जोकर
लहानपणीचा तो जोकर आठवतोय?
मोठ्या लाल नाकाचा, गोल बोजड बुडाचा
जणू मार खाण्यासाठी थांबून असायचा
नाकावर ठोसे मारून त्याला पाडायचा
कितीही मारलं तरी तो मात्र हसायचा
पुन्हापुन्हा तसाच सरळ उभा रहायचा
आपल्याला नाकारायचा नाही की
रागाने कुठे निघून जायचा नाही
लहानपणी त्याची गंमत वाटायची
ठोसे लगावताना धम्माल यायची
आता मात्र तो आठवून खिन्न वाटतं
प्रयत्न केला तरी जराही हसू येत नाही
आपलाच जोकर झाला असला की
उपरती होणारच, आयुष्य नाही तर काय!
बादवे...
मोठ्या लाल नाकाचा, गोल बोजड बुडाचा
जणू मार खाण्यासाठी थांबून असायचा
नाकावर ठोसे मारून त्याला पाडायचाकितीही मारलं तरी तो मात्र हसायचा
पुन्हापुन्हा तसाच सरळ उभा रहायचा
हा विदूषक (जोकर) आणि जपानी बाहुला यांच्यातील क्रॉसब्रीड असा काही प्रकार आहे काय? कारण, 'मोठ्या लाल नाकाचा' हे एकच विदूषकाचे लक्षण त्यात उतरले आहे, बाकी सर्व जपानी बाहुल्याची लक्षणे दिसताहेत.
म्हणजे...
...असलाच काहीतरी प्रकार ना? आमच्या लहानपणी आम्ही या कॉन्सेप्टला/जॉन्रला 'जपानी बाहुला' म्हणायचो. (कारण आमचे पूर्वज त्याला तेच म्हणायचे, म्हणून. अन्य काही कारण नाही. आम्हाला तेव्हा डोके नव्हते. म्हणजे, आताही नाही, म्हणा. परंतु तरीही.) अर्थात, ही कॉन्सेप्ट क्विंटेसेन्शियली जपानी नाही, जगातल्या अनेक संस्कृतींत तिचे ईक्विव्हॅलंट्स अस्तित्वात नि प्रचलित असू शकतात, हे तेव्हा ठाऊक नव्हते. ते आता विकिपीडिया वाचून समजले.
असो.
शेवटच्या
शेवटच्या दोन ओळी वाचेपर्यंत वाटलं, 'नमोंवर' लिहिलंय!