Skip to main content

महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा

" वचनिं लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो ”

सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा!

माझी स्वत:ची अगोदरच वेबसाईट/संकेत स्थळ असल्यामुळे, पुन्हा तिथे लिहिलेले इथे नक्कल करून चिकटवणे, माझ्या तत्त्वात बसत नाही. शेवटी कॉपी बहाद्दर होण्यासाठीहि, ’तेथे पाहिजे जातीचे’

मात्र, अधून मधून, ’ऐसी अक्षरे’ ... संकेतस्थळावर वाचक म्हणून जरूर भेटीन !

खवचट खान Tue, 01/05/2012 - 21:02

WTF???

'न'वी बाजू Wed, 02/05/2012 - 09:44

सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा!

हो हो.

आणि तुम्हालाही गुजरात दिनाबद्दल शुभेच्छा.

विनता Sun, 13/05/2012 - 05:09

In reply to by 'न'वी बाजू

'पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग' ही ओळ पाठ आहे; पण गुजरात दिन कधी असतो हे मला माहीत नाही.(माझ्या अती सामान्य ज्ञानाच्या पलिकडे असावे.) परंतु दिलेल्या शुभेच्छां बद्द्ल धन्यवाद !

सहज Wed, 02/05/2012 - 09:19

गिरा म्हणजे काय?

" वचनिं लेखनीहि मराठी गिरा दिसो

'न'वी बाजू Wed, 02/05/2012 - 09:28

In reply to by सहज

'पडलेला' असा अर्थ खचितच नसावा, एवढाच अंदाज तूर्तास व्यक्त करू इच्छितो.

'न'वी बाजू Wed, 02/05/2012 - 09:33

In reply to by 'न'वी बाजू

मोल्सवर्थमध्ये 'गिरा'च्या अर्थांची नोंद पुढीलप्रमाणे आढळली:

गिरा [ girā ] m A measure of length, 1½ तसू. 2 C Usually गिऱ्हा.

त्यापुढे, 'गिर्‍हा'च्या अर्थांची नोंद तत्रैव पुढीलप्रमाणे आढळली:

गिऱ्हा [ giṛhā ] m (Corr. from ग्रह) A water-demon. 2 Applied to राह q. v. or to an eclipse in general, solar or lunar. 3 fig. Used of a meagre, spectrelike child. 4 fig. Any pest, plague, or trouble, conceived as haunting or cleaving to one.

एकंदरीत काहीच अर्थबोध न होऊन गोंधळ अधिकच वाढला, एवढेच नोंदवू इच्छितो.

'न'वी बाजू Wed, 02/05/2012 - 09:39

In reply to by 'न'वी बाजू

वचनिं लेखनीहि मराठी गिरा दिसो

'गिरा' = 'पडलेला' = 'पडीक' असा अर्थ घेतला तर?

'वचनिं लेखनीहि मराठी पडीक दिसो' - नाहीतरी बडबड आणि (उदाहरणार्थ, मसंवर) लिहिणे (जेथेजेथे म्हणून चालते अशी सर्व ठिकाणे) यात मराठी माणूस पडीक नाही दिसत, तर मग काय भय्या दिसतो?

विनता Sun, 13/05/2012 - 02:07

In reply to by सहज

माझ्या माहितीनुसार
श्री. कृ. कोल्हटकरांच्या कविततेतील वरील पंक्तीत ' गिरा ' म्हणजे भाषा !

ऋषिकेश Wed, 02/05/2012 - 09:53

मौजमजा सदरात शुभेच्छा बघून अंमळ गोंधळलो.
असो शिरीयस शुभेच्छा लेखकांच्या स्वतःच्या संकेतस्थळावर असाव्यात :P

असो. Vinata यांचे ऐसीअक्षरेवर स्वागत :)