Skip to main content

सांब भोळा

रानात सांब भोळा
उघडा असे दुपारी
'देवा कसाही तू रे...!?'
मी एक त्या विचारी

म्हणतो मलाही सांब
'मी खेळ तव मनाचा,
असतो निसर्ग सारा..
कधी देव का कुणाचा..?'

'पडणार साऊली जी
माझेच अल्प रूपं..,
का बांधता तुम्ही हे..
नसते खुळे हिशेबं..?'

'व्यापुनि चराचरी या
मी विश्वरूपं सारे...,
माझेच भोग मजसी..
छळतीलं का कधी रे..?'

'तुमच्या खुळ्या स्वभावी
मज देव-जन्म आहे..,
कुणी 'देवं' का म्हणा ना..?
अंती निसर्ग आहे...!'

'त्याचीच शुद्ध किमया
भासे तुम्हा उन्हाळा,
निर्जीव मूळचा मी
तुमचाच सांब भोळा...!'

फोटो:- घनगडला जाताना काढलेला....

ऋषिकेश Tue, 27/03/2012 - 09:09

वा! 'एक शुन्य मी' ची जाणीव करून देणारी कविता आवडली!

स्नेहांकिता Wed, 28/03/2012 - 11:21

वा ! साध्याच अन थोड्याच शब्दात मोठा आशय मांडलाय. एक सुचवावेसे वाटते.
कुणी 'देवं' का म्हणा ना..?
अंती निसर्ग आहे...!'
निसर्गाच्याही पल्याड
एक चैतन्य आहे,
जाणीव ज्याची तुम्हाला
कधी होणार आहे ?

अतृप्त आत्मा Tue, 19/06/2012 - 23:32

In reply to by स्नेहांकिता

@निसर्गाच्याही पल्याड
एक चैतन्य आहे,>>> निसर्गाच्या पल्याड..? म्हणजे नक्की कुठे..? प्लीज स्पष्ट करा...
जाणीव ज्याची तुम्हाला
कधी होणार आहे ?...आधी स्पष्ट करा,पुरावे द्या... जे अस्तित्वातच नाही,त्याची ''जाणिव'' कशी होणार..?

रमताराम Fri, 30/03/2012 - 22:20

आत्मारामपंत कविता आवडली. (आम्ही जालकविता क्वचितच वाचतो कारण आवडाव्या अशा कविता क्वचितच सापडतात. ;) )

.शुचि. Sun, 04/10/2015 - 10:36

In reply to by चिमणराव

आता कोणी विचारलं मग माणसाला कोणी निर्माण केलं तर आपण सेफली म्हणू शकतो राघांनी ;)
संदर्भ - विश्वाचे आर्त मालिका

राही Sun, 04/10/2015 - 17:29

प्रामाणिक, साधी-सुधी, सांबभोळी, पण (म्हणूनच ) आवडली.