Skip to main content

अनिल कार्की यांच्या कविता

परवा परवा कविताकोश डॉट ऑर्ग साईटवरती 'अनिल कार्की' यांच्या 'रमोलिआ-१', 'उदास वख्त के रमोलिआ', आणि 'पहाडोंपर नमक बोती औरते' या व इतर कविता सापडल्या. साईटवरील, माहीतीनुसार, उत्तरखंड भागातील, एका गावी या कविचा जन्म झालेला आहे. पहील्यांदा भेदक वाटली ती या कवितांमधील भाषा. हिंदी पण प्रादेशिक बोली भाषेचा प्रभाव. कवितांमधील, शब्दाश्बदांतून, अक्षरक्ष: 'मिट्टी की सौंधी खुशबू' म्हणतात तसा भास होतो. खूपसे लोकजीवन, रीतीरिवाज या कवितांमधून लक्षात येते.

ए हो
मेरे पुरखो
खेत के हलिया [हल चालवणारा]
आँगन के हुड़किया[ हुडुक नावाचे वाद्य वाजविणारा]
आँफर[हत्यार बनविण्याची, हत्यारांना धार लावण्याची जागा] के ल्वार[ लोहार]
गाड़[ लहान नदी] के मछलिया[कोळी]
ढोल के ढोलियार[ढोल वादक]
होली के होल्यार[होळी गायक12]
रतेली[विवाह प्रसंगी नौटंकी करणाऱ्या वरपक्षाच्या स्त्रिया] की भौजी
फतोई[पहाडी बास्केट] के औजी
जाग जाग
मेरे भीतर जाग!

.
जसे लोकजीवन लक्षात येते तसेच या लोकजीवनाचा ऱ्हास होत चालला आहे, हेही लक्षात येते. कविने तेथील लोकांचाच तळतळाट, या कवितांमधुन व्यक्त केलेला आहे. बाप रे! शिव्या शापांची भाषा अतिशय उद्वेगी, आहे, मग त्यात कोणताही खोटा मुलामा नाही की सौम्यता नाही. मला पहील्यांदा वाचल्यावर ती भाषा शापवाणी आणि पोट ढवळून काढणारी वाटली होती. डार्क आणि ताकदवान वाटलेली.

तेरी गुद्दी[मेंदू1] फोड़ गिद्द खाए
तेरे हाड़ सियार चूसे
चूहे के बिलों धंसे तेरे अपशकुनी पैर
लमपुछिया[लांब शेपूटवाले] कीड़े पड़े तेरी मीठी जुबान में
तेरी आँखों में मक्खियाँ भनके
आदमी का ख़ून लगी तेरी जुबान
रह जाए डुंग[दगड] में रे!
नाम लेवा न बचे कोई तेरा
अमूस[अमावस्या] का कलिया
रोग का पीलिया
मार के निशान का नीला
ढीली हो जाय तेरी ठसक दुःख से

नक्की कोणाला उद्देशून हा तळतळाट आहे ते कळले नाही. पण एकंदर निसर्गाचा ऱ्हास अन्य काही सामाजिक समस्या या शापवाणीच्या तळाशी आहेत.

ए हो मेरे पुरखो
जागो जागो रे
मेरे भीतर जागो
इस बखत के बीच में

किंवा,

जै हो!
इस बखत की संध्या में
इस बखत की अमूसी रात की चाँख[दृष्ट] लगी है
तेरह बरस का राज्य
तेरह बरस का बछड़ा
बिज्वार[बैल] नहीं बनेगा
कौन मलेगा रे उसकी उगती जुड़ी पर तिल का तेल

करणी, जादूटोणा अशा प्रकारांची आठवण करुन देणारी, ही कविता खूप खूप डार्क जॉनरमधली, शाबर मंत्र वगैरे सारखी एकदम आदिवासी भाषा वाटली, जिला एक नाद आहे, जी काळजाला घरे पाडते, आपल्या आरामदायक शहरी मनाला जिची भीती वाटते.
.
'पहाड़ों पर नमक बोती औरतें ' या कवितेत मात्र वाचकांपुढे, मुख्यत्वे, स्त्रीजीवन येते. पहाडी स्त्रिया, पर्वतांवर जाउन, मीठ टाकून का येतात त्याचे वैद्न्यानिक कारण कळत नाही पण तशी काहीशी लोक-प्रथा दिसते. 'पलटनिया पिता-1', 'पलटनिया पिता-२' आदि कवितांमधून अजुन एक जीवनाचा पैलू लक्षात येतो तो म्हणजे, येथील पुरुष सैन्यात भरती होतात.'शेरपा' नावच्या कवितेत दु:ख मांडलेले आहे की या शेरपांनीच ज्यांना वाटाड्या या नात्याने वाट दाखविली, तेच लोक आता या जमातीला लुटत आहेत.
.
नेटवरती शोधून कवि 'अनिल कार्की' यांच्याबद्दल फारशी माहीती मिळाली नाही. हे एक युवा, उदयोन्मुख कवि असावेत. एखाद दुसरी कविता फेसबुकवरही सापडली.

चीख रहे हैं बीज
रो रही हैं झांड़ियां
असहाय बेलें
लड़खड़ाती
गिर रहीं धरती पर
जिसे डुब जाना है
एक दिन

उदास सावट असलेल्या या कविता, नेपाळ, उत्तरखंडमधील सामाजिक प्रश्न अधोरेखित करतात.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

सामो Wed, 01/04/2020 - 09:08

http://kavitakosh.org/kk/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%…
जयप्रकाशा कर्दम या कविच्या कविता, दलित रचना , या श्रेणीखाली वाचायला मिळाल्या. खूप वेदना आहे, विद्रोह, आक्रोश आहे या कवितांमध्ये. तसेच सामाजिक, विशेषत: रुढींविरुद्ध लिहीलेले आहे. शिक्षणानेच सामाजिक स्तर उंचाउ शकेल, अशी दिशा आहे.
कविता आवडल्या. कविची माहीती वाचली. कविस, आंबेडकरांबद्दल आदर व आत्मियता आहे. बरेच लेख आहेत जालावरती.
प्रत्यक्ष ईश्वरालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे -

ईश्वर, तेरे सत्य और शक्ती को
मै अब जान गया हूं
तेरे दलालोंकी कुटीलता
और कमीनेपनको भी
पहचान गया हूं
शुक्र है तू कहीं नही है
केवल धर्म के धंधे का
एक ट्रेड नेम है
अगर सचमुच तू कही होता
तो सदीयोंकी
अपनी यातना का हिसाब्
मै तुझसे जरुर चुकाता

आरक्षणाच्या संदर्भात, कविचे विचार -

क्या मंदीरोंकी मोटी कमाई पर
ब्राह्मणोंका एकाधिकार उचित है?
क्या गैर-सरकारी संस्थानोमे
केवल सवर्णोंका नियमन उचित है?
क्या यह सब आरक्षण नही है
फिर मेरे आरक्षण का विरोध क्युं?

साभार - https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/123911/9/09_chapter%…

पुंबा Thu, 03/03/2022 - 20:43

In reply to by सामो

तुम्ही अदम गोंडवी या कविच्या कविता वाचल्या आहेत का?
त्या साईटवर अनेक मिळतील.
चार दिन फुटपाथ के सायें मे रहकर देखिये
डुबना आंखो के सागर मे बहुत आसाँ है जनाब!

आणखी एक 'मै चमारों की गली मे ले चलुंगा आपको' ही दीर्घकविता. अतिशय भेदक, दाहक असे काव्य! माझे खुप आवडते कवि आहेत.

सामो Wed, 27/12/2023 - 20:14

निदा फ़ाज़ली

पिघलता धुआँ ही कविची आठवण आहे. या आठवणीतील घराचे आंगण हे सफरचंदाच्या झाडांनी सुशोभित आहे, घरापाशी एक तळे आहे. मला वाटते कविचे घर काश्मीरमध्ये होते.

ही फ़ातिहा नावाची नज्म तर इतकी सुंदर आहे. माणुसकी शिकवण्याकरता कवि जन्म घेतात.
फातिहा म्हणजे - मृतकों की आत्मा की शांति के लिए, पवित्र क़ुरआन की प्रथम सूरत (अध्याय)
कवि म्हणत आहेत कबरी वेगवेगळ्या असतील पण प्रत्येक मृतात्म्याच्या विरहात, दु:खी-कष्टी हृदय तर एकच असते कधी कोण्या आईचे तर कधी बापाचे, मुलाचे, प्रेयसीचे. मग फातिहा कोणत्याही कबरीपुढे वाचल्याने काय फरक पडतो बरं. एकाच दु:खावरती घातलेली ती फुंकर आहे.

छोटी सी हँसी

फ़क़त चंद लम्हे ही एक सुरेख नज्म आहे. बस यायला अवकाश आहे. कवि आणि एक मुलगी/स्त्री बसस्टॉपवरती उभे आहेत. दोघेही अपरिचित पण कवि संभाषण करु इच्छितो. का नाही? दोन अपरिचितांनी एकमेकांशी शब्दही बोलू नये असे काही असते का? कधीकधी तिर्‍हाईत व्यक्तीशी बोलून एक सुकून (शांती) मिळतो कारण तिर्हाईत व्यक्ती नॉन-जजमेन्टल असते. आपल्याला घरच्या-दारच्या कटकटी विसरुन , २ क्षण घालवता येता. हे वैश्विक सत्य आहे.