Skip to main content

आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ५

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.
या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.
---
'लव्हिंग व्हिन्सेंट' या चित्रपटाची अनेक चोखंदळ ऐसीकरांनी स्तुती केली आहे. पुणेकरांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायची संधी उद्या मिळणार आहे. पुण्यात केवळ दोन खेळ दिसत आहेत. अधिक माहिती 'बुक माय शो'वर मिळेल.

Loving Vincent - गिमिकाच्या पलीकडे - ३_१४ विक्षिप्त अदिती
तुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट ! - सर्व_संचारी

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 24/02/2018 - 18:33

आता चित्रपटाबद्दल जंतूचं मत समजेल का?

चिंतातुर जंतू Sun, 25/02/2018 - 17:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रपट गिमिकी वाटला. अनेक कारणं आहेत. एक तर 'तो बायपोलर होता; त्यानं आपला कान कापून वेश्येच्या हातात दिला आणि नंतर त्यानं आत्महत्या केली' हे तपशील अधोरेखित करणारी कथनं मला गिमिकी वाटतात. तसंच, त्याच्या आयुष्यातला एक विशिष्ट कालखंड (दक्षिण फ्रान्समधलं त्याचं वास्तव्य) आणि त्या दरम्यानचं त्याचं कामच अधोरेखित करणारी कथनंही मला गिमिकी वाटतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुद्द कथानायकाच्या आस्थाविषयांना अजिबात हात न घालणारी किंवा केवळ वरवर हात लावून प्रेक्षकांना भावनावश करण्याची आकांक्षा ठेवणारी कथनं मला गिमिकी वाटतात. त्या निमित्तानं ह्याच कालखंडावरचा, पाहिला होता तेव्हा फारसा न आवडलेला चित्रपट पुन्हा आठवला - मोरिस पियालाचा १९९१चा चित्रपट. पियालानं कथानकाला अजिबात सनसनाटी केलं नव्हतं. चित्रं आणि झगझगीत रंग दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्यांना खूश करण्याचंही त्यात टाळलं होतं. पण अखेरच्या दिवसांमध्ये काय घडत होतं, ते दाखवून वर्तमानात एक शोकांतिका कशी आकार घेत गेली आणि भविष्यात एक मिथक निर्माण होण्याची सामग्री कशी एकत्र येत होती, त्याचा अतिशय गांभीर्यानं शोध घेतला होता.

चिंतातुर जंतू Thu, 05/04/2018 - 19:19

शोधनिबंध लिहिण्यासाठी LaTeX नियमितपणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरलं जातं. ते फुकट आहे आणि गणितातली समीकरणं लिहिण्यापासून किचकट टाइपसेटिंग आणि पुस्तकाचं डिझाईन करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी अतिशय सशक्त आहे. आता शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे प्रकाशित होणारी पुस्तकं पूर्णपणे लाटेकमध्ये डिझाईन आणि सेट केली जातात. पुण्यात भास्कराचार्य प्रतिष्ठानातर्फे लाटेक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ज्यांना आपलं किंवा इतरांचं लिखाण जालावर किंवा कागदावर आणि महागड्या किंवा पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर न करता सुबकपणे प्रकाशित करण्यात रस आहे त्यांनी जरूर लाभ घ्यावा.

स्थळ : भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे.
दिवस : १४-१८ मे २०१८
शुल्क : ३००० रुपये.
(आलेल्या अर्जांमधून निवड केली जाईल.)
अर्ज देण्याची शेवटची तारीख : २७ एप्रिल
अधिक माहिती इथे मिळेल.

सुनील Thu, 05/04/2018 - 19:48

In reply to by अबापट

राज ठाकरे यांनी दुकानांच्या पाट्या मराठीत (खरे म्हणजे देवनागरीत) लिहिल्या जाव्यात यासाठी खळ-खट्याक आंदोलन केले. याचा मनसेला कितपत राजकीय फायदा झाला ते ठाऊक नाही परंतु, बऱ्याच जणांना Volkswagen, Renault आणि इतर अशाच काही विदेशी ब्रॅन्ड्सचे खरे उच्चार समजले!

जयदीप चिपलकट्टी Tue, 15/05/2018 - 08:54

In reply to by अबापट

उच्चार देवनागरीत लिहिलेला आहे असं मी म्हणेन, मराठीत नाही. पण ते एक असो. पाश्चात्य पद्धत अशी की LaTeX मधल्या X चा उच्चार loch ह्या शब्दातल्यासारखा करतात - लाटेक्ख. बाकी जंतूंनी LaTeX चे जे कौतुक केलेलं आहे त्यात कणभरही अतिशयोक्ती नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/04/2018 - 01:27

In reply to by चिंतातुर जंतू

लेटेक हे प्रकरण विद्यापीठांमध्ये शिकत असताना बरंच वापरलं. त्यापुढे पुन्हा कधी लेटेक वापरावं लागेल, असं वाटलं नाही.

हल्लीहल्लीच कॉन्फ्लुअन्स नामक क्लाऊड-वर्ड-प्रोसेसर वापरताना मला लेटेकची खूप आठवण झाली. एका दस्तावेजात ४५ आकृत्या डकवायच्या होत्या. सगळ्यांची नावं खूप सारखी होती. स्क्रिप्ट लिहून, लेटेक वापरून पीडीएफ बनवणं खूप सोपं झालं असतं. पण दुर्दैव!

चिंतातुर जंतू Sun, 08/04/2018 - 20:08

म्युझियम कट्टा // लिहावे नेटके
माधुरी पुरंदरे

मराठी भाषेच्या समृद्धीची ओळख
पालक व शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा
२०१० साली प्रकाशित करण्यात आलेल्या ​माधुरी पुरंदरेंच्या 'लिहावे नेटके' ह्या चार पुस्तकांच्या ​संचावर आधारित सदर कार्यशाळा आहे. प्राधान्याने ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांची मराठी भाषेची जाण वाढावी ह्या हेतूने स्वाध्याय पुस्तिकांच्या स्वरुपात ही मालिका तयार करण्यात आली आहे.

​माधुरी पुरंदरे ह्या मराठी भाषेतील प्रचलित लेखिका आहेत. दृश्यकलावंत म्हणून तालीम घेतलेल्या पुरंदरे ह्यांनी इंग्रजी आणि मराठी भाषेतून लहान मुलांकरिता अनेक पुस्तके लिहिली असून त्यांकरिता रेखांकनही केलं आहे.

​कार्यशाळेचं वेळापत्रक:​
- ​शनिवार, २१ एप्रिल २०१८: सकाळी ११ - दुपारी ५​
​- रविवार, २२ एप्रिल २०१८: सकाळी ११ - दुपारी ५
* मध्यंतर: दुपारी १.३० -२.३०

​स्थळ: शैक्षणिक केंद्र, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय​

​सहभाग शुल्क:​ प्रत्येकी रु.३००/-​

* 'लिहावे नेटके' हा पुस्तकांचा संच सर्वांना सोबत बाळगावा लागेल. विक्रीसाठी सवलतीच्या दरात ही पुस्तके उपलब्ध असतील. सवलत शुल्क: रु.४००/-

नोंदणी 'बुकमायशो'वरुन करता येईल.
कार्यशाळेचं फेसबुक पान

कार्यशाळा उत्तम होईल, यात काही शंका नाही. सहभागी विद्यार्थ्यांना हा मोलाचा अनुभव असेल.

मात्र -

माधुरी पुरंदरे ह्या मराठी भाषेतील प्रचलित लेखिका आहेत. दृश्यकलावंत म्हणून तालीम घेतलेल्या

यासारखे हिंदाळ वाक्प्रयोग पाहून (आश्चर्य नसले) तरी खेद वाटला.

'न'वी बाजू Tue, 15/05/2018 - 07:22

In reply to by नंदन

...तालीमच घेतली, शिक्षा नाही घेतली.

(ही माधुरी पुरंदरे काळी की गोरी कल्पना नाही, कधी पाहिलेली नाही. परंतु हे वाचून (अधिक तपशिलात शिरत नाही, परंतु) शड्डू ठोकणाऱ्या बाईचे चित्र मनश्चक्षूंसमोर उभे राहिले.)

(दिल को बहलाने के लिए बस इतना ही ख़याल अच्छा है|)

जयदीप चिपलकट्टी Tue, 15/05/2018 - 09:03

In reply to by 'न'वी बाजू

> ही माधुरी पुरंदरे काळी की गोरी कल्पना नाही, कधी पाहिलेली नाही. 

आपण ‘अर्धसत्य’ पाहिलेला नाही अशी उघड कबुली देणं अंमळ धार्ष्ट्याचं आहे.

'न'वी बाजू Sun, 20/05/2018 - 22:15

In reply to by जयदीप चिपलकट्टी

अर्धसत्य कॉलेजात असताना पाहिला होता. साधारणतः १९८४-८५ सालाकडे. आता शष्प आठवत नाही.

तसेही, ताल पाहून अगदी थेटरातून बाहेर पडल्यापडल्या नाही तरी त्यानंतर लवकरच, 'पण यात ऐश्वर्या राय नक्की कोठे होती?' म्हणून बायकोला फेफरे आणलेले असल्याकारणाने, त्यापुढे माधुरी पुरंदरे म्हणजे काहीच नाही.

आणि हो, आहोतच मुळी आम्ही धार्ष्ट्यवान!

आदूबाळ Tue, 15/05/2018 - 06:28

येत्या शनिवारी सकाळी सात वाजता ऐसीच्या अधिकृत हाटेलात* कट्टा करणे योजले आहे. तरी एणेचे करावे.

*क्याफे पॅरेडाईज, कर्वे रस्ता, पुणे

अभ्या.. Tue, 15/05/2018 - 19:05

In reply to by आदूबाळ

ह्या, असा पंच पंच उषाकाळे कट्टा असतो का कुठे?
पालक किंवा कारल्याचा रस सोबत घेऊन येण्याची टीप तरी टाका.

अबापट Tue, 15/05/2018 - 19:53

In reply to by अभ्या..

कर्वे रोड. सह्याद्री हॉस्पिटल समोर, परडाईज कॅफे नावाचं इराणी हाटेल. स्वतः या. कसलाही रस आणू नका. भुर्जी , ऑम्लेट, बॅन मस्का, चहा आणि बिड्या हे सगळं बरं मिळतं तिथे

अबापट Tue, 15/05/2018 - 18:16

तिरसिंगराव पुण्यात आले आहेत . त्यांना खाजगीत इन्व्हिटेशन पाठवले आहे . तसेच अभ्या पण पुण्यात आहे . तोही जमलं तर येणार आहे ( मनोबा त्याला घेऊन येण्याची जबाबदारी तुझी )
आबा/मनोबा ब्याटोबांना पटवता येतंय का बघा .

तिरशिंगराव Thu, 17/05/2018 - 11:28

माझं नांव 'तिरशिंंगराव' आहे हो! तिरशिंगराव माणूसघाणे पण कट्ट्याला जरुर हजेरी लावणे.

अबापट Sat, 19/05/2018 - 13:05

आजचा कट्टा सुफळ संपूर्ण झाला . ऐसी मेम्बरांपैकी ष्टार अट्रॅक्शन विलायती आबा उर्फ आदूबाळ , नंबर दोन पर्मनंट ष्टारअट्रॅक्शन मनोबा , चालकमालक ब्युरो चे लोकल हेर चिंतातुर जंतू , ज्येष्ठ सदस्य तिरशिंगराव इत्यादी थोर्थोर मंडळी व त्याबरोबर रयत प्रतिनिधी म्हणून नील लोमस ,भाऊ ,अबापट वगैरे मंडळी होती .खास सरप्राईज पाहुणे म्हणून न्यूयॉर्कहुन या कट्ट्यासाठी रा रा धनुष राव आले होते .
काही नॉन ऐसी पाहुणे हि उपस्थित होते .
ऐसीमधील नंबर दोन सर्वशक्तिमान मनोबा यांना कट्टा वृत्तांत लिहिण्याची मी विनंती करतो .
( अभ्या आणि बॅट्या या दोघांनी नेहमीप्रमाणे घोडा लावला )
सर्व उपस्थितांना धन्यवाद व घोडा लावणाऱ्यांचा निषेध .
कुणाचे नांव राहून गेले असेल तर दिलगिरी .

चिमणराव Sat, 19/05/2018 - 15:13

फोटो aise rasik facebook पेजवर द्यावे.
कट्टावेळ फार लवकर असल्याने ( पंच पंच उष:काळे - अभ्या..) मला येता आले नाही. अमचा घोडा कूच करणार नाही हे अगोदरच कळवले होते.
कोणाची मुलाखत कोणी घेतली?

चिंतातुर जंतू Wed, 06/06/2018 - 18:39

रॉक संगीतावर चर्चा चालू आहे त्या निमित्तानं - २७ जूनला कल्याणीनगरच्या देझिओमध्ये (आता दारियोज त्रात्तोरिआ) एक फ्रेंच चित्रपट दाखवणार आहेत तो जरूर पाहा अशी शिफारस करेन - मिया हॅन्सन लव्ह दिग्दर्शित 'एडन'

९०च्या दशकातलं खूप रोचक संगीत त्यात आहे. त्या काळातल्या एका डीजेची गोष्ट आहे.

अधिक माहिती इथे

ट्रेलर :

अबापट Mon, 09/07/2018 - 10:00

संगीतप्रेमींच्या करिता अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता . आधीच्या पिढीतील लोकांना डॉ अशोक रानडे हे संगीतातील जाणकार गृहस्थ टीव्ही वर पाहून माहित असतील . डॉ रानडेंनी संगीतविषयक अनेक विदवत्तापूर्ण संदर्भ ग्रंथ लिहिण्याचे फार मोलाचे काम करून ठेवले आहे. त्यांचा मृत्यू २०११ मध्ये झाला तेव्हाही ते "पाश्चात्य संगीतसंज्ञा कोष "लिहिण्यात व्यग्र होते . त्यावेळी कोशाचे जवळ जवळ ९० टक्के काम पूर्ण झाले होते.
उर्वरित कोष पूर्ण करणे आणि संपादन प्रक्रिया करून कोषाला मूर्त स्वरूप देणे हि अतिशय अवघड आणि महत्वाची जबाबदारी तरुण विद्वान गृहस्थ डॉ. चैतन्य कुंटे यांनी पार पाडली आहे .
या कोशाचे प्रकाशन काही काळापूर्वी मुंबईत पार पडले ( पॉप्युलर प्रकाशन )
हा कोष पुण्यात प्रसारित करण्याकरिता कालचा कार्यक्रम असावा .
शंभर एक संगीतप्रेमी यास उपस्थित होते ( वयाची रेंज १५ तो ८० असावी )
कोशातील काही निवडक संज्ञा घेऊन ( उदा : मेलडी , हार्मनी ) त्याचे 'निरूपण ' डॉ कुंटे करीत व त्यावर आधारित काही मोठ्या कलाकारांचे विडिओ /ऑडिओ अशी एकंदरीत मेजवानी होती .
सादरीकरणात डॉ. अशोक रानडेंच्या इतकी सफाई नव्हती ( हे अपेक्षितच ) पण भविष्यात ती नक्की येऊ शकेल इतके आशादायी सादरीकरण डॉ. कुंटेंनी केले .
या विषयी इतके सखोल आणि एकत्रित काम भारतीय भाषांमध्ये नाही . प्रथमच आणि तोही मराठीत .
डॉ रानडे यांचे हे उपकार आहेत . ( असे मी मानतो ) हि अवघड जबाबदारी पार पाडणारे डॉ . कुंटे हेही अभिनंदनास पात्र आहेत .
बऱ्याच दिवसांनी एका चांगल्या कार्यक्रमाला गेल्याचे समाधान वाटले . दोन वर्षांपूर्वी असेच समाधान डॉ. कुंटेंनीचं ऑर्गनाईझ केलेल्या डॉ. वॉरन सेंडर्स या ( बोस्टन निवासी , पण पुण्यात शास्त्रीय संगीत शिकण्याकरिता बराच काळ व्यतीत केलेल्या ) या विद्वान गृहस्थांच्या "जॅझ " वरील प्रेझेंटेशन मुळे मिळाले होते .

अमुक Wed, 11/07/2018 - 19:41

In reply to by अबापट

अतिशय उत्सुकता होती ह्या कार्यक्रमाबद्दल. लिहिलंत त्याबद्दल आभार.
काही चित्रीकरण उपलब्ध आहे का कुठे?

अवांतर : पाश्चात्त्य संगीतसंज्ञा को असं नाव आहे.

अबापट Thu, 12/07/2018 - 05:33

In reply to by अमुक

चित्रीकरण झाले की नाही याची कल्पना नाही. चैतन्य कुंटेनी चर्चेला आणलेले सिलेक्शन उत्तम होते. पण त्यांचे सादरीकरण अगदी शाळा मास्तर (प्राथमिक) असल्यासारखे वाटले . अशोक रानडे फार साध्या भाषेत ओघवते सादरीकरण करत त्या पार्श्वभूमीवर हे जास्त टोचले.( अर्थात कुंटे शिकतील असे म्हणायला वाव आहे) अर्थात सादरीकरण हा या कार्यक्रमापुरता मर्यादित विषय. मूळ काम थोर आणि मोठे.
घेतलाय मी कोश ...

चिमणराव Fri, 13/07/2018 - 13:27

In reply to by अमुक

पाश्चात्य / पाश्चात्त्य
माझा विंडोजचा( हिंदी) कीबोर्ड 'पाश्चात्य' सुचवतो.
मराठी आणि हिंदीत हा शब्द वेगळा पडतो# का?

# - इस में इतने सारे मसाले पडते हैं। या तालावर वाचावे.

अमुक Fri, 13/07/2018 - 18:58

In reply to by चिमणराव

हिन्दीतले तत्सम-तद्भव प्रमाणलेखनाचे तर्क मला माहीत नाहीत.
जर हिन्दीत मराठीप्रमाणे तो संस्कृतातून जसाच्या तसा (तत्सम) आला असेल, तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे -

नामाचे विशेषण होताना प्रत्यय 'त्य' आहे, हे ध्यानात ठेवावे.

पूर्वा --> पौर्वा + त्य --> पौर्वात्य
पश्चिमा --> पाश्चिमा + त्य --> पाश्चिमात्य
परंतु,
पश्चात् --> पाश्चात् + त्य --> पाश्चात्त्य

'पश्चात्'मधला अर्धा त पुढल्या 'त्य'ला जोडला जातो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/07/2018 - 22:17

In reply to by चिमणराव

बहुतेकसे कीबोर्ड जे सुचवतात, ते लोक काय, कसं लिहितात यावरून सुचवतात. माझ्या फोनचा कीबोर्ड 'पुरूष' (प्रमाणलेखन - पुरुष), 'तरूण' (तरुण) असे शब्द सुचवतो. ते कष्टपूर्वक बदलून टंकावे लागतात. हे शब्द जिथून उत्पन्न होतात त्याचा विचार करता आणखी काही दिवसांनी 'मिञ' किंवा 'ञाटिका' हे प्रमाणलेखन मानलं जाईल.

तिरशिंगराव Wed, 11/07/2018 - 16:40

एवढा युरोपियन चित्रपट महोत्सव चालू आहे NFAI मधे पुण्याला, पण कोणी उल्लेखही केला नाही. ६ जुलै ते १२ जुलै! आता संपत आला.

सर्व_संचारी Tue, 17/07/2018 - 20:05

मी ऑगस्ट सप्टेंबर भारतात (शक्यतो पुणे-तळेगाव)असेन. आल्यावरही एका नाटकाच्या प्रोजेक्ट मध्ये बिझी असण्याची शक्यता आहे. तरीही त्यादरम्यान एखादा "ऐसी कट्टा" असेल तर भेटायला आवडेलच आणि गाणंबजावणं असेल तर लगेचच !!!

चिंतातुर जंतू Thu, 19/07/2018 - 00:03

In reply to by सर्व_संचारी

एखादा "ऐसी कट्टा" असेल तर

जरतरची कशाला बात? तुमच्या सन्मानार्थ करू की कट्टा!

अबापट Wed, 25/07/2018 - 12:04

उद्या रॉकप्रेमींसाठी दोन चांगले कार्यक्रम :
१. ' द स्ट्रेन्जर्स रियूनाइट '
स्ट्रेन्जर्स हा ऐशीचा दशकातील पुण्यातील सर्वात लोकप्रिय रॉक बॅण्ड .काळाच्या ओघात बँड मेम्बर्स आपापल्या पोटापाण्याला लागल्याने नंतर विखुरलेला .
मूळ कलाकार संच होता :
अनिल पुरोहित : बेस गिटार ( सध्या हे आर्किटेक्ट असावेत . )
मिलिंद मुळीक : लीड गिटार आणि व्होकलस ( सध्या हे प्रथितयश चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेत )
विजय जोशी : व्होकलस , विजयनी आता पुन्हा गायला सुरुवात केलीय , गेली काही वर्षे
निको फ्रान्सिस : ड्रम्स
आणि अधून मधून ऍडिशन म्हणून नितीन अनगळ कीबोर्डस वाजवत ( सध्या हे चतुर्श्रुंगी समोरच्या इंद्रप्रस्थ कार्यालयाचे चालक मालक असावेत )

उद्याच्या कार्यक्रमात मिलिंद मुळीक नाहीयेत .

ऐशीच्या दशकात या बँडने डीप पर्पल चे हार्ड रॉक नंबर्स जोरात परफॉर्म करून पुण्यात धमाल उडवून दिली होती. यांचे बरेच शोज होत. आणि फॅन बेस अतिशय मोठा होता . आता हे सगळे वयाने पन्नाशी ओलांडलेले असतील . आता विजय जोशी हायवे स्टार म्हणू शकतील का हे बघणे रोचक ठरेल . धमाल ग्रुप .
नॉस्टॅलजिया सदरात इथे गर्दी व्हावी.
कार्यक्रम उद्या संध्याकाळी साडेसात वाजता बाणेर ला Effingut मध्ये .

दुसरा चांगला कार्यक्रम उद्याच :
विनीत अलुरकरचा " डीलन डायरीज "
कलाकार आहेत :
विनीत अलुरकर : ऱ्हिदम गिटार आणि व्होकलस
भूपाल लिमये : मॅनडोलिन ( छान वाजवतात )
ख्रिस्तोफर फोन्सेका : लीड गिटार ( ख्रिस गिटार वर धमाल करतो )
वगैरे
जागा : शिशा कॅफे , कोरेगाव पार्क रात्री साडे आठ वाजता .
विनीत अलुरकर म्हणजे अलुरकर म्युझिक हाऊस च्या अलुरकरांचे चिरंजीव . वर्षातील काही महिने ऑस्ट्रिया मध्ये वाजवतात . उर्वरित महिने पुण्यात वाजवतात .
मध्ये एकदा भर मंडईत स्टेज लावून विनीत ने " भाजी घ्या भाजी " वगैरे रॉक गाऊन धमाल उडवून दिली होती .
तरुण ग्रुप. चांगला परफॉर्म करतो .

दोन्ही गृप घट्ट पुणे आहेत . चांगले आहेत . जरूर जाणे .

चिंतातुर जंतू Wed, 25/07/2018 - 16:29

'नॅशनल फिल्म आर्काइव्ह'तर्फे नुकताच एक डॉक्युमेंटरी फिल्म क्लब चालू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत येत्या रविवारी २९ तारखेला ४ वाजल्यापासून अरुण खोपकर यांचे माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. नारायण सुर्वे, संगीत, नृत्य, चित्रकला अशा विविध विषयांवरचे हे माहितीपट आहेत. त्यांपैकी अनेकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश. विनामूल्य. अधिक तपशील इथे

चिंतातुर जंतू Tue, 31/07/2018 - 11:32

राम बापट स्मृती व्याख्यानमालेच्या सहाव्या सत्रात या वर्षी इतिहासतज्ज्ञ प्राची देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. प्राची उर्फ रोचना 'ऐसी अक्षरे'शी पूर्वीपासून संबंधित आहेत. व्याख्यान विनामूल्य आणि सर्वांना खुले आहे.

व्याख्यान दि. ३ ऑगस्ट ६ वा. एस.एम.जोशी सभागृह, पुणे येथे आहे. अधिक तपशील :

Prachi Deshpande Lecture

अबापट Sat, 04/08/2018 - 07:03

In reply to by चिंतातुर जंतू

सर्वश्री जंतु, कृपया या व्याख्यानाचे सार लिहू शकाल का ? ( किंवा ते कुठे मिळेल याची लिंक देऊ शकाल का ?)
व्याख्यान सहा वाजता असल्याने सर्वसामान्य शहरी फडतूस नोकरी धंदा वाल्या लोकांना जाता आले नाही. त्यांच्या करिता सुलभ भाषेत काहीतरी .

चिंतातुर जंतू Sat, 04/08/2018 - 12:41

In reply to by अबापट

सारांश लिहिणं कठीण आहे, पण लोकसत्तामध्ये काही भाग आढळेल. काही रोचक मुद्दे -

  1. भाषेचा सांस्कृतिक इतिहास पाहताना केवळ साहित्यावर (लिटरेचर) भर देण्याची आपली प्रवृत्ती आहे. पण अगदी कारकुनी लेखनापासून पोलिसी लेखनापर्यंत अनेकविध साधनांतून मराठीविषयी वेगवेगळ्या आणि मार्मिक गोष्टी कळू शकतात.
  2. मराठा साम्राज्य जसजसं वाढत गेलं तसतशी मराठी लिहू-वाचू-बोलू शकणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली. इंग्रजीसारख्या कोणत्याही वसाहतवादी भाषेच्या प्रसारात दिसतात तसे काही मुद्दे (उदा. सत्ताव्यवहार, वर्गजाणिवा) मराठीच्या या प्रसारातही दिसतात, पण महाराष्ट्रात लिहिली-बोलली जाते त्या मराठीइतके आपण त्याकडे लक्ष देत नाही म्हणून काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.
  3. तंत्रज्ञानानुसार भाषेच्या लेखनप्रक्रियेत बदल जसजसे होत गेले तसतसे सत्ताधारी लोकांनी आपल्या निरंकुश सत्तेला बाधा येऊ नये म्हणून त्या तंत्रांचा आणि बदलांचा वापर आपल्या सोयीनुसार करून घेणं जसं नवीन नाही तसंच सत्तेला विरोध करणारे लोक त्यावर मात करण्याचे विविध उपाय शोधतात हेही होत आलं आहे.

यथावकाश भाषणाचा व्हिडिओ यूट्यूबवर चढवला जाईल अशी ग्वाही संयोजकांनी दिली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 05/08/2018 - 20:35

In reply to by चिंतातुर जंतू

इंग्लिशमधलं पोस्टर, इंग्लिशमधून विषय आणि हरी नरकेंची तक्रार

---

प्रा. नरकेंनी आपली पोस्ट उडवल्याची शक्यता ढेरेसरांनी लक्षात आणून दिली. हा तो मजकूर -

मराठी भाषेची इंग्रजीतली मंगळागौर - प्रा.हरी नरके

" मी मराठी भाषेचा शिवाजी आहे," अशी घोषणा 150 वर्षांपुर्वी पुण्यातल्या एका सनातनी शास्त्रीबुवांनी केली होती. त्यांचे मराठी इथल्या सामान्य माणसाच्या समजण्यापलिकडचे होते. त्यांनी आयुष्यभरात शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्या प्रश्नांवर ब्र शब्द उच्चारला नाही. तरिही या शास्त्रीबुवांचा जयजयकार मराठी भाषेचे शिवाजी म्हणून केला गेला.
अभ्यासक्रमातून तो लादला गेला.

शिवाजी महाराज हे रयतेचे राजे. त्यांचे अपहरण करण्याची सुरूवात इथूनच झाली.

मराठी ग्रंथांची छपाई 1806 ला सुरू झाली. ज्या महात्मा जोतीराव फुल्यांनी मराठीतले पहिले पोवाडारूपी शिवचरित्र लिहून जून 1869 ला प्रकाशित केले त्यांच्या ह्या कार्याची दखल घ्यायचे सोडा, शास्त्रीबुवांनी त्यांच्या व्याकरणात कशा चुका आहेत याचा हिशेब मांडण्यावर भर दिला. 1876 च्या भीषण दुष्काळात लाखो भारतीय मेले त्याबद्दल अवाक्षर न लिहिता शास्त्रीबुवा मराठी व्याकरणावर लेख लिहित राहिले. फुल्यांवर त्यांनी आयुष्यभर गलिच्छ टिका केली. गरळ ओकले.

विनोद म्हणजे या मराठी भाषेच्या शिवाजीने ही घोषणा चक्क इंग्रजीत केली होती. "आय एम दि शिवाजी ऑफ मराठी लॅंग्वेज"

हे आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यातले जे मराठी विचारवंत कायम सामान्य माणसांशी एकरूप झालेले होते, त्यांच्या नावे काल पुण्यात एक व्याख्यान झाले. संयोजक मराठी, वक्त्या मराठी, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यान ते मराठी, विषय मराठी भाषेचा, पण व्याख्यान सामान्य मराठी माणसांना समजू नये म्हणून इंग्रजीत!

वर्तमानपत्रांनी बातम्या देताना काय लिहावे?

म्हणे बुद्धीवंतांनी व्याख्यानाला गर्दी केली होती!

यातले 95% तथाकथित "बुद्धीवंत!" म्हणजे मराठीला कायम नाकं मुरडणारे, मूळचे मराठीच पण इंग्रजी मिडीयममधून मराठी शिकलेले, धड मराठी न येणारे, तरीही मराठीचे तज्ज्ञ म्हणून मिरवणारे.

हे लोक मराठीचे संरक्षक-अभ्यासक आहेत की "तेव्हढेच ज्ञानप्रकाशात" म्हणून चमकून घेणारे?

गब्बर सिंग Sun, 05/08/2018 - 10:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

" मी मराठी भाषेचा शिवाजी आहे," अशी घोषणा 150 वर्षांपुर्वी पुण्यातल्या एका सनातनी शास्त्रीबुवांनी केली होती. त्यांचे मराठी इथल्या सामान्य माणसाच्या समजण्यापलिकडचे होते. त्यांनी आयुष्यभरात शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्या प्रश्नांवर ब्र शब्द उच्चारला नाही. तरिही या शास्त्रीबुवांचा जयजयकार मराठी भाषेचे शिवाजी म्हणून केला गेला.

.
.
अवांतर मोड ऑन्
.
मिडिया बिकाऊ आहे,
उच्चाभ्रू हे नीचभ्रूंबद्दल कणव, संवेदना गमावून बसलेले आहेत नव्हे नव्हे नव्हे त्यांच्याकडे संवेदना नव्हतीच कधी,
अमक्यांनी ढमक्यांना कधी आपलं मानलंच नाही,
तमक्यांनी ढमक्यांच्या मुली सुना/पत्न्या म्हणून करून घ्याव्यात म्हंजे ॲनिहिलेशन का काय ते होईल,
....
....
....
मेरी मत करो कोईभी नक्कल्
नही तो मै कर दूंगा तेरा टक्कल
...
...
अवांतर मोड ऑफ्फ.
.

यडमाठराव Sun, 05/08/2018 - 14:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भुजबळजी टेंपरवारी बाहेर आल्यानंतर हरीजी नरकेजी लईच बुंगाट निघालेत. सगळ्याच विषयावर (काहीही) बोलतात आजकाल हरीजी नरकेजी.

चिंतातुर जंतू Sat, 01/09/2018 - 14:53

मराठी सिनेदिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेता गिरीश कुलकर्णी आणि त्यांचं निर्मितीगृह अरभाट फिल्म्स गेली काही वर्षं लघुपटांसाठीचा फिल्म क्लब चालवतात. या वर्षीचं सत्र उद्या सुरू होत आहे. संध्याकाळी ६ वाजता नॅशनल फिल्म आर्काइव्ह इथे नागराज मंजुळेचा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला लघुपट 'पावसाचा निबंध' आणि इतर काही लघुपट दाखवले जातील. वार्षिक सदस्यत्व १८००/- आणि सहामाहीसाठी १०००/- आहे. अधिक माहिती इथे.

चिंतातुर जंतू Sat, 01/09/2018 - 15:46

शुक्रवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, राज्य मराठी विकास संस्था व फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युनिकोड विषयक कार्यशाळा भरणार आहे. प्रकाशक व अक्षरजुळणीकार यांसाठी त्यात विशेष सत्रे आहेत. युनिकोडचा वापर कसा करावा, मोफत उपलब्ध असलेले फॉन्ट डाउनलोड कसे करावेत, फोटोशॉप, कोरलड्रॉ न वापरता, ही सॉफ्टवेअर करत असलेले काम करणाऱ्या इतर नि:शुल्क उपलब्ध असणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर कसा करावा? ई बुक निर्मिती, जुनी पुस्तके वेबवर आणणे, विकी प्रकल्पांद्वारे मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देणे, पुस्तकांचे सोशल मार्केटिंग कसे करावे? अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

अधिक माहिती इथे

अभ्या.. Sat, 01/09/2018 - 16:14

In reply to by चिंतातुर जंतू

फोटोशॉप, कोरलड्रॉ न वापरता, ही सॉफ्टवेअर करत असलेले काम करणाऱ्या इतर नि:शुल्क उपलब्ध असणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर कसा करावा?

हे इंटरेस्टींग आहे.

चिंतातुर जंतू Sat, 01/09/2018 - 16:46

In reply to by अभ्या..

हे इंटरेस्टींग आहे.

हो. मी स्वतः राज्य मराठी विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललो आहे. त्यांची अलीकडची सर्व प्रकाशनं पूर्णतः ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरून केलेली आहेत.

बॅटमॅन Sun, 02/09/2018 - 00:40

In reply to by चिंतातुर जंतू

त्यांची अलीकडची सर्व प्रकाशनं पूर्णतः ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरून केलेली आहेत.

हे अतिशय जबरदस्त आहे.

चिंतातुर जंतू Sun, 02/09/2018 - 15:22

In reply to by अभ्या..

मला यायचंय, मी पुण्यातच आहे. एक दिवसभर असेल तर मला जमेल. आणि कुणी असणार आहे का?
जंतुराव?

अक्षरजुळणीकारांसाठीच्या सत्रांत जायला मला आवडेल. जायचं जमवेन बहुधा.

चिंतातुर जंतू Tue, 04/09/2018 - 11:53

ऐसीवरचे सर्व_संचारी पोलिश लोकसंगीतावर दृक-श्राव्य सादरीकरण करणार आहेत. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा.
स्थळ : ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ
वेळ : बुधवार ५ सप्टेंबर, दु. ४-६
कार्यक्रम सर्वांना खुला. प्रवेशमूल्य नाही.

अबापट Tue, 04/09/2018 - 12:21

In reply to by चिंतातुर जंतू

वर्किंग डे ला चार वाजता ठेवलाय कार्यक्रम . ईच्छा आहे , पण कसे जमणार ?
पुन्हा रयतेच्या वेळात ( पक्षी : संध्याकाळी /रात्री किंवा रविवारी ) कार्यक्रम असेल तर कृपया सांगणार काय ?

ऐसीअक्षरे Sun, 07/10/2018 - 12:35

मराठी विकिपीडिया समुदायाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत महिला स्वास्थ्य या विषयावर संपादन अभियान राबविले जात आहे. हे अभियान एका राष्ट्रीय अभियानाचा भाग आहे. सदर अभियानात भारतातील अनेक भाषा समुदाय त्या-त्या विकिपीडियामध्ये एकाच वेळी सहभागी होत आहेत. यानिमित्ताने विविध भारतीय भाषा आणि मराठी विकीवर महिला संपादकांची संख्या वाढावी असाही हेतू आहे. या अभियानाच्या कालावधीत महिला स्वास्थ्यविषयक लेखांची भर घालणे, लेख सुधारणे, योग्य ते वर्ग/उपवर्ग तयार करणे, चित्रांचा समावेश करणे, विकीडेटा कलमे इ. कामे करण्याचे योजले आहे. लेख लिहिण्यासाठी आवश्यक अशा संदर्भ संसाधनांची तपशीलात यादीसुद्धा केली जाईल, जेणेकरून विश्वसनीय, उचित व योग्य संदर्भ संपादकांना सहज उपलब्ध होऊ शकतील.

या उपक्रमांतर्गत मराठी विकीपीडियातर्फे महिला स्वास्थ्य अभियान संपादन कार्यशाळा मंगळवार दिनांक ९आॅक्टोबर रोजी ज्ञान प्रबोधिनी पुणे येथे संत्रिका विभागाच्या कक्षात दुपारी १२ ते ४ या वेळात आयोजित केलेली आहे. कार्यशाळा निःशुल्क आहे. सोबत येताना आपला लॅपटाॅप आणि इंटरनेटचे संसाधन आणावे. इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तथापि आपण आपली संसाधने सोबत आणल्यास उपयुक्त ठरेल. नावनोंदणी आर्या जोशी 9422059795 यांच्याकडे करावी.

कासव Sun, 07/10/2018 - 13:13

माहितीबद्दल धन्यवाद. जमलं तर नक्की सहभाग.

पुढे जाऊन संपूर्ण विकिपीडियासाठी पण अशी टप्प्याटप्याने राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून कृती आवश्यक आहे.

असंच अभियान ‛मराठी विश्वकोश’ अद्ययावत करण्यासंदर्भात आवर्जून असावं, असं आवर्जून वाटतं.

चिमणराव Sun, 07/10/2018 - 16:58

महिला स्वास्थ्याबाबत कोणते प्रश्न विचारले जातात ते इथे एकेक धागास्वरुपात काढावे. त्यातले प्रतिसाद संदर्भ म्हणून घेऊन विकिमध्ये लेख लिहिता येतात.

चिंतातुर जंतू Wed, 10/10/2018 - 15:24

French Animation Film Festival
काही फ्रेंच अॅनिमेशन फिल्म्स पुण्यात पाहता येतील -
शुक्र. १२ सं. ६ पासून आणि शनि. १३ ऑक्टोबर दु. २ पासून
स्थळ : नॅशनल फिल्म आर्काइव्ह
प्रवेशमूल्य नाही. पाच वर्षं आणि अधिक वयाच्या व्यक्तींना प्रवेश.
अधिक माहिती इथे

चिमणराव Thu, 15/11/2018 - 19:19

कट्यासंबंधी काही लेखन दिवाळी अंकाच्या एका लेखात चुकून सांडलं/लवंडलं ते इथे कॅापी पेस्ट करतोय.

//

- आचरटबाबा on मंगळवार, 13/11/2018 - 08:37.
अबापट, एका कट्ट्याला चौदाव्याला बोलवूया.
--------
--अबापट on मंगळवार, 13/11/2018 - 09:55.
नक्की बोलवूया की. येईल का तो ?

-------
जरुर!
- १४टॅन on मंगळवार, 13/11/2018 - 18:27.
जरुर!
- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.
---------
--पुंबा on बुधवार, 14/11/2018 - 14:46.
कधी असणारे कट्टा?
----
ठरवा
-- नंदन on बुधवार, 14/11/2018 - 16:03.
लवकर - शक्य झाल्यास, मीही हजेरी लावेन.
---
--आचरटबाबा on मंगळवार, 13/11/2018 - 17:50.
आता काय नाही म्हणणार नाही. बुलेट घेऊनच येईल.
///

अनुप ढेरे Mon, 19/11/2018 - 14:25

In reply to by नंदन

पुण्यातील पॅराडाईज कर्वे रस्त्यावर असल्याने आणि तिथे धूम्रपानाची परवानगी असल्याने वणव्याचा नसला तरी वहाने आणि सिगारेटी यांचा धूर मुबलक प्रमाणात तिथे पिता येईल.

अबापट Wed, 21/11/2018 - 05:08

In reply to by पुंबा

काय प्रश्न हा ? पुम्बा , कुठलाही कट्टा खाजगी नसतो. येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच असते. या तुम्ही.

तिरशिंगराव Mon, 19/11/2018 - 17:25

मी ही याचि डोळा, नंदनसेठ आणि टॅनोबांना पहाण्यास उत्सुक आहे.

१४टॅन Mon, 19/11/2018 - 18:48

In reply to by अबापट

अबापट, जमत नाही म्हणून येत नाही. आत्ताही डिसेम्बर-जानेवारीत येता येणं अशक्य आहे. जानेवारी अंत-फेब्रुवारीत येऊ शकेन. मनोबांशी कध्ध्धीच बोलणं झालेलं आहे. 'मराठी मालिकांची लेखनकृती' जेव्हा लिहीलं तेव्हाच. कलोअ.

१४टॅन Mon, 19/11/2018 - 18:51

In reply to by तिरशिंगराव

भेटू भेटू. मला तर सगळ्यांनाच पाह्यचंय एकदा. अबापटांशी मैत्रीच करायचीहे. मुख्य आकर्षण अनुराव होत्या. गेले ते दिवस... :'(

सुनील Mon, 19/11/2018 - 17:50

एखादा कट्टा मुंबई-ठाण्यातही होऊन जाऊद्या म्हणजे आम्हालाही दर्शनाचा लाभ मिळेल!