आजचे दिनवैशिष्ट्य - ९
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
ह्या असल्या गोष्टी करुनसुद्धा
ह्या असल्या गोष्टी करुनसुद्धा अमेरिका म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा महामेरू अन लोकशाहीचा ॲव्हेंजर अन ह्यांव अन त्यांव अशी प्रतिमा कशी काय आहे बुवा.. म्हणजे भारतात बाकी काही असो, एकदा संविधान मानले कि कुठल्याही पक्षाला खुली सुट असते आपला प्रचार, प्रसार करण्याची. आणि हे म्हणजेच लोकशाही ना???
हे जरा नजरेखालून घाला....
एकदा संविधान मानले कि कुठल्याही पक्षाला खुली सुट असते आपला प्रचार, प्रसार करण्याची. आणि हे म्हणजेच लोकशाही ना???
नक्की का ?
The NGO Good Governance Foundation rightly challenged this that is,challenged both amended Preamble and Section 29-A(5). In 2008,the Supreme Court ducked. It allowed the challenge to Section 29-A(5),but not the Preamble. Now,on the challenge to Section 29-A(5),the Supreme Court has ducked again,calling the issue academic and hypothetical. Why is it academic and hypothetical? Because no registered political party has refused to swear allegiance to socialism? And because the Election Commission (EC) hasnt so far refused registration to a proposed political party on grounds of non-adherence to socialism. Let that situation crop up,and then we (the Supreme Court) shall see.
सर्वोच्च न्यायालय ठोसपणे सोशॅलिस्ट ह्या शब्दाचा आग्रह धरतं की नाही हेच समजत नाही.
सोशालिझम बेसिक स्ट्रक्चरचा
सोशालिझम बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे की नाही
जी ४२ वी घटनादुरुस्ती आणिबाणिच्या काळात दडपून, दामटवून आणण्यात आली .... ती....
आणि ह्याच इंदिराबाई महान नेत्या. प्रियदर्श......
आणि आमचे नमो मात्र हिटलर ??? फॅसिस्ट ??
खऱ्याची दुनिया आहे का ? खऱ्याची दुनिया ???
पुण्यस्मरण : गायक मुकेश
पुण्यस्मरण : गायक मुकेश (मृत्यू : २७ आॅगस्ट १९७६)
बोर्डावर "दिल की नजर से ... नजरोंकी दिल से" हे गाणं लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे अनेक आभार. नूतन च्या नशीबी त्या बुढ्ढ्याबरोबर रोमँटिक गाणं गायची वेळ आली होती ते जर दुर्लक्ष केले तर गाणं लाजवाब आहे.
.
-----
.
पुण्यस्मरण : दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी (मृत्यू : २७ आॅगस्ट २००६
.
.
आमच्या मते "ऋषिदांचा अनाडी" पेक्षा "ऋषिदांचा आनंद." हे जास्त ....
.
.
------
.
मुकेश चे सर्वोत्तम गीत आमच्यामते.....
.
.
.
.
फिराक गोरखपुरींचा जन्मदिवस
फिराक गोरखपुरींचा जन्मदिवस आहे की रघुपती सहाय यांचा. असो -
ही गोरखपुरींची गझल-
वो चुप-चाप आँसू बहाने की रातें
वो इक शख़्स के याद आने की रातें
शब-ए-मह की वो ठंडी आँचें वो शबनम
तिरे हुस्न के रस्मसाने की रातें
जवानी की दोशीज़गी (=कौमार्य) का तबस्सुम
गुल-ए-ज़ार के वो खिलाने की रातें
फुवारें सी नग़्मों की पड़ती हों जैसे
कुछ उस लब के सुनने-सुनाने की रातें
मुझे याद है तेरी हर सुब्ह-ए-रुख़्सत
मुझे याद हैं तेरे आने की रातें
पुर-असरार (गूढ) सी मेरी अर्ज़-ए-तमन्ना
वो कुछ ज़ेर-ए-लब (कुजबुज) मुस्कुराने की रातें
सर-ए-शाम से रतजगा के वो सामाँ
वो पिछले पहर नींद आने की रातें
सर-ए-शाम से ता-सहर क़ुर्ब-ए-जानाँ
न जाने वो थीं किस ज़माने की रातें
सर-ए-मय-कदा तिश्नगी की वो क़स्में
वो साक़ी से बातें बनाने की रातें
हम-आग़ोशियाँ शाहिद-ए-मेहरबाँ की
ज़माने के ग़म भूल जाने की रातें
'फ़िराक़' अपनी क़िस्मत में शायद नहीं थे
ठिकाने के दिन या ठिकाने की रातें
परधर्मसहिष्णुता आणि शिक्षण या
परधर्मसहिष्णुता आणि शिक्षण या दोघांवर त्याचं चिंतन सोशल काँट्रॅक्ट थियरीइतकच बहुमोल आहे. अमेरिकेच्या फाऊंडींग फादर्सवर त्याचा असणारा परिणाम जबरदस्त होता(अर्थात त्याला कारण त्याचे मालमत्तेच्या अधिकारासंबंधीचे विचार: जमिन+ श्रम मिळून संपत्ती तयार होते, त्यामुळे कसणाराची जमिन वगैरे, त्यामुळे अमेरिकेच्या मुळनिवासींची जमिन हिसकाऊन घेतली ही गिल्ट नाहिशी झाली(असलीच तर).
१८५९ : सूर्यावरच्या वादळामुळे
१८५९ : सूर्यावरच्या वादळामुळे तारायंत्र सेवा खंडित.
बोले तो, १८५९ साली सूर्यावरसुद्धा तारऑफिसे होती? सायबाचा पोऱ्या मोठा अकली...
(नाही पण सीरियसली... हे नक्की कोठे घडले? नि सूर्यावरच्या वादळांचा नि तारांचा नक्की संबंध काय? सूर्यावरच्या वादळांमुळे रेडियो (यानी कि वायरलेस) दळणवळणावर परिणाम होऊ शकतो, इतपत ऐकून होतो, पण तारेसारख्या वायर्ड माध्यमावर त्याने फरक का पडावा? शिवाय, १८५९ साली तारखात्यात वापरता येण्यापुरती का होईना, पण वायरलेस दळणवळणमाध्यमे तरी मुळात होती का? मार्कोनीबाबा - किंवा फॉर्द्याट्म्याटर आपले बोसकाका - नक्की कधीचे?)
जन्मदिवस : पत्रकार, लेखक
जन्मदिवस : पत्रकार, लेखक आर्थर कोस्लर (१९०५)
"द गॉड दॅट फेल्ड" या पुस्तकात एक लेख लिहिणारा आर्थर कोस्लर. साम्यवादाला परमसत्य मानणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास झाला व त्यांतल्या काहिंनी १९५० च्या आसपास ६ लेखांचे एक पुस्तक प्रकाशित केले. भ्रमनिरासाचे विवेचन असं म्हणता येईल. त्यातला एक कोस्त्लर यांनी लिहिला. आणखी एक लेखक् म्हंजे आंद्रे गीद. पण हे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी किमान १२ वर्षे दिवंगत कोस्त्लर यांनी कम्युनिस्ट पार्टीचे सभासद या नात्याने केलेले त्यांचे शेवटचे भाषण -
Tho end came as a curious anticlimax. Some time during the spring of 1938, I had to give a talk on Spain to the German Emigre Writers' Association in Paris. Before the talk, a representative of the Party asked me to insert a passage denouncing the POUM as agents of Franco; I refused. He shrugged, and asked me whether I would care to show him the text of my speech and "to discuss it informally." I refused. The meeting took place in the hall of the Societe des Industries Francaises in the Place St. Germain des Pres, before an audience of two or three hundred refugee intellectuals, half of them Communists. I knew it was my last public appearance as a member of the Party. The theme of the speech was the situation in Spain;
it contained not a single word of criticism of the Party or of Russia. But it contained three phrases, deliberately chosen because to normal people they were platitudes, to Communists declaration of war. The first was: "No movement, party or person can claim the privilege of infallibility." The second was: "Appeasing the enemy is as foolish as persecuting the friend who pursues your own aim by a different road." The third was a quotation from Thomas Mann: "A harmful truth is better than a useful lie."
That settled it. When I had finished, the non-Communist half of the audience applauded, the Communist half sat in heavy silence, most of them with folded arms. This was not done by order, but as a spontaneous reaction to those fatal commonplaces. You might as well have told a Nazi audience that all men are born equal regardless of race and creed.
A few days later I wrote my letter of resignation to the Central Committee of the Party.
.
.
.
( काय ओ गब्बर्सिंग त्या भाषणातला पहिला क्वोट हा तुमच्या क्यापिटलिझम ला सुद्धा लागू पडतो का ओ ? )
.
.
गायिका आशा भोसले (जन्म : ८
गायिका आशा भोसले (जन्म : ८ सप्टेंबर १९३३)
आशाबाईंची इतकी मस्त मस्त गाणी असताना उगीचच खबदाडातलं गाणं काढून बोर्डावर लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचा णिशेद.
.
.
उदाहरणार्थ -
.
.
आशाबाईंचं हे मराठी गाणं. ज्ञानेश्वरांची रचना कशीकाय आठवली नाही ऐसी अक्षरे च्या निर्णयन मंडळास ????
.
.
.
.
बाकी ही इतर मस्त हिंदी गाणी घ्या...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ज्ञानेश्वरांची रचना
ज्ञानेश्वरांची रचना कशीकाय आठवली नाही ऐसी अक्षरे च्या निर्णयन मंडळास ????
अधूनमधून ऐसीच्या फेसबुक पानावरही नजर टाकावी ही विनंती.
वेल...
...शेजारचाच देश आहे. कदाचित अरब तेथे नंतर आले असू शकतील. इजिप्तमध्ये तरी ती तुतमोसे (उच्चाराची आयमाय द्याघ्या), तुतानखामुन, झालेच तर पुढची ती क्लियोपात्रा वगैरे मंडळी अरब थोडीच होती? (त्यांना (ओबामाप्रमाणे) 'एरब' म्हणायला१ मी (अमेरिकन असलो तरी) पांढरा+ख्रिस्ती+उजवा२, ३(=अडाणचोट) अमेरिकन थोडाच आहे?) इजिप्तातसुद्धा अरबमंडळी बऱ्याच नंतरच आली असावीत ना? (चूभूद्याघ्या.)
..........
१ म्हणजे, ओबामा कोणाला 'एरब' म्हणाला नव्हे, तर ओबामाला कोणीतरी 'एरब' म्हणाले.
२ 'त्यांच्या' पार्लन्सात 'एरब'चे अॅण्टॉनिम 'डीसेंट फॅमिली मॅन' असे होते, हे २००८च्या निवडणुकीच्या वेळेस समजले.
३ (१च्या संदर्भात) ओबामा पांढरा नाही३अ, उजवा तर नाहीच नाही. हं, आता (जन्माने) अमेरिकन आहे, ख्रिस्तीही बहुधा असावा, परंतु (१) त्याचा जन्म केनयातला आहे, तो जन्माने अमेरिकन नाहीच, आणि (२) तो 'मूस्लिम' आहे, असे (उगाचच) मानणारी मंडळी (अर्थातच उजवी३ब) अस्तित्वात आहेत.
३अ वस्तुत:, अर्धा पांढरा असायला हवा, परंतु एकबिंदुन्याय या ऑब्सोलीट तत्त्वानुसार त्याला कोणत्याही अंशी पांढरा मानण्याची परंपरा अमेरिकेत नाही - 'मल्टायरेशियल' किंवा 'एकाहून अधिक चेकमार्क' हा प्रकार हल्ली कोठे
कागदोपत्री रुळू पाहतोय, परंतु त्यास अद्याप 'परंपरा' म्हणवत नाही - सबब 'पांढरा-नाही'च.
३ब 'अडाणचोट'ची पुनरावृत्ती करीत नाही - ते अध्याहृत आहे. (किंवा, आतापावेतो अध्याहृत असायला हवे.) बेसिकली, 'व्हाइट हाउसमधील ब्लॅक माणूस' ही संकल्पना न रुचलेली - आणि ती प्रत्यक्षात आलेली पाहून अंगाचा तिळपापड झालेली - मंडळी. असो.
मकेन, अल्ला हु अकबर आणि थँक गॉड
रेसिस्ट, इग्नॉरंट फॉक्स न्यूजवाल्यांची (त्रिरुक्ती?) (sic) शाळा घेतानाचा व्हिडिओ आठवला:
https://www.youtube.com/watch?v=o5HRb_T0lts
बाकी पर्शियन संस्कृतीच्या, इराणच्या भौगोलिक सीमांबाहेरील प्रभावाबद्दल हा दुवा पहावा:
https://en.wikipedia.org/wiki/Greater_Iran
तुमच्या निषेधात मी सुद्धा सामील बरं का ...
खरं म्हणजे अजून किती तरी आहेत ...
हे चांगलय ना .....
https://youtu.be/T1tY-zvWEWQ
आणि
https://youtu.be/yZT9c4C6tAg
आणि हे पण ...
https://youtu.be/ft-aKA3KX8o
आणि एक मराठी ...
https://youtu.be/1XK_pm9TBic
नाही नाही
दोनदा नाही चिकटवलय ..
पहिले सोलो आहे आणि दुसऱ्यात महेंद्र कपूर आहेत साथीला .
"बाकी आशाबाईंचं श्रेष्ठ कनिष्ठ ठरवणं ह्यात किमान दहा धागे बरबाद होतील बर्का."
अगदी सहमत
अजून पुष्कळ आठवतायत गाणी ...
ही त्यातली दोन
क्यान्सर नव्हे.
टीबी.
तेव्हा डेडलीच होता तो.
(अवांतर: राज कपूरचा 'आह' पाहा. (आणि नंतर मला शिव्या देऊ नका.) 'राज कपूरला टीबी होतो आणि तो मरतो' एवढ्या एकाच कॉन्सेप्टवर आधारलेला आहे. किंबहुना, तेवढीच त्याची ष्टोरी, तोच त्याचा सारांश. अध्येमध्ये कितीही फिलरमसाला भरलेला असला, तरीही. ('त्यापेक्षा राजकपूरला पिच्चरच्या सुरुवातीलाच मारून टाकला असता - खराखुरा! - तर किती त्रास वाचला असता!' हा सुविचार आमच्या मनास तो पिच्चर पाहून झाल्यानंतर चाटून गेल्याखेरीज राहिला नाही.) गाणी बरी आहेत म्हणा त्यातली, परंतु तरीही.)
अखंड हिंदुस्थानवाला तर आहेच
अखंड हिंदुस्थानवाला तर आहेच मी. आसिंधुसिंधु हिंदु बंधु झिंदाबाद.
पण शेषराव मोऱ्यांचं पुस्तक वाचल्यापासून त्या पाक आणि बांग्लादेशातील गाढवांच्या प्रश्नाबद्दल जागृती झाली मनात.
त्यामुळे दोन्ही भूमिका रिकन्साईल करण्याला एक पॉसिबल उत्तर म्ह. जिना नामक थेरडं हे थेरडं होण्याअगोदरच मेलं असतं तर बेष्ट झालं असतं असं अधूनमधून वाटतं.
अंतरीच्या गूढ गर्भी - हे ना घ
अंतरीच्या गूढ गर्भी - हे ना घ देशपांड्यांचे आहे असे दिसते - https://www.aathavanitli-gani.com/Song/Antarichya_Goodh_Garbhi
--
केळीचे सुकले बाग पण आवडतं
थोडंसं आवडतं.
प्रश्न
(थत्तेचाचांना नि गब्बरलासुद्धा)
ही गाणी त्यातले काव्य आवडते (गमते/भावते) म्हणून आवडतात, की (केवळ) लहानपणी घरच्या (असल्यास१) + शेजाऱ्यांच्या + चाळीतल्या/बिल्डिंगीतल्या/वाड्यातल्या२ तमाम रेडियोंतून चहुबाजूंनी संततभडिमार झाल्याने (फॅमिलियॅरिटीपोटी) आवडतात?३
..........
१ बोले तो, '(लहानपणी) घरी रेडियो असल्यास'. 'घर असल्यास' नव्हे. 'घर आहे' (किंवा किमानपक्षी 'लहानपणी घर होते') हे गृहीत धरलेले आहे.
२ लहानपणी जेथे कोठे राहात असाल, त्याप्रमाणे. (बंगलेवाल्यांना यातून खुबीने वगळले आहे; झोपडपट्टीवाल्यांचा अनुल्लेख हा हेतुपुरस्सर नाही.)
३ प्रामाणिक कबुली: मला आवडणारी अधिकतर गाणी ही बहुतांशी फॅमिलियॅरिटीपोटी आवडतात. त्यातल्या अनेक गाण्यांच्या शब्दांकडे मी नीटसे लक्ष दिलेले असतेच, असे नाही, आणि अर्थाकडे लक्ष दिलेले असलेच, तर बव्हंशी ते आफ्टरथॉट म्हणून दिलेले असते. तरीही सर्व शब्द अचूक माहीत असतातच किंवा अर्थ कळलेला असतोच, असेही नाही.
Nostalgia
खरोख्खर मार्मिक प्रश्न विचारलात. याबद्दल माझी किमान तिघांचौघांबरोबर चर्चा झालेली आहे. कै. निवांत पोपट यांच्याशी सर्वात जास्त. मला आवडणारी अनेक गाणी ही त्या गाण्यांशी संबंधीत आठवणींमुळे आवडतात. मित्रांच्या, कै. मातोश्रींच्या, मामाश्रींच्या आठवणी तर असतातच. पण ते गाणं लागलं होतं त्या क्षणी, त्या दिवसांत माझ्या जीवनात काय घडत होतं त्यानुसार सुद्धा आवडतात. काही गाणी मध्यम गोड/सुरेल असली तरी माझ्या प्रिय व्यक्तीस आवडत म्हणुन मला जर्रा जास्तच आवडतात. काही गाणी माझ्या प्रिय व्यक्तीची आवडती म्हणुन मी अनेकदा त्या व्यक्तीची आठवण उजागर करण्यासाठी विशेषत्वने लावून ऐकतो. पण बहुतेक गाणी मला केवळ ती गोड, सुरेल आहेत म्हणून आवडतात - म्हंजे आवाज, सूर, चाल, संगीत, आवाजातला गोडपणा यासाठी. किंवा अर्थाच्या गहराईसाठी. मी "अर्था"कडे बहुतांश वेळा बारकाईने पाहतो.
उदा.
(१) "वेळ झाली भर माध्यान्ह" हे गाणं. मला ह्याची कविता आवडते, उषाबाईंचा आवाज बऱ्यापैकी आहे. फार गोड नाही. गाण्याची चाल बऱ्यापैकी आहे. निवांत पोंपट ला सुद्धा बऱ्यापैकी आवडायचं. पण माझी व निपोंची तिनचार वेळा चर्चा झाली होती ते स्मरते. त्याची आठवण आली की मी ते अनेकदा लावतो.
(२) दिलरुबा मैने तेरे प्यार मे क्या क्या न किया ... दिल दिया दर्द लिया - हे युगुलगीत् ... यात ४:०० ते ४:१० च्या दरम्यान जो भाग आहे तो मला (का कोणजाणे) अतिशय अस्वस्थ करतो परंतु त्याचवेळी १९८६ मधल्या एक विशिष्ठ क्षणाची आठवण करून देतो ... जो मला प्रिय आहे.
मार्मिक!
लहानपणी घरच्या (असल्यास१) + शेजाऱ्यांच्या + चाळीतल्या/बिल्डिंगीतल्या/वाड्यातल्या२ तमाम रेडियोंतून चहुबाजूंनी संततभडिमार झाल्याने (फॅमिलियॅरिटीपोटी) आवडतात?३
मी ह्या गुंत्यात कित्येक वर्षं आहे. अजाणतेपणीच आपण ती 'अभिजात अभिजात' जुनी गाणी अक्षरश: शेकडो वेळा ऐकलेली असतात, आणि मग इतक्या वेळा काहीही ऐकलं की ते आपसूकच आवडायला लागतं.
मेबी असेलही त्यांच्यात खरोखर कायतरी. नवीन मसाला गाणी आवडून घेण्यासाठी पहिले 'तितक्यावेळा' ऐकवतही नाहीत हेही आहेच.
हम्म्म्म्म्...
मराठी कवी होते हो ते.....
तेही बरोबर म्हणा... तो 'सखी शेजारिणी'वाला कवीसुद्धा 'स्मितचाळ त्यात बांधून रहा' की कायसेसे म्हणतो. साले कविकल्पनेतसुद्धा कधी बंगला बांधतील तर शपथ, चाळीच बांधणार साले! (यांची 'मोठ्ठ्या घरा'ची कल्पना असेल कदाचित.) हे कुठले आले ताजमहाल बांधायला?
आपली पत्नी मृत झाली आहे हे न कळल्याचे लक्षण म्हणजे ही कविता आहे.
एवढी कविता लिहून व्हायला जेवढा वेळ लागला असेल, तेवढ्यात माश्यासुद्धा येऊन घोंगावायला लागल्या असतील. तरीही पत्ता लागला नाही? कसला ढ माणूस आहे!
आय मीन, कोठलाही नॉर्मल माणूस घ्या. समोरचे मनुष्य काही रिस्पॉण्ड करत नाहीये म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा काय करेल? त्या मनुष्यास गदागदा हालवेल, जोरजोरात हाका मारून पाहील, झालेच तर चापट्याही मारून पाहील, एवढे करूनही काही रिस्पॉण्ड नाही केले तर नाकाखाली हात धरून श्वासोच्छ्वास चालू आहे की नाही ते पाहील, नाहीतर नाडीला किंवा छातीला हात लावून ठोके चालू आहेत की नाही याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करेल... एवढे होईस्तोवर त्याला गेला बाजार काही पुसटशी का होईना, पण शंका तरी येईल, मग बोंब मारून शेजाऱ्यापाजाऱ्यांना बोलावेल, डॉक्टरला बोलावेल... हे सगळे करेल, की शांतपणे कविता करत बसेल, नि ती लिहून (आणि प्रेझ्यूमेबली पाकिटात घालून, त्यावर ष्टांप लावून, प्रकाशकाचा पत्ता घालून नि पोष्टाच्या पेटीत टाकून) झाल्यानंतर मग शांतपणे "अरेच्या! ती मेलीये होय? हात् साला! मला कळलेच नाही. मी म्हणजे पण ना, अगदी हाच आहे." असे म्हणेल? छ्या! या कवी लोकांचे काही कळत नाही बुवा.
बायको मेली, तर कविता करतात साले! (आणि दुसरे ते ताजमहाल बांधतात. सेम डिफरन्स.)
प्रतिवादानुसार, ही कविता
प्रतिवादानुसार, ही कविता लिहिली गेली तेव्हा कुसुमावती देशपांडे (कवी अनिलांच्या पत्नी) हयात होत्या!
ट्रायल रन असेल कदाचित... (ड्रेस रि'हर्स'ल१?)
सदर कविता बहुधा स्वत:च्या प्रतिभेला उद्देशून लिहिली गेली, असेही समजले जाते
Vanitas vanitatum, omnia vanitas...
(खखोकजा)!
हां, हे मात्र खरे! पब्लिक (युअर्स ट्रूली इनक्लूडेड) काय वाट्टेल ती बिले फाडते दुसऱ्याच्या नावावर.
..........
१ काय नंदन, आम्ही पण इ.इ.
प्रतिसादकर्त्यांची अभिरुची...
"कुमार गंधर्वांनी ज्या पद्धतीने गायली आहे त्यात ते असला ( मेलेल्या बायकोला उद्देशुन वगैरे ) अर्थ अजिबात दाखवुन देत नाहित. खरे तर त्यांना स्वताची पत्नी मेल्याचा अनुभव होता." - अनुताई
"ट्रायल रन असेल कदाचित... (ड्रेस रि'हर्स'ल१?)" - नवि बाजू
कविवर्य अनिल ह्यांची 'अजुनी रुसून आहे' ही कविता आवडणे किंवा न आवडणे हा वैयक्तिक रुचीचा भाग झाला। पण उपरनिर्दिष्ट दोन प्रतिसादांत जी भाषा वापरली आहे, ती केवळ प्रतिसादकर्त्यांची वैयक्तिक पातळी दर्शविते, हे मात्र नमूद केलेच पाहिजे।
नंदन ह्यांनी दिलेला 'शब्दांचा मार' उपयोगी पडत नाही, असे दिसते।
?
नंदन ह्यांनी दिलेला 'शब्दांचा मार' उपयोगी पडत नाही, असे दिसते।
१. नंदनची कोटी ('कलेवर') डोक्यावरून गेली, असे दिसते. (चालायचेच!)
२. ('शब्दांचा मार' उपयोगी पडत नाही, असे दिसते।) ही ऑनलाइन धमकी समजावी काय? (नाही म्हणजे, हल्लीच्या 'अच्छ्या दिनां'त असले धमकीबहाद्दर जरा जास्तच बळावले/सोकावले/निर्ढावले आहेत, असे दिसते (चूभूद्याघ्या), म्हणून विचारले...)
जन्मदिवस : अभिनेत्री मलाईका
.
.