Skip to main content

चिंब

वृक्ष जसा
अंकुरण्या आधी
बीजस्वरूपी
अस्फुट असतो

बाण जसा
सुटण्याच्या आधी
प्रत्यंचेवर
सज्ज राहतो

मंत्र जसा
स्फुरण्याच्या आधी
बीजाक्षरी
निद्रिस्त राहतो

अर्थ तसा
उलगडण्या आधी
शब्दांच्या
निबिडात राहतो

ओथंबून मग
येतो अवचित
कोसळतो अन्
चिंब भिजवितो

माचीवरला बुधा Tue, 28/12/2021 - 01:50

वा!