Skip to main content

फोर बाय सिक्स सोलकढी

"वेटर, फोर बाय सिक्स सोलकढी!"

(कालांतराने)

"हे काय?"

"सोलकढी."

"एवढीच?"

"हे बघा मिस्टर, एकतर दोन तृतीयांश असं नीट सांगण्याऐवजी तुम्ही चार षष्ठांश सांगितलंत. बरं तुमचा विभाजकांचा अभ्यास कच्चा असेल म्हणून मी काही बोललो नाही. पण दोनशे मिलीलीटरच्या सोलकढीचे दोन तृतीयांश म्हणजे आवर्ती अपूर्णांक येतो. शेवटी मला मोजायची प्रक्रिया थांबवावी लागली. तर ही आहे एकशेतेहत्तीस पूर्णांक चौतीस शतांश मिलीलीटर सोलकढी."

"क्काय?"

"बाॅन अपेतीत!"

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 02:48

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)