके घोळ फक्त शिकस्ता लिपीतच सापडतील. किंवा तिथे तरी सापडतील की नाही ते शिकस्त खाल्लेले इतिहाससंशोधकच जाणोत. मोडी लिपीत ज आणि न सारखे दिसतात. ल आणि क सारखे दिसतात. द आणि प आणि ह देखील सारखे दिसतात. र्‍हस्वदीर्घाची भानगड नसते. त्यामुळे बाजीरावसाहेबांबरोबरचे दोनशे लोक हे दोनशे केकही असू शकतात. कृष्णा हे नाव दमाणा असेही वाचता येते. वगैरे.

बाळ सप्रे Thu, 16/04/2015 - 17:27

In reply to by बॅटमॅन

आणखी काही
ए या स्वराला दीर्घ स्वर नाही.. जसा काही कन्नडसारख्या दाक्षिणात्य भाषात आहे.
जो pen (पेन - र्‍हस्व ए) आणि pain (पेssन - दीर्घ ए) यांच्या उच्चारातला वेगळेपणा दर्शवतो.

बॅटमॅन Thu, 16/04/2015 - 17:42

In reply to by बाळ सप्रे

सहमत.

बाकी अजून एक खुस्पट म्हणजे शक्यतोवर मराठीभाषिक लोक दीर्घ ए घेऊनच उच्चार करतात. र्‍हस्व ए क्वचितच वापरला जातो.

दंत्य व अल्व्हिओलर न मध्ये फरक दाखवायचीही सोय मराठीत व हिंदीतही नाही, उदा. अनन्त मधील पूर्ण न हे दंत्य न नसून, त्याच्या उच्चारप्रसंगी जीभ दातांच्या अंमळ अगोदर टच करते. तर न् मात्र नेहमीचं दंत्य आहे.

अजूनेक खास वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ अ-कार, विशेषतः शब्दांतीचा- उदा. झालं, लांबवलं, इ. तर याकरिता शेप्रेट नोटेषन पाहिजे जे सध्या मराठीत नाही.

ऋषिकेश Thu, 16/04/2015 - 16:36

In reply to by गवि

देवनागरी ही मराठी/हिंदी वगैरेच्या उच्चारांना लिहिण्यासाठी बर्‍यापैकी सुयोग्य लिपी आहे. अन्य भाषेतले कितीतरी आवाज या लिपीत दर्शवता येत नाहीत. (अगदी अन्य भारतीय भाषांतीलही!)

बाकी मराठी लिहितानाही बोलतो तसे नेहमी लिहिले जातेच असे नाही. उदा. प्रश्ण उच्चार असला तरी लिहिताना प्रश्न लिहिणे (आणि वर प्रश्न असा उच्चार करणार्‍यांना हसणे, पुण्ण्याची गणना पुण्याची गणना म्हणून करणे ;) ही उदा पटकन नमुन्यापुरती आठवली

अतिशहाणा Wed, 15/04/2015 - 18:59

In reply to by गवि

याचा उच्चार जम्बालया असाच ऐकला आहे. (साईनफेल्डमध्ये - सूप नाझी भागात - न्यूमन जम्बालाया असाच उच्चार करतो).

धनंजय Wed, 15/04/2015 - 20:23

In reply to by गवि

"Lingerie" असे स्पेलिंग असलेल्या इंग्रजी शब्दाचा एक प्रचलित उच्चार "लाँजरे" असा आहे.
हा उच्चार फ्रेंच भाषक करतात त्याच्या सारखा नाही, तर "फ्रेंचमध्ये असा उच्चार होत असावा" अशा गैरसमजाला अनुसरतो. (फ्रेंच मधील उच्चार "लाँजरी" असा असावा.)

आदूबाळ Wed, 15/04/2015 - 20:48

In reply to by धनंजय

ही हा हा हा!

एफ वाहिनीचा प्रेक्षक असण्याच्या काळात "लिंगरी", "हॉटे कुटुरे" वगैरे शब्द जाम फेमस झाले होते.

ऋषिकेश Thu, 16/04/2015 - 13:48

नवा धागा बनवताना काहीतरी चुक केल्याने अनुप यांचे प्रतिसाद (व त्यावरील उपप्रतिसाद) खाली आले आहेत.
क्षमस्व!
यामुळे चर्चेत खंड पडत नाहिये त्यामुळे चुक निस्तरत नाहिये.

घाटावरचे भट Thu, 16/04/2015 - 13:57

बाकी इथे धाग्यावर नंदन एकटाच ब्याटिंग करतोय. फ्रेंच भाषेत तज्ञ असणारे इतर लोक बहुतेक शेवटी येऊन फक्त 'म्हैस'मधल्या होमीपदी डाक्टरासारखे 'कस्ली मुळ्या अन जांभळं घेऊन बसलात, छ्या छ्या छ्या' असे म्हणणारेत बहुतेक. ;-)

गवि Thu, 16/04/2015 - 14:04

In reply to by घाटावरचे भट

म्है काय म्हणताय पूर्ण? म्है म्हणा नुसतं.

यावरुन वाटतं.

लै म्है - लई म्हैशी- म्हणजे म्हशीचे अनेकवचन.

नंदन Thu, 16/04/2015 - 15:19

In reply to by गवि

म्हैस काय म्हणताय पूर्ण? म्है म्हणा नुसतं.

हाच नियम लोकसत्तेने Hughes मराठीत लिहिताना पाळला असता तर? बिचार्‍या फिल ह्युजचं नाव ह्युजेस करून ठेवलं होतं. (गुजराती भाषकाने कदाचित ह्युजॅस म्हणून त्या 'पार्श्वभूमीवर मोठा' घोटाळा करून ठेवला असता!).

बाकी शेवटच्या व्यंजनांचं त्रांगडं करून ठेवायचा मक्ता केवळ फ्रेंचकडेच नाही. रशियनमध्ये काही व्यंजनं शब्दाच्या शेवटी आली की त्यांचा उच्चार बदलतो.

उदाहरणार्थ- इंग्रजी 'V' ह्या ध्वनीसाठी रशियनमध्ये 'B' ही खूण आहे. पण ते जर शब्दाच्या शेवटी आले तर त्याचा 'फ'कार होतो. उदा. Smirnov (Смирнов) ते Smirnoff
(दुवा: http://en.wikipedia.org/wiki/Smirnoff#Smirnov_vodka)

इतर बदलणारी व्यंजनं म्हणजे
ग चा क
ड चा त
ज चा श
इत्यादी...

त्या परी/परीस फ्रेंच परवडली की नै? :)

गवि Thu, 16/04/2015 - 15:28

In reply to by नंदन

अगदी अगदी.

आणि ह्युजेस केलं त्यात फारसं काहीच नाही. हल्लीच चीनचे मुख्य XI JINPING आले होते तेव्हा एका वृत्तनिवेदिकेने इलेव्हन झिनपिंग असं म्हटलं असं मी ऐकलं.

'न'वी बाजू Thu, 16/04/2015 - 16:47

In reply to by गवि

Illinoisचा उगम फ्रेंच असावा अशा (बहुधा चुकीच्या; चूभूद्याघ्या.) समजुतीखाली त्याचा उच्चार 'इलिन्वा' असा करणारा कॉलेजच्या दिवसांतील एक महाभाग या निमित्ताने आठवला.

'न'वी बाजू Thu, 16/04/2015 - 17:00

In reply to by गवि

आमच्यात तरी 'इलिनॉय' म्हणतात ब्वॉ.

(पण आमच्यात St. Louisला 'सेंट लुईस', Missouriला 'मिझूरा' आणि Arkansasला 'आर्कन्सा' असेही म्हणतात. पण Kansasला मात्र 'कॅन्सस'. त्यामुळे, Go figure!)

बॅटमॅन Thu, 16/04/2015 - 14:09

त्या मार्सेलिसला मार्साय म्हणणे म्हणजे हैट्ट आहे. आमच्याकडचे कंजूष म्हणून गाजलेले कोकणस्थही इतका कंजूसपणा करत नाहीत बरे!

बॅटमॅन Thu, 16/04/2015 - 15:32

In reply to by नंदन

त्याचा उच्चार वूस्टर आहे होय! आम्ही आपला शुद्ध तुपातला वर्सेस्टर हा उच्चार करीत होतो.

अवांतर: -cester किंवा -chester हा स्थलदर्शक सफिक्स आहे का? इंग्लंडात तशा धाटणीच्या नावांची कैक गावे/शहरे आढळतात म्हणून शंका, उदा. winchester, chichestor, worcester, gloucester, वगैरे.

सुनील Thu, 16/04/2015 - 16:13

In reply to by बॅटमॅन

चेस्टरची कल्पना नाही पण विच (wich), लॅटिनमध्ये खेडेगाव, हा सफिक्स म्हणून लागलेला दिसतो. मात्र त्यावेळी w चा उच्चार केला जात नाही.

उदा. ग्रीनिच*, नॉरिच

* आमच्या त्रैभाषिक शाळेतील इंग्रजी माध्यमातील मुले एरवी इंग्रजी उच्चारात आमच्याहून सरस असतील. पण ज्या काही बाबतीत आम्ही सरस ठरत असू त्यातील काही म्हणजे - ग्रीनिच, शिकागो, वर्साय, (चौदावा) लुई इत्यादी शब्द! ती मुले सर्रास ग्रीनविच, चिकागो, लुइस असे उच्चार करीत; वर आम्हाला हसत!!

बॅटमॅन Thu, 16/04/2015 - 16:20

In reply to by सुनील

आँ? डब्ल्यू अनुच्चारित असतोय होय? आम्ही ग्रीनविच, नॉर्विच, इप्स्विच, इ. उच्चार करत असू.

मायला, बाकी सर्व भाषा सोडून पुन्हा इंग्लिशचीच शिकवणी लावावी म्हणतो आता.

आदूबाळ Thu, 16/04/2015 - 18:24

In reply to by बॅटमॅन

लंडनमध्ये या ठेचा अनेकदा लागतात.

भारतीय उच्चार : लंडनरचा उच्चार

ग्रीनविच : ग्रीनिच
मेरिलिबोन : मार्लिबोन
बरो : बरा
साऊथवार्क : सदर्क
पिकॅडली : फिख्याडली

बॅटमॅन Thu, 16/04/2015 - 18:31

In reply to by आदूबाळ

लंडनवासी या अर्थाच्या त्या शब्दाचे मूळ भारतीय असावे असे उगीचच वाटते. इन द्याट केस, ती द्विरुक्ती वाटतेय.

बाकी 'बरा' चा उच्चार एडिंबरा मध्ये स्पष्टच ऐकू येतो. त्यातला डी देखील मराठी डी च्या अंमळ जास्तीच जवळ जातो (कदाचित तो स्कॉटिश उच्चार असावा. ब्रेव्हहार्ट पिच्चरमध्ये तो उच्चार ऐकल्याचे स्मरते.)

पी चा उच्चार आपला बिगरनुक्तावाला फ प्रमाणे करणे, क चा उच्चारही ख (बिगरनुक्तावाला) प्रमाणे करणे, अशीही काही वैशिष्ट्ये जाणवतात.

धनंजय Thu, 16/04/2015 - 22:33

In reply to by बॅटमॅन

> पी चा उच्चार आपला बिगरनुक्तावाला फ प्रमाणे करणे,
> क चा उच्चारही ख (बिगरनुक्तावाला) प्रमाणे करणे, अशीही
> काही वैशिष्ट्ये जाणवतात.
अघोष स्पर्शवर्णांचा महाप्राण (aspirate) उच्चार म्हणजे

  • क्->ख्
  • च्->छ्
  • t->th
  • प्->फ्

हा असा फक्त पदाच्या सुरुवातीला होतो.
उदाहरणार्थ, "pot" मधील p हा महाप्राण (फ्) आहे, परंतु "spot"मधील p हा अल्पप्राण (प्) आहे.

विकीपीडियामधील वाक्य :
> In some languages, such as English, aspiration is allophonic. Stops are distinguished
> primarily by voicing, and voiceless stops are sometimes aspirated, while voiced stops
> are usually unaspirated.
> English voiceless stops are aspirated for most native speakers when they
> are word-initial or begin a stressed syllable, as in pill, till, kill.

इंग्रजीत अल्पप्राण आणि महाप्राण अघोष व्यंजने ही अ‍ॅलोफोने असतात - त्यांनी शब्दार्थ बदलत नाही, परंतु आजूबाजूच्या ध्वनींच्या अनुसार पर्यायी रूपे आहेत.
(घोष व्यंजने ग्-ज्-d-ब् मात्र पदाच्या सुरुवातीलाही अल्पप्राणच राहातात.)

बाळ सप्रे Fri, 17/04/2015 - 09:51

In reply to by आदूबाळ

पहिले चार उच्चार चुकीचे केले जातात हे मान्य, पण पिकॅडली : फिख्याडली हा अ‍ॅक्सेंटचा भाग आहे .

'न'वी बाजू Thu, 16/04/2015 - 16:43

In reply to by बॅटमॅन

'डबल एल' असे ज्यास मराठीत संबोधतात, त्याचा 'य' असा उच्चार फ्रेंचप्रमाणे स्प्यानिशातही कॉमन असावा. जसे, amarillo अमारियो (पिवळा) किंवा tortilla तॉर्तिया (मेक्सिकन स्प्यानिशात कणकेची अथवा मक्याच्या पिठाची चपाती, उर्वरित स्प्यानिशभाषक जगतात अंड्याचे आमलेट) किंवा quesadilla केसादिया (मेक्सिकन तॉर्तियात - बोले तो, चपातीत - प्रामुख्याने चीज़ आणि मग इतर व्यंजने - भाज्या किंवा मांस इ. - घालून, ती चपाती दुमडून, भाजून आणि कापून केलेला एक अर्धचंद्राकृती पदार्थ - शब्दकोशकार वीरकरांना जिवंत नसतील तर दीर्घायुष्य लाभो!).

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/04/2015 - 19:07

In reply to by 'न'वी बाजू

पण (आमच्या) टेक्सासात अमारिलो (Amarillo), लानो (Llano) अशीच गावांची नावं आहेत.

त्यावरून आठवलं. स्पेनमध्ये काही दिवस कॉन्फरन्ससाठी गेले असता हॉटेलच्या भागात एक ट्राम दिसायची. तिचं गन्तव्य स्थान असे Dr Lluch. त्याला मी न चुकता (यूख असा उच्चार समजल्यानंतरही उगाच) डॉ लंच म्हणत होते.

अजो१२३ Thu, 16/04/2015 - 14:38

फ्रेंच शिकणे मंजे संताप आहे.
त्यांच्याकडे देशांची नावे पण बदलून टाकतात. कधी काय उच्चारतील आणि ठेवतील काय नेम नाही. व्यंजनांचे उच्चार काय करतील सांगता येत नाही. त्यांचे डायक्रिटिकल मार्क्स मंजे निव्वळ डोकेदुखी आहे. सरळ अपोस्ट्रोफी, उलटी अपोस्ट्रोफी, एक अनुस्वार, दोन अनुस्वार, टोपी, ... अरेरे ... उकार सुद्धा देतात हुक्की आली तर!!!

इंग्रजीत विशेष क्रियापदे (मंजे ऑक्झिलरी नसलेली म्हणायचे आहे.) वापरतात जनरली पुरुषामुळे* फरक पडत नाही. इथे क्रियापदाची रुपेच रुपे. कितीतरी अनियमित. काळ, रुप, पुरुष, वचन प्रमाणे बदलतात. आठवत नै, पण आत्मनेपदी नि परस्मैपदी सारखी चिडचीड पण आहे वाटतं.

आणि बोलायची टोटल बोंबाबोंब. तुमच्या पॅरीसला तुम्ही पाही म्हणा. अजून काही म्हणा. नो प्रॉब्लेम. पण मी अहुन ओशी? कश्शामुळं? टिचर म्हणाली कि 'Je suis Arun Joshi' कसे म्हणायचे याचे तुला शंभर पर्याय सांगतले पण तू कोणताही पर्याय नीट उच्चारत नाहीस. (तेव्हा खाली बस. पुढच्या वेळेपासून तुला सगळे उच्चारण माफ.)

तेच्च साला वाक्यरचनांमधील शब्दांच्या सिक्वेंसचं. प्रश्न विचारणं सर्वात अवघड. संस्कृतप्रमाणं विशेषण नंतर आणि त्याची नामाप्रमाणे बदलणारी रुपं! कंपुटरवर लिहिताना एकेक अक्सेंट लिहिताना विचित्र विचित्र नंबर कॉबोच्या (९९९ पर्यंतच्या) चाव्या बडवाव्या लागतात.

थोडक्यात, संताप आहे**.
----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------
**अर्थातच अशी प्रतिक्रिया सामान्य कुवतीच्या माणसाची आहे. शिवाय यात भाषेवर भाष्य आहे म्हणून भाषारक्षिणी भुस्कुटेताईंची भितीक्षमा भाकिली गेली हे अध्याहृत आहे.
* इथे अदितीताईंची क्षमा अभिप्रेत आहे. इंग्रजी चांगलं पर्सन म्हणतात. पण आपल्याकडचे दुष्ट पुरुष म्हणतात हे चूक हे मान्य.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 16/04/2015 - 19:08

In reply to by अजो१२३

इथे अदितीताईंची क्षमा अभिप्रेत आहे.

तुम्ही क्षमा नका मागू. मी यथाशक्ती भाषांची विल्हेवाट लावून बदला घेते.

adam Fri, 17/04/2015 - 09:29

आज फ्रान्स म्हटला जातो त्या भूभागात गॉल गॉथ टोळ्याही पूर्वीपासूनच सक्रिय दिसतात फ्रँक टोळ्यांसारख्याच.
मग तो भूभाग फ्रेंचांच्याच नावानं का ओळखला जात असावा ?
गॉथिकलॅण्ड किंवा गोलॅण्ड (गॉल लोकांची भूमी ह्या अर्थाने) प्रचलित का नसावे ?
.
.
युरोपमध्ये फ्रेंचांची सॉफ्ट पावर इतकी जास्त का आहे ?
कैक युरोपिअन देशातले लोक आपली जुनी वंशावळ थेट जर्मन टोळ्यांशी नेउन भिडवतात प्राचीन काळात.
जर्मनीच्या जंगलातल्या विविध टोळ्या आख्ख्या युरोपभर पसरल्या असल्याच्या आख्क्यायिका ऐकण्यात येतात.
अर्धा युरोप त्यांचे वंशज म्हणवतो.
मग जिथं तिथं फ्रेंच स्म्स्कृतीचा वरचष्मा कसा ?
(जुन्या कालातलं बोलायचं तर ग्रीक किंवा इटाली/रोम ह्यांचा सांस्कृतिक वरचष्मा दिसतो;
तो समजूही शकतो. त्या काळात त्यांचं अधिक नागरीकरण झालेलं होतं; ते सिव्हिलाइझ्ड होते. )
पण जर्मनांचं नागरीकरण कै फ्रेंचांच्या फार मागे नै. शिवाय लोकांना 'हे आपले पूर्वज' असं वाटून सेन्स ऑफ बिलॉन्गिगनेस नुसार जर्मन संस्कृती बद्दल अधिक आस्था वाटायला हवी ना ? फ्रेंचांनी ती जागा कशी काय घेतली ?

नंदन Fri, 17/04/2015 - 14:07

नंदनने फक्त चिजंसाठी काढलेला धागा....

नै हो, गविंच्या प्रश्नांना आलेल्या उत्तरांचा धागा ऋषिकेशने वेगळा काढला इतकंच.
(बाकी चिंजंसाठी असला धागा काढणं म्हणजे निळ्याला बॅन कसं व्हायचं याचं प्रशिक्षण देण्यासारखं झालं. प्रीचिंग टू द पोप!) ;)