राम .. राम .. राम ..
विदेश
राम... राम... राम... राम ...
माळ घेऊन माझा जप चालू आहे
कानावर बातमी
पेट्रोल डिझेल महागले
राम .. राम .. राम ..
माळ घेऊन जप चालू
कानावर बातमी
कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा
राम . राम.
जप चालू
राम .
सिलेंडरची टंचाई
मरा.. मरा.. मरा...
आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक !
.
news चॅनल पहायचे बंद करा
news चॅनल पहायचे बंद करा हो...
डोळे मिटा अन म्हणा 'राम राम राम...'