Skip to main content

सोप्पंय - सगळं खापर उदारमतवाद्यांवर - प्रताप भानू मेहता

Good Morning Liberals

(प्रताप भानू मेहता यांच्या 'Blame it on the liberals' ह्या लेखाचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला अनुवाद)

काहीही वाईट झालं की खापर उदारमतवाद्यांवर फोडायचं हा आजचा युगधर्म झाला आहे. उदारमतवादी म्हणजे नेमकं कोण - हा काही सरळसोपा प्रश्न नाही असं तुम्हाला वाटत असेल - पण तसं आता नाही. अगदी सोपंय उत्तर. कुणालाही दोष द्यायचा असेल तर त्यांना उदारमतवादी ठरवून टाका.
अगदी खऱ्या अर्थाने उदारमतवादी म्हणता येतील असे लोक भारतात मूठभर असतील याची आम्हाला चिंताच वाटत असे. पण आता मात्र, ते सर्वत्र फैले हुए हैं असं वाटायला लागलंय - किरकोळ पातळीवर समतेचा विजय व्हावा म्हणून कारस्थाने करणारे, व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, लादल्या गेलेल्या अस्मितांवरून हिंसक होणाऱ्यांना विरोध करणारे, वादविवादात तर्कबुद्धीचा वापर आवश्यक मानणारे, धर्माबाबत शंका उपस्थित करणारे, वैज्ञानिक मूल्यांचे रक्षण करू पाहाणारे, जगात वैविध्य रहावे म्हणून शर्थ करणारे, सत्तेच्या भयंकर केंद्रीकरणाविरुद्ध आवाज उठवणारे, पर्यावरणाचे रक्षण करू पाहाणारे, स्वत्व आणि समाज यांमधील अज्ञात दुव्यांचा अभ्यास व्हावा म्हणून मुक्त अवकाश जपणारे, इतिहासामधील अचपळ गुंतागुंतीचा शोध घेणारे, छळवादी हुकूमशाहीचा उदय होऊ नये म्हणून संस्थात्मक कार्य करणारे, - आणि खाण्यापिण्यात वाईन आणि चीज लोकप्रिय व्हावं म्हणून प्रयत्न करणारे - सारेच उदारमतवादी. हे उदारमतवादी इतके बलवान आहेत की या सर्व मूल्यांचा विजय झालेलाच आहे.

उदारमतवाद्यांचा उदय म्हणजे देश खड्ड्यातच चालला हो. हे उदारमतवादी जर नष्ट झाले तर भारताचा इतिहास जरा सुधरेल, सगळे आर्थिक प्रश्न सटतील, चीन थरथर कापेल, कायद्याचे राज्य येईल आणि देशात कोणतेही धार्मिक-जातीय भेदाभेद उद्भवणार नाहीत.

आम्हाला अर्थातच वाटतं की हे उदारमतवादी म्हणजे होमो सेपियन्स आहेत. त्यामुळे आपण उदारमतवादी आहोत असं म्हणणाऱ्या व्यक्तींमध्ये मानवी गुणावगुण असतीलच - जसं की स्वतःवर खूष असणं, ढोंगीपणा, नैतिकता आपल्यालाच कळते असं मानणं, दिखाऊपणा, स्वार्थ, आळस, फार जास्त इंग्रजीचा वापर, ऐकून घेण्याची क्षमता नसणे, कुणाच्या तरी हातातलं खेळणं बनणे, पेहराव-रहाणीतली वाईट निवड. आणि कधीकधी स्वतःची फसवणूकही. सगळ्या मानवजातीने करायला पाहिजे तसंच यांनीही जरा स्वतःचं परीक्षण करायला हवं. पण छे - एवढ्यावर फसू नका. उदारमतवाद्यांचे अवगुण हे जास्तच धोकादायक आहेत.

बाकीच्या विचारप्रणालींच्या पाईकांत उदारमतवाद्यांसारखे समाज उद्ध्वस्त करू शकणारे अवगुण नसतात. राष्ट्रवादी लोक तर आरपार लगातार शुद्ध चांगुलपणाच. त्यांच्या मलमल के कुर्तेपर छींट लाललाल... संभवतच नाही. त्या बिचाऱ्यांना तर हिंसा या शब्दाचा अर्थही माहीत नसतो - तर ते हिंसा करणार कुठून… मार्क्सवाद्यांनी तर ऐतिहासिक आवश्यकता त्यांच्या बाजूने आहे हे सांगूनच टाकलेले असते, त्यामुळे ते कशाशी प्रतारणा करतात किंवा ढोंग करतात असं म्हणताच येत नाही. त्यांच्या लालेलाल प्रणालीला आणखी लाल होणे शक्यच नाही. अ-मार्क्सवादी डावे लोक गरिबांच्या वतीने टोकाचे दावे करतात. पण एकदा गरीब जनता हे तुमचं कारण आणि उद्दिष्ट ठरलं की मग तुमचे निर्णय चुकणं शक्य नसतं, भ्रष्टाचार शक्य नसतो आणि दुष्टत्व तर नाहीच.

सर्व रंगी मूलतत्ववादी - मग ते भगवे असोत वा हिरवे, सारे सगळे एका दिव्य उदात्त हेतूचे रक्षक - जिथे दुष्टत्व अस्तित्वातच येऊ शकत नाही. बाकीचे विविध पंथांचे विचारवंत - ज्यांचा एकमेव अजेंडा असतो तो सामूहिक ओळख जपण्याचा- मग तो धर्म असो, वा जात, वा प्रदेश... हे लोक तर चुका करूच शकत नाहीत. एकदा का तुम्ही आपलं व्यक्तित्व बृहत् समष्टीत एकजीव करून टाकलं की मग व्यक्तिगत दुष्टत्वाला स्थानच कुठे रहातं हो?
आंबेडकरवादी, ज्यांचे उद्दिष्ट केवळ न्यायाच्या शोधातच आहे, त्यांच्यात मात्र नक्की काही ना काही दुष्टत्व असते, पण आपण त्यांना इतके विकल करून टाकले आहे की त्यांची फार चिंता करण्याचं कारणच नाही. शिवाय, त्यांना एकदा पटवून दिलं की उदारमतवादी हे ब्राह्मणी असतात, की मग ते तर उदारमतवाद्यांचा निःपात करण्यासाठी आपले दोस्तच होऊ शकतात.

आणि मग शिवाय भांडवलदार आहेत, ज्यांची प्रगतीची घोडदौड उदारमतवाद्यांनी सतत धारेवर धरली आहे. भांडवलाचे उत्तम प्रकारे वितरण या तत्वाच्या पायावर भांडवलदारांची व्याख्या होते. ते त्यात कसे बरं दुष्टत्व आणतील? आता कळलं का, की केवळ उदारमतवादी हेच धोकादायक आहेत. त्यांच्यात काही खोडी आहेत, दुष्टत्व आहे हा प्रश्नच नाही. त्यांची चूक ही त्याहून अधिक गंभीर आहे, दुष्टता ही केवळ त्यांना आणि त्यांनाच जमते असं स्पष्टच दिसतं.

त्यात भर म्हणजे सहिष्णुतेचा प्रश्न येतो तेव्हा हे उदारमतवादी काय करतात. त्यांचा विविधतेवर विश्वास आहे म्हणे. पण ते एक गोष्ट मात्र मान्य करत नाहीत, की दोन अधिक दोन म्हणजे सात होऊ शकतात हे ज्ञानमार्गातील वैविध्यही मान्य करायलाच हवे - जितके आपण दोन अधिक दोन म्हणजे चार हे मान्य करतो. हे त्यांचे तर्कशास्त्र अजब आहे, ही असहिष्णुता आहे. त्यांना व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण हक्कांची पायमल्ली करणाऱ्या असहिष्णू लोकांपासून करायचे असते. पण ही देखील एक प्रकारची असहिष्णुताच आहे.

ते वाद घालतात, उरबडवी भाषणबाजी करतात आणि आपल्याला न पटणाऱ्या मुद्द्यांवर आघात करतात. पण लक्षात घ्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संक्षेप करण्यासाठी राज्यसत्तेचा, कायद्यांच्या वापर करण्याइतकंच हेही वाईटच आहे.

या उदारमतवाद्यांमुळे किती असुरक्षिततेची भावना निर्माण होते, प्रत्येकाला आपण कशाचेतरी बळी आहोत असं वाटू लागतं ते पहा... अगदी पंतप्रधानांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत. हिंदूंच्या मनात बळी असल्याची भावना निर्माण करण्यास सर्वस्वी तेच जबाबदार आहेत... भारताच्या लोकसंख्येच्या ८० टक्के असलेल्या हिंदूंच्या मनात अशी भावना निर्माण करणे हे यांचेच काम, लक्षावधी सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या बिचाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या अनेक संघटनांमध्येही त्यांनी ही बळी असल्याची भावना रुजवली, भारतातील बऱ्याच राज्यांत ज्यांची सत्ता आहे अशा भाजपामध्येही त्यांनी बळीची भावना रुजवली, अकबर आणि नेहरूंसारख्यांचे गुण एकत्रितपणे ज्याचे ठायी नांदतात अशा पंतप्रधानाच्या मनात त्यांनी ही भावना रुजवली. हे उदारमतवादी म्हणजे फार मोठी आपत्तीच. त्यांच्या टीकेच्या एखाद्या शब्दानेही सारी नागर संस्कृती गुडघे टेकते हो... उदारमतवाद म्हणजे एक कारखानाच आहे... मोठमोठे बाहूबली गटही स्वतःला परिस्थितीचे नि कशाकशाचे बळी समजू लागतात त्यांच्या वक्तव्यांमुळे.

हे उदारमतवादी चिडखोर असतात, खोडसाळ असतात आणि दादागिरी करणारेही. कुठल्याही प्रत्यक्ष हिंसाचारापेक्षा त्यांचे शब्द अधिक विनाशकारी असतात. त्यांचा निःपात कसा करायचा ते पाहून ठेवा - ते जर स्वतः नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याचं सांगू लागले तर त्यांना ढोंगी म्हणा, त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या रक्षणाची भाषा केली तर त्यांना समूहाच्या स्वप्रेमाच्या तोंडी द्या, त्यांनी जरा बऱ्या कल्याणकारी व्यवस्थेची मागणी केली तर त्यांना कट्टरवादी म्हणा, त्यांनी स्वच्छ हवेची मागणी मांडली तर त्यांना विकास विरोधी म्हणा, गर्दीने केलेल्या हत्येचा त्यांनी निषेध आरंभला तर त्यांना फक्त असहिष्णू म्हणा, पुरतं, एखाद्या खुनाबद्दल बोलू लागले तर त्यांना पक्षपाती ठरवा, त्यांनी ज्ञानाची बाजू लावून धरली तर तुम्ही जोरात आरोळी ठोका प्राचीन संस्कृतीची... ते म्हणाले भारताची राज्यघटना - तर म्हणा भ्रष्टाचार भ्रष्टाचार... कुठल्याही संस्थेच्या बाजूने ते बोलू लागले तर एखादा नेता फेका त्यांच्या अंगावर, त्यांना समाजात सर्व प्रकारच्या धारणांना स्थान हवंय म्हणतात - निधर्मी, धार्मिक, अज्ञेयवादी, निरीश्वरवादी... जोरात ओरडा हिंदूद्वेषी हिंदूद्वेषी... हिंसा कमीत कमी असावी असं म्हणाले ते तर म्हणा तुम्ही नेभळट आहात.

उदारमतवाद्यांचं खच्चीकरण करणे, त्यांना ठेचणे यासाठी तुम्ही जे काही धोरण स्वीकाराल ते समर्थनीयच असेल. बाकी काही प्रभावी ठरत नसेल तर मग हिंसाही समर्थनीयच ठरेल. लक्षात ठेवा, त्यांच्याकडे बारीकसारीक अवगुण आहेत, आणि आपलं सर्वांचं ध्येय महान.

उदारमतवाद्यांना ठोकणे किती मजेदार असतं - तुम्ही एकाच वेळी त्यांना उदारमतवादी हे खरे उदारमतवादी नाहीत असंही म्हणू शकता आणि ते उदारमतवादी असल्याबद्दल त्यांना ठोकूही शकता. हे असं केलंत की काय होईल डावे नि उजवे दोघेही सोबत येतील आपल्या. अगदी काही उदारमतवादीही सामील होतील. तसं त्यांनी केलं नाही तर मग आपण म्हणू शकतो की उदारमतवादी हे कडवे असतात. आणि कुठल्याही उदारमतवाद्याला कडवेपणाचा शिक्का अजिबात सहन होत नाही. त्यामुळे ते आपलीच शेपूट पकडून गोलगोल घुमू लागतील. किती सोप्पंय पहा... उदारमतवाद्यांची प्रजाती अस्तंगत करू शकलो ना तर या जगातील सारी तिरस्काराची भावना, असुरक्षिततेची भावना पार नष्ट होऊ शकेल.

प्रताप भानू मेहता
अशोक विद्यापीठाचे कुलगुरू.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 29/06/2018 - 16:47

कालच हा लेख वाचला. मात्र लेख कितीही पटला तरी सतत याच प्रकारे पुरोगाम्यांनी व्यक्त होऊ नये असं वाटतं.

गब्बर सिंग Fri, 29/06/2018 - 23:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मात्र लेख कितीही पटला तरी सतत याच प्रकारे पुरोगाम्यांनी व्यक्त होऊ नये असं वाटतं.

.
हॅहॅहॅ.
.
तकलादू गृहितक : फुर्रोगामी हे उदारमतवादी असतात.
.

गब्बर सिंग Fri, 29/06/2018 - 23:18

प्रताप भानू मेहता यांच्या लेखाचं टायमिंग रोचक आहे. मोदीविरोधी आघाडी अत्यंत केविलवाणी वाटत्ये आणि ट्रंप विरुद्ध महाभियोग चालवला जाण्याची शक्यता दिसत नाही (डिसेंबर पर्यंततरी).

चिमणराव Sat, 30/06/2018 - 06:58

भाषण लांबलं की मुद्दा काय आहे हे समजत नाही. शिवाय पुरोगामी/डावे/उजवे/उदारमतवादी ही लेबलं कोणी कोणत्या गुणधारकांसाठी आहेत ते सामान्य जनतेस माहित नाही.

गब्बर सिंग Sat, 30/06/2018 - 20:54

In reply to by चिमणराव

शिवाय पुरोगामी/डावे/उजवे/उदारमतवादी ही लेबलं कोणी कोणत्या गुणधारकांसाठी आहेत ते सामान्य जनतेस माहित नाही.

.
(१) पुरोगामी म्हंजे सामाजिक धोरणांमधे समानतेचं विष कालवणारे. (जोडीला - सरकार हे सेक्युलर असावे असा आग्रह धरण्यापेक्षा जनता ही सेक्युलर असायला हवी असा आग्रह धरणारे).
(२) उदारमतवादी म्हंजे बलप्रयोग कमीतकमी असावा असा आग्रह धरणारे. (बलप्रयोग शून्य असणे हे खूप अवघड आहे.)
(३) उजवे म्हंजे परंपरा अनेकदा उपयुक्त असतात असं मानणारे व धर्माचं व्यक्तीच्या जीवनातल्या स्थानाचं महत्व न नाकारणारे.
(४) डावे म्हंजे बाजारपेठ, व धर्म हे व्यक्ती चे शत्रू आहेत व स्पर्धा प्रक्रिया बरखास्त करून बहुतांश निर्णय सरकारने घ्यावेत असं मानणारे.
(५) प्रतिगामी म्हंजे पूर्वीपासून, परंपरेनुसार जे चालत आलेलं आहे ते अयोग्य, समस्याजनक असण्याची सुतराम शक्यता नाही - असं मानणारे.
.

तिरशिंगराव Sat, 30/06/2018 - 10:46

काश्मीरमधल्या दगड फेकणाऱ्यांना क्षमा करा, म्हणणारेही उदारमतवादी ठरत असतील , तर त्यांना जरुर झोडा.

गब्बर सिंग Sat, 30/06/2018 - 20:57

In reply to by तिरशिंगराव

काश्मीरमधल्या दगड फेकणाऱ्यांना क्षमा करा, म्हणणारेही उदारमतवादी ठरत असतील , तर त्यांना जरुर झोडा.

.
एकदम सहमत.
.

'न'वी बाजू Sat, 30/06/2018 - 22:00

In reply to by तिरशिंगराव

...स्वतःला खिळे ठोकणाऱ्यांबद्दल 'देवा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करताहेत ते त्यांचे त्यांना समजत नाही' असे जाहीर म्हणणाऱ्यांचे नक्की काय करावे?

(नाही, कश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांचे मी समर्थन करत नाही. हे केवळ कुतूहल.)

चिंतातुर जंतू Sun, 01/07/2018 - 13:13

In reply to by तिरशिंगराव

काश्मीरमधल्या दगड फेकणाऱ्यांना क्षमा करा, म्हणणारेही उदारमतवादी ठरत असतील , तर त्यांना जरुर झोडा.

अशा चमकदार वाक्याशी असहमत होण्याचं काय कारण, असा प्रश्न रास्त आहे. मात्र, दगड फेकणारा म्हणून ज्याला पकडलं जातंय तो नक्की दगड फेकणारा आहे का, की इतर कुणी तरी काही तरी वेगळंच फेकतंय इथपासून सवाल उपस्थित केले जात आहेत. उदा. आजच्या लोकसत्तात आलेला हा लेख - भय अन् तणावग्रस्त काश्मिरी पत्रकारिता!

तिरशिंगराव Sun, 01/07/2018 - 14:25

In reply to by चिंतातुर जंतू

दगड फेकणारा म्हणून ज्याला पकडलं जातंय तो नक्की दगड फेकणारा आहे का, की इतर कुणी तरी काही तरी वेगळंच फेकतंय इथपासून सवाल उपस्थित केले जात आहेत.

दगड फेकले जातात तेंव्हा समोर लष्कराचे जवान असतात. त्यांना तुमच्या राजकारणाशी काहीच देणेघेणे नसते. त्यांनी समोरासमोर दगड फेकणाऱ्यांना ताब्यात घेतले तरी तुम्ही त्यांच्यावर संशय घेणार का ?
माझा लोकसत्ता वा कुठल्याही विचारसरणीच्या वृत्तपत्रापेक्षा लष्कराच्या जवानांवर जास्त विश्वास आहे, कारण ते तिथे हा दगडांचा मार झेलत असतात.

चिंतातुर जंतू Sun, 01/07/2018 - 15:35

In reply to by तिरशिंगराव

त्यांनी समोरासमोर दगड फेकणाऱ्यांना ताब्यात घेतले तरी तुम्ही त्यांच्यावर संशय घेणार का ?

  1. ज्याला ताब्यात घेतलं आहे तो केवळ घटनेचं वार्तांकन करत होता, असा आरोप होतो आहे. एकंदरीत वार्ताहरांना लक्ष्य केलं जातंय असा आरोप होतो आहे.
  2. शिवाय, लष्करात काम करणारे/केलेले अधिकारी पातळीवरचे काही लोक आप्त-परिचित आहेत. वरून येणारे आदेश पाळणं, एकदा दुश्मन कोण हे ठरलं की त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रस‌ंगी निरपराधांचा बळी घेणं, हे काही त्यांना नवीन नाही.

थोडक्यात, आपल्यापर्यंत वास्तव पोहोचवणाऱ्या लोकांना जर तसं करण्यापासून परावृत्त केलं जात असेल, तर मग वास्तव काय आहे, ह्याविषयी खात्रीलायक निवाडा मला तरी करता येत नाही. तुम्हाला करता येत असला, तर तो तुमचा प्रश्न आहे.

गब्बर सिंग Sun, 01/07/2018 - 22:40

In reply to by चिंतातुर जंतू

शिवाय, लष्करात काम करणारे/केलेले अधिकारी पातळीवरचे काही लोक आप्त-परिचित आहेत. वरून येणारे आदेश पाळणं, एकदा दुश्मन कोण हे ठरलं की त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रस‌ंगी निरपराधांचा बळी घेणं, हे काही त्यांना नवीन नाही.

.
लोल.
.
पुरोगामी मंडळींना जो दोष दिला जातो (म्हणून प्रताप भानू मेहता आरडाओरडा करतात) त्याचं नेमकं कारण हेच. समस्येचं खापर लष्करावर फोडणं पुरोगाम्यांना काही नवीन नाही. प्रत्येक समस्या ही व्हिक्टिम वि. ऑप्रेसर या अक्षावर मांडायची आणि ऑप्रेसर हा पुरोगामी म्हणतात म्हणून ऑप्रेसर असतोच असं म्हणणं पुढे रेटायचं हा खाक्या.
.
आता म्हणून टाका की - गब्बर, माझ्या म्हणण्याचा असा अर्थ काढलास अन तसा अर्थ काढलास तर त्याला माझा काही इलाज नाही. वगैरे.
.

चिंतातुर जंतू Mon, 02/07/2018 - 13:53

In reply to by गब्बर सिंग

समस्येचं खापर लष्करावर फोडणं पुरोगाम्यांना काही नवीन नाही. प्रत्येक समस्या ही व्हिक्टिम वि. ऑप्रेसर या अक्षावर मांडायची आणि ऑप्रेसर हा पुरोगामी म्हणतात म्हणून ऑप्रेसर असतोच असं म्हणणं पुढे रेटायचं हा खाक्या.

'कामरान युसुफ वार्ताहर आहे आणि तो घटनास्थळी वार्तांकन करत होता' असा दावा जमिनीवरून केला जातो आहे. यावर 'लष्कराचे जवान अधिक विश्वासार्ह असतात' किंवा 'प्रत्येक समस्या ही व्हिक्टिम वि. ऑप्रेसर या अक्षावर मांडायची...' वगैरे हजारो फुटांवरचे प्रतिवाद इथे केले जात आहेत. आता ह्यावर मी काय म्हणणार? जे काय म्हणायचं किंवा करायचं ते काश्मिरींनीच. त्यांच्यासमोरही असले प्रतिवाद केले जातात आणि काश्मीरविषयी वास्तव काय आहे हेदेखील आम्हालाच ठाऊक आहे, असे दावेही केले जातात. मुळात, हीदेखील एक अडचणच आहे, हे कधी तरी काश्मीरबाहेरच्या लोकांना कळेल अशी आशा बाळगण्याव्यतिरिक्त मी तरी काही करू शकत नाही.

गब्बर सिंग Mon, 02/07/2018 - 14:47

In reply to by चिंतातुर जंतू

हजारो फुटांवरचे प्रतिवाद इथे केले जात आहेत

.
वेगळ्या शब्दात --- "गब्बर हस्तिदंति मनोऱ्यातून बोलत आहे".
.
-----
.
मी इन्स्टिट्युशनल प्रतिवाद करतो. पहा तुम्हाला पटतो का.
.
तुमचे खालील तांबड्या रंगाने रंगवलेले वाक्य पहा.
.
In general Army is not supposed to have the responsibility to decide who the enemy is. Army is told by politicians - who the enemy is. This is indeed desirable. As a citizen of a democracy you do not want the Army to decide who the enemy is. In fact you want army to be fully and completely under civilian control. हे अत्यंत महत्वाचे आहे. This is institutional logic because the Indian Army follows the democratic value of "strict civilian control of military".
.
तेव्हा तुम्ही राजकीय नेतृत्वाला हव्या त्या शिव्या द्या. हवी तितकी टीका करा.
पण थलसेना ही राजकीय नेतृत्वाच्या अधीन असल्यामुळे थलसेनेस जबाबदार धरू नका.
.
पटलं नसेल तर तसं स्पष्ट लिहा.
.
.

वरून येणारे आदेश पाळणं, एकदा दुश्मन कोण हे ठरलं की

.

चिंतातुर जंतू Mon, 02/07/2018 - 14:54

In reply to by गब्बर सिंग

तेव्हा तुम्ही राजकीय नेतृत्वाला हव्या त्या शिव्या द्या. हवी तितकी टीका करा.
पण थलसेना ही राजकीय नेतृत्वाच्या अधीन असल्यामुळे थलसेनेस जबाबदार धरू नका.

इथे मी तुमच्याशी सहमतच आहे. मात्र, एखाद्या देशाचं लष्कर आपल्याला दिलेलं ध्येय गाठण्यासाठी खोटं बोलत नसेल, तर ते लष्कर ध्येय गाठण्यासाठी सक्षम नाही, असं मी पुढे जाऊन म्हणेन. त्यामुळे, 'जवान विश्वासार्ह आहेत' हे वरचं विधान पटण्यासारखं नाही. उलट, लष्कर सक्षम आहे असंच मी म्हणतोय. पण, त्यामुळे जवान जमिनीवर कधी कधी खोटं बोलणार; किंबहुना, त्यात त्यांचा दोष नाही असं मी म्हणतोय.

kedarg6500 Sat, 30/06/2018 - 13:23

काहीही वाईट झालं की खापर हिंदुत्ववाद्यांवर फोडायचं हा कालच्या युगातील युगधर्म होता कि नाही?
बाजी उलटवून लावली कि पोटात दुखायला लागलं यांच्या.
कठुआ प्रकरणावर छाती बडवणारे, ‘मदरसा बलात्कार’ प्रकरणात मुग गिळून गप्प. जोशी निघाले अन्य जातीचे, कि परत हे गप्प. अरे छाती बडवायचं थांबवा, समाजच तुम्हाला जागा दाखवेल.

अजो१२३ Sat, 30/06/2018 - 21:51

किरकोळ पातळीवर समतेचा विजय व्हावा म्हणून कारस्थाने करणारे = उदा. समान नागरी कायद्यास विरोध करून्

व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे = उदा. भारत तेरे तुकडे होंगे गँगला टॉनिक देऊन्

लादल्या गेलेल्या अस्मितांवरून हिंसक होणाऱ्यांना विरोध करणारे = जाट, यादव, मराठे, लिंगायत, शीख, आदिवासी, इ च्या हिंसक होण्याचे कौतुक करणारे.

वादविवादात तर्कबुद्धीचा वापर आवश्यक मानणारे = उदा. सुब्रमण्यम स्वामींचे इतर सर्व लेख छापणारी पण हिंदूत्ववादावरचा लेखच कंसिडर न करणारी द हिंदू ची संपादिका मानिनी

धर्माबाबत शंका उपस्थित करणारे = उदा. होळीत टीचभर पाणी वाचवून प्रदूषणाने तळंभर पाणी घाण करणारे.

वैज्ञानिक मूल्यांचे रक्षण करू पाहाणारे = उदा. आर्य आक्रमणाची थेरी वैद्न्यानिक रित्या फोल ठरली तरी तिचीच री ओढणारे

जगात वैविध्य रहावे म्हणून शर्थ करणारे = उदा. वैविध्य मंजे इंट्रा इस्लाम वा इंट्रा ख्रिस्ती

सत्तेच्या भयंकर केंद्रीकरणाविरुद्ध आवाज उठवणारे = उदा. केवळ एकदाच संपूर्ण विपक्षाची सत्ता ५ वर्षे आल्याने "सगळं संपलं" मोड मधे असलेले.

पर्यावरणाचे रक्षण करू पाहाणारे,= आणि अत्यंत विलासी शैलीत निसर्गाचे दोहन करणारे

स्वत्व आणि समाज यांमधील अज्ञात दुव्यांचा अभ्यास व्हावा म्हणून मुक्त अवकाश जपणारे = स्व कोणीतरी शहाणा आणि समाज कोणीतरी मूर्ख आहे ज्याला सुधारायचा ठेका आपल्याकडे आहे असं मानणारे.

इतिहासामधील अचपळ गुंतागुंतीचा शोध घेणारे,= उदा. असा इतिहास सातत्याने लिहिणार कि भारतीय न्यूनगंडी होतील आणि राजेशाहीप्रमाणे लोकशाही चालवणारे योगदानशून्य सत्त्तालोलुप लोक महान वाटू लागतील. - रोमिला थापर, आणि तो "अकबराचा भारत" लिहिणारा मूर्ख

छळवादी हुकूमशाहीचा उदय होऊ नये म्हणून संस्थात्मक कार्य करणारे,= ज्या छळवादी हुकुमशाहीचा इतिहास देशाला आहे मग ती मुसलमानांची असो, हिंदूंची असो, इंग्रजांची वा इंदिरेची असो ते सगळं लपवून ठेवणे आणि ज्यांनी यांना विरोध केला त्यांना गुंड म्हणून रंगवणे

आणि खाण्यापिण्यात वाईन आणि चीज लोकप्रिय व्हावं म्हणून प्रयत्न करणारे = तसंच तूप आणि पनीर अप्रिय, लोवर क्लास व्हावेत म्हणून अजून अधिक प्रयत्न करणारे.

'न'वी बाजू Sun, 01/07/2018 - 06:09

In reply to by अजो१२३

आणि खाण्यापिण्यात वाईन आणि चीज लोकप्रिय व्हावं म्हणून प्रयत्न करणारे = तसंच तूप आणि पनीर अप्रिय, लोवर क्लास व्हावेत म्हणून अजून अधिक प्रयत्न करणारे.

हे कसे काय ब्वॉ? रादर, कोण म्हणतो?

सीताफळसिंग हत्ती Mon, 02/07/2018 - 14:25

In reply to by अजो१२३

ही लेखिका फेसबुकवर किती आक्रस्ताळे आणि डोके गहाण ठेवल्याप्रमाणे लिहित असते ते वाचलेत तर या लेखिकेच्या कोणत्याही बडबडीला उत्तर द्यायला जाल असे वाटत नाही. ही लेखिका अत्यंत उथळ आणि खरीखुरी फुर्रोगामी आहे.

गब्बर सिंग Thu, 05/07/2018 - 11:32

In reply to by अजो१२३

उदारमतवादी च्युत्ये असतात. काही काही महाच्युत्ये असतात. जे लोक, जो देश,जो समाज ह्यांचं ऐकतो त्यांची वाट लागते.

.
यावर विचार करत आहे.
.
अजो तुमच्या मते मार्क्स हा उदारमतवादी होता का ?
मार्क्स चं ऐकणारे देश - रशिया (सो.यु), क्युबा, चीन, कंबोडिया, उत्तर कोरिया, व्हेनेझुएला,........
.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/07/2018 - 18:40

In reply to by गब्बर सिंग

समजा (मला विंचू चावला, त्यावर मी गांजा ओढला किंवा मला विनोदाची उबळ आली आणि मी) अजोंचं विधान खरं आहे असं मानलं तरीही, सगळे च्युत्ये किमवा महाच्युत्ये उदारमतवादी असतात असं अजो म्हणालेले नाहीत.

तर ओढूनताणून समाजवाद, साम्यवादाचा विषय इथे काढून, त्यांमुळे (आणि अनेक कारणांमुळे) ज्या ज्या देशांचं वाटोळं झालं आहे, त्याची जबाबदारी कधीकाळीच मेलेल्या मार्क्सवर टाकण्याचा प्रयत्न गोंडस-निरागस आहे, तिर्री मांजरीसारखाच; पण तिच्यासारखाच निरुपयोगी आणि बालिशही आहे.

गब्बर सिंग Fri, 06/07/2018 - 21:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तर ओढूनताणून समाजवाद, साम्यवादाचा विषय इथे काढून, त्यांमुळे (आणि अनेक कारणांमुळे) ज्या ज्या देशांचं वाटोळं झालं आहे, त्याची जबाबदारी कधीकाळीच मेलेल्या मार्क्सवर टाकण्याचा प्रयत्न गोंडस-निरागस आहे, तिर्री मांजरीसारखाच; पण तिच्यासारखाच निरुपयोगी आणि बालिशही आहे.

.
समाजवाद (व त्याचे अंतिम लक्ष्य साम्यवाद) यांचं येनकेणप्रकारेण डेमोनायझेशन करायचं - हा माझा छंद आहे.
.
मी निष्पक्ष नाही.
.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/07/2018 - 23:42

In reply to by गब्बर सिंग

मी निष्पक्ष नाही.

निष्पक्ष असण्याचा वेडावाकडा आरोप मी कोणत्याही सज्ञान मनुष्यावर करणार नाही. मात्र संबंध नसताना उगाच बादरायण संबंध जोडत कुठेही, काहीही ओकत बसणं बालिश आहे. कंटाळवाणं आहे.

मांजरीची बुद्धी तेवढीच असते; तिनं असले चाळे केले; अधूनमधून अंगात आल्यावर येऊन चावली, बोचकारलं तर गंमत वाटते. तीसुद्धा अंगात आल्याशिवाय असं वागत नाही; दिवसाचा बहुतेकसा वेळ ती शांत असते, आपली आपण खेळते, पळते. वरवर सज्ञान दिसणाऱ्या लोकांनी अंगात आल्यासारखे चाळे वारंवार केले की 'आवरा' येतं.

चिंतातुर जंतू Fri, 06/07/2018 - 18:55

In reply to by गब्बर सिंग

अजो तुमच्या मते मार्क्स हा उदारमतवादी होता का ?

उदारमतवादाचं ठाऊक नाही ब्वा पण मार्क्सच्या मते मार्क्स हा मार्क्सवादी नव्हता असं मी ऐकून आहे.

अजो१२३ Sat, 30/06/2018 - 23:06

१. उदारमतवादी - सर्व काही समान चांगलं नि योग्य असतं.
२. उजवे - जे चांगलं ते चांगलं असतं. सर्व समान नसतं. आमचं आहे ते चांगलं आहे. आम्ही ते सप्रमाण सिद्ध करू शकतो.
३. उदारमतवादी - उजवी भूमिका चूक आहे. आम्ही इतके मूर्ख (खरंतर उदार) नाहीत कि उजव्यांचा उजवी बाजू मांडण्याचा, आचरण्याचा अधिकार मान्य करू.

अबापट Sun, 01/07/2018 - 16:05

In reply to by अजो१२३

आपल्या मताचा आदर. लेखक द्वेष्टा आहे हे तुमचे मत असेल त्याचाही आदर. द्वेष्टा आहे म्हणून त्याची लायकी नाही याही तुमच्या मताचा आदर.
परंतु आपल्या तिन्ही मतांशी संपूर्ण असहमती .
हल्ली मोदी, भाजप, संघ यांचे चाहते अतिसंवेदनशील झाले असावेत.
थोडा वेगळा विचार कुठून आला की त्याला द्वेष्टा लेबलून त्याची लायकी नाही असे लिहिले जाते.
साधारणपणे लेखकाचा हा पण मुद्दा असावा का ?

१४टॅन Mon, 02/07/2018 - 19:12

In reply to by अबापट

श्रीमंत आदूबाळ ह्यांच्या एकेकाळच्या कमेंटच्या धर्तीवर:
"पुरोगामी आणि प्रतिगामी ह्यांनी एकमेकांना त्याज्याऽयचं येडं म्हणत राहणे हा जालीम उपाय आहे."

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/07/2018 - 05:20

लेखाच्या सुरुवातीलाच पुरेशी (खवचट) विधानं आहेत -

उदारमतवादी म्हणजे नेमकं कोण - हा काही सरळसोपा प्रश्न नाही असं तुम्हाला वाटत असेल - पण तसं आता नाही. अगदी सोपंय उत्तर. कुणालाही दोष द्यायचा असेल तर त्यांना उदारमतवादी ठरवून टाका.

अगदी खऱ्या अर्थाने उदारमतवादी म्हणता येतील असे लोक भारतात मूठभर असतील याची आम्हाला चिंताच वाटत असे. पण आता मात्र, ते सर्वत्र फैले हुए हैं असं वाटायला लागलंय - किरकोळ पातळीवर समतेचा विजय व्हावा म्हणून कारस्थाने करणारे, व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे, लादल्या गेलेल्या अस्मितांवरून हिंसक होणाऱ्यांना विरोध करणारे, वादविवादात तर्कबुद्धीचा वापर आवश्यक मानणारे, धर्माबाबत शंका उपस्थित करणारे, वैज्ञानिक मूल्यांचे रक्षण करू पाहाणारे, जगात वैविध्य रहावे म्हणून शर्थ करणारे, सत्तेच्या भयंकर केंद्रीकरणाविरुद्ध आवाज उठवणारे, पर्यावरणाचे रक्षण करू पाहाणारे, स्वत्व आणि समाज यांमधील अज्ञात दुव्यांचा अभ्यास व्हावा म्हणून मुक्त अवकाश जपणारे, इतिहासामधील अचपळ गुंतागुंतीचा शोध घेणारे, छळवादी हुकूमशाहीचा उदय होऊ नये म्हणून संस्थात्मक कार्य करणारे, - आणि खाण्यापिण्यात वाईन आणि चीज लोकप्रिय व्हावं म्हणून प्रयत्न करणारे - सारेच उदारमतवादी. हे उदारमतवादी इतके बलवान आहेत की या सर्व मूल्यांचा विजय झालेलाच आहे.

त्यात सामान्य जनतेला काय वाटतं, आणि काश्मिरात दगड फेकणाऱ्यांना उदारमतवादी म्हणता येईल का, याची दखल घेतली आहे.

'न'वी बाजू Sun, 01/07/2018 - 06:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काश्मिरात दगड फेकणाऱ्यांना उदारमतवादी म्हणता येईल का, याची दखल घेतली आहे.

प्रश्न काश्मिरात दगड फेकणाऱ्यांना उदारमतवादी म्हणता येईल का असा नसून, काश्मिरात दगड फेकणाऱ्यांना क्षमा करा असे म्हणणाऱ्यांना उदारमतवादी म्हणता येईल का, असा होता.

काश्मिरात दगड फेकणाऱ्यांना कोणी उदारमतवादी म्हणण्याचा विचार करेल, याबद्दल साशंक आहे. (आय मीन, बेसिस काय?)

'न'वी बाजू Sun, 01/07/2018 - 18:05

In reply to by अजो१२३

...कल्पना नाही. तुमच्या पचनसंस्थेतले बाहेर आले, एवढे निश्चित.

(कोठल्या मार्गाने, हा प्रश्न अलाहिदा.)

अजो१२३ Sun, 01/07/2018 - 18:29

In reply to by 'न'वी बाजू

काय लोकांच्या पचनसंस्थांच्या द्वारांवर करडी नजर आहे म्हणायची!! कॅनडात अजून दुसरं काही बघायला नाही का?

अबापट Sun, 01/07/2018 - 20:50

In reply to by अजो१२३

थोडी शंका, अजो कॅनडा मध्ये गेलेत की न बा ? काही कळेनासे झालंय ( यात काळा, पांढरा किंवा कुठल्याही रंगाचा विनोद नाहीये . शोधायला गेल्यास व न सापडल्यास मी, अजो, न बा, कॅनडा, अटलांटा तसेच कुणाचाही कुठलाही अवयव तसेच अवयवाचे ऊर्ध्व किंवा अधोमुख जबाबदार नाही याची नोंद घ्यावी)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/07/2018 - 19:31

In reply to by 'न'वी बाजू

अंमळ आकलनचूक झाली (टंकनचूक निराळी).

'न'वी बाजू Sun, 01/07/2018 - 06:21

प्रतिसाद योग्य ठिकाणी हलविला आहे.

चिमणराव Sun, 01/07/2018 - 13:18

मतमोजणीवेळी एकेक पेटी/विभागवार यंत्र त्यामतदार विभागणनास जोडल्यावर त्यामध्ये किती मते कशी विभागी गेली आहेत ते दाखवण्याचं बंद केलं तर धारावी/ किंवा शिवाजीपार्क नक्की कोण उदारमतवादी आहे हे समजण्याचंच बंद होईल.
मग घाला शिव्या कुणाला घालायच्या त्यांना.