आक्रीत
सापशिडीच्या डावात
माझ्या घडते आक्रीत
शिड्या गिळतात साप
आणि टाकतात कात
बुद्धिबळाच्या डावात
माझ्या घडते आक्रीत
राजा पांढरा, करतो
काळ्या रंगावर प्रीत
घडे आक्रीत तसेच
माझ्या जगण्यात रोज
वास्तवाच्या कोलाहली
कानी अतर्क्याची गाज
चर्चाविषय
चर्चा विषय
उत्स्फूर्तता - एक यशस्वी जीवनाचा निकष
उत्कांतीमध्ये जे अनेकानेक घटक 'फिट' होण्याच्या स्पर्धेत असतात त्यांच्या कृतीमध्ये एक उत्स्फूर्तता असते. ही उत्स्फूर्तता त्यांच्या काल-अक्षावर टिकून रहाण्याशी संबंधीत असते. घटकांमधील एखादा वैयक्तिक पातळीवर काही निराळी उत्स्फूर्तता असणारा शक्य आहे. आणि सहसा हा उपघटक सरासरी घटकांइतका टिकणारही नाही. सर्वांची सामायिक उत्स्फूर्तता त्या समावेशक घटकाची उत्स्फूर्तता ठरेल. असो. हे मानवासाठीही खरे आहे. फरक एव्हढाच आहे की माणसाला सामायिक घटक टिकून राहण्यासाठी काय करायला हवे याची जाणीव आहे. त्यामुळेच उपघटकांना वैयक्तिक उत्स्फूर्तता बाजूला ठेवणे, त्याग करणे भाग पडते. आणि इथेच आपला चर्चा विषय सुरु होतो.
येथे एक गृहीतक मांडावयाचे आहे. ते असे. “मानवाचा एक वैयक्तिक उपघटक म्हणून जो कोणी त्याची विशेष उत्स्फूर्तता जीवनभर वापरू शकतो त्याचे जीवन यशस्वी गणले जावे.” अशी विशेष उत्स्फूर्तता ज्याच्या कार्यात नाही तो साहजिकच मानव घटकाची सरासरी उत्स्फूर्तता अमलात आणतो पण त्याला विशेष यशस्वी ठरवण्याचे काहीच कारण नाही. हा विषय व्यापक असल्याने उदाहरणे उद्धृत करण्याची आवश्यकता नाही; विशेषतः 'ऐसी'च्या वाचकांना.
वसंत साठये
ही मात्र
तुमच्या कविता सहसा उत्तम असतात, पण ही मात्र जमली आहे असं वाटत नाही.