Skip to main content

चला न कॉम्रेड

चला न कॉम्रेड
एक मुडदा पाडू,
चला न, त्याच्यावर एक गोष्ट रचू

तयार करुन ठेवू,
पोस्टर, पेज आणि भरपूर कविता
मग करु त्यांचा गोळीबार योग्य वेळी
हे वारे, आपल्याला हवे तसे वाहत असतील तेव्हा
आणि हो कॉम्रेड, थोडं तिखटमीठही टाकू त्यात
तुमच्या स्वादानुसार,
आणि नेहमीप्रमाणे फोडू खापर,
हिंदुस्तान, देवीस्थान और ब्लडी "भक्त" यांच्यावर

कॉम्रेड, लॉजिक कसलं शोधताय?
त्याच्याशी आपल्याला काय देणंघेणं?
काय म्हणालात? लोहड़ी आणि मकर संक्रांतीच्या वेळी
देवळात कसं कुणी कुणाला लपवेल?
कॉम्रॅड ते सगळं ठीक आहे हो,
#कॉम्रेड, पुन्हा गिधाडासारखं व्हा बरं,
यु नो, मुडदे खातात ती !
वेमुला, जुनैद, आणि आता हा !
आणि ब्रो, मुडदा हा मुडदा असतो!
जाब वगैरे विचारत नसतो तो,
या मुडद्यामुळे आणखी मुडदे पडले तरच काय तो फायदा !

चला न कॉम्रेड
एक मुडदा पाडू,
चला न, त्याच्यावर एक गोष्ट रचू
------------------------------------
मूळ हिंदी कविता: गौतम
------------------------------------
चलो न कॉमरेड
------------------
चलो न कॉमरेड,
एक लाश गिराते हैं,
चलो न, उसपे कहानी बनाते हैं,
रच के रखते हैं,
पोस्टर, पेज और कविताएँ,
जो दागी जाएँगी ठीक समय पर,
ठीक तब, जब हमारा मौसम हो,
हाँ कॉमरेड, तुम्हारे टेस्ट के हिसाब से,
साल्ट एन पैपर भी रहेगा,
उसपे 'ऐज़ युज़ुअल' ब्लेम करेंगे,
हिंदुस्तान, देवीस्थान और ब्लडी "भक्त" को,

कॉमरेड लॉजिक क्यों ढूंढते हो,
उससे हमारा क्या लेना देना?
क्या ? लोहड़ी, मकर संक्रांति पर
मन्दिर में कोई कैसे छुपायेगा किसी को ?
कॉमरेड सब सही है,
#कॉमरेड बी लाइक अ वल्चर,
यु नो, वो लाशों को खाते हैं !
वेमुला, जुनैद, और अब ये लाश!
अरे लाश थोड़ी न हिसाब मांगती है ब्रो!
लाश तो लाश है,
इससे और लाशें गिरे तो कोई बात हो !
चलो न कॉमरेड,

एक लाश गिराते हैं,
चलो न, उसपे कहानी बनाते हैं

- गौतम

तिरशिंगराव Wed, 09/05/2018 - 10:32

चला ना कॉम्रेड
मुलांना ॲडमिशन घेऊ,
पैसे देऊन.
सिस्टिमला नाकारतच
सिस्टिमचा फायदा घेऊ.
कॅडरला रखडू दे, रानावनांत
आपण शहरांत इस्टेटी घेऊ.

१४टॅन Thu, 10/05/2018 - 09:04

'भक साला'च्या चेपु पानावर वाचली आहे. तिथेच जाम आवल्डी.
माझं हिंदी फारच दिव्य आहे, पण तरीही 'रच के रखतें हैं' मध्ये तिच्यातला बनाव अधोरेखित केलाय असं वाटतं. त्यामुळे मराठीत
'मस्त बेतूया,
तीवर पोस्टर,
पानं आणि बऱ्याच लावण्या'
असं काहीसं छान आणि यमकातही वाटलं असतं.

मिलिन्द् पद्की Fri, 11/05/2018 - 00:55

सन्माननीय भक्त-शिरोमणी, सादर प्रणाम ,
नाही , म्हटलं २०१९ जवळ आलंय , बाकबूक होत असेल पोटात
च्यायला , हिंदूंना जर हे कळलं की हे फक्त
अडानी -अंबानींची भर करतायत , आणि
आपल्याला लावतायत थुका , तर कसं व्हायचं ?
अहो चिंता कशाला , आपला जुना कार्यक्रम आहेच की:
हुकमी दंगली घडविणे? दोनपाचशे मुसलमानांमागे
शेदोनशे हिंदूही मेले तर काय बिघडतंय? आपल्याला
सत्तेशी मतलब, द्या टाळी! आणि
मुसलमानांना जाळायला कशी मजा येते नाही,
आपली पाचास एक संख्या असली की?
अहो भिताय काय? आपण आत्ताही सत्तेवर असेच आलो ना ?
पण एक हिंदू म्हणून सहजच म्हणतो,
आमच्या त्या रामाला जरा मतपेटीतून
बाहेर काढा की! मोकळा श्वास घेऊ द्या त्याला .
आंबला असेल तो!
xxx

'न'वी बाजू Tue, 03/07/2018 - 17:38

In reply to by सुमित

'मस्त'मधल्या 'स्त'वर अनुस्वार देणाऱ्यांना उलटे टांगून इ.इ.

सामो Thu, 26/07/2018 - 22:03

In reply to by 'न'वी बाजू

कवि मधला वि पहीला हवा. बहुतेक रवि मधला वि सुद्धा.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 27/07/2018 - 02:48

In reply to by सामो

मराठी शब्द - अजून, कवी, रवी.

फडक्यांचा लेखनकोश फोनवर अॅप म्हणून उपलब्ध आहे. हौशी लोकांनी त्याचा लाभ घ्यावा.

तिरशिंगराव Fri, 27/07/2018 - 09:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रवि म्हटलं तर डोळ्यासमोर सूर्य येतो.
रवी म्हटलं तर घुसळण्याची रवी वाटते.

राजेश घासकडवी Fri, 27/07/2018 - 15:33

चल रे गुंडा
गोरक्षक बन,
माणसं काप.

आमदारांच्या भेटी,
सरकारी नोकर्या,
मिळतील आपोआप

असली कविता कोणीतरी लिहायला हवी.

पुंबा Mon, 30/07/2018 - 13:24

In reply to by राजेश घासकडवी

याच्या पुढे,

चल रे गुंडा
मंत्री बन,
बुद्धीवाद्यांना गोळ्या घाल
बलात्काऱ्यांसाठी मोर्चे काढ
मॉब लिंचर्सचा सत्कार कर

ओंकार Mon, 30/07/2018 - 16:12

In reply to by अनुप ढेरे

ही बातमी फक्त या एकाच सायटीवर आहे. त्यामुळे भरोसा नाय. बाकी सगळीकडे ही बातमी आहे सुरेश कुमार ची.

- ओंकार

गब्बर सिंग Mon, 30/07/2018 - 14:01

चल रे सुशिक्षित माणसा
स्नेह, प्रेम व्यक्त कर
कृतीशीलपणे
आधी वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यु यॉर्क
नंतर मुंबई
नंतर सॅन बर्नार्डिनो
नंतर ब्रसेल्स
नंतर पॅरिस
मधेच एकदा रुचिपालट ... म्हणून
लंडन... टोरोंटो....पुणे... तेल अवीव वगैरे...
पुन्हा पॅरिस
पुन्हा न्यू यॉर्क
...
एक लक्षात ठेव ....
प्रेम व्यक्त करताना
वसुधैव कुटुंबकम हे महत्वाचे
म्हंजे समस्त आलम दुनियेतल्या लोकांना
तुझ्या प्रेमाच्या श्रावणधारांत भिजवून
ओलेचिंब करून टाकायचे.....
....
...
व त्याहून महत्वाची म्हंजे कृतीशीलता...
....
स्नेह नुसता व्यक्त करून भागत नाही...
त्याचा परिणाम दिसायला हवा...
अन्यथा स्नेहाला किंमत ती काय ? व कितीशी ???
....
आणि प्रेम व्यक्त करायला कारण थोडंच लागतं ?
कोणतंही कारण पुरतं त्यासाठी...
...
अक्षरश: कोणतंही कारण पुरतं....
तेव्हा बेधडक देधडक....
प्रेम कर....
प्रेम उत्कट पणे व्यक्त कर....
त्यातच तुझे व समस्त विश्वाचे हित्
सामावलेले आहे....
....
खरा तो एकची धर्म ...जगाला प्रेम अर्पावे....
...
आणि हो ... तुझ्या स्नेहबाहुल्यात ....
...
जाऊ दे ... तुला माहीती आहे ...
मला काय म्हणायचं आहे ते...
.
.