Skip to main content

एका सासूबाईची करुण कहाणी.

लहान माझी भावली
मोठी तिची सावली.
नकटे नाक उडवीते
घारे डोळे फिरवीते.
भात केला कच्चा झाला
वरण केले पात्तळ झाले.
आडाचे पाणी काढायला गेली
धुपकन पडली आडात.
सासू बाई शेजार्याच्या लहान मुलीला गाणे “शिकवत” होत्या.
सून स्वयंपाक गृहात काम करत होती. मनात म्हणाली. “मला शिव्या देताहेत. ऐकतेय मी सगळे. तुम्ही काही म्हणा मी आडात जाऊन जीव देणाऱ्यातली नाही. सज्जड हुंडा देऊन आले आहे. तेव्हा न लाजत मुलाची किंमत खण खण वाजवून घेऊन त्याला विकला न तुम्ही?”
साबा आणि साबू दोघेही व्हाट’स अप अंकल आणि आंटी.
सारखी किच कीच चाललेली. पदर सांभाळ. केस किती आखूड कापलेस? आता वेणी कशी घालणार? खुर्चीवर सावरून बसावे स्त्रियांच्या जातीने. कुंकू लावलेस का? मला मेलीला आताशा दिसत नाही म्हणून विचारले हो.
चाहत साखर कमी पडलीय. साखर संपली असेल तर नवऱ्याला सांगायचे. तो काय तुझ्या मुठीतच(मिठीत?).मला अजून डायबेटीस नाही हो.
पोळ्या किती जाड लाटल्या आहेस? मुद्दामहून ना? का नाजूक हात दुखताहेत. आमच्या काळी मी एकटी दहा जणांच्या पोळ्या... आता काय राजा राणीचा संसार. इन मीन तीन.
भाजीत किती मीठ पडलय.
अजून बरच काही. कधी म्हणून कधी समाधान नाही.
एकदा मात्र कहर झाला.
“सुनबाई साधी मेथीची भाजी करता येत नाही. तुझ्या आईने माहेरी काय शिकवले?”
“अहो सासूबाई, ते माझे माहेर होते. केटरिंग कॉलेज नव्हते.”
मग एके दिवशी दारात टॅक्सी उभी राहिली.
सुनेने साबा आणि साबू च्या दोन बॅगा भरल्या, टॅक्सीत नेऊन ठेवल्या.
“सुनबाई कुठे बाहेर जायची तयारी आहे का?”
“हो तुम्हा दोघांची व्यवस्था त्या नदी काठच्या वृद्धाश्रमात केली आहे. तिथ खरपूस भाजलेल्या पातळ पोळ्या, घट्ट वरण, शिजलेला भात, दोन वेळ चवदार चहा मिळेल. तिकडे देऊळ आहे. तिथं भजन प्रवचन कीर्तन चालते. टीवी आहे. आस्था चानल बघायाल मिळेल. जय मा देवी असे पिक्चर बघायला मिळतील.”
सगळ्यात म्हणजे इतर सास्वान्च्या जोडीने सुनांच्या नावाने बोटं मोडायला मिळेल.
आमच्या बाब्या म्हणजे सुनेच्या ओंजळीने पाणी पिणारा. शामळू. ऑफिसमध्ये काय रुबाब. घरात मात्र कबाब. गोगल गाय.
पैशाची काळजी करू नका. आल एक्सपेन्सेस प्रिपेड!
आम्ही दोघ येऊ मधुन मधून भेटायला.
टॅक्सी सुरु झाली आणि भुर्कन निघून गेली.
व्हाट ए मेसी एंड!

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

विजुभाऊ Sat, 27/05/2023 - 14:13

क्वीक कथा. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपली.
उतू नका मातू नका सुबा ने चे व्रताची सांगता कंटिन्यूनीटी पुढे नेली..

प्रभुदेसाई Sat, 27/05/2023 - 15:43

तिने आडात "पडून" कंटिन्यूनीटी तोडायला पाहिजे होती.
२+२=५
I agree.

'न'वी बाजू Sat, 27/05/2023 - 18:53

In reply to by प्रभुदेसाई

…तिने सासूला आडात ढकलून दिले असते, तर? (साँस-बहूची) कंटिन्यूइटीसुद्धा चालू राहू शकली असती, नि… थोडासा बदल!

प्रभुदेसाई Mon, 29/05/2023 - 15:26

नाहीतर काय!
आमच्याकाळी अस काही नव्हत.

Rajesh188 Mon, 29/05/2023 - 15:27

सासू , सासरे,मुलगा ,सून
ही वयानुसार असणारी नाती केंद्र बिंदू कधीच असू शकतं नाहीत..मानवी हक्क .
स्त्री पुरुष .
हे वयावर ठरवणारे आणि तसा विचार करणारे ही महामूर्ख जमात आहे