४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन!
४ जून- बिजिंगच्या तियानानमेन चौकात कम्युनिस्ट चिनच्या कत्तलीत मारल्या गेलेल्या १०,००० चिनी युवकांच्या बलिदानाचा २९ वा स्मरणदिन!
१९८९ च्या एप्रिल पासून चिनमध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी चिनी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. बिजिंगच्या तियानानमेन चौकात हजारो युवा ठाण मांडुन बसले. आंदोलने शेकडो शहरात पसरली. डेंग जियाओपिंगने धमक्या देऊनही युवक माघार घेईनात. कम्युनिस्ट सरकारने निःशस्त्र विद्यार्थ्यांच्या दमनासाठी सैन्याच्या आरमर्ड डिव्हिजन्स तैनात केल्या!
४ जून १९८९ ला ३ लाख चिनी सैनिकांनी रणगाडे चालवून आणि गोळीबार करून तियानानमेन चौकात १० हजारांहून जास्त युवकांची कत्तल केली.
कम्युनिस्ट सरकारने मेलेल्यांचा आकडा ३०० सांगितला!
भारतीय कम्युनिस्टांनी आजतागायत यावरुन चिनी सरकारवर टिका केल्याचा उल्लेख नाही!
या चित्रात एक निःशस्त्र, निर्भय युवक चिनी रणगाड्यांच्या समोर उभा दिसत आहे!
सर्व अनामिक हुतात्म्यांना नमन!
https://www.telegraph.co.uk/content/dam/news/2016/05/04/Tiananmen-Squar…
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
भारतीय कम्युनिस्टांनी
भारतीय कम्युनिस्टांनी आजतागायत यावरुन चिनी सरकारवर टिका केल्याचा उल्लेख नाही!
.
भारतीय कम्युनिस्टांनी स्टॅलिन, माओ सारख्या लोकांचा इतिहास दाबला हे खरं आहे असं मानू. पण आजही भारतीय कम्युनिस्ट ज्या कम्युनिझम ला आरत्या ओवाळतात तो कम्युनिझम भारतीय प्रोलेटेरियट (व्हॉटेव्हर दॅट मीन्स) ला गोड वाटतो - त्याचं काय ? उपेक्षित, वंचीत, दडपले गेलेले, रंजलेगांजलेले, शोषित, पीडीत, तळागाळातले, अल्पभूधारक, भूमिहीन, Heart of Darkness या सगळ्या लोकांना कॅपिटलिस्ट पार्टी काढण्यापासून कोणी रोखले आहे ?? दर वेळी एजंट (कम्युनिस्ट पार्टी) ला जबाबदार का धरावे ?? प्रिन्सिपल ला जबाबदार का धरू नये ???
.
सवी सन १९९४. स्थळ नेदरलँड
सवी सन १९९४. स्थळ नेदरलँड मधील एक विद्यापीठ. सहविद्यार्थी असलेल्या एका छान मैत्री झालेल्या उच्चशिक्षित चिनी सहकार्याला* मी या विषयी प्रश्न विचारल्यावर त्याने चेहरा ब्लँक केलां आणि म्हणाला असलं काहीही घडलं नाहीये . हा सगळा पाश्चात्य मीडिया चा कावा आहे. तो खोटं बोलत असेल असं वाटलं नाही . बहुधा त्यांचे तत्कालीन सरकार या विषयी नागरिकांना "असं काही नव्हतंच " हे पटवून देण्यात यशस्वी झालं असावं.
* हा चिनी मित्र हुशार होता , जवळचा मित्र होता . जगातल्या कुठल्याही विषयावर आम्ही बोलत असू . ( या गप्पांचा शेवट हमखास या अमेरिकनांना अक्कल नाही या सुवचनाने होत असे ) हा एकाच वेळी कम्युनिस्ट आणि कॅपिटॅलिस्ट होता.आता हा चीन मधील सिनो डच कंपनी चा एमडी आहे . त्याची हि मते ठाम होती आणि आहेत .तिबेट बद्दलही त्याची अशीच ठाम मते आहेत.
सरकारी प्रचाराने काय काय साधले जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण.
.
माझ्या सहकर्मचारी चिन्याला त्याची मतं काय ते विचारून पाहिलं पाहिजे. पण माझ्या ओळखीचे सगळे चिनी लोक फार चष्मिष्ट छापाचे, सरळमार्गी घासू लोक आहेत. मुक्त जगात काय सुरू असतं, याचाही त्यांना गंध नसतो.
पण हल्लीच उत्तर कोरियातल्या लोकांची मतं एनबीसीवर ऐकली. आपल्या देशात सगळं आलबेल आहे आणि अमेरिकाच काय ती दुष्ट आहे, अशी त्यांची मतं होती. पैकी अमेरिका या विषयावर एकमत होऊ शकेलही; पण त्यांतल्या गुंतागुंतीपासून ते लोक आलिप्त असावेत असं वाटलं. न्यू यॉर्करमधलं रिपोर्टिंगही अशाच छापाचं वाटलं.
दोन अनुभव
नव्वदच्या दशकाच्या अखेरीला अमेरिकेत दोन चिनी मुली भेटल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनात भाग घेतला होता. नंतर त्या अमेरिकेत आल्या होत्या. कम्युनिस्टांवर त्यांचा अर्थात राग होता. त्याच सुमाराला एक चिनी जोडपं भेटलं होतं. नवरा हायटेक काम करत होता, बायको एमआयटीत एआयमध्ये पीएचडी करत होती. त्यांनी मात्र आपल्याला ह्या सगळ्यापासून विभक्त ठेवलं होतं. म्हणजे ते डिनायलमध्येच होते. सुरुवातीला मी त्यांची थोडी खेचत असे, पण नंतर मला वाटलं की आपलं डोकं शाबूत ठेवण्यासाठीची ती त्यांची स्ट्रॅटेजी असावी, मग मी नाद सोडून दिला. आजही संपर्क आहे, पण राजकारण हा विषय वर्ज्य असतो.
चीन कॅपिटलिस्ट आणि कम्युनिस्ट असं दोन्ही एकाच वेळी आहे
ज्या दिवशी हे घडले त्याच्या कित्येक वर्षे आधी ( नेमकं सांगायचं तर - १९७८ मधे, डेंग झाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली) चीन ने लिबरलायझेशन केले होते. सबब हे जे घडले त्या वेळी चीन हा पूर्णपणे कम्युनिस्ट नव्हता वा ना धड कॅपिटलिस्ट होता. आजही चीन हा पूर्ण कम्युनिस्ट (किंवा कॅपिटलिस्ट) आहे असं म्हणताना जीभ अडखळते. आज चीन कॅपिटलिस्ट आहे आणि कम्युनिस्ट पण आहे - असं दोन्ही एकाच वेळी आहे. तसेच चीन मधे आजही NDRC आहे जे नियोजन आयोगाची भूमिका पार पाडते. NDRC हे समाजवादाचे मूलभूत अंग आहे. व समाजवाद हा साम्यवादाच्या दिशेने जाण्याचा मार्ग आहे.
.
चीन चे नेते (उदा डेंग झाओपिंग) इतके द्रष्टे होते की त्यांनी क्रायसीस (उदा. एक्स्टर्नल डेब्ट टू जीडीपी रेश्यो खूप वाढणे) निर्माण व्हायची वाट न पाहता १९७८ मधे पुनर्रचना घडवून आणल्या.
.