एका स्त्रीवादी बाईचा महिला दिवस
सकाळी सकाळी मोबाईलवर आलेले प्रमोशनल मेसेजेस वाचून एक स्त्रीवादी बाई फारच वैतागली. मेसेज होता एका ऑनलाइन शॉपिंगच्या सेल संदर्भात. महिला दिनानिमित्त किचन एप्लायन्सेसवर भरघोस सूट. दुसरा मेसेज होता साड्यांच्या सेलबद्दल. त्यातील एक वाक्य होते. 'वुमेन इन सारीज् लूक्स मोअर ट्रेडिशनल. हॅप्पी शॉपिंग'
सकाळीच असे मेसेजेस वाचल्यावर बाईंचे पित्त खवळले. बातम्या बघण्यासाठी टिव्ही लावला तर स्त्रीया आता पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात आघाडीवर वगैरे बाबतीत चर्चा चालू होत्या त्यात फक्त अँकर बाई होती आणि चर्चेसाठी बोलावलेल्या पॅनलवर पाचपैकी एकच स्त्री होती. बाकीचे चार म्हणे फेमिनिस्ट मेल होते. हे बघून बिचारी स्त्रीवादी एकदम फेमिनाझी झाली. 'फ' वर्गातील आंग्ल शिवी हासडून टिव्ही बंद करून मोबाईलवर स्क्रोल करू लागली. व्हॉट्सऍप ग्रुपवर वुमेन्स डे निमित्ताने येणाऱ्या पानाफुलांच्या, कवितांच्या, इमोजींच्या, सुविचारांच्या गराड्यात गोंधळून गेली. फेसबुकवर टॅग केलेल्या मैत्रिणींच्या नवऱ्यांच्या पोस्टींचा महापूर पाहून 'एक्स'च्या पोस्टवर थबकली.
आपल्या एक्सला बायको म्हणून काकूबाई घर सांभाळण्यासाठी पाहिजे होती आणि तशी त्याला भेटली होती हे पाहून मनातून कासावीस झाली. मग आवरून लाडक्या 'पेट' ला घेऊन मॉर्निंग वॉकला निघाली. बाईंनी मुद्दाम कुत्राच पाळला होता आणि नाव पण एक्सचेच दिले होते. खुन्नस. तसंही पोरं ब्रेकअप झाल्यावर कुत्री पाळून तिला आपल्या एक्सचे नाव देतात. मग महिलांनी का मागे रहायचे! कुत्र्याची रपेट झाल्यानंतर बाईंची व्हेजिटेबल स्मुदी आणि वर्क फ्रॉम होम सेटअप रेडी झाला. लॉगिन केल्यावर एच.आर. चे वुमेन्स डे स्पेशल व्हाउचर्स, ग्रिटींग आणि मिटिंग इन्व्हीटेशन्स धडधडायला सुरुवात झाली. मग दिवसभर आळोखेपिळोखे देत स्टँड अप, स्टेटस मिटिंग, सेशन्स, एक्सेल शीट्स, जीरा टिकिट्स, ब्रेन स्ट्रॉमिंग डिस्कशन्स, कॉफी ब्रेक, लंच ब्रेक, वामकुक्षी, घरच्यांसोबत बोलणं, लग्नासाठी तुणतुणे वादविवाद, दिवसभराची कामे वगैरे सगळे सोपस्कर झाले. राहत असलेल्या सोसायटीची आज खास महिला दिना निमित्त खास महिलांनी महिलांसाठीच पुरुषांच्या पुढाकाराने टेरेस डिनर इव्हेंट पार पडला. सभासदांनी नसती केली तरी चालली असती अशी भाषणे फेकून मारली. घिसेपिटे हास्य विनोद. गॉसिप करताना कोंडलेल्या एकमेकींच्या इच्छा, आकांशा आणि वेदनांना मोकळी वाट मिळाली. इथे स्त्रीवादी बाई थोड्या आयसोलेटच होत्या.
सोसायटीच्या इव्हेंटमध्ये नटूनथटून येणाऱ्यांचा बाईंना विशेष एलर्जी. बाई स्वतः टॉमबॉय प्रमाणे वावरतात. बुलेट वापरतात. विकेंडला हँगआऊटला जातात. महिन्यात किमान डझनभर ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सिरिज संपवतात. घरच्यांचा आग्रहाखातर सणासुदीला गावी जातात. महिन्या दोन महिन्यांतून एकदा भावाच्या घरी जाऊन भाच्च्यांसोबत दंगामस्ती करतात. वर्षातून एकतरी लॉंग बाईक राईड फिनिश करतात. थोडक्यात मनाला हवं तसं जगतात म्हणून महिला दिनानिमित्त होणाऱ्या मच हायपर सेलेब्रेशन्स इव्हेंट्सचा तिटकारा करतात. पुर्वीसारखी आता नातलग, मित्रमैत्रिणींचे लग्न समारंभ उत्साहात साजरा करत नाहीत. स्वतःच्या स्पेसमध्ये गुरफटून जगाची निरिक्षणे नोंदवत बसतात. कधीतरी घरातून फारच पिच्छा पुरवला तर एखादे शनिवारी लग्नासाठी म्हणून पाहिलेल्या मुलासोबत कॉफी प्यायला जड मनाने पोचतात. मग इकडच्या तिकडच्या साचेबद्ध गप्पा. फ्युचर, पार्टनर, आवड निवड, नोकरी वगैरेंच्या चोथट चर्चा होतात. कधी इकडून नकार तर कधी तिकडछन नकार यातच वयाची वर्षे वाढत जातात. मग पुन्हा तोच प्रपंच स्वतः स्वतःसाठी स्वतःपुरता केलेला रहाटगाडगे चालवण्यासाठी.
©भूषण वर्धेकर
८ मार्च २०२२, पुणे
ललित लेखनाचा प्रकार
स्त्रीवाद म्हणजे नक्की काय
हेच भारतीय स्त्री वादी स्त्रियांना माहीत नाही
पूर्ण फसलेली ही चळवळ आहे
पुरुषी कपडे वापरणे,पुरुषांचा द्वेष करणे पण त्यांचीच मदत घेवून जीवन जगणे,कौटुंबिक कलह निर्माण करणे
आणि स्त्रीचे आतोनात नुकसान करणे.
हाच प्रकार भारतात तरी स्त्री वादी स्त्रिया करत आहेत
समाजात त्यांना काहीच किँमत नाही.
म्हणून त्या एकाकी आणि सैर भैर असतात.
I don't know
काकांना नक्की काय म्हणायचं आहे (म्हणजे मूळ काकांना. नबा काकांना नाही).
पण स्वैराचारी स्त्रीवादी स्त्रिया जे विकेंडला करतात त्याला hangout म्हणत नाहीत. "Let's hangout" असंही हल्ली कुणीच म्हणत नाही. Hangout ला जातात असं "अंघोळीला जातातच्या" चालीवर तर अगदीच म्हणणार नाहीत.
लानत म्हणजे धिक्कार.
आणि मी संसारी स्त्रीवादी आहे. मला सगळ्यांचं करून उरलेल्या वेळात स्त्रीवाद करता येतो. So, आपला पास!
हँगआऊटला जातात हे त्याच धर्तीवर आहे.
वॉश घेऊन फ्रेश बनून येतो.
आत्ता जस्टच आलोय
टर्निंग ला वळून ये
अशी कित्येक इंग्रजी शब्दांचा वापर मराठीत हल्ली बोलीभाषेप्रमाणं केला जातो.
आजकाल नवनिर्वाचित उच्चभ्रू व्यवस्थेत चंचुप्रवेश करणारी एक पिढी अनुकरण की अंधानुकरण याच्या गर्तेत असते आणि शोऑफ करताना आम्ही कस्से पुढारलेलो आहोत असं दाखवलं जातं.
Mansplaining
हेच भारतीय स्त्री वादी स्त्रियांना माहीत नाही
पूर्ण फसलेली ही चळवळ आहे
पुरुषी कपडे वापरणे,पुरुषांचा द्वेष करणे पण त्यांचीच मदत घेवून जीवन जगणे,कौटुंबिक कलह निर्माण करणे
आणि स्त्रीचे आतोनात नुकसान करणे.
हाच प्रकार भारतात तरी स्त्री वादी स्त्रिया करत आहेत
समाजात त्यांना काहीच किँमत नाही.
म्हणून त्या एकाकी आणि सैर भैर असतात.>>
याला म्हणतात मॅन्सप्लेनिंग. स्त्रीवाद्यांनी काय करायचे, काय नाही, त्याच्या फायद्याच्या गोष्टी कोणत्या हेही पुरूष शिकवणार.सैरभैर स्त्रीवाद्यांनी हे नक्कीच असैरअभैर पुरूषांकडून शिकावे.
अवांतर- एकदा आमच्याकडे एका मुस्लिम द्वेष्ट्या स्टाफने दुसऱ्या मुस्लिम स्टाफला म्हटलं होतं, “तू कैसा रे मुसलमान, सादा पाच बार नमाज नै पडता तू!”
मी सहज लिहिले आहे.
जे निरिक्षण केले ते टिपले.
स्त्रीवादाबद्दल बरीचशी मतमतांतरे आहेत. एकूण फेमिनिस्ट आणि फेमिनाझी महिलांना त्यांच्या कंपूमध्येच महत्त्व दिले जाते. सार्वजनिक सामाजिक जीवनात स्त्रीवाद्यांचा फारसा प्रभाव नसतो. शहरी महिलांच्या ढोबळ व्यवस्थेत त्यांना बऱ्यापैकी मान्यता आहे.
दुर्दैवी!
बाकी माझ्या मैत्रिणींना आणि काही मित्रांनासुद्धा आजच्या दिवशी चॉकलेट देते.
अत्यंत दुर्दैवी शब्दयोजना!
प्रस्तुत चित्रा(तील व्यक्ती)च्या संदर्भात ‘चॉकोलेट’ हा वाक्प्रयोग, अत्यंत offensive if not downright racist मानला जाऊ शकतो (irrespective of your actual intent), हे मी तुम्हाला सांगावे लागेल, ही अपेक्षा नव्हती. माय बॅड.
असो. होते असे कधीकधी.
आवांतर ---
आवांतर ---
फक्त अधुनिक जीवनशैली स्वीकारून जगते म्हणजे ती स्त्री स्वतंत्र झाली असे म्हणणे बरोबर नाही. अत्याधुनिक केशभूषा, वेषभूषा करणाऱ्या उच्चशिक्षित, बुद्धिमान स्त्रीया -- मानसिक दृष्ट्या किती मागासलेल्या असतात हे नेहमीच पाहण्यात येते.
या उलट स्त्री स्वातंत्र्य, महिला मुक्ती इत्यादीबद्दल कधीही न बोलणाऱ्या, सर्व सामान्य स्त्री प्रमाणेच जगणाऱ्या स्त्रीया, अधुनिकता , व्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी सहजपणे आचरणात आणताना देखिल नित्यनेमाने दिसून येते.
अर्थात ही दोन टोकाची उदाहरणे आहेत. मला फक्तं इतकेच म्हणायचे आहे की,
'दिसण्या' पेक्षा 'असणे' महत्वाचे आणि खरे असते.
हे जेव्हा मान्य केले जाईल... तो सुदिन!
लेख विषयी ---
हा लेख बहुदा उपहासात्मक आणि विनोदी म्हणून लिहिला असावा. त्यावर भाष्य न करणे उत्तम.
संधींची समानता, लिंगाधारित
संधींची समानता, लिंगाधारित भेदभाव नको, स्त्रियांना काही बाबतीत विशेषाधिकार, कायद्याचे संरक्षण असावे अश्या निदान काही मूल्यांवर तरी स्वयंभूंचा विश्वास आहे का? कि तितकीही स्त्रीमुक्ति त्यांना मान्य नाही? असे मला विचारायचे होते.
माझ्या मते अशी गरळ ते सगळ्याच पुरोगामी चळवळीबद्दल ओकत असतात. नक्की का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अर्थातच मान्य आहे.
मात्र दिल्या गेलेल्या कायद्याचा आणि संरक्षणाचा गैरवापर झाला तर त्यावर स्त्रियांकडून कडक टिकाटिप्पणी व्हायला हवी. जस्टीफायेबल करतात ते चुकीचे.
मी गरळ ओकत नाही. विसंगती वर लिहितो. जे जे ढोंगी दिसते त्यावर व्यक्त होतो. ज्या पुरोगामी चळवळीकडे कॉलेजमध्ये असता आकर्षित झालो होतो कारण एक वैचारिक चळवळ म्हणून काहीतरी विधायक आणि विवेकी वाटत होतं. नंतर त्यांच्यातील विरोधाभास, ढोंगीपणा आणि सोयीस्कर प्रोपागंडा दिसू लागला. याच्यावर खूप काही लिहिता येईल.
उदाहरणार्थ एक गोष्ट सांगतो. कधीकाळी प्रियांका चोप्रा नामक अभिनेत्रीने वक्तव्य केले होते की मला फक्त पुरुष मूल जन्माला घालण्यासाठीच लागेल. संदर्भ
आता यावर तमाम स्त्रीवादी कार्यकर्ते, समर्थक तिच्या धाडसीपणाचे कौतुक करत होते. मग समजा हेच वाक्य जर उद्या कोणी सेलेब्रिटी पुरुषाने केले असते तर त्याच्यावर कुजकट पुरुषी मानसिकतेचा धब्बा लावला असता.
माझं मत दोन्ही गोष्टीत स्त्री फक्त मुलांना जन्म घालण्यासाठी आहे असे का उल्लेखले ?
दोन्हीबाजूचा एकच दृष्टिकोन. तेच जर एखाद्या स्त्रीने मी जे मिळवलय स्वकर्तुत्वाने ते सहजासहजी कोणी मिळवू शकणार नाही हे असं वक्तव्य करणं संयुक्तिक वाटते स्त्रीसक्षमीकरणाच्या दृष्टीने.
अशा सुपरफिशियल स्त्रीवाद्यांच्या तऱ्हा चळवळ कमकुवत करतात.
कायद्याचा गैरवापर
मात्र दिल्या गेलेल्या कायद्याचा आणि संरक्षणाचा गैरवापर झाला तर त्यावर स्त्रियांकडून कडक टिकाटिप्पणी व्हायला हवी. जस्टीफायेबल करतात ते चुकीचे.>>>>> कायद्याच्या लढाईत कायदे व फायदे आपल्या बाजूला वळवून घेण्याची प्रवृत्ती प्रत्येक घटकात असते. स्त्रीत्वाचे भांडवल करणार्या स्त्रिया आहेत पण ते जस्टीफाय न करणार्या स्त्रिया ही आहेत. मधुसापळ्यात स्त्रीत्वाचे हत्यार वापरले जाते.त्यात भले भले अडकतात. पण तसे अडकणे हे नैसर्गिक आहे. पुरुषांच्या स्त्रीविषयक असलेल्या लैंगिक भावनांबद्दल शास्त्रीय विश्लेषणासाठी आपण सेक्सायन हे निरंजन घाटे यांचे पुस्तक जरुर वाचा. स्त्री पुरुष संघर्ष व पुरकता या दोन्ही गोष्टी चालूच राहणार आहेत. स्त्रियांकडून होणार्या कायद्यच्या गैरवापराबद्दल अनेक विवेकी स्त्रियांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. विद्या बाळ ही नंतरच्या टप्प्यात घ्यायच्या. स्वयंभू विषय लै मोठा आहे. तुम्हाला राजीव सान्यांनी मांडलेल्या भुमिकेविषयी स्वतंत्र प्रतिसाद लिहितो.
स्त्रियांनीच टिप्पणी करायलाच
स्त्रियांनीच टिप्पणी करायलाच पाहिजे असे का बुवा ? कायद्याच्या गैरवापराचे समर्थन करू नये हे समजते. पण प्रत्येक व्यक्तीने सगळ्याच चळवळी करायला हव्यात असे तर नाही ना ?
कुठे झाले आहे "कायद्याच्या established गैरवापराचे समर्थन"?
झाले असल्यास असे समर्थन किती लोकांनी केले आहे ? जे समर्थन त्या चळवळीचे मत आहे का ? या प्रश्नांची उत्तरे काय आहेत हे शोधल्याशिवाय टिप्पणी होत आहे.
चळवळीशी संबंध जोडणे चूक.
व्हिक्टिम कार्डचा वापर झाला तर स्त्रीयांनी त्यावर आक्षेप घेणं महत्त्वाचे. नाहीतर त्याचा साधन म्हणून चळवळीची बदनामी केली जाते.
थोडंसं अवांतर - एखाद्या प्रेमविवाह झालेल्या दांपत्यामध्ये नवऱ्याने जर बायकोचा खूण केला तर कायदेशीर कारवाईने गुन्हेगार पकडून शिक्षा केली जाते. यात स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या अग्रभागी असतात स्त्रीला आणि कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. आता ह्याच उदाहरणात जर स्त्री हिंदु असेल नवरा मुस्लिम असेल सगळेच संदर्भ बदलतात. लागलीच लव्हजिहाद वर येतो. मग अशा पिडित लोकांसाठी किती स्त्रीवादी लोकांनी आवाज उठवून आरोपींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केलाय? हिंदुत्ववादी पाठपुरावा करतात कारण त्यांचं ते साधन असतं. अशावेळी स्त्रीवादी लोकांची ठोस भूमिका महत्त्वाची असते.
चळवळीशी संबंध जोडणे चूक.
व्हिक्टिम कार्डचा वापर झाला तर स्त्रीयांनी त्यावर आक्षेप घेणं महत्त्वाचे. नाहीतर त्याचा साधन म्हणून वापर होतो आणि चळवळीची बदनामी केली जाते.
थोडंसं अवांतर - एखाद्या प्रेमविवाह झालेल्या दांपत्यामध्ये नवऱ्याने जर बायकोचा खूण केला तर कायदेशीर कारवाईने गुन्हेगार पकडून शिक्षा केली जाते. यात स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या अग्रभागी असतात स्त्रीला आणि कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. आता ह्याच उदाहरणात जर स्त्री हिंदु असेल नवरा मुस्लिम असेल सगळेच संदर्भ बदलतात. लागलीच लव्हजिहाद वर येतो. मग अशा पिडित लोकांसाठी किती स्त्रीवादी लोकांनी आवाज उठवून आरोपींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केलाय? (केला असेल तर मला माहित नाही) हिंदुत्ववादी पाठपुरावा करतात कारण त्यांचं ते साधन असतं. अशावेळी स्त्रीवादी लोकांची ठोस भूमिका महत्त्वाची असते.
स्त्री सक्षमीकरणासाठी जे गरजेचं ते झालेच पाहिजे.
रामतीर्थकर बाई तिखट आणि सडेतोड बोलणाऱ्या होत्या. त्यांचे स्त्रीयांनी अमुकतमुक पद्धतीने वागले पाहिजे तरच कुटुंबातील कलह होणार नाहीत वगैरे लॉजिक मला पटत नाहीत.
स्त्रीने कसे वागावे हे तीने ठरवावे पण अनुकरण आणि अंधानुकरण याच्यात फसू नये. स्वैर असणं आणि मुक्त असणं यातला फरक नेमकेपणाने ओळखता आला पाहिजे.
प्रमाणपत्राची गरजच काय?
नेमकेपणा म्हणजे अशी कृती करा की जीचा संबंध स्त्रीवादाशी जोडला तर चळवळीला गालबोट लागू नये. 'आम्ही स्त्रीवादी आहोत ' म्हणून तुम्ही असे वागावं की त्याने निगेटीव्ह क्राऊड सायकॉलॉजी तयार होऊ नये. उदाहरणार्थ व्यसने करावीत पण त्याचा संबंध आम्ही मुक्त आहोत म्हणून आमच्या वर कसलेही बंधन नाही म्हणून व्यसने कयतो असा समज तयार होणे. याचा परिणाम 'पुढारलेल्या स्त्रिया व्यसने करतात' वगैरे नॅरेटिव्ह सेट होऊ लागते. व्यक्तीगत आयुष्यात जे वागणं आहे त्याचा स्त्रीवादाशी लागलीच संबंध लावला जातो.
स्त्रीपुरुष समानता आणि मुक्त विचार हा गाभा आहे मूळ स्त्रीवादी चळवळींचा. मात्र स्त्री पुरुषांची बरोबरी स्वैर वागणे असे हर्ड बिहेविअर पसरले गेले.
अं?
चळवळीला गालबोट कुणामुळे लागतं? मुळात स्त्रीवादी चळवळ म्हणजे नक्की काय आहे सध्या?
तुम्ही म्हणता व्यसनं वाईट, म्हणून बायकांनी व्यसनं करायची नाहीत, कारण स्त्रीवाद बदनाम होतो. यात स्त्रीवाद किंवा बायकांपेक्षा तुम्ही अज्ञ आहात असा दोष मला दिसतो. व्यसनं वाईट हे ठरवणारे तुम्ही कोण? व्यसन हा मानसिक विकार असतो अशा प्रकारची संशोधनं आता अनेक डॉक्टर मान्य करत आहेत. आणि मानसिक विकारांसाठी तुम्ही अजूनही गेल्या शतकातच राहून, बायकांना आणि स्त्रीवादाला बदनाम करणार! वा रे वा!!
…
I may not necessarily agree with him, परंतु मला वाटते त्यांचा मुद्दा थोडा वेगळा असावा. व्यसने करावीत/करू नयेत, किंवा व्यसने चांगली/वाईट, यांपैकी ते काहीही म्हणत नसावेत. फक्त, समाजात जोवर व्यसनांकडे negatively पाहणारा वर्ग आहे, तोवर, तुम्ही व्यसने केलीत (जो तुमचा वैयक्तिक मामला आहे), आणि ‘मी स्त्रीवादी आहे म्हणून मी व्यसने करते’ अशी जर मांडणी केलीत, तर त्यातून काही जणांना चुकीचा संदेश जाऊन चळवळीची नाहक बदनामी तथा चळवळीचे नुकसान होऊ शकते; सबब, व्यसने केलीत, तर या (असंबद्ध) गोष्टीचा संबंध जाहीरपणे स्त्रीवादाशी लावून चळवळीचे नुकसान करू नका, असे काहीसे मला वाटते त्यांचे प्रतिपादन असावे.
(आता, प्रत्यक्षात अशी मांडणी कोणी करते का, की हा निव्वळ स्वयंभूंचा भ्रम आहे, हा वेगळा मुद्दा. परंतु, त्यांच्या प्रतिपादनाचा मथितार्थ एवंगुणविशिष्ट असावा, इतकेच.)
अं? #२
म्हणजे लोक अडाणीपणातून काय वाट्टेल ते समज करून घेतात म्हणून स्त्रीवाद्यांनी करुणा आणि विज्ञान दोन्ही सोडून द्यायचं, आणि व्यसनाधीन लोकांना समजून घेण्याजागी नाकारायचं? का, तर मठ्ठ लोकांनी स्वीकारावं म्हणून?
बाय द वे, ही सध्याची स्त्रीवादी चळवळ म्हणजे नक्की काय असतं?
.
म्हणजे लोक अडाणीपणातून काय वाट्टेल ते समज करून घेतात म्हणून स्त्रीवाद्यांनी करुणा आणि विज्ञान दोन्ही सोडून द्यायचं, आणि व्यसनाधीन लोकांना समजून घेण्याजागी नाकारायचं?
व्यसनाधीन लोकांना समजून घेण्याचा, त्यांच्याप्रति करुणेचा आणि/किंवा विज्ञानाचा त्यांच्या प्रतिपादनाशी मला वाटते संबंध नसावा. मुळात ते ‘स्त्रीवादी (तिऱ्हाईत असलेल्या) व्यसनाधीनांशी कसे वागतात (किंवा त्यांनी त्यांच्याशी कसे वागावे’ याबद्दल बोलत नसून, ‘(काही) स्त्रीवादी (स्वतः) व्यसनाधीन असतात, नि (स्वतःच्या) व्यसनाधीनतेचे समर्थन “मी स्त्रीवादी आहे, म्हणून मी व्यसने करते,” अशी मांडणी करतात’ या अॅझम्प्शनखाली, 'त्यांनी तशी मांडणी करू नये' असे प्रतिपादन करीत आहेत, अशी माझी समजूत आहे. (या अॅझम्प्शनला आधार काय, ते मला विचारू नका. त्या शेंगा मी खाल्लेल्या नाहीत.)
ही सध्याची स्त्रीवादी चळवळ म्हणजे नक्की काय असतं?
ते मला काय ठाऊक? कदाचित तेच सांगू शकतील.
थांबायचं?
स्त्रिया म्हणतात की त्या स्त्रीवादी असल्यामुळे व्यसनं करतात, हे वैज्ञानिक आणि/किंवा स्त्रीवादी सत्य आहे असं कसं मानायचं? स्वयंभू - जे स्वतः स्त्री नाहीत, स्त्रीवादीही वाटत नाहीत - म्हणतात म्हणून?
आपण आता असं करू ... मानसिक विकार समजल्या गेलेल्या व्यसनांबद्दल स्वयंभू एवढे हळवे का, याबद्दल तेच काय म्हणतात याची वाट बघू! शिवाय स्त्रीवादी चळवळ म्हणजे सध्या नक्की काय असतं, याचंही उत्तर मला त्यांच्याकडून हवं आहे.
स्त्रीवादी चळवळ म्हणजे स्त्रीचे शोषण होण्यापासून रोखणे.
कारण गुलाम करण्यासाठी शोषण केले जाते. गुलामी आणि शोषण हे समप्रमाणात असतात नेहमी.
स्त्रीवादी चळवळीवर लिहायचं ठरवलं तर समाजसुधारणा करणाऱ्या लोकांपासून करता येईल. नंतर द सेकंड सेक्स लिहिणाऱ्या बोव्हुआरचा लढा. त्यानंतर त्यात समाजवादी महिलांचा सक्रीय सहभाग. फार वेगवेगळे पैलू आहेत.
माझा विशेष राग असतो तो चमकोगिरी करणाऱ्या स्त्रीवाद्यांवर. उदाहरणार्थ महाराष्ट्रात श्रावण महिन्यात सणवार सुरु झाले की स्त्रीवाद्यांचा हुरूप पाहण्यासारखा असतो. नंतर शनिशिंगणापूर आणि शबरीमाला चा स्पॉन्सर्ड लढा. नंतर हर चॉईस हर व्हॉईस च्या नावावर खपवला जाणारा लढा. ह्यात ओव्हर हिज चॉईस आणि ओव्हर हिज व्हॉईस हे अध्याहृत असतं. असे कैक चमकोगिरी चे उपद्व्याप अस्सल महिलांच्या जमीनीवरच्या लढाया कमकुवत करतात.
मेधाताई पाटकरांनी आदिवासी महिलांना सोबत घेऊन कैक ठिकाणी विकासाच्या नावाखाली ज्या वनजमीनी हडपल्या त्याबद्दल लढे दिले. त्यांचे लढे खरे स्त्रीवादी. कारण वर्षानुवर्षे वापरात असलेली जमीन कवडीमोल भावाने बळजबरीने खरेदी केली जाते. त्याविरुद्ध कितीतरी ठिकाणी भारतात आदिवासी महिलांनी लढे दिले. उदाहरणार्थ लवासा मुळशी तालुक्यातील. त्यांच्या पुनर्वसनासाठी कीती चमकोगिरी करणाऱ्या स्त्रीवाद्यांनी आवाज उठवला. त्यात वनजमीनी बळकावून बंगले बांधणारे पण आले बरका!
नव्यानं येऊ घातलेला सरोगसी मदर म्हणून एक नवा बिझनेस होऊ पाहतोय. यात गरीबांच्या महिलांना का बरं बकरा बनवलं जातं? यावर तस्लिमा नसरीन यांनी एक ट्विट केले होते. या सरोगसी वर भविष्यात शोषणव्यवस्था उभी राहू शकते. विकले जातेय म्हटल्यावर बिझिनेस मॉडेल बनवणे, राबवणे आपल्याकडे काही नवीन नाही. आता तसं पाहता तस्लिमा नसरीन ही खरीखुरी स्त्रीवादी. मात्र भारतात त्यांना जाहिरपणे कोणत्याही स्त्रीवाद्यांनी समर्थन दिले नाही. त्या जेव्हा भारतात किंवा महराष्ट्रात येणार असं समजतं रे समजतं की लागलीच धार्मिक कट्टर एकवटतात त्यांना येऊ न देण्यासाठी. यावर कोणत्याही चमकोगिरी करणाऱ्या स्त्रीवाद्यांनी आवाज उठवला नाही. का त्यांचा स्त्रीवाद वेगळा आणि इकडचा स्त्रीवाद वेगळा आहे का?
सिंधुताई सपकाळ आणि सुधा मूर्ती ह्या खऱ्याखुऱ्या स्त्रीवादी. सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या बायका. पण ह्यांना पण मनुवादी दुषणं लावणारी मंडळी असतात. का कारणं काय?
हिंदुत्ववादी लोकांच्या आवडीचे विषय म्हणजे तीन तलाक, हिजाब, हलाला वगैरे यावर किती स्त्रीवाद्यांनी प्रबोधन केलंय?
मग स्त्रीवादी चळवळ कोणती जी दाखवली जाते ती का जी लढली जाते ज्वलंत प्रश्नांवर ती?
स्त्रीयांच्या शिक्षण, नोकरी बद्दल जेवढा प्रचार प्रसार शहरीभागात झालाय तेवढा ग्रामीणभागात झाला नाही. अजूनही गावागावात भाकरीची सोय व्हावी म्हणून पोरांचे लग्न लावून देणारे आढळतात. त्यावरची कडी म्हणजे मुलींना खपवलं जातं लग्नाच्या बाजारात. 'लग्न करून मोकळी हो' ही मानसिकता क्रूर. त्याविरोधात प्रबोधन गरजेचं.
अजून एक मुद्दा शेतकरी म्हणून जेवढं मिरवलं जातं तेवढं शेतकऱ्यांच्या बायकांना दुर्लक्षित करतात. खरंतर शेतातील निम्मी कामे शेतमजूर म्हणून बायकाच करतात. पण शेतकरी हाच खरा नायक असतो. हे बदलणं गरजेचं आहे.
चमकोगिरी करणाऱ्या लोकांकडून हे शक्य नाही. दिखाऊ पणा करणारे स्त्रीवादी घातक असतात. असो ह्यावर पुन्हा कधीतरी लिहिन.
?
स्त्रीने कसे वागावे हे तीने ठरवावे पण अनुकरण आणि अंधानुकरण याच्यात फसू नये.
वदतो व्याघात:?
स्त्रीने कसे वागावे, हे तिने ठरवावे, म्हटल्यावर, तिने अनुकरण अथवा अंधानुकरण करावे की न करावे, हे तिचे तिनेच का ठरवू नये? समजा तिला अनुकरण वा अंधानुकरण (जाणूनबुजून, समजूनसवरून) करायचेच असेल, तर? तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिला का असू नये?
(स्त्रीलाच, असे नव्हे. फॉर्दॅट्मॅटर, कोणालाही?)
स्वैर असणं आणि मुक्त असणं यातला फरक नेमकेपणाने ओळखता आला पाहिजे.
या दोहोंत नक्की फरक काय?
(नाही, या दोहोंत काही फरक नाहीच, असा माझा दावा नाही. परंतु, तो नेमका फरक तुम्ही क्वालिफाय आणि/किंवा क्वांटिफाय करू शकाल काय?)
(हिंट: मी नाही करू शकणार.)
मुक्त आणि स्वैर यात फरक आहे.
उदाहरणार्थ एखाद्या सासूने सूनेला सांगणे की घरातील सणांच्या चालीरीती, परंपरा पाळल्या नाही तरी चालतील. तुला स्वातंत्र्य आहे तुला जमेल तसे सण साजरे करायला. नाही केलेस तरी चालतील. असे केल्याने 'केलंच पाहिजे' ही सक्ती राहत नाही. त्यातून मुक्त होऊन हवं ते कर. इथे पिढीजात उगाचंच लादलेल्या गोष्टींची मक्तेदारी संपते.
मुक्त होण्यासाठी सक्ती केली जाणारी व्यवस्था बदलणं गरजेचं आहे.
स्वैर म्हणजे मनाला हवं तसं वागणं. मात्र जर त्या वागण्याचा संबंध 'मी स्त्रीवादी' आहे याच्याशी जोडला तर बदनामी चळवळीची होते.
दुसरं उदाहरण. सिंधुताई सपकाळ आणि लता मंगेशकर यांच्या निधनानंतर
ज्या काही विचित्र टिप्पणी पहायला मिळाल्या त्यावर स्त्रीवादी लोकांनी जाहीरपणे निषेध नोंदवायला हवा होता. (नोंदवला असेल तर माहिती नाही.) त्या दोघीही त्यांच्या कार्यक्षेत्रात अजरामर गोष्टी करून गेल्या. त्या सक्षम होत्या म्हणूनच ना? त्यांचे व्यक्तीगत जे काही विचार होते ते त्यांच्यापाशी. मात्र गेल्यानंतर जी काही शेरेबाजी झाली ते निषेधार्ह. त्यांच्या वर बऱ्याच महिलांनी टिप्पणी केली मनुवादी, प्रतिगामी प्रवृत्तीच्या होत्या म्हणून हे चूक आहे. दिवंगत माणसांवर अशी टिप्पणी मी स्वैर समजतो.
शाफुआवादी महिलांचा एक वेगळाच स्वॅग असतो स्त्रीवादाशी निगडीत. त्यांच्या बद्द्ल परत कधीतरी लिहिन.
माझं एवढंच म्हणनं आहे की स्त्रीवादाशी निगडित जे काही कृतीशील आचार विचार असेल त्याचा प्रभाव आणि परिणाम होत असतो नव्याने आकृष्ट होणाऱ्या लोकांवर. त्यामुळे स्त्रीवादी चळवळीची शिकण देणे गरजचे. (मी संस्कार शब्द टाळतो तो थोडासा धार्मिक वाटतो. शिकवण द्यावी लागतो संस्कार आपोआप घडत असतात) स्त्रीवादाशी संबंधित अनेक विचारसरणीचे वेगवेगळे पैलू आहेत. त्यावर परत कधीतरी लिहिन.
अब्राह्मणी स्त्रीवाद
शाफुआवादी महिलांचा एक वेगळाच स्वॅग असतो स्त्रीवादाशी निगडीत. त्यांच्या बद्द्ल परत कधीतरी लिहिन.
"अब्राह्मणी प्रबोधनाला पर्याय नाही" - प्रा. प्रतिमा परदेशी इथे आहे ना!
कठोर बुद्धीवादी य.ना.वालावलकर यांच्या मते श्रद्धा व अंधश्रद्धा यात एकच फरक आहे पहिला शब्द दोन अक्षरी आहे व दुसरा चार अक्षरी. तसे काही मुक्त आणि स्वैर मधे असावे असे काही रॅशनॅलिस्ट लोकांना वाटत असणारच ना
मी हल्ली मिरवला जाणारा स्त्रीवादी नाही.
माझं स्पष्ट आणि सुटसुटीत मत आहे की स्त्री पुरुष ह्यांपेक्षा माणूस म्हणून आपण कसे आहोत हे महत्वाचे. हल्लीचा मिरवला जाणारा स्त्रीवादी प्रवृत्ती, स्त्रीमुक्तीचा गजर मला मान्य नाही.
महिलांना सोयीसुविधा आणि सवलती दिल्या पाहिजेत सक्षमपणे समाजात वावरण्यासाठी. मात्र त्याचा उपयोग व्हीक्टिम कार्ड खेळणाऱ्या स्त्रीयांमुळे खरेखुरे गरजवंत दुर्लक्षित राहतात.
पुरुष घरी स्वयंपाक करून,
पुरुष घरी स्वयंपाक करून, फेसबुकवर येऊन मिरवतात.
एवढेच काय, अभिजीत बॅनर्जी नावाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थशास्त्रज्ञानं नुकतंच एक पाककृतींचं पुस्तक बाजारात आणलं आहे.
पुस्तक फारच सुंदर आहे. रेखाटनं 'ऍब्स्ट्रॅक्ट' आहेत. बॅनर्जींची आई मराठी, वडील बंगाली तर बायको फ्रेंच आहे. त्यांना स्वयंपाकाची मुळातच आवड असल्याने या सगळ्या संस्कृतींतल्या आणि त्यांच्या प्रवासांत त्यांना सापडलेल्या अशा अनेक उत्तम पाककृती पुस्तकात आहेत. मी त्यातल्या अनेक करून बघितल्या आहेत.
पण मला त्या पुस्तकातल्या काही गोष्टी सतत त्रास देत होत्या.
१. त्यांच्या पुस्तकावर 'नोबेल लॉरेट' अशी जाहिरात आहे. एखाद्या नोबेल विजेत्या स्त्रीनं असं पाककृतींचं पुस्तक लिहिलं असतं तर लोकांची प्रतिक्रिया काय असती? आणि त्यांच्या स्वयंपाकाशी त्यांच्या नोबेल पारितोषिकाचा काय संबंध आहे? ते पुस्तक नुसतं एखाद्या मुलानं, नवऱ्यानं आणि बापानं लिहिलं आहे म्हणून खपवलं तरी ते नाविन्यपूर्ण आहे.
२. प्रत्येक पाककृतीच्या आधी ते, "ही पाककृती जेव्हा तुमचे सासू-सासरे येणार असतील तेव्हा करा/एखाद्या उच्चभ्रू जोडप्याला इम्प्रेस करायला/बायकोची मैत्रीण येणार असेल तेव्हा/मुलं खूप दमून आली असतील तेव्हा इत्यादी इत्यादी .. अशा प्रकारच्या क्युट प्रस्तावना लिहून सुरु केली आहे. त्या वाचताना न राहवून मला पुन्हा एकदा असं वाटलं की एखाद्या बाईनं, "सासू सासरे येतील तेव्हा" अशी प्रस्तावना लिहून जर पाककृती टाकली तर आज तिच्याकडे कसं बघितलं जाईल? तिचं सगळ्यांकडून कौतुक होईल का?
पण यावर विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं, की कदाचित मला जे करायला आवडतं (स्वयंपाक, लोकांना जेऊ घालणे इत्यादी) आणि ज्यात मला खरंच समाधान वाटतं (मुलासाठी हौशेनी काही पदार्थ करणे, त्याला गरम जेवायला वाढणे इत्यादी इत्यादी) ते हा पुरुष सहज व्यक्त करू शकतो आहे. पण मला ते त्या भाषेत व्यक्त करताना आपण खूप पारंपरिक वागतोय का, असं सतत तपासून बघावं लागतं. आणि म्हणून एक प्रकारचा मत्सर/राग मला अशा लिखाणाबद्दल वाटतो.
मला वाटतं की बुलेट चालवणाऱ्या/फेसबुकवर दारू-सिगरेट पितानाचे फोटो टाकणाऱ्या/स्वतःच्या करियरबद्दल सतत बोलणाऱ्या/लग्न, मूल नको असलेल्या आणि त्याबद्दल मोकळेपणाने लिहिणाऱ्या स्त्रियांबद्दल अशाच प्रकारच्या भावना मनात येत असाव्यात का?
कारण जोपर्यंत घरी सासू सासरे येणार म्हणून प्रेमानं स्वयंपाक करणाऱ्या पुरुषाबद्दल आणि नोकरी व्यवसायामुळे सतत फिरणाऱ्या/स्वयंपाक न करणाऱ्या बाईबद्दल आपल्याला काहीच वाटेनासं होत नाही तोपर्यंत असं 'मिरवण्याची' गरज आहे असं मला वाटतं.
महिलांना सोयीसुविधा आणि
महिलांना सोयीसुविधा आणि सवलती दिल्या पाहिजेत सक्षमपणे समाजात वावरण्यासाठी. मात्र त्याचा उपयोग व्हीक्टिम कार्ड खेळणाऱ्या स्त्रीयांमुळे खरेखुरे गरजवंत दुर्लक्षित राहतात.
सहमत .. अनेक वेळा असे दिसून येते.
खरे गरजू दुर्लक्षित रहातात याचे प्रमुख कारण अज्ञान हे असावे असे वाटते. नियम, कायदे आहेत पण त्याची माहिती फार कुणाला असत नाही. एखाद्या परिस्थितीत कायदा मला काय संरक्षण देउ शकतो हेच माहिती नसेल तर ती स्त्री दाद मागणार तरी कशी? आणि कुणाकडे? स्त्री संघटना या करता काम करतात, परंतु त्या बहुतेक बहुसंख्यवेळेला शहरी भागातच असतात. अजूनही खेडोपाड्यात, तळागाळापर्यंत या माहितीचा पुरेसा प्रसार होऊ शकलेला नाही.
दुसरे कारण समाजव्यवस्था . पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पद्धती, संस्कार इतके घट्ट रुजलेले असतात, की स्त्री तिचे न्याय्य हक्क बाजूला सारून, निमुटपणे अन्याय सहन करीत राहते. अनेकवेळेला तिच्याकडे अन्य कुठलाही पर्यायच उपलब्ध नसतो.
समांतर उदाहरण.
लोकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य 'दिलं' पाहिजे, आपलं मत, म्हणणं व्यक्त करण्यासाठी. त्याशिवाय नवनवीन विचार चर्चेत कसे येणार? पण त्याचा उपयोग काही लोक इतर (काल्पनिक का होईना) व्यक्तींच्या व्यक्तिगत आयुष्यावर टीकाटिप्पणी करण्यासाठी करतात, उदाहरणार्थ सदर धागा. त्यांच्यामुळे खऱ्याखुऱ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची ज्यांना गरज असते त्या व्यक्ती दुर्लक्षित राहतात.
त्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्यवादी चळवळीची हानी होते. तेव्हा कुणाला असं अभिव्यक्तीस्वातंत्र्य द्यावं किंवा देऊ नये, हे खऱ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांनी ठरवावं. (म्हणून सदर धागा काढून टाकावा?)
सदर धागा हा मार्मिकपणे लिहिला आहे.
मला ज्या मिरवण्याचे सोंग घेतात बायका त्यांच्या बद्दल लिहायचं होतं. लिबलर वीमेन म्हणून जे खपवलं जातं आणि तेच उचलून धरलं जातं. विरोधाभास असतो खूप वागण्यात, बोलण्यात आणि कृती करण्यात. ते सापडलं की मी व्यक्त होतो.
या धाग्यात कपोलकल्पित टॉमबॉय पात्रं रंगवलंय. (ही टॉमबॉय माझ्या एका कथेची नायिका आहे बरेच दिवस कथा घोळत होती असे बरेच प्रसंग आहेत लिहायचे त्यापैकी हा एक रेखाटला) कारण अशी कुतरोड आणि घुसमट होणारी पात्रे आजूबाजूला वावरत असतात. चीडचीड करणं स्वाभाविक. दुषणं देणं स्वाभाविक. व्यसणं करणं हवं तसं वागणं हे ही व्यक्तीगत. मात्र त्याचं जस्टीफिकेशन करताना वी आर लिबरल वीमेन म्हणून करणं घातक. कारण अशा मिरवण्याच्या कृतीतून वेगवेगळ्या घटकांवर वेगवेगळे प्रभाव पडतात. असो.
स्त्री मुक्ती
ह्या मधील मुक्ती ह्या शब्दाचा अर्थ च मुक्त होणे हा आहे.
आणि हा मुक्ती वाला शब्द अयोग्य आहे असे मला तरी वाटत.
स्त्री मुक्ती चळवळ नको आपल्याला स्त्री पुरुष समानता ही चळवळ हवी आहे.
स्त्री पुरुष सह जीवन हवं आहे.
स्त्री आणि पुरुष ही दोन टोकं नसावीत.
तर एकच असावीत आणि सामान पातळीवर असावीत.
.
कुटुंबसंस्था ही, स्त्रीवर किंवा कसे, ते ठाऊक नाही, परंतु, एकंदरीत अत्याचारासाठीच (विशेषेकरून कुटुंबियांवरील अत्याचारासाठी) आहे, असे आमचे नम्र प्रतिपादन आहे. (पारंपरिक पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीला त्याची झळ अधिक पोहोचत असल्यास नवल नाही, परंतु, ती स्पेसिफिकली स्त्रीवरच अत्याचारासाठी बनलेली आहे, याबद्दल आम्ही साशंक आहो.)
At best, it is a necessary evil.
बाकी, ती पुरुषांनीच लादली आहे, याहीबद्दल आम्ही साशंक आहो. ती एकंदरीत समाजानेच लादली आहे, असा आमचा दावा आहे. (पुन्हा, पारंपरिक पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत पुरुषांचा हातभार ती लादण्यात अधिक प्रमाणात असणे हे साहजिक आहे, परंतु, त्याच्या exclusivityबद्दल आम्ही साशंक आहो.)
हे आमचे नॅरेटिव आहे. असो.
असुरक्षितता ?
नंदा खरे यांचं 'कहाणी मानवप्राण्याची' नुकतंच वाचलं.
त्यात कपींबद्दल लिहिताना त्यांनी असं काहीसं लिहिलं आहे की "मातृत्व उघड असतं पण पितृत्व सिद्ध करणं अवघड असतं. त्यामुळे मादीने जन्माला घातलेलं मूल आपलंच कशावरून, अशी शंका असल्यानं नरांना बालसंगोपानाशी काही देणं घेणं नसायचं."
हे असंच पुढे चालू राहायला हवं होतं. सगळेच सुखी राहिले असते.
असे स्त्रीवादी स्त्रियांबद्दल लेखही नसते लिहावे लागले.
?
मुद्दा समजला नाही.
म्हणजे, पुरुषांना बालसंगोपनात भाग घेण्यास भाग पाडण्यासाठी कुटुंबसंस्था लादली, आणि तीही पुरुषांनी, असे काही म्हणायचे आहे काय?
Doesn’t make sense to me, परंतु… असेल ब्वॉ. (…साला कुछ भी मुमकिन है।)
डिस्कवरी आणि बाकी चॅनेल
ह्यांचे कृपेने काही गोष्टी माहीत पडतात आणि दृश्य स्वरूपात बघायला पण मिळतात.
माणूस च नाही तर अनेक प्राणी त्यांच्या पिल्लाची काळजी घेतात..एकट्याने ती घेणे शक्य नसल्याने ते समूह बनवून घेतात.ती एक नैसर्गिक भावना आहे कोणी कोणावर लादली नाही.
त्याचा पुढचा सुनियोजित प्रकार म्हणजेच माणसाची कुटुंब व्यवस्था..
माणूस हा जास्त बुध्दी मान प्राणी असल्या मुळे नैसर्गिक भावनेला कल्पनेची जोड पण आहे.
पण मूळ भावना ही नैसर्गिक च.
आणि माणसाच्या गरजा पण खूप असतात.
एक माणसाचे मुल लवकर स्वावलंबी होत नाही अनेक वर्ष लागतात त्याला स्वावलंबी होण्यास.
त्या साठी त्याची काळजी घेण्यासाठी पण स्थिर व्यवस्था लागते.
म्हणून बाकी निती मत्ता.
पण स्त्री चे शोषण करणे ह्या मूळ हेतू नी कुटुंब व्यवस्था निर्माण झालेली नाही.
विशेष अधिकार
विशेष अधिकार = ज्यांना हा अधिकार दिला जावा अशी मागणी केली जाते ह्याचा लपलेला अर्थ तो वर्ग कमजोर आहे असे समजणे, समज करून देणे,किंवा खरोखर कमजोर असणे.
अशा
पण तीन शक्यता निर्माण होतात.
एकाध्या वर्गाला कमजोर वर्ग असे समजा आणि विशेष अधिकार ध्या.
ही स्वार्थी मागणी झाली.
पण नक्की तो वर्ग कमजोर आहे ह्याची शहनिशा करू नका ,कोणतेच प्रश्न उपस्थित करू नका.अशी अपेक्षा ठेवणे चूकच.
शहनिषा करताना हा वर्ग कमजोर च आहे असा समज करून देणे
अशी पण चॅप्टर लोक असतात
आणि एकदा वर्ग खरोखर कमजोर असेल तर विशेष अधिकार दिलाच पाहिजे त्या विषयी पुर्ण सहमत.
किती तरी वर्ष अनंत काळापर्यंत असे कमजोर वर्ग अस्तित्वात राहतात
विशेष अधिकार देण्या मुळे.
मग सबलीकरण, सशक्ती करणं हा काय प्रकार आहे तो यशस्वी होत च नाही.
हे फक्त स्त्री साठी नाही तर .जात,धर्म,देश,राज्य सर्वांसाठी लागू होणारे आहे
केंद्र जास्त निधी देते म्हणून राज्य गरीब च आहे किंवा गरीबच ठेवणे असे प्रकार पण होत असावेत.
Bimaru राज्य किती वर्ष झाली बिमारू च आहेत.
जगातील एका तरी प्रगत देशात स्त्री चे सबलीकरण ,,सशक्तीकरण झाले आहे का .?
की त्या देशात त्यांना स्त्री म्हणून विशेष अधिकाराची गरज नाही
जर कोणता ही कमजोर वर्ग सशक्त होणारच च नसेल त्याला विशेष अधिकार ची गरज लागणारच असेल तर.
खूप मोठी चूक होत आहे.
उपाय ,उपचार अयोग्य आहेत.
रोग फॉफवण्याची शक्यता जास्त आहे.
तुलनेने सशक्त
जर कोणता ही कमजोर वर्ग सशक्त होणारच च नसेल त्याला विशेष अधिकार ची गरज लागणारच असेल तर.
खूप मोठी चूक होत आहे.
इथे त्यांच्या अगोदरच्या परिस्थितीच्या तुलनेत सशक्त असे समजावे. सर्व वर्ग एकाच लेव्हलला कसा येईल. आपला देश हा एकाच वेळी किमान तीन शतकात वावरतो. १६ व्या शतकातील मानसिकतेत वावरणारे आहेत व २१ व्या शतकात वावरणारे ही आहेत. सर्व माणसांच्या क्षमता निसर्गत: सारख्या असणार नाहीत. त्या विकसित केल्या तरीही सारख्या असणार नाहीत.विज्ञान व तंत्रज्ञान ही शतकांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतच पण मानसिकतेच काय? ते प्रबोधनाचच काम आहे.अशा मानसिकतेत प्रबोधन व कायदा एकाच वेळी वापरणे हा एकच मार्ग उरतो.नुसत्या प्रबोधनाने होणार नाही व नुसत्या कायद्याने ही होणार नाही. व्यक्ति तितक्या प्रकृती असल्याने तफावत ही राहणार आहे. ती कमी करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर आपापल्या परीने होत असतात. आपल्याला जे माध्यम मानवेल, रुचेल, पचेल ते हाती घ्याव आणि पुढे चालाव. काळ अनंत आहे.
स्त्रीवादावर राजीव साने यांची भूमिका
स्त्रीवादावरचे वेगळे पैलू राजीव सान्यांच्या या लेखात वाचायला मिळतात. सर्व स्त्रियाही सारख्या नाहीत व सर्व पुरुष ही सारखे नाहीत. त्यामुळे स्त्रीवादाकडे पहाण्याचे दृष्टीकोन हे वेगवेगळे असणार. काही स्त्रिया पुरुषप्रधान संस्कृतीच्या बळी ठरतात तसे काही पुरुष सुद्धा जहाल स्त्रीवादाचे बळी ठरतात.
ज्यांनी वाचलेले नसेल त्यांच्यासाठी राजीव साने यांच्या
गल्लत गफलत गहजब पुस्तका मधील
स्त्री-वादावरील हे प्रकरण
स्त्रीवर जोखड नको, स्त्रीवादाचेसुध्दा
स्त्रीचे, व्यक्तिस्वातंत्र्य मिळविणे आणि विकसित करणे, ही प्रक्रिया अनेक टप्प्यातून जात आहे. बहुतेक चळवळींच्या विद्रोही टप्प्यात, जहालमतवाद उफाळून येणे, ही अवस्था अटळ असते. पण या अवस्थेचे, जर सार्वत्रिक तत्त्वज्ञान बनविले गेले तर ते तत्त्वज्ञानच, मुक्तीमार्गातील अडथळा बनू शकते. कारण विभिन्न वर्गांत, देशांत, टप्प्यांवर, पिढ्यांत आणि वयांत सुध्दा आव्हानेही वेगळी आणि उत्तरेही वेगळी असतात.
जगात चळवळी अनेक आहेत. पण जिचा विजय निश्चित आहे आणि नजरेच्या टप्प्यात आहे अशी फक्त एकच चळवळ आहे. ती म्हणजे स्त्रीचळवळ. हे एवढ्या आत्मविश्वासाने म्हणता येते कारण मानवी इतिहासात, निर्णायक व परत मागे जाता न येणाऱ्या अशा काही घटना घडल्या आहेत की ज्यांच्या आधारे विजय निश्चित आहे असे वस्तुनिष्ठपणे म्हणता येते.
१.एकत्र कुटुंबपद्धती नष्टप्राय होणे. (फूट पडू नये याखातर स्त्री पुरुषांना विलग ठेवून त्यांच्यावर संवाद-सहवास-बंदी घातली गेली व कामजीवन अपवित्र मानले गेले. तसेच ज्येष्ठांची हुकुमशाही रुजली) २.लोकशाही येऊन स्त्रीला मताधिकार मिळणे. ३.स्त्रीला घराबाहेर रोजगार मिळणे. ४.गर्भनिरोधक साधने उपलब्ध व प्रचलित होणे. ५.अनेक घरकामांचे औद्योगिकीकरण होणे. ६.संपर्कशक्ती आणि माध्यमे सर्वत्र पोहोचणे. ७.युध्दासकट सर्व व्यवहारातील उपकरणांमुळे ‘शारीरिक ताकद’ अप्रस्तुत बनणे. हे सात, असे भीमटोले आहेत, की ज्यांच्यापुढे पुरुषशाहीचे चलाख प्रतिडाव व सुप्त मानसिक अवशेष, निष्प्रभ ठरणे अटळ आहे.
अनेक कारणांनी स्त्रियांच्या दास्याच्या/दुय्यमतेच्या तीव्रता आणि परी वेगळ्या असतात. ज्यांच्यावर ठोस अत्याचारच होत आहेत त्यांना लागणारी ताबडतोबीची सुटका पुरविण्याचे कार्य वेगळे असते. ज्यांचे दुय्यमपण जास्त सूक्ष्म(सटल) असते त्यांना लागणारी वैचारिक साधने अगदीच वेगळी असतात. सटल अवस्थेत प्रस्तुत ठरणारे सिद्धांत जर ढोबळ अवस्थेत लागू केले तर “बाजारात तुरी आणि भटीण भटाला(!) मारी” असे होऊन आपण का भांडतोय हे कोणालाच कळेनासे होते.
तिसऱ्या पिढीचे वैराग्यविरोधी बंड
स्त्री चळवळीबाबत जरी आशादायक चित्र असले, तरी ‘स्त्रीवादा’ची जी वैचारिक प्रारूपे नेहमीप्रमाणे पश्चिमेत उत्पन्न होऊन( माझा आक्षेप ‘पश्चिमेत’ला अजिबात नाही.) भारतातल्या विद्यापीठांतूनही पाझरत आहेत, ती अनावश्यक गोंधळ निर्माण करीत आहेत. अगोदरच बऱ्यापैकी स्वतंत्र बनलेल्या स्त्रियांच्या, व्यक्ती म्हणून चालू असलेल्या आत्मशोधात, विघ्ने आणत आहेत. कसेही करून त्यांच्यात ग्रस्ततागंड टिकवून ठेवण्यासाठी, ‘खाजवून खरूज काढणे’ व जगातील प्रत्येक गोष्टीकडे पुरुषसत्ताक कारस्थान म्हणून बघणे, ही विघातक शिकवण देऊ पहात आहेत.
अशा नको इतक्या ताणलेल्या स्त्रीवादाविरुध्द, पश्चिमेतील तरुणीच बंड करू लागल्या आहेत. “मी नाही होणार आईसारखी शुष्क”, “या स्त्रीवादी सनातन्यांची दहशत नको”, “रडक्या स्त्रीवादाकडून हसऱ्या स्त्रीवादाकडे”, “स्त्री म्हणून फुलू देणारा स्त्रीवाद”, “विजय साजरा करण्यात वाईट ते काय?” अशा आशयसूत्रांनी युक्त पुस्तके, त्या प्रकाशित करत आहेत. आता हेही विद्यापीठांत पाझरायला विद्यापीठीय विलंब लागेलच. म्हणूनच ही सुवार्ता मी बाहेरच परस्पर देऊन टाकत आहे.
मी स्त्रीवादी असूनही आनंदी कशी(किंवा कसा)? असा प्रश्न पडणे व ज्याअर्थी आनंदी आहे त्याअर्थी प्रस्थापितशरण तर नाही ना?, अशी चिंता वाटणे ही एक गोची असते. दुःखांना वाचा फोडणे, अन्यायाविरुध्द चीड येणे, कुप्रथांवर हल्ला चढविणे, त्यात झीज सोसणे हे आवश्यकच असते. पण ते पुरेसे नसते. मानसिक ऊर्जेचे अर्थशास्त्र कधीच विसरून चालत नाही. संघर्षासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे पुनर्भरण करण्यासाठी आणि एरवीसुध्दा, वट्टात सुखी असावे लागते. तितपत समन्वयवाद म्हणजे संधिसाधूपणा नव्हे. तसेच माझा परिवर्तनवाद हा अस्सल (ऑथेन्टिक) प्रतिसाद म्हणून उमटला पाहिजे. अमुक वर्तुळात प्रतिमा टिकविण्यासाठी, सुखाच्या संधी सोडणे, हाही अहंकाराचा संधिसाधूपणाच असतो. आपल्या ‘मानिसिक अर्थकारणा’चे ऑडिट करण्याचा अधिकार, विद्रोही समूहाच्या स्वयंघोषित धुरीणांना देऊन टाकणे, म्हणजे नवी गुलामी पत्करणे असते. असे केल्याने, ना आपण स्वतःशी प्रामाणिक रहातो, ना चळवळीशी!
तिसऱ्या पिढीचे बंड हे या गोचीतून सुटण्याचे बंड आहे. ‘उलटी अडकणूक म्हणजे सुलटी सुटका नव्हे’, हे त्यांचे सामान्य तत्त्व दिसते. साचेबध्द प्रतिमांच्या आहारी न जाणे, हे महत्वाचे आहेच. पण याचा अर्थ असा नव्हे की उफराट्या-साचेबद्ध प्रतिमांत अडकावे! पारंपरिक स्त्रीची साचेबध्द प्रतिमा विरुध्द विद्रोही स्त्रीची साचेबध्द प्रतिमा, यापैकी कोणतीच ‘मला’ न्याय देणारी नसूही शकते. माझी स्वतःशी सर्वाधिक आत्मीयता ज्यात आहे ते सतत निवडायचे असते. मग ते योगायोगाने पारंपरिकही निघेल! लादलेल्याला शरण न जाणे हे महत्वाचे आहे. माझे स्वातंत्र्य टिकवून, मी पुरुषांना पूरक ठरले किंवा आवडले, तर मी गद्दार ठरते की काय? असा सवाल या मुली उभा करत आहेत.
‘शाही’ झुगारणे म्हणजे पुरुषद्वेष नव्हे
काही प्रमाणात स्त्रियाही पुरुषशाहीच्या एजंट बनतात व काही प्रमाणात पुरुषही पुरुषशाहीचे जाच सोसत असतात. त्यामुळे समोरील व्यक्ती ही स्त्री आहे की पुरुष, एवढ्यावरून ती कोणत्या बाजूने असेल, हे ठरवता येत नाही.
आपल्याला स्त्री-व्यक्ती-धार्जिण्य आणि स्त्री-समूह-वाद यात फरक करता आला पाहिजे. कोणतीही स्वातंत्र्यप्रेमी व्यक्ती (सरासरी स्थिती पाहिल्याने) स्त्री-धार्जिणी असणे स्वाभाविक आहे. पण यातही एक मेख आहे. जे सरासरीने खरे असते, ते प्रत्येक प्रकरणात खरे नसते. त्या त्या प्रकरणातील न्याय्य बाजू कोणती हे प्रकरणाच्या मूल्यमापनात (मेरिट्समध्ये) शिरूनच ठरविले पाहिजे. पण हे भान सुटून, सरासरीवर आधारित बाजू घेणे, म्हणजे काहीवेळा अन्यायाच्या बाजूने उभे राहणे ठरते आणि समूहवादी ठरते. म्हणूनच न्यायप्रेमी व्यक्तीने सर्वच आघाड्यांवर समूहवाद टाळला पाहिजे. स्त्रीची बाजू जास्त आस्थेने समजावून घेणे एवढ्या अर्थाने आपण स्त्री-धार्जिणे असलो पाहिजे, यावर दुमत होऊ नये. मात्र ‘स्त्रीवादी’ असणे ही वेगळी गोष्ट आहे..
जहाल-स्त्रीवाद असे मानतो की, आतापावेतो जमा झालेले सर्व मानवी ज्ञान, बहुतांश पुरुषांनी घडविलेले आणि म्हणून शंकास्पद आहे. मानवाची जगाविषयी, स्वतःविषयी, अशी संपूर्ण समजच, स्त्री-केंद्री ज्ञाननिर्मितीद्वारे बदलणार आहे. या भूमिकेशी मी असहमत आहे. कारण स्त्रीपुरुषांत भेद आहे हे खरे असले तरी समाईक-मानवीही बरेच काही आहे. त्यामुळे स्त्रीवादी ज्ञानशास्त्रच (फेमिनिस्ट एपिस्टेमॉलॉजी) वेगळे असेल, हे शक्य नाही.
जहाल स्त्रीवादाचे दुसरे एक टोक असे की, सर्व मानवी दुर्गुणांचे मूळ हे ‘नर’ असण्यात आणि सद्गुणांचे मूळ ‘मादी’ असण्यात शोधणे! मानवी सद्गुण व दुर्गुण हे प्रत्येक मानवी व्यक्तीत कमीअधिक प्रमाणात असतातच. त्यापैकी वाव कशाला मिळेल हा व्यवस्थेचा प्रश्न असतो. तसेच सद्गुण-दुर्गुण जरी तेच असले, तरी ते कसे अभिव्यक्त होतील, याच्या शैली मात्र स्त्रीविशिष्ट व पुरुषविशिष्ट असतात, हे बऱ्याच अंशी खरे आहे. लहानपणीसुध्दा मुलगे मारामाऱ्या करतात व मुली एकमेकींविषयी अफवा पसरवतात असे एक निरीक्षण आहे. हा शैलीतला भेदसुध्दा सरसकट लागू पडतो असे नाही. व्यक्तीची जनुकीय, संस्कारबध्द आणि स्व-निर्णित जडणघडण अनन्य असतेच. त्यामुळे काही पुरुषांची शैली काहीशी बायकी व तसेच उलटपक्षी स्त्रियातही आढळते.
मुख्य मुद्दा असा की, उफाळून येणारे दुर्गुण हे सत्तास्थानामुळे आहेत की जेंडरमुळे?. गल्लत अशी होते आहे की, सत्तास्थानी पुरुष जास्त प्रमाणात असणे, ही वस्तुस्थिती वेगळी आहे आणि पुरुषांतच नरत्व-अंगभूत जुलुमीपणा असतो हे सामान्यीकरण वेगळे. सत्तास्थानी स्त्रियाही कशा पोचतील, वा सत्तास्थानेच कशी बरखास्त वा सौम्य करता येतील, याचा कार्यक्रम वेगळा आणि त्यांना पुरुषद्वेष्ट्या बनवणे, हा कार्यक्रम वेगळा आहे. जहाल-स्त्रीवादाने, काचोळ्यांच्या होळ्या करणे, लेस्बियनिझमला मुक्तीची आवश्यक अट मानणे, पुरुषांना नकोसे वाटेल असा पेहेराव व आविर्भाव राखणे, अशा प्रतिक्रयावादी गोष्टी केल्या. त्याचवेळी स्वतः (दुर्गुणांसकट) पुरुषासारखे बनण्याचा प्रयत्नही केला.
सर्वच प्रश्नांचे जेंडरीकरण कशाला?
आणखी एक घोटाळा टाळला पाहिजे. स्त्री-व्यक्तीला अनेक प्रश्न असतात. ती कामगारही असेल तर तिला कामगार-प्रश्न असतात. तिला जातीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, वार्धक्याचे असे सगळेच प्रश्न असतात. ते ते प्रश्न हे त्या त्या क्षेत्रानुसार सोडवावे लागतात. कोणताही प्रश्न हा, स्त्रीला आहे याखातर, ‘स्त्रीप्रश्न’ बनत नसतो. इतर प्रश्नांतही स्त्रीत्वाचे अंग असू शकते. उदा कामगार स्त्रीची लैंगिक छळवणूक हा नक्कीच ‘स्त्रीप्रश्न’ आहे. पण उदा. जास्त तास राबवणे हा ‘कामगारप्रश्नच’ आहे. जिथे तिथे ओढून ताणून जेंडर आणणे हे एकारलेपणाचे आणि संभ्रम उत्पन्न करणारे आहे व तेही टाळले पाहिजे.
जिथे अद्याप काहीच यश आलेले नाही, तिथे चळवळ पोहोचवणे, महत्त्वाचे आहे. पण ते सोडून, जिथे बऱ्यापैकी यश आलेले आहे, तिथे कोरून कोरून जेंडर काढत बसण्याचा अट्टाहास कशाला?
जमिनी वर पाय असलेला व्यक्ती ची व्याख्या
स्त्री वाद,पुरुष वाद हा काही प्रकार अस्तित्वात नाही .समजावे म्हणून ..
BJP जसे हिंदू विषयी फालतू प्रेम दाखवते..पुरोगामी जसे स्वार्थ साठी दलित ,वंचित लोकांचे हित वादी आहे असे दाखवतात ..
तसेच हे स्त्री वादी आपण स्त्री चे हितचिंतक आहे असा भ्रम निर्माण करतात .
माझ्या कुटुंबात बायको,मुलगा,आई ,बहिणी आहेत.
पण एकत्र राहणारे मी,बायको ,मुलगा ,आई च आहे.
घरातील कोणतेही काम ह्याच व्यक्ती नी केले पाहिजे हा फालतू नियम नाही .
स्वयंपाक मी फ्री असेल तर मी करतो .मुलगा फ्री असेल तर त्याला जे शक्य आहे ते तो करतो
स्त्री म्हणजे माझी बायको .हिने स्वयंपाक करावा,साफ सफाई करावी ,भांडू साफ करावी .अशी बिलकुल अपेक्षा नाही .जो फ्री असेल तो ही सर्व काम करतो .आई वयस्कर आहे त्या मुळे तिला सर्व सुविधा देणे ही तिघांची जबाबदारी आहे .हे समजून सर्व सेवा करतात
आणि अगदी पाहुणे आले तरी मला किंवा माझ्या मुलाला भांडी साफ करण्याची लाज वाटतं नाही
आम्ही ते करतो..
स्त्री पुरुष समानता ही ह्या व्यतिरिक्त अजून काही असू शकत नाही...
mसाधा माणूस साधी उदाहरणे
मी सीएसटी तर cuff parade asa बस नी प्रवास करायचो.
स्त्री साठी विशेष अधिकार म्हणून बस मध्ये काही सीट आरक्षित असतात..
सीएसटी हा पहिलाच स्टॉप पण स्त्रिया बस मध्ये रांगेत चढायच्या तेव्हा आरक्षित सीट वर न बसता बाकी सीट वर बसायच्या .
त्यां नंतर येणाऱ्या स्त्रिया आरक्षित सीटवर हक्क दाखवायच्या ..
हे रोज घडायचे .
विशेष अधिकाराचा गैर वापर ह्याचे हे उदाहरण
कुटुंबात आई वडील मुलगा सून हे सदस्य असतात
पण अनेक जवळच्या घरात सासू सासरे अतिशय चांगले असताना फक्त स्वतःच्या इगो साठी सूनेन मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करून सर्व कुटुंबाला जेल ची हवा दाखवली आहे .
मी बघितले आहे .
स्त्री च नाही तर कोणालाच विशेष अधिकार नको.
म्हणजे बाकी सर्व समाजापासून कोणाला मुक्त समजू नका समान समजा.
मुक्ती आणि समानता ह्या मध्ये हा फरक आहे
अतिशय कमजोर, असहाय ह्या वर्गाला विशेष अधिकार दिलाच पाहिजे .
पण टर्म्स आणि condition असल्याचं पाहिजेत .
सर्रास नको..
एक माझे अनुभव चे मत.
स्त्रीला कायद्याने दिलेले संरक्षण आणि विशेष अधिकार दिला आहे ह्याचा उपयोग ज्या खरेच पीडित आहेत त्यांना होत नाही
पण ह्या सवलतीचा आणि अधिकाराचा फायदा स्वार्थी सक्षम स्त्रिया स्वतःच्या फायद्या साठी करतात.
स्वार्थ साधण्यासाठी ह्या सवलती आणि विशेष अधिकार चा वापर करतात.
त्या
मूळ कल्पनेला चा ह्या मुळे तडा जातो
त्याच्या पुढची स्टेप म्हणजे विशेष अधिकाराच्या कायद्याचा उपयोग करून आर्थिक फायदा करणे ,मालमत्ता हडपणे .
असे प्रकार करणाऱ्या संघटित टोळ्या निर्माण झाल्या आहेत.
ही रिॲलिटी आहे.
कोणती तरी बंगाली अभिनेत्री आता पकडली गेली चोरी करताना .ती एनजीओ चालवते स्त्री का सशक्त करण्यासाठी
.हे एक उदाहरण आहे .
अशा विशेष अधिकार देणाऱ्या कायद्यांचा वापर ज्यांना गरज आहे त्यांना होत नाही तर .गुंड,स्वार्थी लोक त्याचा पुरेपूर वापर करतात.
त्या मुळे विशेष अधिकार सर्रास स्त्रियाच नाही तर कोणाला पण नसावा.
पण स्त्री वर किंवा कोणत्याही कमजोर वर्गावर सामूहिक एकी दाखवून अत्याचार करणारे ह्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे .
त्याला बिलकुल विरोध नाहीं
रिकामं मडकं खूप वाजतंय.
तिरपे तिरपे प्रतिसाद वाचणं कठीण वाटतं म्हणून इथे एकत्रच प्रतिसाद, श्रीमान स्वयंभू यांना.
कृपया चळवळ म्हणजे काय हे जरा नीट समजून मग स्त्रीवादी 'चळवळी'बद्दल बोललात तर बरं होईल. शिवाय, कालक्रम वगैरेही बघा, जरा आजच्या वास्तवाबद्दल बोला. उदाहरणार्थ, सिमोन दि बोव्हार (बोव्हुआर नव्हे) मेल्याला आता ३०+ वर्षं झालेली आहेत.
माझ्यासारख्या शहरांत राहणाऱ्या, शिकलेल्या, कमावणाऱ्या, स्वतःच्या पैशांवर दारू पिणाऱ्या, लोकांवर अवलंबून नसणाऱ्या, आणि जमेल तितपत आनंदात राहणाऱ्या बायकांना सामाजिक चळवळीची गरजच नाहीये. आम्ही कशा वागतो, यामुळे आमच्यासारख्या सामाजिक परिस्थितीत नसलेल्या बायकांवर परिणाम होतो, हे म्हणणं हा अडाणीपणाचा आणखी एक नमुना आहे.
त्यातही एक बाई कशी वागते यावरून इतर कुठल्याही स्त्रीला जोखणं, नावं ठेवणं; किंवा इतर स्त्रियांच्या विचारसरणीला नावं ठेवणं; हा भिकारचोटपणा आहे. होय, भि-का-र-चो-ट-प-णा! आणि असले भिकारचोट चाळे तुम्ही ह्या धाग्यात बऱ्याच प्रतिसादांमध्ये केले आहेत.
स्वतःच्या लेखनाला तुम्ही मार्मिक वगैरे विशेषण लावत आहात. कुणी बाई स्वतः कमावून, स्वतःच्या घरात कशी का राहीना, तुमची मिंधी नाहीये. तिला तिच्या आयुष्यात जे काय करायचं आहे, ते ती करेल. मिरवेल, सोंगं नाचवेल किंवा आणखी काही करेल! कुणीही बाई तुमची मिंधी नाहीये. आधी स्वतःचं प्रबोधन करा मग लोकांना नावं ठेवायची का नाही ते ठरवता येईल. आधी स्वतःचा स्त्रीद्वेष कमी करून पाहा, मग सल्लावाटप केंद्र उघडा!
आणि तुम्हाला कुणी विचारलंय! तुमचा संबंधच काय, ती बाई टॉमबॉय असेल नाही तर स्पृहा जोशी... तुम्ही कोण तिच्या व्यक्तिगत आयुष्यात नाक खुपसून न्यायदान करणारे! अत्यंत भिकारचोट लेखन आहे हे. होय, भि-का-र-चो-ट.
तुम्हाला स्त्रीवाद या
@स्वयंभू, तुम्हाला स्त्रीवाद या विचारप्रणालीबद्दल फार माहिती दिसत नाही. आसपासच्या उदाहरणावरून तुम्ही या सगळ्या विचारप्रणालीवरच एक ठपका लावता आहात. स्त्रीवादातही अनेक गट उपगट आहेत आणि त्यांचे स्वतंत्र सैद्धांतिक विवेचन आहे. उदारमतवादी, मार्क्स्वादी, कृष्णवर्णीय, रॅडिकल, आदीवासी अश्या विभिन्न दृष्टीकोनातून स्त्रीवादाची मांडणी होत आली आहे. मेरी वॉल्स्टनक्राफ्ट सारख्या सुरूवातीच्या काळातील विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी स्त्रीवादी विचाराचा लावलेला अर्थ पुढे नेणे हे अनेक स्त्रीवादी विचारवंतांनी पुढच्या काळात केले, सिमॉन एकटी नव्हे केट मिलर, बेटी फ्रिडन, अश्यात वारलेली बेल हुक्स, कमला भसिन अश्या कित्येकांनी स्त्रीवादी दृष्टीकोन पुढे नेला आहे. आपल्याकडेदेखिल आगरकर, लोकहितवादी, फुले दांपत्य, कर्वे, आंबेडकर यांच्या प्रयत्नांतून स्त्रीमुक्तीची वाट सुकर झाली असली तरीही स्त्रीवाद या विचारप्रणालीचे भारतीय दृष्टीकोनातून क्रिटिक म्हणावेसे झाले नाही. स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागामुळे स्त्रीअधिकार जनमानसात रूजू लागले. ती प्रक्रिया सुरूच आहे. वंदना शिवासारख्यांचा इकोफेमिनिझम यासारखे प्रयत्न याचाच भाग आहे. तेव्हा स्त्रीवादी महिला असे संबोधून आगपाखड करण्याने काही विधायक बदल घडणे असंभव आहे. त्यापेक्षा अधिक अभ्यास करून हा विचारप्र्वाह नीट समजून घेता येतो का हे पहाणे इष्ट ठरेल. अन्यथा केवळ स्वतःपुरता स्त्रीचे वैयक्तिक स्वातंत्र्य, तिचा समानतेचा आग्रह समजून घेता आला तरी पुरेसे ठरावे.
तुम्ही हिंदूत्ववादी असाल तर हिंदू स्त्रीयांना मिळणाऱ्या अधिकारांबद्दल, त्यांचे अवकाश विस्तारण्याबद्दल तुम्हाला बरेच वाटत असेल ना? हिंदूंचेच भले आहे की त्यामुळे.
एकच उपाय
स्त्री वाद,स्त्री हक्क ,बलात्कार,विनय भंग,जातीवाद,जाती साठी विशेष कायदे,स्त्री साठी विशेष कायदे. .
धर्म ,धर्मा साठी विशेष कायदे .
स्त्री वर अत्याचार,जाती वर अत्याचार, धर्मा वरून अत्याचार
ह्या सर्वाचा आता वैताक आला आहे .
जेनेटिक अभियांत्रिकी आता प्रगत आहे .
त्यांच्या वरची सर्व बंधन नष्ट करा .
जशी स्त्री हवी तशी पुरुष विकत घेतील .जसे पुरुष हवे आहेत तसे स्त्री विकत घेईल
कोणतेच कायदे
धार्मिक ,स्त्री वादी,पुरुष वादी,जाती वादी,धार्मिक कायदे .
जेनेटिक अभियांत्रिकी रीती नी निर्माण केलेल्या जीवा ना लागू होणार नाहीत.
ह्या वर पूर्ण जगा नी विचार करून .नैसर्गिक मानव निर्मिती बंद करावी.
Factory madhye उत्पादन झालेले स्त्री,पुरुष रोबोट लोक विकत घेतील.
.
बाईंनी काय करावे, त्यांचा दिनक्रम कसा असावा, त्यांनी कसे जगावे, हा बाईंचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तुम्हाला काय त्याचे?
----------
अत्यंत भिकार लेख.