दोन कविता
अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं
एकदा मी मराठ्यांवर
विद्रोही कविता केली
महाराष्ट्रातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
मग मी गुजरात्यांवर
विद्रोही कविता केली
गुजराती अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
नंतर मी सरदारांवर
विद्रोही कविता केली
पंजाबी, हरियाणातील अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
मग मी चिडून हिंदी भाषिकांवर
विद्रोही कविता केली
उत्तरेतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
थोडसं सावरून तमिळींवर
विद्रोही कविता केली
तमिळनाडूतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
त्वेषाने तेलुगू लोकांवर
विद्रोही कविता केली
आंध्रा, तेलंगणातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
नंतर मी मल्याळींवर
विद्रोही कविता केली
केरळी अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
त्यानंतर बंगाली, ओरिया लोकांवर
विद्रोही कविता केली
तिथल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
शेवटी मी ईशान्येकडील लोकांवर
विद्रोही कविता केली
तिकडल्या अस्मितावाद्यांनी पण
मला ठोकून काढलं
सरतेशेवटी मी भारतीयांवर
विद्रोही कविता केली
एकदम सगळ्या सेक्युलरांनी
माझं कौतुकच केलं
मात्र राष्ट्रवाद्यांनी शोधून
मला ठोकून काढलं
- भूषण वर्धेकर
__________________________________
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे शोषितांसाठी लढले
कामगारांसाठी हाल सोसले
लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले
विळा हातोड्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे वंचितांसाठी लढले
दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले
निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले
अशोक चक्रांचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे वर्चस्वासाठी लढले
फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले
क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले
विजयी उत्सवाचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे स्वराज्यासाठी लढले
गुलामांना धर्माखाली बांधले
सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले
सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे समाजासाठी लढले
ऐहिक कल्याणासाठी टिकले
चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले
स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे सर्वांगीण विकासासाठी लढले
संधीसाधूंनी त्यांना मिरवले
ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले
सत्ताधीश बनून सरंजामीत रमले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे उपेक्षितांसाठी लढले
रोजीरोटीसाठी रक्त आटवले
समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले
अल्पसंख्यांक म्हणून राजाश्रित झाले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे ऐक्यासाठी लढले
एकात्मकेच्या हक्कासाठी घुसमटले
मुलभूत गरजांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत भिडले
ते जयंती, पुण्यतिथीतच अडकले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
____________________
भूषण वर्धेकर
२८ नोव्हेंबर २०२१
पुणे
____________________
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे शोषितांसाठी लढले
कामगारांसाठी हाल सोसले
लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले
विळा हातोड्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे वंचितांसाठी लढले
दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले
निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले
अशोक चक्रांचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे वर्चस्वासाठी लढले
फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले
क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले
विजयी उत्सवाचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे स्वराज्यासाठी लढले
गुलामांना धर्माखाली बांधले
सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले
सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे समाजासाठी लढले
ऐहिक कल्याणासाठी टिकले
चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले
स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे सर्वांगीण विकासासाठी लढले
संधीसाधूंनी त्यांना मिरवले
ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले
सत्ताधीश बनून सरंजामीत रमले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे उपेक्षितांसाठी लढले
रोजीरोटीसाठी रक्त आटवले
समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले
अल्पसंख्यांक म्हणून राजाश्रित झाले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे ऐक्यासाठी लढले
एकात्मकेच्या हक्कासाठी घुसमटले
मुलभूत गरजांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत भिडले
ते जयंती, पुण्यतिथीतच अडकले
ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
____________________
भूषण वर्धेकर
२८ नोव्हेंबर २०२१
पुणे
____________________
(लागोपाठ दोन धागे आल्यामुळे ते एकत्र केले आहेत. - व्यवस्थापन)
अस्मिता ह्या शब्दाचा अर्थ च
स्व अस्तित्व नष्ट होईल ह्याची तीव्र भीती आणि त्या मधून येणारी भावना म्हणजे अस्मिता.
ती कोणत्याच लॉजिक नी चुकीचं ठरवली तरी संबंधित लोक ते ऐकण्याच्या मन स्थिती मध्ये नसतात
अस्मिता नष्ट करण्याचा एक मेव मार्ग आहे देश नामक भू भागातील कोणत्याच समाज घटकाला आपले अस्तित्व धोक्यात आहे असे वाटून न देण्यासारखी स्थिती त्या भागात निर्माण करणे.
सर्व ..... माझे बांधव आहेत
हे तत्त्व ज्ञान आहे प्रॅक्टिकल आयुष्य मध्ये कूच कामी.