Skip to main content

मांजर-कुत्र्यांच्या/गप्पा शिळोप्याच्या

शेकोटी भोवती / गप्पा शिळोप्याच्या
पाळीव कुत्र्यांच्या / चालू होत्या
बघा आपल्याला / घरातही घेती
खायला घालती / उत्तमसे
आजारपणात / डॉक्टरकडे नेती
औषधही देती/ प्रेमपणे
केव्हढे हे थोर / असती मानव
नक्कीच ते देव/ असणार!

शेकोटी भोवती / गप्पा शिळोप्याच्या
काही मांजरांच्या / चालू होत्या
बघा आपल्याला / घरातही घेती
खायला घालती / उत्तमसे
आजारपणात / डॉक्टरकडे नेती
औषधही देती/ प्रेमपणे
बघा किती थोर / आपण मांजरे
देवच साजरे / असू नक्की!
---

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/05/2016 - 02:02

मस्तच.

हा व्हिडिओ बघितला आहेत का?