Skip to main content

"भर्त्सना"

ही अशी मोडकी रिक्षा
अस्तित्वाचीच परीक्षा
श्वास घेण्याचीच शिक्षा
कशापायी?

जनुक-संच कळकटणे
बिन-धुराचे हे जळणे
आणि काहीहि न कळणे
कशापायी?

अरे आहेस "तू" कोण ?
चालविशी का हे बाण ?
माझ्या वेदनेची जाण
कशी नसे?

तूच मला बनविले!!!!
मी होते सांगितले?
नव्हते मी मागितले
"असे" काही!
xxx