पा.कृ.: ब्रह्माण्डाचे ऑम्लेट
anant_yaatree
नका डोळयांसी वटारू | नका काना॑सी टवकारू
शीर्षक योग्यची "पा.कृ."| वाटे जरी अस्थानी
प्रथम ब्रह्माण्ड फेटावे | स्थल-काल कुपीत ठेवावे
चांदण-चुऱ्याचे लवण घालावे |चवी पुरतेच फेटणी
अणु-गर्भाचे सोलीव कांदे | (बारीक चिरायचे वांदे)
फोडुनी तयांची पुष्ट दोंदे |ढकलावे फेटणी
आदि-स्फोटाचा अग्नी पेटवा |आकाश-गंगेचा चढवा तवा
तेजोमेघांचे तेल उडवा |दोन थेंबुटे त्यावरी
फेटण त्यावरी हळू ओता | गुरुत्व-कालथ्याने अरता-परता
ऑम्लेट होईल बोलता बोलता |कल्पांता पर्यंत
या पा.कृ. चे प्रकाश-चित्र | देखू न शकती चर्म-नेत्र
म्हणोनी तिचे रेखा-चित्र | सत्वर टाकावे कुणीतरी
मस्त! मस्त!
मस्त! मस्त!