Skip to main content

शूर आम्ही दंगलखोर

शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती
शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती

बेरोजगारीच्या खाईत उमगली दगडफेकीची रीत
गल्लीतल्या नेत्याची संगत अन् जडली येडी प्रीत
करोडोंची नासधूस करून येईल अशी शक्ती संघटीत
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती

तोडफोड वा जाळपोळ करावी हेच आम्हांला ठाव
नियतीच्या लाथाबुक्क्या खाणे हेच आम्हांला ठाव
जातीधर्मापायी सारी इसरू माया ममता नाती
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती
शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती
-------------------------------------
विडंबनात्मक
©भूषण वर्धेकर
-------------------------------------

pspotdar Mon, 08/02/2021 - 13:23

In reply to by नितिन थत्ते

On the night of 11 August 2020, violent clashes took place in the Indian city of Bangalore, Karnataka.[4] Provoked by an inflammatory Facebook post on Muhammad that was allegedly shared by the nephew of the Akhanda Srinivas Murthy, a state legislator of the Indian National Congress,[5] a Muslim mob[6] arrived at his house in protest which turned violent.[7]

The clashes between the police and the mobs started around the residence of the legislator and spread to the police stations of KG Halli and DJ Halli.[8] The incident resulted in the imposition of a curfew in the affected areas.[9] 3 people were killed after police opened fire on the crowds.[10][11] 30–80 policemen[6] and several journalists, were injured by armed assailants.[12] Murthy's property was torched during the period of violence.[13]

The following day, over 100 people were arrested by the police.[14] Some of the crowds were also allegedly led by members of the Social Democratic Party of India (SDPI), an Islamist fundamentalist political outfit[12] and has led to the arrest of a few of its leaders.[15]

https://en.wikipedia.org/wiki/2020_Bangalore_riots

:D :D :D

pspotdar Mon, 08/02/2021 - 13:30

In reply to by नितिन थत्ते

In the second version, a girl from the Hindu Jat community was allegedly harassed in an eve-teasing incident by one Muslim youth in Kawal village.[15][16] In retaliation, Hindu relatives of the girl in question, Sachin Singh and Gaurav Singh,[17][18] killed the youth named Shahnawaz Qureshi.[19] The two brothers were lynched by a Muslim mob when they tried to escape.[18] The police arrested eleven members of the girl's family for killing the Muslim youth.[16] According to some locals, the police did not act against the killers of the Hindu brothers.[16]

Supreme Court of India while hearing petitions in relation to the riots held the Akhilesh Yadav led Samajwadi Party, prima facie guilty of negligence in preventing the violence and ordered it to immediately arrest all those accused irrespective of their political affiliation. Court also blamed the Central government for its failure to provide intelligence inputs to the Samajwadi Party-governed state government in time to help sound alerts.

https://en.wikipedia.org/wiki/2013_Muzaffarnagar_riots

:P :P :P :P :P

pspotdar Mon, 08/02/2021 - 13:59

In reply to by नितिन थत्ते

In 1989, as part of the Ram Janmabhoomi campaign, which aimed to construct a Hindu temple at Ayodhya in place of the Babri mosque, the Vishwa Hindu Parishad (VHP) had organized a "Ramshila" procession in Bhagalpur. The procession aimed to collect bricks (shilas) for the proposed Ram temple at Ayodhya. One such procession passing through Fatehpur village provoked brickbatting and arson on 22 October. Prior to the outbreak of the riots, two false rumors about the killing of Hindu students started circulating: one rumor stated that nearly 200 Hindu university students had been killed by the Muslims, while another rumor stated that 31 Hindu boys had been murdered with their bodies dumped in a well at the Sanskrit College.[5] Apart from these, the political and criminal rivalries in the area also played a role in inciting the riots.

https://en.wikipedia.org/wiki/1989_Bhagalpur_violence

:P :P :P :P :P

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 11/02/2021 - 02:02

बाकी चालू राहीलच. मात्र मराठी संस्थळावर निदान इंग्लिश विकिपिडीयाचं भाषांतर तरी करून डकवा. तेवढीच राष्ट्रकार्यासोबत मराठीची सेवा फुकटात होऊन जाईल.

pspotdar Thu, 11/02/2021 - 18:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कवितेतल्या आशयाला धरुन केलेल्या डिवचण्याला उत्तर आहे ते, सदैव एकतर्फि प्रसार, आपल ठेवावे झाकुन दुसर्याचे पाहावे वाकुन

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 11/02/2021 - 21:26

In reply to by pspotdar

कवितेतून कुणाला डिवचण्याचा उद्देश आहे हे स्पष्ट नाहीये; त्यामुळे सगळ्यांचीच खोडी काढली असावी. पण ते ठीकच आहे. आपापलं मत. लगे हाथ थोडी भाषांतरित माहिती संदर्भ म्हणून तयार करायला काय हरकत आहे?

स्वयंभू Fri, 12/02/2021 - 11:06

मी हे विडंबन २०१८ साली जानेवारी मध्ये लिहिले होते. त्यावेळी नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरेगाव भिमा वगैरे प्रकरण चालू होते.
मूळातच आपल्या देशात दंगली वगैरे होत असतात. काही दंगलीचे समर्थन करून कैक लोकांचे चरितार्थ चालतात. तर काही दंगलीचा सोयीनुसार विरोध निषेध वगैरे करून काहींनी पोटजीविका चालवली. मी विडंबनात्मक लिहिताना शूर आम्ही सरदार गाण्याचा आधार घेतला. सरसकटपणे सगळ्याच दंगलखोरांना लागू पडते हे. रिकामी डोकी आणि रिकामे हाथ जिथे जास्त तिथे दंगली लवकर पेटतात किंवा पेटवल्या जातात. त्यात आपल्याकडे जातपातधर्माच्या अस्मितांचे बारमाही भरघोस पिक येत असते.
भारतात नावाजलेल्या दंगली किंवा शिरकाण हे बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. त्यापैकी दोन गांधींच्या हत्येनंतर (१९४८, १९८४), काश्मिरी पंडितांचे शिरकाण (हल्लीच्या पुरोगाम्यांच्या सिलँबस मध्ये ह्या घटना नसतात तर हिंदुत्ववादींना यांचा उल्लेख नाही केला तर फाऊल असतो) आणि ९० नंतर झालेल्या, मुंबई बॉम्बस्फोटानंतरच्या, गुजरातमधील २००२ च्या दंगली (हल्लीच्या पुरोगाम्यांचे आवडीचे विषय तर हिंदुत्ववादींचा कशी जिरवली हा अविर्भाव) वगैरे नेहमी चर्चिल्या जाणाऱ्या असतात.

ज्याच्या त्याच्या निष्ठा त्या त्या विचारसरणींशी असतात त्यानुसार तो प्रत्यक्ष घटनेकडे पाहतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 13/02/2021 - 01:37

In reply to by नितिन थत्ते

शिवाय, समजा भीमा-कोरेगाव प्रकरण. तिथे दंगल झाल्यास ती बाब निराळी. त्या प्रकरणात आनंद तेलतुंबडे, वरवरा राव, गौतम नवलखा वगैरे लोकांना त्यांच्या वयाचा, महासाथीचा वगैरे कसलाही विचार न करता कशा पद्धतीनं तुरुंगांमध्ये सडवलं जात आहे, यांबद्दल बाळगलेलं मौनही सूचक आहे. आम्हांला दंगलीत होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीची पर्वा आहे, पण माणसांचे जीव जातात, माणसांना अमानुषपणे वागवलं जातं याचं काहीही पडलेलं नाही.

बरं, ह्या लोकांच्या विचारांमुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती नसेलही. मात्र ह्या प्रकारांमुळे सरकारला मनमानी करण्याचा अधिकार मिळत आहे, अशा काळ सोकावण्याचीही कुणाला पडलेली नाही. तो मुद्दा गौणच असतो; कारण मान खाली घालून मुकाटपणे राहिलं तर कोण तुम्हाला त्रास देणार? स्वतंत्र विचार वगैरे हौस आहेच कुणाला!

स्वयंभू Sat, 13/02/2021 - 08:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

परस्परविरोधी विचारांची सरकारे अशी कारवाई त्या त्या वेळी करत आलेले आहेत. कपटी राजकारण असते हे. आज भाजपा सत्तेत आहे म्हणून अर्बन नक्सलच्या नावाखाली रेटून कारवाई करतंय. कधीकाळी कॉंग्रेसचे सरकार होते त्यांनीसुद्धा अशीच सूडबुद्धीने कारवाई केली होती.
हा सत्तेचा दुर्गुण आहे. सत्ता नसताना कोणीही कीतीही आदर्शवादी भूमिका, विचार मांडत असेल पण सत्तेत आल्यावर सब घोडे बारा टाका मामला असतो.
या दुर्देवी पाशातून कोणताही पक्ष वा संघटना सुटलेली नाही.
अमुक एक लोक सत्तेत आल्यावर कायदा सुव्यवस्थेचे राज्य येईल ही एक सामाजिक अंधश्रद्धा आहे. भारतात व्होट बँक पॉलिटिकल अजेंडा राजरोसपणे चालतो.