Skip to main content

संभाव्याच्या अब्ज छटांतून

संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उजळतो कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?

भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते

कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
"क्षण आत्ताचा क्षणजीवी नच"
क्षणोक्षणी वर्तमान म्हणते

पर्स्पेक्टिव्ह Mon, 27/09/2021 - 22:03

पहिले कडवे आवडले. बाकीच्यात थोडासा सुपरनॅचरल टच घुसडला आहे, त्यामुळे पहिल्या कडव्याशी सुसंगत वाटत नाही.