Skip to main content

पाठांतरासाठी तुम्ही कोणत्या क्लुप्त्या वापरत होतात?

1 minute

मराठी प्राथमिक शाळेत दुसरी तिसरी ला असताना आमच्या गुरुजींनी इंद्रधनुष्याचे सात रंग शिकवले होते. त्या रंगांची नावं लक्षात राहण्यासाठी ' तानापिहीनिपाजा' किंवा ' जातानाहीपाणीपाजा' असं लघुरूप सांगितले होते. तानापिहीनिपाजा सहज लक्षात राहू शकते. तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. हे मेमरीत साठवायला कीवर्ड सोपा सुटसुटीत उपयोगी पडतात.
तसेच कॉलेजमध्ये क्रेब्ज सायकल लक्षात ठेवण्यासाठी एका मित्राने सांगितलेला कीवर्ड अर्थात की वाक्यच होते ते.
ते असे होते " पुनम आली चालत चालत इतक्यात ओमपुरीने कुत्र्याची साखळी सोडली सटकन फटकन मुस्कटात मारली."
पायरुव्हिक अॅसिड पासून सूरु होत वाक्यातील प्रत्येक शब्दाचे पहिलं अक्षर हे त्या त्या स्टेपचं पहिलं अक्षर होते. आता क्रेब्ज सायकल आठवत नाही पण ते वाक्य लक्षात आहे.
असे अनेक मजेशीर लघुरुपं होती पण आठवत नाहीत.
तर मंडळी तुमच्या शालेय जीवनात होती का अशी लघुरुपं? असतील तर शेअर करा. धन्यवाद!

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

देवदत्त Fri, 06/03/2020 - 22:29

सखाराम = सकाळचे खारे, रात्रीचे मतलई.

कंचेभागुबेव ऊर्फ BODMAS होतंच.

वृत्तांसाठी "भुजंगप्रयाती य चारीहि येती" वगैरे (गण सांगणारी) उदाहरणं होती. गण समजण्यासाठी यमाताराजभानसलगा हा शब्द होता.

My very educated mother just showed us nine planets हे वाक्य नऊ ग्रह क्रमाने लक्षात ठेवायला वापरायचो. (प्लूटो ग्रह होता तेव्हा)

हेन्री फेयाॅलची principles of management क्रमाने लक्षात ठेवायला "डॅड यूयू एसआरसी एसओई एसआयई" असं घोकायचो.

Planet Sat, 07/03/2020 - 03:45

BBROY Great britains very good wife... as Engineering madhe resistors color code lakshat thevayala shikavayche.
aani Tan ki shakti man ki shakti bournvita... sine theta upon cos theta equals tan theta ashi poems hi banwali hoti.
Papachaperu - pakit pass chavi pen rumal ghetala ka? as check karanyasathi Papa cha peru kinva Peru cha papa vaparal jai.

Lefty loosy, righty tighty -he screw tight / loose karanyasathi upyogi.

baki Sakharam, tanapihinipaja aani Planets kase lakshat thevaych he majhahi same.

गोल्डन ब्राऊन Sat, 07/03/2020 - 12:35

In reply to by Planet

छान

अस्वल Sat, 07/03/2020 - 05:43

हहेलिबेबकनोफने (आरोह)
नामग अल सी पस कल अर (अवरोह)
ककास्कटी वक्रमन्फे (आरोह) -कोनिकुझ्नगागे अस से बर कर (अवरोह)
========
(इथवर जमायचं, पुढलं निव्वळ ष्टाईल मारायला)
ऱ्हब्स्र यझ्र नब मो टक रू ऱ्हप्ड अग क्ड इन सन सब टे इक्से
-------------

'न'वी बाजू Sat, 07/03/2020 - 06:47

In reply to by अस्वल

...झक मारायला पीरियॉडिक टेबल पाठ करायची गरज काय होती?

(या रेटने, कॉलेजात जाईपर्यंत मुंबईची टेलिफोन डिरेक्टरी पाठ करीत होतात काय?)

(लॉग टेबल नाही ना पाठ केलेत?)

अमुक Sat, 07/03/2020 - 10:37

In reply to by अस्वल

मीदेखील गमतीखातर पहिली ३६ मूलद्रव्ये पाठ केली होती. अजूनही स्वच्छपणे आठवतात. फरक इतकाच, की मी इंग्रजी नावांची आद्याक्षरं घोटली होती.

एच् एची
एलाय् बीई बी सी एन ओ एफ् एनी
न म अल् सी प स क्ल अर्
क कॅ स्क टी व्ही कर् मन् फे को नि कु झन् गॅ गे अस् से बर् कर्

तसंच 'ही नी अर् कर् क्से रन' ही निष्क्रीय वायूंची नावं.

पुढे बारावीला 'अगरवाल' शिकवणीवर्गात एका शिक्षकाने लॅन्थनाइड, ॲक्टिनाइडसाठी काहीतरी वाक्य बनवलं होतं. मी दुर्लक्ष्य केलं होतं.

अस्वल Sat, 07/03/2020 - 22:52

In reply to by अमुक

अरे काय!
मी हे शाळेत शिकलो होतो. बहुधा एका मित्राने सांगितलं असावं.
===
अगरवाल नामक वेताळ आमच्याही पाठीवर बसला होता, पण तिथे असं सांगणारे कुणी नव्हते तेव्हा.

गवि Sat, 07/03/2020 - 07:35

All Altruists Gladly Make Gum In Gallon Tanks.

अर्थात यात स्वतःची काही निर्मिती नाही. रा.रा. फिशर यांनी बनवून दिलेलं फक्त वापरलं.

मेडिकल विद्यार्थी अश्लील शॉर्टफॉर्म्स मराठीत करत असल्याचं ऐकलं आहे. डोक्यातील नर्व्हज क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी वगैरे.

मारवा Tue, 10/03/2020 - 11:57

In reply to by गवि

आपले ऐसी अक्षरेवरील लेखक श्री जयदीप चिकलपट्टी यांच्या साइटवर एक वाचण्यात आला.
म्हणजे वैली हा मुळात शॉर्ट फॉर्म कसा झाला असा एका इंग्रजी जोकच भन्नाट भारतीयकरण भाषांतर केलेलं आहे.
त्यात दिनुच लग्न होत. त्याल त्याच्या बायकोचा " वैशाली" चा फार नाद लागतो तो त्याच्या शिस्नावर तिचं नाव गोंदवुन घेतो मग एकदा तो रस्त्याच्या कडेला शु करत असतांना त्याच्या शेजारी एक दुसरा सु करत असतो त्याच्याही शिस्नावर तो " वैली" गोंदवलेल बघतो त्यावर दिनु विचारतो काय हो तुमच्याही बायकोच नाव वैशाली आहे का ?
त्यावर तो म्हणतो नाही तिथे लिहिलय की..............................................
अजुन एक boss brother of sexy sister
असो अजुन अवांतर नको

अरविंद कोल्हटकर Sat, 07/03/2020 - 10:05

६०-७० च्या जमान्यात मुंबईत राहणारा चाकरमानी कामाला निघाला की बायको विचारी 'अहो, पेरूचा पापा घेतलात का?'

म्हणजे 'पेन रुमाल चावी पाकिट पास' घेतलेत का?

anant_yaatree Sat, 07/03/2020 - 12:35

In reply to by अरविंद कोल्हटकर

वि.आ. बुवांचं आहे.
राहुकाळाच्या वेळा व वारांचे क्रम लक्षात ठेवण्यासाठी हे वाक्य आहे
Mother saw father wearing the turban suddenly.

M= Monday 7-30 to 9-00 a.m.
Sa = Sat 9 to 10.30

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/03/2020 - 04:20

ज्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आता घोकंपट्टी करावी लागते, त्या निरुपयोगी आहेत म्हणून लक्षात ठेवत नाही.

अरविंद कोल्हटकर Tue, 10/03/2020 - 08:45

पाठांतरासाठी तुम्ही कोणत्या क्लुप्त्या वापरत होतात?>

क्लुप्ति नव्हे, क्लॢप्ति. मला वाटते संस्कृतात 'क्लॢप्ति'क एकुलता एक शब्द आहे ज्यामध्ये 'ऌ हा स्वर वापरला जातो.

गोल्डन ब्राऊन Tue, 10/03/2020 - 10:23

मी ही साशंकच होतो, बोलण्यात असला तरी लिखाणात कमीच आढळतो हा शब्द. क्लृ लिहावे की क्लु लिहावे या संभ्रमात पडलो होतो. धन्यवाद.