Skip to main content

तंजावरी ऊर्फ दक्षिणी मराठी

तंजावरी मराठी दक्षिणी मराठी बोली म्हणून यूट्यूबवर उपलब्ध आहे. फारच रोचक प्रकार आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

'न'वी बाजू Sun, 03/03/2019 - 21:52

फारच रोचक प्रकार आहे.

(रोचक खरी, परंतु) शिळी बातमी. यावर येथे (आणि बहुधा इतरत्रसुद्धा) अगोदर चर्चा झालेली आहेसे वाटते. (चूभूद्याघ्या.)

अर्थात, चर्वितचर्वणास प्रत्यवाय नाहीच. किंबहुना, चर्वितचर्वण करायचे नाही म्हटले, तर 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्'-न्यायाने, कोणीही कधीही काहीही लिहावयास नको. त्यामुळे, चालू द्या. (फक्त, हे बहुधा आधीही झालेले आहे, या देजा वू भावनेचा ज़िक्र करावासा वाटला, इतकेच.)

उज्ज्वला Sun, 03/03/2019 - 22:25

In reply to by 'न'वी बाजू

होय. २०१६ साल पाहिले तेव्हा बातमी शिळी याची जाणीव होती. मला आज प्राप्त झाली आणि म्हणूनच "उपलब्ध आहे" असा शब्दप्रयोग केला.
मी ऐसीवर येऊन फक्त दहा महिने झालेत. त्या कालावधीत तरी नव्याने वा उत्खनन मार्गे ही माहिती पाहण्यात आली नव्हती :)

सामो Thu, 07/03/2019 - 20:23

In reply to by धर्मराजमुटके

वाचला तो धागा. ती भाषा कसली गोड आहे कानाला. अर्थात बंगाली इतकी नाही गोड. पण प्रचलित मराठी सारखी 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' सारखी नाही.
माझी तेलुगु मैत्रिण मला म्हणायची - ठ, भ, ढ वगैरे जोरकंस उच्चार फार वाटतात तुमच्या भाषेत.

शशिकांत ओक Mon, 25/03/2019 - 15:23

त्याच त्या तंजाउरी बोलीत गप्पा मारत असत. एक घडलेला किस्सा मी त्यांना तंजाउरीतून सादर करायला दिला होता. काही कारणानी ते तसेच राहिले. त्यात हैयो हैयैयो यांनी भर घालून लेखन केले होते.

पूमबुहारचे भीषण समुद्रस्नान...

असे त्याचे नाव होेते. वेगळा धागा काढून तो नवीन वाचकांसाठी किस्सा सादर करेन.