Skip to main content

"कोव्हिडच्या रात्री"

सुस्कारा टाकून आपण
यू -ट्यूब मालवितो ,
फेसबुक-वाद संपतात , दिवस मावळतो,
गरम पापण्यांखाली हळूहळू
अश्रू जमा होऊ लागतात.
निरुपयोगी अश्रूंच्या
जागी व्हिस्की सरकविणे
उपयुक्त ठरते.
ते छद्म-सोनेरीपण "खोटे" कसे म्हणणार?
उद्याचा दिवस "आज" तर आलेला नाही ना?
अश्रूंच्या तळ्यातून व्हिस्कीच्या मळ्यात शिरुया
तळ्यात मळ्यात
तळ्यात मळ्यात..
xxx

पर्स्पेक्टिव्ह Thu, 13/05/2021 - 01:39

ते शेवटचं ट्रिपल एक्स सुद्धा कवितेचाच भाग आहे काय? त्याच्या अनुषंगाने निघू शकणारे कवितेचे अनेक वाच्यर्थ जाणवू लागले, त्यामुळे कविता अधिकच ज्वलज्जाल वाटली. बादवे, व्हिस्कीपेक्षा रम बरी, असे सुचवतो (नाही, ज्यांना जे वांछायचे आहे तो ते लाहो, आपलं ते पीओ. आपल्याला काय?)