Skip to main content

शेजारच्या काकवा गंमत ऐका

शेजारच्या काकू आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारत होत्या. शेजारच्या काकूंच्या मैत्रिणीचा जीव कुणावर तरी जडला आहे. त्याबद्दल मैत्रीण बोलायला लागली.

थर्मामीटर बर्फ हिम थंड

मैत्रीण - मला तो आवडतो, पण तो आवडतही नाही.
शेजारच्या काकू - एक पे रहना, आवडतो का आवडत नाही?
मैत्रीण - आवडतो, पण तो माझ्याशी बोलत नाही म्हणून मला तो आवडेनासा झालाय. म्हणजे आम्ही दोघे मॅग्नेट्स आहोत..
काकू - म्हणजे ते पिझोमॅग्नेट्स असल्यासारखं का?
मैत्रीण - नाही, नाही, दोन विरुद्ध ध्रुव आहोत आम्ही!
काकू - म्हणजे आकर्षण आहे हे मला समजलं. पण विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात. एकसारखे असले की दूर ढकलतात. तुम्ही कुठले ध्रुव आहात?
मैत्रीण - म्हणजे आम्ही विरुद्ध ध्रुवच आहोत, पण आकर्षण होत नाहीये?
काकू - म्हणजे मी तुला समजावते कसं ते! थोडं फिजिक्स समजून घे आता.
मैत्रीण - …
काकू - तुमचं चुंबकीय आकर्षण खूप आहे, पण ते कमी पडतंय गुरुत्वाकर्षणासमोर. तुमच्या लोखंडात चिकार माती मिसळल्ये, त्यामुळे ते पिझोइलेक्ट्रिक…
मैत्रीण - काय? काय पिझोइलेक्ट्रिक?
काकू - मला आठवत नाही. गूगल करून सांगू का?
मैत्रीण - नाही, नको. इथे आपली चांगली कविता लिहिणं सुरू आहे आणि तुला गूगल कसलं आठवतं?
काकू - बरं. तर ते वस्तुमान फार जास्त आहे त्यामुळे चुंबकीय आकर्षण असलं तरी मॅग्नेटं जागची हलत नाहीयेत.
मैत्रीण - हां, आता मी माझं वस्तुमान खूप वाढवते. म्हणजे गुरुत्वाकर्षणानं तो ओढला जाईल माझ्याकडे.
काकू - पण गुरुत्वाकर्षणात तुला उजवं-डावं करता येणार नाही! त्यात सगळेच येतील. फेसबुकवरचे फेमस लोकही येतील!
मैत्रीण - अरे यार! तुला गुरुत्वाकर्षणात चुंबकीय आकर्षण वाढवता येणार नाही का? एवढी गणित-गणित करत असतेस आणि साधी बेरीज नाही का करता येत तुला?
काकू - … प्वाईंट आहे. केमिस्ट्रीत करता का बेरजा?
मैत्रीण - तू आता इथे उपमांची सरमिसळ करत्येस. आपण चुंबकांपासून सुरुवात केली ना! मग फिजिक्समध्येच राहू या. ज्ञानशाखांची सरमिसळ नको करायला.
काकू - ज्ञानशाखा म्हणजे काय जाती आहेत का, की विजातीय विवाह नको?
मैत्रीण - अरे यार … तू पुन्हा लग्नापर्यंत पोहोचलीस. मी इथे आकर्षणाचा गुंता सोडवताना कंटाळल्ये!
काकू - ...
मैत्रीण - तुला काय झालं, बोलत का नाहीयेस?
काकू - मी तेवढ्यात गूगल केलं. मला डायमॅग्नेटिझम म्हणायचं होतं, पिझोइलेक्ट्रिसिटी निराळी. पण तुझ्याशी बोलताना खाण्यापिण्याच्या गोष्टी जास्त सुचतात.
मैत्रीण - शीः! पिझोवरून पिझा … घाणेरडी आहेस! मी तुला एवढं महत्त्वाचं काही सांगत्ये आणि तू एवढी थंड-कोरडेपणानं का बोलत्येस माझ्याशी? नवऱ्याशीसुद्धा अशीच वागतेस का?
काकू - हो. ही माझी राजकीय भूमिका आहे.
मैत्रीण - कशाबद्दल? यात कसली डोंबलाची राजकीय भूमिका?
काकू - ग्लोबल वॉर्मिंगला विरोध करायला पाहिजे म्हणून मी कायम, सगळ्यांशी थंड वागते.

सई केसकर Thu, 10/02/2022 - 19:45

फोन ठेवल्यावर मैत्रिणीने पिझा मागवला.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/02/2022 - 20:26

In reply to by सई केसकर

थंड पिझा चांगला लागतो का कसं?

'न'वी बाजू Thu, 10/02/2022 - 21:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Some like it hot, Some like it cold, Some like it in the pan nine days old...

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/02/2022 - 02:58

In reply to by सई केसकर

But if you have a broken ligament, you should do hot and cold.

मी शाकाहारी आहे हो! हे नळ्या फोडणं वगैरे काही मला माहीत नसतं.