anant_yaatree Mon, 22/03/2021 - 21:41 सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी पोचलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी Like Dislike मस्त. सामो Mon, 22/03/2021 - 22:23 :) मस्त. Log in or register to post comments Log in or register to post comments1051 views
मस्त.
:) मस्त.