Skip to main content

आपल्या देशाची अद्यावत प्रतीकचिन्हे!

सुज्ञास सांगणे न लगे! :)
(....ढकलपत्रावरून साभार!)

राजन बापट Sat, 07/04/2012 - 10:10

गमतीशीर भाष्य !

Nile Sat, 07/04/2012 - 12:07

आवडले. बाकी भारतात कमोड पॉप्युलर झालेला दिसतोय! ;-)

सन्जोप राव Sun, 08/04/2012 - 06:06

(खानोलकरांची क्षमा मागून..)
'आणि त्याने आकाशाकडे तोंड करुन गर्जना केली की बाप्पा तुला क्षमा नाही. वाड्यावरची धेंडे दोंद वाढवतात आणि माझ्या काशाचे पाय बाकी पांगळे होतात. कलमाडी चौदा सालची निवडणूक लढवण्याची भाषा करतात आणि मानकरांना पुणेकर उपमहापौर करतात. पन्नास-पंचावन्न वर्षे राजकारण करुन आपल्या तुंबड्या भरणारे शरद पवार अजूनही बेशरमपणाने पोपटासारखी शेतकर्‍यांच्या कल्याणाची भाषणे करतात आणि उन्हात होरपळणारे, जळणारे, केविलवाणे, भकास चेहरे ती भाषणे ऐकून त्यावर विश्वास ठेवतात. तुंदिलतनु पतंगराव, कलपट विलासराव, हव्यासमूर्ती अजितदादा आपापल्या खात्यात खोर्‍याने कशी भरती करता येईल हे बघतात आणि जळत्या उन्हात अडलेल्या गर्भवतीला वेळेवर दवाखाना मिळत नाही. तर बाप्पा तुला क्षमा नाही...'

ऋषिकेश Mon, 09/04/2012 - 12:31

ठिक. शैली-रुपके फारशी मजेशीर वाटली नाहीत किंबहूना भडकपणा अधिक वाटला.