Skip to main content

कोडे - चवळीचे दाणे

(१) चवळीच्या दाण्यांचे १० पेले आहेत.
(२) प्रत्येक पेल्यात १०० चवळीचे दाणे आहेत.
(३) १० पैकी ९ पेल्यात, प्रत्येक दाणा १ ग्रॅमचा आहे.
(४) १० वा जो पेला आहे, त्यातील प्रत्येक दाणा ०.९ ग्रॅमचा आहे.
(५) तो विशिष्ठ् पेला कोणता ते माहीत नाही. डोळ्यांना कळू शकत नाही.
(६) एक तराजू आहे.
(७) त्या तराजूत फक्त एकदाच वजन करता येते. परत नाही. कारण एकदा वजन केल्यानंतर तो तराजू अदृष्य होतो.

कोडे - तो तराजू वापरुन, तो पेला कसा ओळखाल?
_________________
उत्तर मलाही माहीत नाही. मी प्रयत्नच करते आहे :)

राजेश घासकडवी Tue, 09/10/2018 - 22:42

वजन ग्रॆममध्ये करता येतं का? तसं असल्यास खूपच सोपं आहे. पेल्यांना क्रमांक द्यायचे आणि तितके दाणे प्रत्येक पेल्यातून घ्यायचे. सर्व दाणे 1 ग्रॆमचे असतील तर वजन 45 यायला हवं. 44.6 भरलं तर चौथ्या पेल्यातले चार दाणे प्रत्येकी 0.1 ग्रॆमने कमी आहे. 44.5 भरलं तर पेला क्र. 5. इत्यादी.

'न'वी बाजू Thu, 25/10/2018 - 07:27

In reply to by राजेश घासकडवी

सर्व दाणे 1 ग्रॆमचे असतील तर वजन 45 यायला हवं.

चूक. १ + २ + ... + ९ + १० = ५५ ग्रॅम यायला हवे. (४५ नव्हे.) पण बाकी आपली पद्धत चालायला हवी.

अधिक विचाराअंती, १०पैकी ९च पेल्यांतून आपण म्हणता त्या पद्धतीने दाणे घेतले, तर (दाणे प्रत्येकी १ ग्रॅमचे असल्यास) वजन १ + २ + ... + ८ + ९ = ४५ ग्रॅम भरेल, आणि तरीही काम चालून जाईल. बोले तो, वजन एक्झॅक्ट ४५ ग्रॅम भरले, तर १०वा पेला इज़ द कल्प्रिट. नाही भरले, तर तुम्ही आधी वर्णिलेला फंडा पहिल्या ९ पेल्यांतून घेतलेल्या दाण्यांना लागू व्हावा.

माझे लॉजिक कोठे चुकत आहे काय?

'न'वी बाजू Thu, 25/10/2018 - 15:36

In reply to by राजेश घासकडवी

(१) पेल्यांना ० ते ९ नंबर देणे (आणि मग नंबराप्रमाणे दाणे उचलणे), आणि (२) एका पेल्यातून काहीही न घेणे आणि उरलेल्या पेल्यांतून अनुक्रमे १ ते ९ दाणे घेणे (आणि पेल्यांना नंबर न देता 'अडम', 'तडम', 'तडतड', 'बाजा' इ.इ. किंवा अशाच कोठल्याशा स्कीमनुसार काहीबाही दहा डिस्टिंक्ट नावे देणे - कोठल्या पेल्यातून किती दाणे काढले हे लक्षात राहिल्याशी मतलब!), या दोन गोष्टी ईक्विव्हॅलंट आहेत.

(उलटपक्षी, पेल्यांना १ ते १० नंबर दिले, आणि मग नंबराप्रमाणे दाणे उचलले - किंवा नंबराप्रमाणे (न + क) जेथे -१ <= क <= ९०, किंवा (क * न) जेथे ० < क <= १०, इतके दाणे उचलले - तरी काम चालू शकेल. येथे न हा अर्थात पेल्याचा नंबर यानी कि १ ते १० यांमधील क्रमिक पूर्णांक आहे, आणि क हा दिल्याप्रमाणे अचल पूर्णांक आहे.)

सामो Tue, 09/10/2018 - 22:48

अरेच्या हेच उत्तर असेल की. त्या कोड्यात म्हटले आहे की स्केल आहे. आता तो वजनकाटा असू शकतो हे माझ्या लक्षात आले नाही. मला वाटले की तो तराजू आहे. :(
____________
त्या लेखकाने हिंटमध्ये असेच म्हटलेले आहे की - वेगळ्या वेगळ्या संख्येचे दाणे वेगळ्या वेगळ्या पेल्यातून घ्या.
__________
राघांचे अभिनंदन. तेही एका मिनिटात उत्तर आले. :) कौतुकास्पद आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 25/10/2018 - 07:49

तराजू आणि वजनाच्या काट्याला इंग्लिशमध्ये एकच शब्दप्रयोग आहे का, weighing scales?

सामो Thu, 25/10/2018 - 12:02

नबा तुम्ही जे ऑप्टिमाझेशन केलेलं आहे, ते राघांनी आधीच केलेले आहे.
राघा ०-१-२-३-४-५-६-७-८-९ असे दाणे घेत आहेत. ० दाणे इज ॲज गुड ॲज तुम्ही सोडुन दिलेला एक पेला.

पुंबा Fri, 26/10/2018 - 11:21

मस्त कोडं..
व्हॉट्सॅपवर स्टेटस टाकून सगळीकडं फिरवलं, ३ जणांनी रिप्लाय दिला. त्यातल्या एकाचं बरोबर आलं.