ॐ ऐं र्हीं फट चिकन: स्वाहा!
(माझ्यासह सर्व ब्राम्हणांची क्षमा मागून!)
जर्सीमधला गोरा गडी गरब्यामध्ये नाचे,
जर्सीमधला कृष्णवर्णी भगवद्गीता वाचे,
जर्सीमधला ब्राम्हण मात्र काय करतो पहा,
ॐ ऐं र्हीं क्रीम् चिकन: स्वाहा!
विमानात बसून आला ब्राम्हण इतका दूर,
उतरल्यावर लावला त्याने नवाच आता सूर,
भला मोठा हॅमबर्गर रोज खातो पहा,
ॐ ऐं र्हीं ड्रीम चिकन: स्वाहा!
पुण्यामध्ये इष्टमित्र , नातलगांची गर्दी,
ब्रान्डी सुद्धा वर्ज्य तेथे, झाली जरी सर्दी,
अमेरिकेत आता काय, व्हिस्की मध्ये नहा,
ॐ ऐं र्हीं फट चिकन: स्वाहा!
---
उतरल्यावर लावला त्याने नवाच
उतरल्यावर लावला त्याने नवाच आता सूर,
भला मोठा हॅमबर्गर रोज खातो पहा,
ॐ ऐं र्हीं ड्रीम चिकन: स्वाहा!पुण्यामध्ये इष्टमित्र , नातलगांची गर्दी,
ब्रान्डी सुद्धा वर्ज्य तेथे, झाली जरी सर्दी,
अमेरिकेत आता काय, व्हिस्की मध्ये नहा,
लेखक पुराण पुरुष असावा १९ व्या शतकातला.
ब्राह्मण हाम्रीकेत जायच्या खुप आधी पासुन "बामणांची मटणाचे भाव वाढवले" असा आरोप होत आला आहे.
पुण्यात ब्रँडी वगैरे वर्ज असणे ५० वर्षापूर्वीच बंद झाले होते. कैच्या काही निरर्थक लिहायचे.
मजा आली. अशाच धर्तीवरचा एक
मजा आली. अशाच धर्तीवरचा एक लेख मी लिहिला. त्यात चहाबद्दल संस्कृत मध्ये प्रसिद्ध लेखक यशवंत पाठक यांनी मजेशी लिहिले होते.