Skip to main content

अर्नब गोस्वामीचे अटकनाट्य..

अर्नब गोस्वामी हा आक्रस्ताळेपणा करतो त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात हे जगाला ठाऊकच आहे. मात्र त्याने उचलून धरलेले मुद्दे आणि प्रश्न सोयीस्करपणे दुर्लक्षित करता येऊ शकत नाहीत. जुन्या केसमध्ये अर्नबला अटक होते याचा अर्थ राजकीय हस्तक्षेपामुळे हे घडतेय. नक्कीच सुडबुद्धीने ही कारवाई केली गेली. यात सरकारचे समर्थन करणारे बरेचजण आहेत. मुद्दा हा आहे की, अशीच कारवाई जेव्हा भाजपप्रणीत सरकारने केली होती जुन्या केसेस उकरुन काढून तेव्हा हेच सरकारचे समर्थन करणारे लोक भाजपाला नावे ठेवत होती. भाजपा सुडाचे राजकारण करत आहे असे बोलत होते. म्हणजे पोलिसांना हाताशी धरून जर का एखाद्या सरकारने कारवाई केली तर समर्थन किंवा विरोध प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार करतात. म्हणजे व्यवस्थेचा दुरूपयोग होतो आणि करता येतो हि गोष्ट लक्षात ठेवत नाहीत. आज सत्तेवर असणारे जर सत्तेचा आणि व्यवस्थेचा दुरुपयोग करत असतील तर भविष्यात असाच दुरुपयोग दुसरा कोणीही करु शकतो हे लक्षात घ्यायची गरज आहे. अर्नबवर कारवाई करून शिवसेनेने अर्नबला मोठा केला आहे. एखाद्याला त्याच्या लायकीनुसार जागा दाखवायची असेल दुर्लक्षित करणे किंवा फाट्यावर मारणे एवढा सोपा मार्ग असताना शिवसेनेने कारवाईचे समर्थन करुन चूक केली आहे. समोरच्याला अनुल्लेखाने, दुर्लक्षित करुन किंवा फाट्यावर मारुन कशी ज्याची त्याची जागा दाखवावी हे मोदी शहांकडून शिकायला पाहिजे. शिवसेना जेवढ्या चुका करेल तेवढा भाजपा महाराष्ट्रात प्रबळ होईल. एखाद्या मेडिया हाऊसबाबत असे होत असेल तर इतर कोणत्याही आस्थापनाच्या बाबतीत होऊ शकते. मुंबईत असे खुप मोठे दिग्गज लोक आहेत ज्यांना अशा जुन्या केसेसमध्ये अडकवून हवे ते साध्य करता येईल. याचा उपयोग भाजपा नक्कीच करतल. कारण अशी बरीच मंडळी शिवसेनेवर खार खाऊन आहेत मुंबईत. जे भाजपाला मुंबईत शिवसेना नमोहरम करायला मदत करत आहेत आणि करतीलच. याचा फटका शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नक्की बसणार. आज मुंबईत जी शिवसेनेची ताकद आहे ती अशा घटनांमुळे क्षीण होणार आणि त्याचा फायदा भाजपा घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेला प्रश्न विचारले, घराणेशाहीवरुन टिका केली की मराठीप्रेमाचे तुणतुणे वाजवून आता काहीही उपयोग नाही. १९६० साली जी मराठी माणसांची टक्केवारी मुंबईत होती ती आज आहे का? का नाही याचा विचार करण्याची गरज आहे. मराठी माणसासाठी लढा देणारी संघटना म्हणून शिवसेनेचा उदोउदो खूप झाला. शिवसेनेची कैक वर्षांची महापालिकेत सत्ता असूनही प्रत्यक्षात मुंबईतील समस्या सुटल्या का? भाजपाचे खूप मोठे राजकारण आहे हे मुंबईतील महापालिकेच्या निवडणूकीसाठी. अमित शहा सारखे महाशय महाराष्ट्रातील सत्ता हातातून जात असताना शांत का बरे बसले असतील? भाजपाने संपूर्ण भारतात गेल्या सहा वर्षांत पाळेमुळे घट्ट रोवून ठेवली आहेत. आता प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण करण्यासाठी डावपेच आखत आहेत. वेळ जर पडली तर राष्ट्रवादीला हाताशी घेऊन सत्ता काबीज करतील. राष्ट्रवादीला सत्ता महत्वाची. कारण राष्ट्रवादीचे राजकारण हे बरोबरच्या सहयोगी पक्षांचे कसे खच्चीकरण करता येईल व स्वतःचा बेस वाढवता येईल यावर आधारलेले आहे. शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेऊ सगळे डाव खेळवले जात आहेत. अर्नब गोस्वामी अटक प्रकरण हा त्यातीलच एक प्रकार. कारण गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे आहे. शिवसेनेच्या चाणक्यांनी दुसऱ्या बाजूने विचार करून आपला वापर केला तर जात नाही ना याचा विचार करावा. केवळ मुख्यमंत्री आमचाच, महापौर आमचाच वगैरे घोषणाबाजी करून पोरखेळ करण्याचे दिवस गेले. शाखाप्रमुख आमचाच म्हणत बसायची वेळ येऊ नये म्हणजे झाले.
©भूषण वर्धेकर

अबापट Thu, 05/11/2020 - 11:59

बाकी चालू देत, पण अर्णब ने उचलून धरलेले आणि योग्य असलेले आणि दुर्लक्षिले गेलेले मुद्दे कुठले या विषयी मार्गदर्शन करावे कृपया.

नितिन थत्ते Thu, 05/11/2020 - 12:08

In reply to by अबापट

पालघरला दोन साधूंना मारण्याची ऑर्डर इटालियन बार गर्ल ने दिली होती

सुशांतसिंग राजपूतच्या सेक्रेटरीचे नाव दिशा होते आणि आदित्य ठाकरेही कुणा दिशाबरोबर फिरत होते म्हणजे आदित्य ठाकरेने सुशांतचा खून केला

हे अर्णब ने उचलून धरलेले आणि योग्य असलेले आणि दुर्लक्षिले गेलेले मुद्दे तुम्हाला माहिती नाहीत?

स्वयंभू Thu, 05/11/2020 - 14:52

In reply to by नितिन थत्ते

अर्णब भाजपाची तळी उचलून धरतो म्हणून तो पत्रकार म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही हा तर्क मला पटत नाही.

स्वयंभू Thu, 05/11/2020 - 14:50

In reply to by अबापट

आजपर्यंत कोणतेच मुद्दे अर्णबने उचलून धरले नाहीत का? कॉंग्रेसच्या काळातही तो आकांडतांडव करीतच होता. मागे एकदा लालूप्रसाद यादवांच्या घोटाळ्याबद्दल त्यानेच ब्रेकींग न्यूज वगैरे दिली होती नवीन स्वतःच्या न्यूज चँनेलवर. गेल्या काही महिन्यात सुशांतसिंग राजपूत, दिशा सलियान वगैरे मुद्दे सेलेबल ब्रेकींग न्यूज आयटम्स होते. त्याचा तो वापर करत होता. देशात भाजपा सरकारने पण कित्येकदा पत्रकारांवर एफ.आय.आर, केसेस वगैरे दाखल केल्यात. तेव्हा सरकारची चूक असते. आता महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली तर कायदेशीर कारवाई. हा कोणता डबल ढोलकीचा फुकाचा विरोध?

राहिला प्रश्न अर्णबबद्दल.
अर्णब ने गुन्हा केला असेल तर शिक्षा झालीच पाहिजे. आहे तो गुन्हेगार. आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या मयत अन्वयने चिठ्ठीत त्याचा उल्लेख केला. मी कुठे म्हणालो अर्णब निर्दोष आहे.
मी फक्त लिहिलेय की ही अशा पद्धतीची कारवाई भाजपाने पण केली आहे जुनी मढी उकरुन काढून तेव्हा भाजपाला दोष देत होते लोक. आता शिवसेनेच्या लोकांनी असे केले तर समर्थन. युपीत पत्रकारांवर केसेस टाकल्या की माध्यमस्वातंत्र्याची गळचेपी आणि महाराष्ट्रात हेच झाले की कायदा सुव्यवस्थेचा डंका..
सूडबुद्धीने डाव खेळणारे भाजपाई खूप सराईत आहे सध्यातरी. जुन्या गुन्ह्यांच्या केसेस काढून जर कोणावरही कारवाई होत असेल तर तशीच कारवाई भविष्यातही होईल. फक्त सरकारे बदललेली असतील. पोलीसव्यवस्था ही राजकारण्यांनी पाहिजे तशी वापरली आहे आजपर्यंत. परत अशीच जुनी केस एखाद्या दुसऱ्या सरकारने उकरून काढून जर कोणाला अटक केली तर दोष कोणाला देणार? सरकार कोणाचे आहे ते पाहून ठरवणार? यापुर्वीही मुंबईतील गुन्हेगारी आणि शिवसेना यावर कितीतरी केसेस दाबल्या गेल्या आहेत. हे अवघड शिवसेनेला जाणार आहे.

मुळात पत्रकार हा निष्पक्ष वगैरे काहीही नसतो.
तो हल्ली कॉर्पोरेट पगारी नोकर असतो. सगळं कसं स्क्रिप्टेड प्लॉटवर कार्यक्रम करतो किंवा बातम्या वगैरे देत असतो
त्यामुळे आमुक पत्रकार ह्या पक्षाचे धार्जिणे तमुक पत्रकार त्या पक्षाचे धार्जिणे वगैरे नावे ठेऊन काहीही अर्थ नाही. सर्वपक्षीय मासळी बाजार झालाय व्यवस्थेचा.

आता महाराष्ट्रात म्हणाल तळ आघाडीसरकारात तीन पक्ष आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेतेमंडळी नामानिराळे राहिलेत. शिवसेना टार्गेट केली जातेय
महाराष्ट्रात मधल्यामधे कॉंग्रेसचे हाल होताहेत
रस्त्यावरच्या सिग्नलच्या पिवळ्या दिव्याप्रमाणे कॉंग्रेस आहे. कोणीही लक्ष देत नाही. :-)
फोकसमध्ये फक्त लाल दिवा हिरवा दिवा. :-)

अबापट Thu, 05/11/2020 - 15:13

In reply to by स्वयंभू

अहो, प्रश्न काय विचारलाय , उत्तर काय देताय ?
सुशांत राजपूत आणि दिशा सालीयन हे मुद्दे म्हणत होतात होय ?
काय झालं पुढं त्याचं ?
सरकारला काय मध्ये आणता यांच्यात, कुठल्याही भाजप किंवा काँग्रेस.
जमल्यास स्पेसिफिक उत्तर द्या.
नसल्यास राहू द्या.

स्वयंभू Thu, 05/11/2020 - 15:20

In reply to by अबापट

मुळात अर्णबने जे खपत होते ते विकायचा प्रयत्न केला. तसंही अर्णबचे नातेवाईक आहेत भाजपाशी संबधित.

तुम्हाला असे म्हणायचे का आजपर्यंत कोणतेच प्रश्न अर्णबने उचलून धरले नाहीत का?

माझा मुद्दा हाच आहे की अशी सुडबुद्धीने केलेली कारवाई केल्याने महाराष्ट्रात नवा पायंडा पडतोय.

Rajesh188 Thu, 05/11/2020 - 23:38

In reply to by स्वयंभू

अर्णव हा व्हाइट कॉलर गुंड आहे .दोन धर्मात वीतुष्ट निर्माण करण्याचे काम तो नेहमीच करत आहे.
BJP ल अजुन हिंदू मुस्लिम ह्या मध्ये वैर निर्माण करून सत्ता मिळवू असे वाटत आहे.
यूपी,बिहार सोडले तर bjp च्या निती ल बाकी राज्यातील सुजाण नागरिक बळी आता तरी पडणार नाहीत.
पाकिस्तान, bangla देश,मुस्लिम ह्याच भावनिक प्रश्नात लोकांना अडकवून त्यांची साधन संपत्ती,त्यांचे रोजगार,हिरावून घेण्याचा एकमेव हेतू bjp च आहे.
गुंड लोकांचे एन्काऊंटर करणे जर योग्य असेल तर white कॉलर गुंडा ला घरातून उचलून अटक करणे हे योग्य च समजले पाहिजे.

लंपन Thu, 05/11/2020 - 17:02

In reply to by अबापट

अर्णबने काही मुद्दे उचलून धरले असतीलही.
पण जे काही घाणेरडे वतातवरण तयार केले आणि जी काही sheer quantity ऑफ कचरापट्टी चालवली टीव्हीवर, त्यात हे मुद्दे गायबच झाले.

लंपन Thu, 05/11/2020 - 16:59

राजकीय हस्तक्षेप आहे हे सूर्यप्रकाशाइतके जरी स्वछ असले तरी त्याबद्दल बोलणे अयोग्य आहे. हे बोलणे त्या मृत इंटेरियर डिझाइनर व्यक्तीच्या स्मृतीस अपमानकारक नाही का ? फारतर फार इतका वेळ का लागला असा प्रश्न केला जाऊ शकतो, पण त्याचा रोख भाजपवर पण आहेच.

हि अटक अयोग्य कारणामुळे झालीये, किंवा कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे असे काहीही माझ्या ऐकण्यात तरी आले नाहीये. तेव्हा राजकीय हस्तक्षेप हा मुद्दाच लुळा पडतो आहे.

बाकी let the case run its course. अर्णब निर्दोष असेल तर त्याला काही होऊ नये ,हे वे सां न ल. त्याला जो काही त्रास आता होत आहे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त त्रास त्याने अनेक जणांना सुशांत सिंह प्रकरणात दिला आहे. ज्या प्रकारे शेरलॉक होम्सगिरी त्याने एका आत्महत्येच्या पत्रकारितेत दाखवली, जर त्याच पातळीवर त्याला वागणूक दिली तर काय होईल ? त्याचे तर थेट नाव आहे पत्रात.

स्वयंभू Thu, 05/11/2020 - 17:45

In reply to by लंपन

सरकार सोयीस्करपणे जुन्या केसेस जर उकरून काढत असेल आणि सरकारचे समर्थन होत असेल तर अशा बऱ्यापैकी दाबल्या गेलेल्या किंवा विस्मृतीत गेलेल्या केसेसमध्ये पण पोलीस अशी धडाडीची कारवाई करेल काय??

माझा रोख लोकांच्या दुटप्पीपणावर आहे. जेव्हा इतर वेळी अशी कारवाई होते तेव्हा सरकारला दोष देतात आता मात्र सरकारचे समर्थन.

अशा घटनांचा व्हॉटअबाउटिझम साठी पुरेपूर वापर होतो. अशा घटनांंत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींंवर नको नको त्या चर्चा होताना दिसतात. त्यात कुटुंबाला भोगावे लागते. राजकीय हेतूने ज्या कारवाया होतात त्यात पुर्णतः न्याय मिळतोच असे नाही.
आता फक्त नको असलेला पत्रकाराला कसा धडा शिकवला आणि कशी जिरवली असा समर्थकांचा दावा आहे.

तसही भारतात सत्ता आली जनतेची सेवा करणे वगैरे अंधश्रद्धा असल्याने सगळेच राजकीय पक्ष पोलीस आणि कायद्याचा वापर हवा तसा करत असतात.

अशा गदारोळात महत्त्वाच्या घटनांकडे दुर्लक्षच होते.

त्या दोघांना अटक झाली आहेच. अर्थातच त्यांच्याबद्दल बातमी नाही कारण ते अर्णब इतके प्रसिद्ध नाहीत.
दुटप्पीपणा वैगेरे सगळं ठीक आहे, तो असतोच. पण discussion muddle up करण्याखेरीच दुटप्पीपणाने काही होत नसते. हे कसे तर तुम्हाला पण इथे कोणीतरी विचारू शकते, caa प्रोटेस्टच्या वेळेस योगेंद्र यादव आणि गुहांना अटक का केली,आनंद तेलतुंबडे इतक्या दिवस जेलमध्ये आहेत (का होते ?) त्यांचे काय, सेडिशन आणि लायबल सारखे कायदे लहानसहान पत्रकार हौसेस वर का वापरले, (द क्विंट वर कित्येक करोड रुपयांचा लायबल सूट आहे.) तेव्हा तुम्ही धागे का नाही काढले ?तर काय होईल ? काहीही नाही, फारतर तुम्ही म्हणाल कि या सगळ्या गोष्टी मला तेव्हापण आवडल्या नव्हत्या. तुमच्या या विधानाने तुमची एनर्जी वाया तेव्हडी जाईल, चर्चेत काय सकारात्मक बदल झाला का ? तर नाही. त्यामुळे व्हॉटअबौट्री बद्दल बोलण्यात रस नाही. या अटकेपुरतेच बोलावे.अटक व्हावी कि नाही ही चर्चा आहे न ? मग मी किंवा इतर जण दुटप्पी असलो तरी आमच्या बोलण्याच्या व्हॅलीडीटी वर फारसा फरक पडत नाही. तुमच्याही. दुटप्पी व्यक्ती सुद्धा योग्य मुद्दा मांडू शकतोच. त्याची दुटप्पी आयडेंटिटी वर सतत आणली तर केवळ चिखलफेक उरते.

इथे मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतोय, हि अटक राजकीय आहे हे तुम्ही कशावरून म्हणताय ? अटक रायगड पोलिसांनी केलीये आणि तिघांना केलीये.

बाकी दोन वर्षांपूर्वीच्या केसवर आज का कारवाई, ह्यात मला फारसे कळत नाही, कि अशा प्रकारच्या केसेस मध्ये किती वेळ लागतो आणि काय काय होत असते. तुमच्याकडे तौलनिक माहिती असल्यास नक्की द्या.

त्यापलीकडचा तुमचा रोख सुद्धा मान्यच आहे. यापूर्वी भाजप आणि सेना गोस्वामीच्या रक्षणार्थ होते आणि आता सेना विरोधात आहे. सेनेची एकंदरीत वाटचाल सुद्धा ह्या रोखाला पुष्टी देणारी आहे.
पण तरीही. इथे केवळ राजकीय रोख आहे म्हणणे हे मृत व्यक्तीवर अन्यायकारक होईल असे मला वाटते. गोस्वामीवर्ती अन्याय होणे आणि त्या इंटेरियर डिझाइनर वर अन्याय होणे ह्या दोन शक्यता असतील, तर गोस्वामी वर अन्याय होण्याची शक्यता फार कमी आहे, इतका मोठा पक्ष पाठीशी आहे, संपूर्ण मीडिया त्याला उपलब्ध आहे and all. त्यामानाने दुसरी शक्यताच जास्त आहे.

हे माझे म्हणणे.

पुंबा Thu, 05/11/2020 - 18:42

प्रशांत कनौजिया, पवन जैस्वाल ही नावे गुगलून बघा. ह्या दोघांवर केसेस कुणी टाकल्या, काय आरोप आहेत ह्याची माहिती घ्या. अर्नबला आत्महत्याचिठ्ठीत नाव आले म्हणून तरी अटक झालीये. तुमचे म्हणणे काय आहे, पोलिसांनी मृताच्या नातेवाईकाच्या तक्रारीची दखल घ्यायला नको होती का?
अर्नब भाजपाने पाळलेला आहे. त्याचे कामच भाजपचे अजेंडे चालवणे आहे, तो जे काही करतो त्याला पत्रकारिता म्हणणे म्हणजे मुर्खपणाची हाईट आहे.

'न'वी बाजू Thu, 05/11/2020 - 20:50

In reply to by पुंबा

अर्नब भाजपाने पाळलेला आहे. त्याचे कामच भाजपचे अजेंडे चालवणे आहे, तो जे काही करतो त्याला पत्रकारिता म्हणणे म्हणजे मुर्खपणाची हाईट आहे.

मी अर्नब किंवा रिपब्लिक टीव्ही फारसा पाहिलेला नाही, परंतु जो काही थोडाफार पाहिलेला आहे, त्यावरून माझे झालेले इंप्रेशन म्हणजे, अर्नब हा भारताचा शॉन हॅनिटी आहे, आणि रिपब्लिक टीव्ही हा भारताचा फॉक्स 'न्यूज़' (अर्थात रिपब्लिक टीव्ही) आहे. त्याला पत्रकारिता म्हणू नये, हे मला पटते, परंतु, म्हणणारे म्हणतात, त्याला कोण काय करणार?

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/11/2020 - 20:54

In reply to by 'न'वी बाजू

हॅनिटी अर्नबएवढा आरडाओरडा करत नसावा. असा अंदाज आहे. मी हॅनिटी बघितलेला नाही. करमणूकमूल्य कमी असेल असं वाटतं.

'न'वी बाजू Thu, 05/11/2020 - 21:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅनिटी अर्नबएवढा आरडाओरडा करत नसावा. असा अंदाज आहे.

काय सांगता!

मी हॅनिटी बघितलेला नाही.

ऐकलेलासुद्धा नाही? (लकी यू!)

असो. आय गेस दॅट एक्स्प्लेन्स इट ऑल.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/11/2020 - 21:26

In reply to by 'न'वी बाजू

आता तुम्ही म्हणताय तर बघते. ह्या आठवड्यात बघायला जरा जास्त मजा यावी.

'न'वी बाजू Thu, 05/11/2020 - 22:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्या आठवड्यात बघायला जरा जास्त मजा यावी.

मजा!

डोके फिरले, तर नंतर मग मला शिव्या घालत येऊ नका.

'न'वी बाजू Fri, 06/11/2020 - 01:08

In reply to by स्वयंभू

शॉन हँनिटीबद्दल काही माहिती नाही.

गू मनुष्य आहे.

(सॉरी. त्याचे थोडक्यात नि समर्पक वर्णन करायला याहून स्वच्छ शब्द मराठी भाषेत नाही. 'हलकट मनुष्य' doesn't quite cut it - doesn't quite cover him in his entirety.)

रेडियोवर आणि टीव्ही(फॉक्स 'न्यूज़')वर त्याचे टॉक शोज़ असतात.

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/11/2020 - 02:17

In reply to by 'न'वी बाजू

फूट पाडणाऱ्या, तेढ माजवणाऱ्या लोकांबद्दल फारच सभ्य शब्द वापरत आहात.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/11/2020 - 20:38

हा अजब प्रकार आहे. अर्णब (म्हणे) पत्रकार आहे, म्हणून पत्रकारितेबाह्य केलेल्या सकृतदर्शनी अपराधांबद्दल त्याला अटक करू नये. बाकीच्या अशा लोकांवरही खटले चालवावेत, म्हणायचं सोडून हे काय तरी अजबच. पत्रकार असण्याचा आणि ह्या अटकेचा संबंधच काय?

स्वयंभू Thu, 05/11/2020 - 21:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भले त्याची शैली आक्रस्ताळी असेल. काही लोकांना आकांडतांडव करणारे पत्रकार किंवा वृत्ततनिवेदक आवडतात. हल्ली तर फुल्ल टछ ड्रामाटायझेशन झालेय न्यूज रिपोर्टिंग. अर्णबला अटक झाली ती पत्रकार म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणून. पण औचित्यपूर्ण प्रसंगीच कशीकाय जुनी केस रिओपन होते?
म्हणजेच शिवसेनेच्या लोकांना खासकरून ठाकरे कुटुंबातील सदस्यांना जर टार्गेट करून प्रश्न विचारले तर असे काहीतरी होते. त्याचे समर्थन ही केले जाते. हा कळीचा मुद्दा आहे. म्हणजेच सरकारला कोंडीत पकडणारे प्रश्न विचाराल तर याद राखा असा मेसेज दिला जातोय का?
पत्रकार संघटनेच्या वतीने आधीच जाहिर केलेय की ही अटक पत्रकारितेवर घाला वगैरे असे काही नाही.
मुख्य मुद्दा हाच की अटकनाट्य हायली डेकोरेटेड वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/11/2020 - 00:19

In reply to by स्वयंभू

नक्की कधी अटक केली असती तर औचित्यभंग झाला नसता?

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तिनं स्पष्ट चिठ्ठी लिहिली होती की, ह्या तीन लोकांवर जबाबदारी आहे. ह्यापेक्षा आणखी मोठा सकृतदर्शनी पुरावा काय हवा, अटक करायला? त्यातून तिघेही रिपब्लिक टीव्हीशी संबंधित आहेत. बाकी दोघांवर रिपब्लिकची काही अंशी का होईना, जबाबदारी नाही का? मग त्यांच्याबद्दल कळवळा का येत नाही? का सोयीसवडीनं फक्त अर्णबला तेवढी सहानुभूति, कारण त्याचं तोंड टीव्हीवर दिसतं, त्याचं नाव सगळ्यांना माहित्ये; आणि बाकीच्या आरोपींना कायद्यानुसार, कायदाबाह्य काही का शिक्षा होईनात!

अटकनाट्य का झालं? पोलिस दाराशी पोहोचले तेव्हा ह्यानंच वेळकाढूपणा केला आणि आपल्या दाराशी माध्यमं जमा केली. कुणाला तरी सकृतदर्शनी पुरावा दिसल्यावर अटक होते, ह्यात नाट्य का निर्माण होतं? झालं तरी त्याला का भाव द्यायचा?

इतर अशा केसेस पुढे रेटाव्यात असं वाटत नाही का? बाकीच्या अशा, आर्थिक व्यवहारांत फसवल्या गेलेल्या आणि त्यामुळे आत्महत्या केलेल्या लोकांना न्याय मिळावा असं मनातून तुम्हाला अजिबातच वाटत नाही का?

ह्या सगळ्या प्रकारात मुळात अर्णब हुतात्मा का? न्यायपालिकेवर विश्वास नाही का तुमचा? अर्णब निरागस असेल (किंवा साक्षी पुरावे विकत घेण्याएवढा मालदार, गब्बर आणि लब्धप्रतिष्ठित असेल) तर सुटेलच की! तेव्हा आनंद साजरा करता येईलच.

बाकीचे अनेक लोक भाजपच्या आयटीसेलच्या भिकारडेपणामुळे आत गेले होते. उदाहरणार्थ, कन्हैया, उमर खलिद वगैरे. तेव्हा असे प्रश्न पडतात का? उमर खालीदवर अजूनही सरकार नजर ठेवून आहे. त्याच्या विरोधात असा कुठलाही सकृतदर्शनी पुरावासुद्धा नाही. मग तिथे औचित्याबद्दल बोलता का?

सगळ्यात महत्त्वाचं - गुन्हा आणि औचित्याचा संबंधच काय?

स्वयंभू Fri, 06/11/2020 - 03:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मात्र जी केस २०१९ ला क्लोज केली होती सबळ पुराव्याअभावी. तीच आता परत ओपन केली गेली.
मुळात मी जे सरकारने केलेल्या कारवाई बद्दल बोलत आहे.इतर सरकारने अशीच केली होती तेव्हा किंवा करतील तेव्हा हीच समर्थनार्थ भूमिका असेल का? सारांश अशी कारवाई भाजपाप्रणित राज्य सरकारे जेव्हा करतात तेव्हा विरोध आणि इतरांनी केले की समर्थन. म्हणजेच पोलीसांना हाताशी धरुन खेळ कोणता पक्ष करतोय ह्यावर समर्थन आणि विरोध ठरतोय.
व्यवस्थेचा आणि अधिकारांचा दुरुपयोग केला जातो ह्याकडे दुर्लक्ष होतेय. हे माझं निरिक्षण.

आता तुम्ही उपस्थित केलेले दुसरे मुद्दे पाहू.
गुन्हेगारांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात जे होईल ते होईलच. मी अर्णबला हुतात्मा म्हणतच नाही. तुम्ही एक भिकार म्हणत असाल त्याला तर मी दहा भिकार म्हणेन. अर्णबबद्दल चिठ्ठीत उल्लेख आहे म्हणजे नक्कीच तो दोषी आहे. मात्र जे अटकनाट्य रंगवून फुल कव्हरेज दिले जातेय त्याबद्दल माझे आक्षेप आहेत.

राहिला प्रश्न कन्हैय्या कुमार, उमर खालिद वगैरेंच्याबाबतीत तर त्यांच्यावर केल्या गेलेल्या कारवाईचे समर्थन करणारे आणि अर्णबवर झालेल्या कारवाईचे करणारे माझ्या दृष्टीने एकसारखेच. कारणा त्या दोहोंमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे मनात असलेली नकारात्मक प्रतिमा. काही लोकांना कन्हैय्या कुमार, उमर खालिद वगैरे अजिबात आवडत नाहीत तसेच काही जणांना अर्णब अजिबात आवडत नाही.
माझा मुद्दा कायदा व सुव्यवस्थेचा सोयीनुसार वापर करण्यावर आहे. सरकार किंवा पक्ष कोणीही असो.

आम्हाला अडचणीत आणणारे प्रश्न विचाराल तर डूख धरुन कारवाई करू हा एकमेव एककलमी कार्यक्रम राबवला जातोय.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/11/2020 - 04:05

In reply to by स्वयंभू

नक्की काय कारवाई केली? समजा सरकारला वाटलं की मागच्या वेळेस केस निष्कारण दाबली गेली आणि सरकारकडे कुणीतरी न्याय मागितला. तर त्यांनी ती केस उघडायची नाही?

मला कायदा समजत नाही. पण आत्महत्या करणाऱ्यानं मरण्याआधी लोकांची नावं लिहून ठेवणं आणि भाजपच्या आयटी सेलनं खोटे व्हिडिओ पसरवणं ह्यांतला फरक समजतो.

अटकनाट्य रंगवणारं रिपब्लिक टीव्ही आहे, सरकार २४ तास आक्रस्ताळ्या बातम्या चालवत नाही.

स्वयंभू Fri, 06/11/2020 - 04:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समजा सरकारला वाटलं की मागच्या वेळेस केस निष्कारण दाबली गेली आणि सरकारकडे कुणीतरी न्याय मागितला. तर त्यांनी ती केस उघडायची नाही?

जुन्या क्लोज केलेल्या केसेस नक्कीच रिओपन केल्या जाव्यात. न्याय्यासाठी ते गरजेचं आहे. मात्र जो अर्णब गेले काही महीने शिवसेनेवर आणि ठाकरे कुटुंबातील सदस्यांना टार्गेट करत होता. बरोबर अशा वेळी त्याचीच कधीकाळी क्लोज झालेली केस रिओपन होतेय. तसंही आत्महत्याग्रस्त लोकांनी बऱ्याचशा वेळी कोणामुळे आत्महत्या करतोय हे चिठ्ठीत किंवा डायरीत लिहिलेले असते. मात्र कारवाईची तत्परता तेथे दिसत नाही. लागेबांधे असल्याने पुराव्याअभावी केसेस बंद करायच्या. कोणालातरी गोत्यात आणण्यासाठी पुन्हा रिओपन करायच्या. अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांची विश्वासार्हता कमी होते.
तसंही मनाप्रमाणे न्याय मिळाला तर न्यायव्यवस्थेचा विजय असो आणि मनाविरुद्ध न्याय मिळाला की न्यायव्यवस्था विकली गेल्याची आरोळी हे पुर्वापार चालत आलेले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/11/2020 - 05:36

In reply to by स्वयंभू

तुमच्या सगळ्या लेखनाचा सूर सरकार अर्नबवर सूडानं कारवाई करतंय असा आहे. सरकार सगळ्यांना न्याय देत नाही, असा नाही. त्यामुळे जशी प्रजा तसं सरकार, असं म्हणायला पुरेपूर जागा आहे.

हा माझा शेवटचा प्रतिसाद. तेच तेच कितीदा लिहिणार!

नितिन थत्ते Sat, 07/11/2020 - 17:20

In reply to by स्वयंभू

उलट सरकार बदललं आहे त्यामुळे आपल्यावर कारवाई होऊ शकते असे कळल्यामुळे ॲलिबी तयार करावी* म्हणून अर्णब सातत्याने शिवसेना आणि ठाकरे यांच्यावर टीका करत आहे (जेणेकरून कारवाई झाली तर तुमच्या सारख्यांना हा कांगावा करायची संधी मिळेल).

*तसं काही नसून अर्णब हा भाजपचा चमचा असल्याने भाजपचा अजेंडा चालवण्यासाठी तो शिवसेना आणि ठाकरे यांच्यावर टीका करतो हेही शक्य आहे पण तेही शक्य आहेच.

स्वयंभू Sat, 07/11/2020 - 21:31

In reply to by नितिन थत्ते

*तसं काही नसून अर्णब हा भाजपचा चमचा असल्याने भाजपचा अजेंडा चालवण्यासाठी तो शिवसेना आणि ठाकरे यांच्यावर टीका करतो हेही शक्य आहे पण तेही शक्य आहेच.

अर्णबवर जशी तत्परतेने कारवाई होत्या जून्या केसमध्ये तशी इतरांवर होईल काय?
माझे तोच म्हणणे आहे आमच्यावर टिका कराल, नावे ठेवाल तर आम्ही तुम्हाला कोणत्याही केसमध्ये अडकवून दाखवू. हे भाजपाचे राष्ट्रीय धोरण आहे. त्याचीच पुनरावृत्ती महाविकासआघाडी सरकारने केली.

मात्र नेहमीप्रमाणे कारवाई कोण करतंय आणि कोणावर होतेय हे पाहून विरोध किंवा समर्थन ठरते.
भाजपाई भगतलोग भाजपाच्या कोणत्याही कारवाईची तोंडभरून स्तुती करतात तशीच स्तुती अर्णबवरच्या कारवाई बद्दल केली जाते.

मला अशी सोयीस्कर भूमिका घेणाऱ्यांंची किव येते.( भाजपाने जेव्हा अशी जुनी मढी उकरून काढून केसेस केल्या होत्या खटले दाखल केले होते तेव्हा माझ्या माहितीतील काही जणांनी सरकारला नावे ठेवत श संविधान खतरे मे वगैरेंंचा नारा दिला होता आणि तीच मंडळी अर्णबवरच्या कारवाईवर खुश आहेत)
अशी मंडळी आजूबाजूला पाहिली की समजतं व्हॉटअबाउटिझमवर सगळी भिस्त आहे. सावळा गोंधळ चालूय नुसता. :-)

स्वयंभू Sun, 08/11/2020 - 11:28

In reply to by नितिन थत्ते

मग "बऱ्याच पत्रकारां"पैकी कीती पत्रकारिताएशी पाईक आहेत हे ही बघणे गरजेचे आहे.
सध्याचे सरसकटपणे सगळेच पत्रकार हे परफॉर्मर आहेत. स्क्रिप्टेड न्यूज स्लॉटवर ज्याचा परफॉर्मन्स चांगला तो फेस ऑफ दि सेगमेंट.

पुर्वी गावपातळीवर किंवा तालुक्यातील वार्ताहर काही प्रतिष्ठित राजकीय कुटुंबियांनी बांधू ठेवले होते गावाच्या राजकारणात इमेज बिल्डिंग करण्यासाठी तसाच काहीसा प्रकार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कॉर्पोरेट व्यावसायिकांनी उचलला आहे. पक्ष कार्यालयातून फोन गेल्यावर ब्रेकींग न्यूजच्या स्क्रोलिंग पट्ट्या हटवल्या जातात.
पुर्वी एखादी न्यूज पाहिली किंवा पेपर वाचला की भागत होते. आताशा एखादी बातमी वाचून शहानिशा करण्यासाठी वेगवेगळी पोर्टल्स पालथी घालावी लागतात. नंतर इंडिपेंडंट युट्युबवरील न्यूज चँनेल्सवर जाऊन शोधून शहानिशा करावी लागते.
कॉलेजमध्ये एवढे वाचन केलं असतं तर एमपीएससी सुटलो असतो असं वाटतं कधीकधी. :-)

काळा पहाड Tue, 10/11/2020 - 00:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तिनं स्पष्ट चिठ्ठी लिहिली होती की, ह्या तीन लोकांवर जबाबदारी आहे. ह्यापेक्षा आणखी मोठा सकृतदर्शनी पुरावा काय हवा, अटक करायला?

हे भारी आहे. याला पुरावा म्हणत नाहीत! तसं असेल तर आजच एका कंडक्टर ने आत्महत्या करून चिट्ठी मध्ये सरकारला दोषी धरलंय. घालूया का सगळ्या मंत्रीमंडळाला आत? आत्महत्या करणाऱ्याचे कुठले पैसे का पेंडिंग आहेत, रिपब्लिक चे या बाबतीत काय म्हणणे आहे पहायला नको? मोगलाई आहे काय तुम्हाला वाटलं म्हणून दोषी धरायला? बाकी ही close झालेली केस बद्दल काही तरी कारणाने त्या आत्महत्या करणाऱ्याच्या बायकोने पुन्हा complaint केलेली आहे. ही नेमकी या काळातच कशी केली गेली वगैरे गोष्टी कुणी तपासायच्या?

Rajesh188 Thu, 05/11/2020 - 23:14

ह्या पांढरा हत्ती च्या गरजा राज्यांनी भागवाय च्या आणि त्या पासून मिळणारे सर्व फायदे केंद्रांनी उचलायचे हा आत बट्ट्याचा व्यवहार आहे.
महाराष्ट्र शिवाय मुंबई स्वतंत्र राहूच शकत नाही मुंबई ची पूर्ण वाट लागेल .
शेजारचा गुजरात पण हा हत्ती स्वतःच्या पदरात आता घेणार नाही.
Mumbai पासून राज्याला मिळणारे उत्पादन आणि मुंबई साठी राज्याला करावा लागणारा त्याग ह्याचा विचार केला तर नुकसान च आहे.
भारता मधील आता ची अवस्था आता अशी आहे की राज्याची प्रगती करणे हा शाप ठरत आहे.
Banglore ची प्रगती करून कर्नाटक पण डोकं aaptun घेत असेल .
हिंदी पट्ट्या मधील बेकार लोकांची सोय करण्यासाठी स्वतः च्या राज्यातील साधन संपत्ती चा बळी देणे म्हणजे राज्याची प्रगती हा अर्थ आजची स्थिती बघून निघत आहे

स्वयंभू Sun, 08/11/2020 - 11:40

In reply to by Rajesh188

श्रीमंत राज्याकडून जेवढा कररुपाने पैसा गोळा केला जातो त्यापैकी तुटपुंजा दिला जातो मदत म्हणून. मात्र उत्तरेकडील गरीब ठेवली गेलेली राज्ये मात्र अमाप पैसा ओरबडत असतात.
एखादी गोष्ट मागास, कुपोषित आणि शोषित ठेवून त्याचे मार्केटिंग करून स्वतःची दुकानदारी सुरू करून नंतर मक्तेदारी प्रस्थापित करणे हे एकमेव सूत्र आहे आपल्याकडील बरबटलेल्या व्यवस्थेचे.
पुर्वी माझ्या अशा गोष्टी लक्षात येत नव्हत्या. नंतर वाचन वाढले, समज वाढली आणि हळूहळू फोलपणा लक्षात येऊ लागला.

भटक्या कुत्रा Thu, 05/11/2020 - 23:14

तुम्हालाही माहित्ये आम्हाला पण माहित्ये, काय चालू आहे ते.
काका शिवसेनेला खपवायला बसलेत. भाजप ला BMC पायजे. भाजप, काँग्रेस सर्वजण असंच करतात
बाइ द वे, वरील आलेले बहुतांशी प्रतिक्रिया या अनिवासी भारतीय किंवा अभारतीय निवासी च्या आहेत. त्यामुळे लेखांकर्त्याने मनावर लावून घेऊ नये

स्वयंभू Fri, 06/11/2020 - 04:00

In reply to by भटक्या कुत्रा

भविष्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी वातावरण तयार करून कोणाचा फायदा होतोय?

मी मनावर घेत नाहीच नाही. अशा घटना जेव्हा मेडियात तिन्हि त्रिकाळ कव्हर केल्या जातात तेव्हा मुख्य मुद्यावरून भरकटवण्यासाठी बहुधा असे इव्हेंट स्क्रिप्टेड केले जातात असे वाटते.
इंग्रजांनी डिव्हाईड अँड रूल रणनीती वापरली होती. हल्ली डायव्हर्ट अँड रूल अशी नवी निती वापरली जातेय.

चिमणराव Fri, 06/11/2020 - 06:47

१) नाईकशी काही व्यापारी व्यवहार झाला,
२) तो तोट्यात गेला,
---------
व्यवहारात तोटा झाला का/ का फायदा झालेला फक्त अर्णवनेच उचलला आणि नाईकला वाटा मिळाला नाही आणि त्याचं पर्यवसन आतमहत्येत झालं असा दावा लावला.

३) मागच्या वर्षी नक्की काय तक्रार होती की ती फाईल बंद केली?
( फक्त आर्थिक बाबीवर असेल आणि कराराप्रमाणे हरली असेल. )
४) आता 'आत्महत्येला जबाबदार' अशी तक्रार नव्याने केली का?

क्रमांक (३) आणि (४) तक्रारींचे स्वरुप नागरी , फौजदारी असे वेगळे झाले. क्र (३)मध्ये पोलीस थेट कारवाई करू शकत नाहीत.

अर्णव चानेल कसा चालवतो आणि ही तक्रार याचा काही संबंध दिसत नाही.

चिमणराव Fri, 06/11/2020 - 07:07

माहीत नाहीत। आणि एकदम अर्णवचा चानेल, केस उघडण्यात कुणाचा राजकीय हात वगैरे चर्चा हवी तेवढी चालवता येईल.
चानेल कसा आरडाओरडा करून चालवतो हा आणखी वेगळा मुद्दा.

-------------------

प्रसिद्ध व्यक्तींच्या आर्थिक उपक्रमांसंबंधी भांडणं चर्चेत लगेच येतात. इतरांची तशाच स्वरुपाची असली तरी येत नाहीत.
खटल्याला लागणारे पुरावे कागदोपत्रीच असल्याने ते पाहून दावे मान्य केले/फेटाळले जातात.
हुशार माणसे पार्टनरशिप अग्रीमेंट त्यांच्या फायद्याचे बनवून घेतात.

काळा पहाड Tue, 10/11/2020 - 00:41

In reply to by चिमणराव

हो, पण हा त्याचा चॅनेल आहे. बघायचं नसेल तर कोणी जबरदस्ती केली आहे का? भारतात सर्वात जास्त इंग्लिश viewers त्याच्या चॅनेल चे आहेत. तो पत्रकार आहे की नाही, आक्रळास्ते पणा करतो की नाही हा प्रश्नच का उपस्थित व्हावा? ज्यांना बघायचं नसेल त्यांनी दुसरं काही पहावं किंवा पाहू नये. इथे एक सज्जन म्हणाले की तो हिंदू मुस्लिम यांच्यात भांडण लावतो म्हणून हे योग्य आहे. तो जर हिंदूंची बाजू घेत असेल तर तथाकथित सेक्युलर लोकांच्या पोटात दुखणारच. म्हणून त्याची बाजू गैर कशी ठरू शकते?

काळा पहाड Tue, 10/11/2020 - 00:30

https://www.republicworld.com/india-news/law-and-order/full-facts-of-mo…

हे एकदा वाचून पहायला हरकत नाही. जर रिपब्लिक कडे इथे सांगितल्याप्रमाणे पुरावे असतील तर संपूर्ण चित्र किती वेगळं दिसेल हे सांगायला नकोच.

Rajesh188 Thu, 12/11/2020 - 12:03

न्यायाधीश हे माणूसच असतात आणि राग,लोभ,स्वार्थ,मत त्यांना असतात आणि त्याचा प्रभाव न्यायदान करताना पडतो.
आधुनिक सायन्स नी निर्माण केलेल्या कृत्रिम बुध्दी मत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात न्यायालयात करणे गरजेचे आहे.
सर्वच न्यायाधीश हे मानव नकोत तर कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे रोबोट त्यांच्या जागी हवेत .
आणि हे रोबोट च माणसाचा न्याय योग्य पने करतील कोणताच आकस न ठेवता.
फक्त कायदा काय आहे हाच त्यांचा न्याय देण्याचा पाया असेल..

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/11/2020 - 23:13

आजच्या लोकसत्तामधली बातमी - “…बोबडी वळली होती का?,” किरीट सोमय्यांच्या आरोपांना अन्वय नाईकांच्या कुटुंबीयांनी दिलं उत्तर

पुरोगामी महाराष्ट्राच्या, सर्वसमावेशक आर्थिक राजधानीतले एक भाजप नेते, किरीट सोमय्या यांचा आरोप -

"... जमिनीचे आर्थिक व्यवहार करतात आणि आपल्या पत्नीचं नाव देतात याच्या मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी कालपासून करत आहे."

बाई आपल्या हिंमतीवर जमिनीचे आर्थिक व्यवहार करू शकत नाही; भविष्यातल्या मुख्यमंत्र्यांची बायको तर नाहीच नाही. अर्थात ह्या असल्या मुद्द्यांची कुणाला पडल्ये! ह्याच इसमाला बायकाही भरभरून मत देतील, भगवा आहे म्हणून! आणि मग 'बाईच बाईची शत्रू असते' म्हणणाऱ्यांना जितम् मया वाटेल.

अर्नबवर सूडबुद्धीनं कारवाई केली का नाही, हाच एकमेव आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरलेला आहे. इतर आत्महत्या प्रकरणांत काय झालं, करोनानं किती बळी घेतले, चार तासांत लॉकडाऊन जाहीर करण्याचे काय परिणाम झाले, येता-जाता लोक बायकांना हिणकस ठरवतात वगैरे छाटछूट प्रश्न कधीच सुटले आहेत.

स्वयंभू Fri, 13/11/2020 - 12:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणतीही स्त्री जमीनीचे व्यवहार कोणासोबतही करू शकते त्या बद्दल काहीच वाद नाही. कोणीही कोणासोबत कधीही केव्हाही जमिनीचे खरेदीविक्रीचे व्यवहार करू शकतो. भाजपा आता या प्रकरणात राजकारण करतंय हे जगजाहीर आहे. अशी चिखलफेक करण्याची संधी कोणता पक्ष सोडेल? राजकारण करण्यात मिळालेली संधी कोणीही सहजासहजी सोडत नाही.

मुद्दा हाच की या आधी सुद्धा आत्महत्या सारख्या केसेस झाल्यात जेथे राजकीय लोक अडकले होताते. उदा. फार मागे ठाण्यातील एका बिल्डरने आत्महत्या करण्याआधी ठाण्यातील स्थानिक राजकीय नेत्यांची नावे डायरीत लिहिली होती. त्या केसचे पुढे काय झाले हे मेडियाने कव्हर नाही केले.
अर्णबवरच्या केसेस पुन्हा ओपन केल्या ते ही जेव्हा अर्णब उघडपणे ठाकरे कुटुंबातील सदस्यांना टार्गेट करत होता तेव्हा.
सगळेच पत्रकार किंवा अँकर टिव्ही चँनेल्सवर कोणा ना कोणाच्या बाजूने किंवा विरोधात ठाम आणि बेधडकपणे भुमिका घेतात. त्यामुळे अर्णबवरची कारवाई आकस ठेवून केलेली नसेल कशावरून?
मुळात पोलीसांनी धडक कारवाई करुन अर्णबला उगाचंच नाहक महत्त्व दिले आहे. आता तर भाजपा उघडपणे राजकारण करणार. भाजपाला आयती संधी दिली शिवसेनेच्या लोकांनी.

आता तुम्ही उल्लेखलेल्या इतर मुद्दयावर बोलू.
गेले काही वर्षे महत्वाच्या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी कोणत्याही क्षुल्लक गोष्टींचा उपयोग केला जातोय. डायव्हर्ट अँड रूल सध्याचा नवा पायंडा पाडला गेलाय.

मी एवढेच म्हणेन की अर्णबवरच्या कारवाईचे समर्थन करून अशा पद्धतीने आकस ठेवून कारवाई करण्याला बळ दिले जातेय. भविष्यात अशा कारवाया जर झाल्या तर हीच समर्थन करणारी मंडळी काय करतील?
असो तूर्तास थांबतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/11/2020 - 21:22

In reply to by स्वयंभू

हे जर राजकारणच सुरू आहे, तर त्याची चर्चा आपण का करावी? राजकारण्यांना ह्यातून फायदा होतो म्हणून ते त्याबद्दल बोलतात; आपण का चर्चा करतोय? आपल्यासाठी महत्त्वाचे विषय सोडून अर्नबच्या अटकेबद्दल चर्वितचरण करावं म्हणून?

दिगोचि Sat, 14/11/2020 - 07:57

क्लोज झालेली केस रिओपन करताना कोर्टाची परवानगी घ्यावी लागते तसे न करता गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्या मुखत्यारीत केस ओपेन करून अर्णबला तुरुंगात टाकले. ही चूक झाली. तसेच सरकारमधील कोणाला एकेरी नावाने बोलणे हा गुन्हा नाही. अर्णबने नाईकांना 83 लाख रुपये देणे होते. तसेच त्यांना 20 कोटी रुपयांची कर्जे पण होती.

दिगोचि Sat, 14/11/2020 - 18:13

माझ्या प्रतिसादात शेवटच्या ओळीनंतर एक वाक्य टाकायला विसरलो ते असे: नाईकांनी कंपनीला असलेल्या 20 कोटी रुपयांच्या कर्जामूळे आत्महत्त्या केली असावी असे माझे मत आहे. कारण त्यामानाने 83 लाख रुपये ही तेव्हढी मोठी रक्कम नाही. तसेच त्यांच्या आईने आत्महत्त्या का केली? हे काळात नाही.

Rajesh188 Sun, 15/11/2020 - 02:42

भारतीय जनता पक्षाचे गुप्त भागभांडवल रिपब्लिक न्यूज नेटवर्क मध्ये असावे असा मला दाट संशय आहे.
अर्णव साठी भारतीय जनता पक्षाने जी पक्षाची ताकत वापरली मुळात हेच वागणे संशयस्पद आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 19/01/2021 - 02:46

अर्नबचे व्हॉट्सॅप चॅट हेसुद्धा पत्रकारिताबाह्यच आहेत. त्याबद्दल कुणाचं आता काही म्हणणं आहे का?

फेसबुकवरची मीमं बघून आणि कॉमेड्या वाचून मला मजा येत्ये. (मला काही कारण लागत नाहीच खिदळायला!) उदाहरणार्थ, बालाजी सुतार यांनी फेसबुकवर लिहिलंय, त्यातल्या 'शिव्या' वाचून मी हसत सुटले होते.

ते अर्णब गोसाव्याच्या व्हाश्टॅपचं काय लफडं आलंय बाहेर? ब-याच भाजेपवाल्यांनाच घोंगड्यात घेतलंय भावड्याने, असं ऐकलं मघा नाक्यावरच्या खारेमुरेवाल्याकडं. लैच आंग्लभाषेत पाचेकशे पानांची हकनाक रामकहाणी प्रसवलीय, असं कळलं. तितकी होलसेल आंग्लभाषा वाचायची म्हणजे आमच्या यंकट्राव गुरूजींच्या जाळीमुळीलाच नांगर जुपायची पाळी येणार.
सोटम्याने कसं कसं काय काय छाटलंय, वन थर्डमध्ये सारांश करून सांगेल का कुणी इकडे?

एका प्रतिक्रियेत त्यांनी भादऱ्या अशी शिवी अर्नबला हासडल्ये!

स्वयंभू Tue, 19/01/2021 - 11:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

५०२ पानांची ८० एमबी ची पीडीएफ व्हॉट्सऍप वर बरीच व्हायरल झालीय..
बाबाओ
प्रकरण लय खतरा दिसतंय..
लोकांना भलतीकडेच वळवून भलतेच काहीतरी होणारेय दिसतेय.
तसही हल्ली लोक कोणालाही सिरियसली घेत नाहीत.

बऱ्याचशा तज्ञ मंडळींंना ह्या चँटने भारी कामाला लावलेय.
मला तर वाटतेय पनामा पेपर्स, ज्युलियन असांजेचे विकीलिक्स सारखा काहीसा प्रकार असावा.
काहीतरी घमासान होईल असे दिसतेय.