Skip to main content

खादी कॅलेंडर वर मोदींचा फोटो लावल्यावर , जर गांधीजी हयात असते, तर त्यांची प्रतिक्रिया काय असती?

राही Mon, 16/01/2017 - 12:54

या प्रश्नाचे 'हो किंवा नाही' असे उत्तर देणे कठीण आहे. मोदींच्याच फोटोमुळे गांधीजी नाराज झाले असते असे नाही. त्या काळातल्या अनेक नेत्यांचे सूत काततानाचे फोटो आहेत. पण कोणाचीही हिरोगिरी अथवा चमकोगिरी त्यांनी खपवून घेतली नसती हेही खरे. जाहिरातीसाठी जर एखाद्याचा फोटो वापरायचा झालाच तर कमीत कमी त्या फोटोतल्या व्यक्तीला सूत कातता तरी येतेय ही खात्री त्यांनी करून घेतली असती. मुळात हा फोटो प्रचारासाठी- खादी अथवा काहीही-काढला गेलाच नव्हता. त्यांचे अनेक फोटो प्रतीकचिह्न बनले तसाच हाही बनला. आणि अशा प्रतीकांमध्ये फेरफार करून ती जाहिरातीसाठी वापरणे तितकेसे नैतिक वाटत नाही. उद्या स्वातंत्र्यदेवतेच्या मूर्तीऐवजी तंतोतंत त्याच पोझमध्ये कुणा राष्ट्रध्यक्षाचा फोटो अमेरिकेच्या गौरवार्थ किंवा दुसऱ्या जाहिरातीमध्ये वापरला तर कसे वाटेल? व्यंगचित्रामध्ये मात्र अपवाद होऊ शकतो.
गांधीजी व्यक्तिस्तोम माजवण्याच्या विरुद्ध होते.स्वत:चा फोटो वापरला जातोय म्हणून त्यांचा ईगो सुखावला नसता आणि दुसऱ्या कुणाचा वापरला म्हणून दुखावलाही नसता.

अबापट Mon, 16/01/2017 - 12:59

In reply to by राही

ढेरेशास्त्री तुमचा पोल हा मोदी ऍप सारखा झाला आहे .मर्यादित आणि सोयीस्कर . माझे उत्तर , बापू नि त्यांना माफ केले असते . ( हा ऑप्शन तिथे नाही )

आणि राही ताई यांच्याशी १०० टक्के सहमत .

तिरशिंगराव Tue, 17/01/2017 - 11:03

In reply to by अबापट

ऑप्शन्स फार लिमिटेड आहेत.

कदाचित, गांधी नुसतेच हंसले असते.

हे, मार.. असेही म्हणाले असते.

मला आश्चर्य हे वाटतं की 'ग्रेटेस्ट शोमन' म्हणून राजकपूर ला डोक्यावर घेता आणि त्याच कारणासाठी मोदींना लाथा घालता ?

अबापट Tue, 17/01/2017 - 11:08

In reply to by तिरशिंगराव

>>>मला आश्चर्य हे वाटतं की 'ग्रेटेस्ट शोमन' म्हणून राजकपूर ला डोक्यावर घेता आणि त्याच कारणासाठी मोदींना लाथा घालता ?
काका , हे तुम्ही उपहासाने म्हणले आहे असे गृहीत धरतो .. तुमच्या प्रश्नातच उत्तर लिहिले आहेत हो

तिरशिंगराव Tue, 17/01/2017 - 14:40

In reply to by अनु राव

मोदी हे शोमनच आहेत, याची खात्री पटत चालली आहे. वाराणशीत जाऊन ३-३ तास धार्मिक सोहळ्यांमधे स्वतःचा आणि परदेशी पाहुण्यांचा वेळ वाया घालवणे, चरख्यावर स्वतःचा फटु काढणे, तो छापून पुरेशी प्रसिद्धी झाल्यावर एकदम विश्वामित्री पवित्रा घेणे..... ही सगळी त्याचीच लक्षणे आहेत. सतत चर्चेत रहायला त्यांना आवडते, असे दिसते.

गमभन झिंदाबाद!

अजो१२३ Tue, 17/01/2017 - 14:44

In reply to by तिरशिंगराव

तुम्ही बहुतेक चरख्यावरचा केजरीवाल, सोनिया, राहुल, इ इ पाहिला नाही. शिवाय विविध टोप्यांमधे स्वतःचे फोटो देखिल पाहिले नाहीत. असो.
=============
चरख्यावर स्वतःचा फटु काढणे, तो छापून पुरेशी प्रसिद्धी झाल्यावर एकदम विश्वामित्री पवित्रा घेणे....>>>>>>>> पी एम ओ च्या अधिकृत विधानांपेक्षा तुमचा पावित्रा खरा? बोलता काय राव?

अजो१२३ Tue, 17/01/2017 - 15:08

In reply to by अनु राव

मोदीन्ना चर्चेत राहायला आवडत नसावे. ते फार काही बोलत नाहीत - प्रचारसभा नि मन कि बात सोडून . तिथे ही जे बोलतात ते नेहमीचे दवणीय प्रकार असतात.
===============
मोदीम्च्या प्रत्येक गोष्टीत कन्ट्रोवर्सी काढण्याची खाज दिवसेन्दिवस वाढत आहे, यात वाद नाही.

अजो१२३ Thu, 19/01/2017 - 12:55

In reply to by अस्वल

ये लेव हौर एक गुड वन...
=============
उगाच तुम्ही (मंजे तुम्ही नाही, असं लिहितात मराठीत) मोदीबाबत आकस बाळगून असले नि त्याच्याबद्दल खूप विचार करायला लागले, बोलायला लागले, चिंतन करायला लागले, घाबरायला लागले, त्याचा शब्द खाली पडू देईना झाले (म्हणजे पडायच्या आत विकृत अर्थ काढू लागले), टिका कशी करावी ते शोधायला लागले, कुशंका घ्यायला लागले, त्याच्या बोलण्याचा विपरित अर्थ काढून परिणामांची सखोल चर्चा करायला लागले म्हणजे मोदीला चर्चेत राहायला आवडते असे होत नाही.
===========

अस्वल Fri, 20/01/2017 - 00:22

In reply to by अजो१२३

मोदी विरोधक सोडून द्या हो, ते तर बोलणारच.
पण सोता मोदींनीच आपल्यावर १००० कोटी खर्च केलेत दोन वर्षांत. आता एवढा सगळा पैसा स्वतःवर म्हणजे खाण्यापिण्यावर, कपड्यांवर, दाढी वाढवण्यावर किंवा मौजमजेवर खर्च केला नाही हे उघड आहे.
पण मोदी ज्या अ‍ॅडस मधे होते - सरकारच्याच- त्यावर मिळून एवढे खर्च झालेत असं RTI अंतर्गत स्वतः सरकारचंच म्हणणं आहे.
तेव्हा तुमचं ढीग मत असेल की मोदींना चर्चेत रहायला आवडत नाही, पण सरकारलाच (आणि सरकार कोण? मोदी!) असं वाटत नाही त्याला मी तरी काय करू?
------------------
शिवाय, वरच्या प्रतिसादात एकदाही पुरोगामी हा शब्द न वापरल्याने मी फाऊल डिक्लेर करत आहे. तुम्ही सहीतच पुरोगामी टाकून चीटींग केली आहे.

अजो१२३ Sun, 22/01/2017 - 00:18

In reply to by अस्वल

आपलं ढुंगण खाजवायचा अधिकार नसलेल्या आणि देशाच्या तुलनेत टुचभर असलेल्या दिल्लीतल्या "पुरोगामी" मुख्यमंत्र्याने "एका" वर्षात फक्त जाहिरातीवर (त्याच्यावर असू द्यात) ५२० कोटी खर्चलेत.
=============
भारत सरकारच्या योजनांसाठी पंतप्रधान असलेल्या जाहीराती फक्त १००० कोटीच्या दोन-आडीच वर्षात आहेत म्हणजेच मोदीला चर्चेत राहायला आवडत नाही.

अस्वल Sun, 22/01/2017 - 10:50

In reply to by अजो१२३

अगदीच गचाळ लॉजिक आहे हे.
दिल्लीच्या पुरोगामी वगैरे (थॅंक्स हा शब्द वापर्ल्याबद्दल!) मुख्यमंत्र्याला चर्चेत रहायला आवडत नाही असं मी कधी म्हणालो?
कमॉन, you used to come with better retorts that this.

अजो१२३ Mon, 16/01/2017 - 23:30

In reply to by राही

पण कोणाचीही हिरोगिरी अथवा चमकोगिरी त्यांनी खपवून घेतली नसती हेही खरे.>>>>>> खोटे!! नेहरू म्हणून एक माणूस होता . हिरो नि चमको . नि अजून बरेच काही .
============
गांधींना हिरोगिरी आवडायची नाही असे म्हणणार लोकांनी त्यांनी पटेल ऐवजी नेहरू कोण्या कारणांनी पंतप्रधान केले ते एकदा वाचावे. त्या कारणांची लिस्ट पाहून गांधींजींचे चमको प्रेम लक्सात येईल.
=============
चरख्या सारख्या साध्या गोष्टीला इतके गांधीकृत करणे अनपेक्सित नाही.

राही Tue, 17/01/2017 - 10:58

In reply to by अजो१२३

आपल्या प्रतिसादात इतकी हिरिरी,अर्धसत्ये,विपर्यास असतो की त्यावर काहीच लिहावेसे वाटत नाही. अर्थात हे सर्व नावडणे हा माझा कमकुवतपणा आहे. स्वत:ची मते कोणत्याही स्वरूपात मांडण्याचे आपले स्वातंत्र्य आहे. आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य तर सर्वांनाच आहे. तेव्हा ठीकच.
ता.क. पटेलांना डावलून नेहरूंना का निवडले यावर अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. तेव्हा तेही ठीकच.

अजो१२३ Tue, 17/01/2017 - 12:25

In reply to by राही

हिरीरी असण्यात मला काही चूक वाटत नाही. अर्धसत्य नावाचे काही नसते, ती संकल्पना फक्त "भाग भौतिकशास्त्रात" उपयुक्त आहे. विपर्यासात सत्य आणि सोबत चूक लॉजिक वापरले जाते.
===============
https://www.quora.com/Why-was-Jawaharlal-Nehru-selected-as-the-first-Pr…
इथे बरीच माहिती आहे. आपण लावलेली विशेषणे नि इथले बारीक सारीक माहिती पहा.
=========
पटेलांना डावलून नेहरूंना का निवडले यावर अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे.>>>>>>>>>> या विधानात "गांधींनी" हा शब्द तुम्ही गाळला आहे . जेव्हा तुम्ही गांधींना चमकोगिरीचे प्रेम नव्हते म्हणता तेव्हा हे विसरत आहात कि एका चमको च्य प्रेमात त्यांनी 'निर्वासित सदस्यांनी नेता निवडणे' या लोकशाही तत्वांचा गळा सुरुवातीलाच कापला. असंसदीय , अनीर्वाचीत तत्त्वे काहीही करू शकतात हे भारत इतका छान शिकला आहे कि दोन नेते उभे राहिले , पैकी एकाला जास्त प्रतिनिधीनी मते दिली व तो पंतप्रधान वा मुख्य मंत्री झाला असे उदाहरण आपली लोकशाहीत मला तरी आठवतच नाही. नेता निवडणे हा पक्ष श्रेष्ठींचा अधिकार आणि खासदारांचा सोपस्कार हा गांधीजींचा देशाला शाप आहे. म्हणून गांधीप्रेमी मोदीला चमको , चमको प्रेमी म्हणायचं नैतिक अधिकार ठेऊ शकत नाहीत.
=================
आपल्याशी ज्यांची मते जुळत नाहीत त्यांना खोटारडे म्हणणे हिंसा आहे.

अजो१२३ Tue, 17/01/2017 - 12:51

In reply to by राही

गांधीजी व्यक्तिस्तोम माजवण्याच्या विरुद्ध होते.>>>>>>>>> गांधीजीचे स्वतःचे खूप व्यक्ति स्तोम होते. त्यांना दुसर्याचें म्हणणे पटताच नसे . त्यांना मनवणे असम्भव असायचे .

राही Mon, 16/01/2017 - 13:45

In reply to by नितिन थत्ते

मला हेच लिहायचे होते.पण प्रतिसाद संपादित करतानाच बापटांचा प्रतिसाद आला आणि ते लिहिता आले नाही. गांधीजींना असेही वाटले असते की कार्यामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे कार्याचे महत्त्व वाढते असे नव्हे. त्यांनी स्वत:चा फोटो वापरू दिला नसता.

अतिशहाणा Mon, 16/01/2017 - 21:45

In reply to by नितिन थत्ते

त्यांचा फोटू वापरु दिला नसता असे वाटत नाही. मात्र स्वतःऐवजी दुसऱ्याचा फोटू पाहून गांधी नाराज झाले असते असे नक्की वाटते.

राही Mon, 16/01/2017 - 14:10

In reply to by अबापट

गांधीच नव्हेत तर त्या काळातले अनेक नेते आणि सामान्य लोक रोज थोडे तरी सूत कातीत. आश्रमाचा आणि गांधींचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होई. सकाळी प्रार्थना,पत्रलेखन,न्याहारी,पाच कि.मी.प्रभातफेरी,स्वयंपाकगृहात मदत, स्वच्छता (कपडे, भांडी,केरवारा,संडाससफाई,भाज्यावगैरे निवडणे,गहू दळणे ई.)
संध्याकाळी चार वाजता सूत कताई असे.
गागोदे येथील विनोबाजींच्या आश्रमात निदान दहा वर्षांपूर्वीपर्यंत असा शिस्तबद्ध दिनक्रम असे.

अबापट Mon, 16/01/2017 - 15:23

In reply to by आदूबाळ

आबा , तुमचा प्रश्न सिरीयस प्रश्न असेल तर याचे उत्तर कोल्हटकर आजोबा योग्य देऊ शकतील .
आणि तो प्रश्न तिरकस असेल तर त्यावर खालील गोष्टी
महात्मा गांधी ( तेच ते पूर्वी खादीच्या कॅलेंडर वर असायचे ते !!)
१. काही काळ तुरुंगात असल्याने , तेव्हाचे पोटपाणी विलायतेंतील सरकार
२. उपोषणाच्या काळात पाणी लागत असेल पण पोटाची काळजी नसावी
३. कपड्याचा खर्च अति मर्यादित असावा ( २ पीस पंचाला असे किती लागणार पैसे)
४. उर्वरित दिवसांना शेळीचे दूध स्वस्त असावे आणि खजूर पण . शिवाय उरलेल्या खाण्याला खास स्वैपाकी लागत नसावा .
न्हेरू ( तेच ते गुलाब वाले )
१. तुरुंग फॅक्टर कॉमन असावा
२. त्यांच्या तीर्थरुपांनी लय कमावलं होत म्हणे .

शिवाय बिर्ला बजाज असे आत्ताप्रमाणे सहृदयी राष्ट्रप्रेमी उद्योगपती पण असावेत असे म्हणतात
( प्रतिसाद वैतागून व खवचट पणे लिहिलेला आहे हे तुम्हाला सांगायची जरुरी नाही , पण इतरांना सांगतो )

आदूबाळ Mon, 16/01/2017 - 16:05

In reply to by अबापट

प्रश्न सीरियस आहे.

व्यवसायामुळे म्हणा किंवा पालथी उत्सुकता म्हणा, मला असले प्रश्न पडतात. उदा० गांधीजी ही व्यक्ती फायनान्स कशी होत असे? भारतावर राज्य करणं ब्रिटिश राजा/राणीला फायद्याचं गेलं की तोट्याचं? रास्व संघाला परदेशातून प्रचंड देणग्या मिळतात म्हणे - त्यांचा विनियोग कसा होतो? हे सगळं योग्य अकाऊंटिंग/ऑडिटिंग स्टँडर्डच्या कसोट्यांवर घासलं गेलं आहे का?

नितिन थत्ते Mon, 16/01/2017 - 16:52

In reply to by आदूबाळ

प्रत्येक नेत्यासाठी याचे उत्तर वेगळे असते. वरती बापट यांनी काही उदाहरणे दिली आहेत.
टिळकांची कोकणात खोती होती असे ऐकले आहे.

चिमणराव Mon, 16/01/2017 - 17:10

In reply to by आदूबाळ

गांधिजी आणि विनोबा यांच्याविषयी माझीही थोडी विचित्र मतं तयार झाली होती माझ्या शाळेत असताना. ६६-७० काळ. परंतू मित्राचे वडीलच पवनारमध्ये लहानाचे मोठे झाले, लग्नही विनोबांनी लावून दिलेले.तर त्यांच्याकडून बरीच माहिती कळल्यावर मतं बदलली. ज्याकाळी शिक्षकास १ रुपयापेक्षा कमी पगार होता,भिंतीवरचे टोल्याचे घड्याळ १३रुपयास मिळायचे त्याकाळी बॅरिस्टर मोहनदास १०० रुपये मिळवू शकत होते. तेव्हा त्यांनी पंचा नेसला.
बिडलासारखे उद्योगपती होतेच.

राही Mon, 16/01/2017 - 15:21

In reply to by आदूबाळ

गांधीजी स्वत:च्या पोटापाण्याच्या गरजांचे मूल्य श्रमदानातून चुकवीत.शिवाय पत्रकारिता असे. नवजीवन, हरिजन, यंग इंडिया या पत्रांचा चांगला खप होता.आश्रमात आसपास पुष्कळ जागा असे आणि त्यात भाजीपाला,शेती होई. गुरांचे गोठे असत.तिथे सक्त श्रमवारी असे.कपडे सूतकताईतून बनत.गरजा अगदी साध्या आणि कमीत कमी होत्या.खूपच काटकसर असे.आलेल्या पोस्टकार्डाच्या मागचा कोरा अर्धा चौकोनही गांधीजी कापून ठेवीत आणि वापरीत.
अनेक उच्चाविद्याविभूषित आणि धनवान लोक आंदोलनात उतरले होते.त्यांनी कालांतराने आपापले व्यवसाय सोडून दिले तरी त्यांच्याकडे संचित धन खूपच असे. उत्पन्नाचे दुसरे स्रोत असत.जसे बागायती,मालमत्तेची भाडी,सल्लागारी इ.
देणग्या हा आंदोलनकार्याचा प्रमुख स्रोत असे.सर्व जनताच गांधीकार्याची पाठीराखी होती.सभांमधून बायका अंगावरचे दागिने उतरून देत.व्यापारी लोक भरघोस देणग्या देत. यातून पूर्णवेळ कार्यकर्त्यांसाठी फार थोडी रक्कम बाजूला काढली जाई आणि त्याचा काटेकोर हिशोब ठेवला जाई.रक्कम आणि सामग्रीच्या विनियोगाबाबत गांधीजी फारच दक्ष असत. कुठेही फाजील खर्च,हलगर्जीपणा,नासधूस होऊ नये यावर सक्त नजर असे आणि तशी ती करणाऱ्यास जबर शारीरिक अथवा नैतिक दंड असे.

अभ्या.. Mon, 16/01/2017 - 15:32

In reply to by राही

स्वातंत्र्ययुध्दातील बऱ्याच नेत्यांचा व्यवसाय वकीली असावा असे वाटायचे लहानपणी. त्याकाळात ह्या व्यवसायात आजइतके पैसे मिळत नसावेत. नसणारच. शिवाय त्यात कन्सीस्टन्सी नसणार.
नेते लोक त्यांचे उत्पन्न कशा पध्दतीने मिळवतात, मॅनेज करतात. आयुष्य व कुटुंब चालवतात हा आजपण मला कुतूहलाचा विषय आहे.

राही Mon, 16/01/2017 - 16:24

In reply to by अभ्या..

वकिली हे मोठे आकर्षक व्यवसायक्षेत्र होते.सार्वत्रिक शिक्षण कमी म्हणून स्पर्धा कमी आणि पैसा जास्त अशी स्थिती होती. १९४०-५० च्या सिनेमातले विलन किंवा हीरो/हिरोईनचे बाप हे वकील असत. हीरोसुद्धा वकिली शिकण्यासाठी लंडनला जात असे.नंतर गिरणीमालक,स्मगलर,बिल्डर्स,राजकारणी असे क्रमाक्रमाने आले.
ग्रामीण भागात सावकारी, जमीनदारी असे.

अजो१२३ Mon, 16/01/2017 - 23:15

In reply to by राही

शारीरिक अथवा नैतिक दंड >>>> अहिंसेच्या पुजाऱ्याकडून ?
===============
रक्कम आणि सामग्रीच्या विनियोगाबाबत गांधीजी फारच दक्ष असत. कुठेही फाजील खर्च,हलगर्जीपणा,नासधूस होऊ नये यावर सक्त नजर असे >>>>>>>> बनिये कंजूस ही होते है .

राही Tue, 17/01/2017 - 10:44

In reply to by अजो१२३

अहिंसक वृत्तीचे लोक पापक्षालनार्थ(स्वत:च्या किवा अन्यांच्या)प्रायश्चित्त किंवा आत्मक्लेश करीत असत.
शारीरिक शिक्षा म्हणजे कानफटात/थोबाडीत मारणे,फटके देणे असे नव्हे हे आपल्याला माहीत असणारच.
एका मोठ्या जमिनीचा तुकडा साफ करणे, शेणगोठा एकट्याने करावा लागणे,एखादा आवडता पदार्थ खाण्यास काही दिवस बंदी करणे अशा तऱ्हेच्या शिक्षा असत. कित्येक वेळा गांधीजी स्वत: एक दिवस मौन बाळगणे,एका वेळेचा किंवा दिवसाचा उपास करणे अशी प्रायश्चित्ते करीत. हातून घडलेल्या चुकीची त्या व्यक्तीला जाणीव होणे आणि पुन्हा तीच चूक घडू न देण्याच्या प्रयत्नाकडे तिने लागणे एव्हढेच अभिप्रेत असे.

अजो१२३ Tue, 17/01/2017 - 15:16

In reply to by राही

तुम्ही ज्याला शारिरिक शिक्षा म्हणत आहात त्यात शिक्षात्मक असे काही दिसत नाही. ती साधी कामे आहेत.
============
आणि, तसे असल्यास, जे काम शरीरास सहन होत/झेपत नाही, ते करायला बाध्य करणे ही हिंसा का नाही? (का नाही ही प्रश्नरचना कोकणस्थ नाही. मराठवाड्याची आहे.)

राही Tue, 17/01/2017 - 17:38

In reply to by अजो१२३

अश्याच साध्या साध्या कृतींतून गांधीजी शिस्तीचे महत्त्व बिंबवीत असत. शहाण्याला शब्दांचा मार म्हणतात तसा लाक्षणिक मार.
आश्रमात प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी कामे दिलेली असत.विश्रांतीची वेळ आणि आजारपणा सोडून कोणी मोकळा नसे. शिक्षा म्हणजे ह्या वेगवेगळ्या कामांऐवजी एकच काम करावे लागणे.
जुन्या काळच्या मारकुट्या पंतोजींच्या शिक्षेसारख्या शिक्षा नसत त्या.

गब्बर सिंग Tue, 17/01/2017 - 21:39

In reply to by राही

आश्रमात प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी कामे दिलेली असत

गांधींना काम नेमून देणार्‍या व्यक्तीचे नाव काय होते ?

( कृपया प्रश्नाचे थेट, व थोडक्यात उत्तर द्या. )

राही Tue, 17/01/2017 - 22:16

In reply to by गब्बर सिंग

गांधींनी स्वत:चे ध्येय स्वतः निश्चित केले होते आणि स्वतःचा मार्ग आणि इष्टकार्य (मराठीत इच्छित काम)स्वतः ठरवले होते.
ते नेता होते.
त्यामुळे आपल्या प्रश्नाचे थेट आणि थोडक्यात उत्तर 'मोहनदास करमचंद गांधी' असे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 16/01/2017 - 21:11

नथुराम गोडसेच्या 'कर्तृत्वा'खेरीजही आज गांधी जिवंत नसते. त्यातही खादी ही गोष्ट जनसामान्यांची व्हावी यासाठी गांधींनी प्रयत्न केले. त्यामुळे खादीचे मॅस्कट कोणी बनावं याबद्दल गांधींची मतं सगळ्यांनी प्रमाण मानावीत, हा आग्रह पटत नाही. असा आग्रह अर्थातच थेट केलेला नाही, पण हेतू तोच असावा.

राहींचा प्रतिसाद - हो किंवा नाही असं सरळसोट उत्तर देता येणार नाही - पटतो. बापटांनी मोदींच्या सर्व्हेशी केलेली तुलनाही पटते. फोटो हे प्रतीक असतं हा मुद्दा तर अगदी पटतो. एखादी व्यक्ती तिच्या कार्यामुळे ठरावीक गोष्टींशी जोडली जाते. शिवाजीची तलवार जहालांचे नेते टिळकांच्या हातात किंवा गाडगेबाबांचा झाडू महात्मा फुल्यांच्या हातात शोभणार नाही. झाशीच्या राणीच्या चित्राला अहिल्याबाई होळकरांचा सात्विकपणा शोभणार नाही. मोदींचा चरखा हे 'प्रॉप' असल्याचं दुनियेला ठाऊक आहे; त्यातला बेगडीपणा सहज समजतो. पण तेवढंच नाही, चरखा आता कालबाह्य झालेला आहे; ठरावीक 'झोला'वाल्या वर्गात खादीची फॅशन असली तरीही. आजच्या सैन्याच्या संचलनाच्या किंवा एकेकट्यांच्या व्यक्तिचित्रांमध्ये घोडे किंवा तलवारी नसतात, रणगाडे आणि/किंवा बंदुका असतात. बुद्धीजीवी वर्गाचं चित्र म्हणून गंध आणि पगडी दाखवत नाहीत, पेन, चष्मा अशा गोष्टी दाखवतात. हे समजून न घेता, बेगडी फोटो काढवून घेऊन मोदींनी स्वतःचं हसं करवून घेतलेलं आहे.

ट्रोलीय पद्धतीनं म्हणायचं तर मोदींचे इतर राष्ट्रपुरुषांच्या, विशेषतः आजकाल ज्यांच्या नावानं अस्मितांचं राजकारण केलं जातं, अशा अवतारातले फोटो दिसत नाहीत! ५६ इंची छातीचा फायदा काय!

फेसबुकवर अवधूत परळकरांनी केलेली कॉमेंट मला आवडली -

खूपच खरं बोलायचं तर ---- नरेंद्र मोदी नावाची कमालीची देशनिष्ठ अशी एक व्यक्ती सोडली तर आज संपूर्ण देशात महात्मा गांधी यांच्याविषयी कुणालाच फारसा आदर नाही.

अनुप ढेरे Mon, 16/01/2017 - 22:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यातला बेगडीपणा सहज समजतो.

हसं नक्की कशाला म्हणायचं हे माहिती नाही पण खालील माहिती रोचक ठरावी.

http://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/garments-/-t…

सो बेगडीपणा सगळ्याना वाटला हे पटत नाही.