Skip to main content

स्वातंत्र्याचा आकांत

काल जरा दाराशी उघड्झाप झाली
तुरुंगाच्या खिडकीतून निरभ्र आकाश दिसाव
तसं मला दिसलं बाहेरच जग
वाटलं याव एक चक्कर टाकून मोकळा श्वास घेऊन
पण किती धावाधाव केली तरी अंधाराचा रस्ता संपेना
चकवा लागल्यासारखा फिरत राहिलो तुरुंगात
शेवटी थकून बसून राहिलो प्रकाशाच्या एका किरणाची वाट बघत
एक दिवस पुन्हा दाराशी हालचाल जाणवली
मी दबा धरून बसून होतो
अखेर तो क्षण आला, लख्ख प्रकाश होता,
हवेत छान गारवा होता
तडक बाहेर पडलो आता सगळं जग माझं होतं
इथून तिथे पसरलेल्या अस्ताव्यस्त साम्राज्याचा मी आता सम्राट झालो होतो
पण सगळ्या शांततेला भेदुन एक किंकाळी विरली
काहीतरी पळत होतं ओरडत होतं भूत पाहिल्या सारखं
आता त्याने शस्त्र ही काढले होते, केसाळ केसाळ टोचंनार
त्याच्या एका स्पर्शाने अंगाची लाही लाही होत होती
लपतछपत मी जिवाच्या आकांताने पळत होतो
माझा आक्रोश कुणाला ऐकू जाण शक्य नव्हतं
कारण कानठल्या बसवणार्या आवाजात एकचं चित्कार ऐकू येतं होता
"मार मार ते झुरळ"

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 26/04/2016 - 22:01

:ड

'न'वी बाजू Thu, 28/04/2016 - 07:56

आता त्याने शस्त्र ही काढले होते, केसाळ केसाळ टोचंनार
त्याच्या एका स्पर्शाने अंगाची लाही लाही होत होती

अश्लील!!!!!!