कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी
गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गौ दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गायी प्रदान केल्या. सरकारचा मुख्य उद्देश्य देशात गायीच्या दूधाचे उत्पादन वाढविणे आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे होता. आज ही अनेक राज्यांत गाय पाळण्यासाठी सरकार अनुदान देते. गौ सेवा केल्याने शेतकर्यांचे जीवनमान सुधारले. दूध आयात कमी झाला. आज आपण दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात ही करतो. देशात १९ कोटी गायी आहेत त्यात 5 कोटी विदेशी आणि संकर गायी आहेत. त्यात 13 कोटी गायी दूध देणार्या आहेत. दुधाचे उत्पादन 2014-15 मध्ये 146.3 एमटी होते जे वाढून 23-24 मध्ये 239.2 एमटी झाले. दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात 2014 मध्ये 141.39 मिलियन युएस डॉलर होता तो 23-24 मध्ये वाढून 272.64 मिलियन डॉलर झाला. देशात अमूल, मदर डेअरी, नंदिनी सारखे मोठे ब्रॅंड तैयार झाले. कोट्यवधी शेतकर्यांना त्याच्या लाभ झाला. असो
आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे. आज ही आपण यज्ञ हवन आणि धार्मिक समारंभात आपण गायीच्या गोवार्यांच्या उपयोग करतो. पूर्वी आणि आज ही गावांत घर शेणाने सावरतात. पावसाळ्यानंतर घराच्या भिंतींचा रखरखाव करण्यासाठी ही शेणाचा उपयोग होतो. गायीच्या शेणापासून, उदबत्ती, धूप, संभ्राणी कप, हवन कप, दिवे इत्यादि पूजा सामग्री बनतात. आता तर भिंती रंगविण्याचे पेंट ही शेणा पासून बनू लागले आहेत.
शंभर वर्षांपूर्वी आणि आज ही भारतात ग्रामीण भागात आणि जगात अनेक भागांत घरांच्या निर्मिती साठी माती आणि शेणाचा वापर होतो. काही वर्षांपूर्वी अशोक नगर जवळ एका मराठी जमींदाराच्या शेताला भेट दिली होती. बाहेर भयंकर गरमी होती पण शेतात असलेल्या मातीच्या (माती आणि बांबू वापरुन पूर्वी घरे बनत होती) आणि वरती मातीची कौलारू छत) घरात वातावरण थंड होते. मातीच्या घरांच्या निर्मिती आणि रखरखावचा खर्च अत्यंत कमी असतो. या शिवाय भूकंप इत्यादि आल्या तरी तुमचे प्राण वाचण्याची शाश्वती. आज गायीच्या शेणापासून वीट,टाईल्स बनतात. शेणापासून बनलेल्या वैदिक प्लास्टरचा आणि पेंटचा उपयोग केला तर घराचे तापमान बाहेरपेक्षा आठ ते दहा डिग्री कमी राहते. घराच्या निर्मितीचा खर्च ही कमी येतो. याशिवाय ज्याच्या कडे गाय आहे. तो गोबर गॅसचा वापर करू शकतो आणि खत तर बाई प्रॉडक्ट म्हणून तैयार होणारच. घरासाठी शेणाचा वापर पर्यावरणाला पोशाक ही आहे आणि खर्च वाचविणारा ही आहे.
आज अधिकान्श शेतकरी जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा जास्त वापर करतात. सरकारी ही रासायनिक खतांवर भारी भरकम अनुदान देते. पण जेवढा शेतकर्यांचा खर्च वाढत जातो तेवढे उत्पादन मिळत नाही. या शिवाय कितीही रासायनिक शेती केली तरी दर दोन किंवा तीन वर्षानी प्रति हेक्टर 12 ते 15 टन शेण खत विकत घेऊन शेतात टाकावे लागते. किमान तीस ते 50 हजार खर्च करावा लागतो.
देसी गायीच्या गौ मूत्रात असंख्य सक्रिय संयुगे असतात. मुख्यत: नाइट्रोजन, युरिया आणि खनिज इत्यादि ज्यांचा वापर खत आणि कीटनाशक बनविण्यात वापर होतो. गौ मूत्रात तांबे, लोह आणि जास्त सारखी खनिजे सापडतात जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. गायीच्या शेणात ही असंख्य संयुगे असतात. नायट्रोजन, फास्फोरस, पोटाशीयम असतात. असंख्य सूक्ष्मजीव असतात जे मातीच्या आरोग्यासाठी आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. शेतीत गौ मूत्र आणि शेणाच्या वापराने शेत जमीन सुपीक आणि समृद्ध होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते. एखाद वर्षी पाऊस कमी झाला तरी शेती होऊ शकते. पण यांच्या जास्त वापराने जमिनीचा पोत बिघडतो. कालांतरात जमीन नापीक होते. जमिनीतील पानी ही प्रदूषित होते. कृषि वैज्ञानिकांच्या मते विशेषकरून रासायनिक खतांचा वापर कमी झाला नाही तर भविष्यात जमिनीतील पानी पिण्याचे सोडा ओंघोळीच्या लायकीचे राहणार नाही. आज रासायनिक खतांचा आणि किट नाशकांचा परिणाम शेतकर्यांना भोगावा लागतो आहे. एक तर शेतीचा खर्च वाढला दूसरा लाखो शेतकरी कॅन्सर ग्रस्त होतात. पंजाबातून बिकानेरला जाणार्या गाडीचे नावच कॅन्सर ट्रेन पडले आहे. रासायनिक खत आणि किटनाशक वापरुन पिकावलेले अन्न ही विषाक्त असते. अश्या अन्नाचे सेवन करून कोट्यवधी लोक दरवर्षी रोगग्रस्त होतात. हजारो कोटी उपचारावर खर्च होतात. आज हजारो शेतकरी पुन्हा गोमय आधारित शेतीकडे वळत आहे किंवा स्वत:च्या वापरासाठी उपयोग करत आहे.
आयुर्वेदात रूग्णांच्या उपचारासाठी पंचगव्याचा वापर होतो. गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो. आज मोठ्या प्रमाणात गौ मूत्रावर संशोधन सुरू आहे. फिनायाल एवजी घरात गोनायलने (डिस्टील गो मूत्र आणि पाणी, कडू लिंब, निलगिरी, वज आणि पाईन तेल पासून) फरशी पुसली तर किटाणू आणि जिवाणू पासून सुरक्षा ही मिळते आणि अपायकरक ही नसते. आज हजारो गोशाला गोनायल, आंघोळीचे साबण आणि गो अर्क बनवितात. एका स्वदेशी कंपनी ने 100 कोटीहून जास्त रुपयांचे गो अर्क आणि गोनायल गेल्या वर्षी विकले. शेतकर्यांना ही गोमूत्र विकून एका लीटरचे पाच ते दहा रुपये सहज मिळतात. गेल्यावर्षी गोमय निर्मित वस्तूंचा 400 कोटींचा निर्यात आपण केला.
जर गोपालक आणि शेतकर्याने गोमयचा आर्थिक दृष्टीकोणातून उपयोग केला तर गौ मूत्र आणि शेण यातून विभिन्न जीवनावश्यक उपयोगी पदार्थांची निर्मिती करून गायीच्या दुधापेक्षा जास्त कमाई करू शकतो. शेतकरी एक गाय पाळून किमान एक हेक्टर शेतीत गौ मूत्र आधारित किटनाशकांचा आणि शेण आधारित खतांचा उपयोग करून खर्च वाचवू शकतो. जास्त उत्पन्न घेऊ शकतो. जमिनीची सुपीकता आणि पाणी धरण करण्याची क्षमता वाढवू शकतो. जास्त नफा मिळवू शकतो.
गायीच्या गौ मूत्र आणि शेणाचे आर्थिक महत्व आपल्या ऋषींना माहीत होते म्हणून ते म्हणाले "गोमय वसते लक्ष्मी"
दैवदुर्विलास!
वस्तुतः, माझ्या उपरोल्लेखित प्रतिसादात एका अक्षरानेदेखील अतिशयोक्ती नाही. माझ्या बालपणी, साधारणतः १९७०च्या दशकात, त्या परिसरात राहात असताना आलेल्या अनुभवांचे यथार्थ वर्णन आहे ते!
असे असताना, आमचा उपरोल्लेखित प्रतिसाद हा काळ उघडा करणारा वगैरे न ठरता निव्वळ हास्योत्पादक ठरावा, याहून मोठा दैवदुर्विलास अन्य तो कोणता!
परंतु तरीही, 'जे मिळेल ते गोड मानून घ्यावे' या तत्त्वास अनुसरून तथा 'जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया' या न्यायाने, विनोदी श्रेणी तर विनोदी श्रेणी, तीच गोड मानून घेतो, झाले.
चालायचेच!
माझा प्रतिसाद हा >…
माझा प्रतिसाद हा >>चिमणरावांचा प्रस्तुत प्रतिसाद बोले तो दस्तुरखुद्द चिमणरावांच्या बालपणाचे वर्णन नसून, येथे कोठल्या प्रकारचे लेखन (चिमणरावांना) अपेक्षित आहे (आणि/किंवा वाचावयास आवडेल), याच्या वानगीदाखल, एक आदर्श प्रारूप (मॉडेल)/नमुना म्हणून त्यांनी तो लिहून दाखविला असावा, >> न'बांनी बरोबर ओळखले.
हाच लेख पटाईत काकांनी असा लिहिला असता तर आपण गाय, म्हैस, त्यांचे दूध, शेण यांच्या गुणावगुणात शिरलोच नसतो. लेखकाचे प्रांजळ अनुभव म्हणून वाचले असते.
माझे बालपण डोंबोलीत गेले…
माझे बालपण डोंबोलीत गेले नाही. ते सायन( शीव) येथे गेले. अगदी शहरी झाले. पण सहावी सातवीपर्यंत सांगली जिल्ह्यातील एका गावात मामाच्या गावी सुटीत गेले. तसे नंतरही जात होतो. पण अगदी लहान मुलांचा खोडसाळपणा गाववाले चालवून घेतात तसे नंतर होत नाही. कुणाच्यातरी झाडावरच्या कैऱ्या तोडणे, बैलगाडीत चढून बसणे,ऊस पळवणे , मोरांच्या मागे धावणे या गमतीजमती करायला मिळाल्या. " चड्डी काढून घेऊ का?, मोरांच्या मागे का लागतात?" वगैरे ओरडा बसायचा आणि सोडून देत.
निषेध!
माझे बालपण डोंबोलीत गेले नाही. ते सायन( शीव) येथे गेले. अगदी शहरी झाले.
पुणे (आणि त्यातसुद्धा आमची नारायण पेठ) हे १९७०च्या दशकातसुद्धा शहरी विभागातच मोडत होते हो!
पण सहावी सातवीपर्यंत सांगली जिल्ह्यातील एका गावात मामाच्या गावी सुटीत गेले.
आणि माझे मुंबईत, नि त्यातसुद्धा भर गिरगांवात. (माझे आजोळ, आणि, कर्मधर्मसंयोगाने, माझे जन्मस्थानसुद्धा. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मुक्काम तेथेच असायचा.) म्हणजे, त्याहूनही शहरी. (आणि अत्यंत बकाल!) तेथे श्वापदांचा जास्तीत जास्त संबंध म्हणजे चाळीच्या समाईक उकिरड्यावर बागडणारी आणि रात्रीच्या वेळेस कधीमधी चाळीच्या गॅलरीत कोठेही तळ ठोकणारी मांजरे.
या मांजरांबद्दल मला जिव्हाळा वगैरे नसला, तरी त्या काळी त्यांच्याशी खूप जवळून संबंध आलेला आहे. एकदा रात्रीच्या वेळेस माझ्या आजोबांच्या खोलीसमोर गॅलरीत मुक्काम ठोकलेल्या मांजराचे मी निव्वळ कुतूहल म्हणून शेपूट ओढून पाहिले होते. (लहान होतो मी तेव्हा. Not that that can be an excuse for anything, परंतु तरीही. मुख्य म्हणजे, रात्री सव्वानऊसाडेनवाची वेळ होती, त्यामुळे, चाळीतील समस्तजनांची जेवणे होऊन गेलेली असल्याकारणाने, मी आणि ते मांजर वगळता गॅलरीत जवळपास कोणीही नव्हते, आणि, गॅलरीत दिवा वगैरे असण्याची चाळीची परंपरा नसल्याकारणाने, कोणी असते, तरीसुद्धा त्याला मी आणि ते मांजर यांच्यात काय चालले आहे, ते दिसण्याची सुतराम् शक्यता नव्हती. कार्यभाग साधून घेण्यासाठी आवश्यक असा पूर्ण एकांत होता, नि संधी होती. थोडक्यात, अडवायला तिसरे कोणीही नव्हते.)
तर अशा रीतीने, मी त्या मांजराचे शेपूट हळूच ओढून पाहिले. मांजराने, समस्त मार्जारकुलात अभूतपूर्व अशा संयमाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. (शायद बच्चा समझ के छोड़ दिया होगा।) म्हटल्यावर, माझेही कुतूहल वाढले, नि मी त्या मांजराचे शेपूट पुन्हा एकदा ओढले. या खेपेस मांजराने डोळे वर करून माझ्याकडे पाहिले, परंतु बाकी काही हालचाल केली नाही. (कुठे या एवढ्याशा पोराच्या नादी लागायचे, असा विचार केला असेल.) मग मी त्याचे शेपूट पुन्हापुन्हा ओढून पाहू लागलो. दोनदा झाले, तीनदा झाले, हा पोरगा काही ऐकतच नाही, म्हटल्यावर पुढच्या खेपेस मांजराने आपल्या पंजाने माझ्या हातावर एकच फटका मारला. त्याने मला इजा अशी झाली नाही, परंतु, पुन्हा त्या मांजराच्या वाटेस जाण्यापासून मला परावृत्त करण्यासाठी तो फटका पुरेसा होता. मांजराचा नाद सोडून तसाच धावत घरी गेलो, तिथे शेजारचे तात्या रोजच्या परिपाठाप्रमाणे रात्रीच्या जेवणानंतर माझ्या आजोबांशी राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत वाटेल त्या विषयावर पान खाताखाता गप्पा मारण्यास आले होते, त्यांनी आपल्या घरून टिंक्चर आयोडीन आणून (आमच्या आजोबांच्या घरी नसायचेच!) माझ्या हातास फासले होते, असे आठवते. चालायचेच.
पुढे एकदा, एके सकाळी दहासाडेदहाच्या सुमारास, चाळीच्या अंगणातून एक मांजर आपल्या पिल्लाला दातांनी मानेला धरून उचलून नेत होते, ते दृश्य पाहावयास आम्ही चाळीतील काही मुले तेथे घोळका करून उभे राहिलो होतो. ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो, त्याच्या समोर मोघे आडनावाच्या एका वयस्कर बाईची खोली होती. आपल्या खोलीसमोर अर्धा डझन पोरे मांजर बघत घोळका करून उभी आहेत, याचा त्या म्हातारीस का कोण जाणे, परंतु त्रास वाटला. (असतात असे नग.) ती आपल्या खोलीतून पाण्याने भरलेली एक कळशी घेऊन आली, नि कोणतीही पूर्वसूचना न देता, ते पाणी आमच्यावर नि त्या मांजरावर फेकलेनीत्. नि वर आमच्यावर खेकसली. हाकलले म्हणा ना आम्हांस तेथून! मग आम्ही तेथून बस्तान हलविले, नि थेट चाळीच्या तिसऱ्या मजल्यावरील (मुंबईच्या भाषेत: दुसऱ्या माळ्यावरील) गॅलरीच्या टोकाच्या खिडकीतून मोठ्या आवाजात ‘ए मोघिणी! खाष्ट थेरडी!’ वगैरे वगैरे आम्हांस तेव्हा अवगत असलेल्या तमाम अपशब्दांचा खजिना तेथून (सुरक्षित अंतरावरून) तिच्यावर रिता केला. असो.
——————————
(@बापटसोा, मांडून ठेवताय ना तेवढी ती ज्ञानपीठे खात्यावर?)
.
गाढव आणि म्हशीचं appreciation करताना अजून एक गोष्ट नोंदवली पाहिजे. या प्राण्यांची पिल्लं अतिशय गोंडस असतात. नबा यांनी वर वर्णन केलेली कृती जर पूर्णत्वास गेली, तर तीतून जन्माला येणारं पिल्लू गाढव जगातलं सर्वात सुंदर बाळ ठरेल. तसंच, तान्ह्या रेडकाला डोक्यावर जे जावळ असतं त्याचं वर्णन काय करावं? फारच गोड!
त्यातला एक यूट्यूब विडिओ…
त्यातला एक यूट्यूब विडिओ
https://youtu.be/zlJvIxpVVDA?si=jAdrSAiH_KG-vY1K
"जेंव्हा लक्ष्मी मातेने…
"जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा."
गोमातेने असे का केले असेल? लक्ष्मीदेवीने शरीरात निवास मागितला होता ना? (का?)
मग उत्सर्जित गोमय आणि गोमुत्रात का आश्रय दिला असेल?
समझने वाले को…
गोमातेने असे का केले असेल? लक्ष्मीदेवीने शरीरात निवास मागितला होता ना? (का?)
मग उत्सर्जित गोमय आणि गोमुत्रात का आश्रय दिला असेल?
या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवेच का?
तरीसुद्धा, आता विचारलाच आहे प्रश्न, तर उत्तराचा प्रयत्न करतो.
दोन शक्यता लक्षात येतात.
१. Euphemism: लक्ष्मीने तिला जे काही मागायचे होते, ते खुल्लमखुल्ला मागितले. त्याबद्दल तिला काहीही hangups नव्हते. (आता, लक्ष्मीला तेच का मागावेसे वाटले, ते सोडून देऊ. असतात एकेकीच्या kinks; लक्ष्मीच्या लक्ष्मीला(च) लखलाभ होवोत! किंवा, असेही असू शकेल, की तेव्हा गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देवतांकरिता एक ग्रँड हौसिंग स्कीम चालू असल्याबद्दल ऐकलेले आहे, तीत आपला क्लेम लावण्याकरिताची लक्ष्मीची ही धडपड असेल. मिळतेच आहे अनायासे, तर का सोडा, नाही का? किंबहुना, अधिक विचाराअंती, हे दुसरे स्पष्टीकरणच अधिक सयुक्तिक वाटते. तर ते एक असो.)
आता, झाले असे, की लक्ष्मीला (क्लेम लावायला) यायला किञ्चित उशीर झाला. त्यामुळे, ती क्लेम लावायला जेव्हा आली, तेव्हा स्कीममध्ये केवळ (शेवटचे) दोनच प्लॉट शिल्लक होते. आता, शेवटचे दोनच प्लॉट म्हटल्यावर, ते बाकी कोणालाच नको असलेले असणार, हे उघड आहे. (तुम्हीच सांगा, ड्रेनेज नि सॅनिटेशनखात्याजवळचे प्लॉट तुम्ही तरी घ्याल काय? मग बाकी कोणी ते कशाला घेईल?)
तर लक्ष्मी क्लेम लावायला गेली, तेव्हा केवळ दोनच प्लॉट शिल्लक होते. त्यांचे यथार्थ वर्णन ऐकायला लक्ष्मीला लाज वाटली असती वा नसती, याबद्दल काही तर्ककुतर्क करणे हे आमच्या कुवतीबाहेरचे आहे; मात्र, गायीला ते वर्णन स्पष्टपणे करण्यास संकोच वाटला, एवढे निश्चित. त्यामुळे तिने स्पष्टोच्चार न करिता, तत्संबंधी इतर शब्दांचा वापर करून लक्ष्मीला हिंट दिली, एवढाच अर्थ यातून आपण लावू शकतो. (काहीसे ‘संडासला दुखते’ अथवा ‘लघवीला जळजळते’ म्हटल्यासारखे. दुखत संडासास अथवा जळजळत लघवीस नसते. दुखत वा जळजळत अन्यत्र असते. परंतु, आपण समजून घेतो. तसेच आहे काहीसे हे.)
याव्यतिरिक्त आणखीही एक शक्यता लक्षात येते. मात्र, वरील पहिल्या शक्यतेच्या तुलनेत ती नगण्य वाटते. तरीही, for whatever it is worth तत्त्वावर ती येथे मांडतोच.
२. गोमातेने लक्ष्मीला आपल्या शरीरातील जागाच देऊ केली. आणि, पहिल्या शक्यतेविरुद्ध, तिचे वर्णन करताना कोठलाही पर्यायी शब्द वापरला नाही. (थोडक्यात, जे काही देऊ करीत आहे म्हणून गोमातेने सांगितले, नेमके तेच ती प्रत्यक्षात देऊ करीत होती.)
मात्र, अशी एखादी जागा देऊ करीत असताना गोमातेस नेमका out of body experience येत होता. त्यामुळे, ती जी जागा देऊ करीत होती, ती लौकिक दृष्टीने जरी गायीच्या शरीराबाहेर असली, तरी गायीच्या दृष्टीने कदाचित तो (निदान त्या क्षणापुरता तरी) गायीच्या शरीराचा भाग असणे अशक्य नाही.
त्यामुळे, गोमातेचे बहुधा अगदीच काही चुकले नसावे.
असो चालायचेच.
(अवांतर)
हिंदू दृष्टिकोनातून गोमातेच्या शरीराचा (नि त्यात अंतर्भूत असलेल्या देवतांकरिताच्या गृहयोजनेचा) नकाशा कसा दिसतो, याबद्दल काही खात्रीशीर माहिती दुर्दैवाने मिळू शकली नाही.
तुलनेकरिता, अमेरिकन दृष्टिकोनातून गायीच्या शरीराचा नकाशा काहीसा असा दिसतो:
(नकाशा विकीपीडियावरून साभार.)
नकाशा उत्तम आहे…
नकाशा उत्तम आहे.
क्षीरसागरामधे शेषशायी पतीदेवांची सेवा आटोपून, वेणीफणी करून पृथ्वीतलावर येण्यास लक्षीमीदेवींना उशीर झाला असावा, त्यामुळे चांगला फ्लॅट मिळण्याची संधी हुकली. आधी घराचे बुकींग आणि नंतर पतीसेवा असा बाणेदारपणा त्यांनी दाखवला असता तर? .... पण मग हा लेख इथे पडलाच नसता.
(अतिअवांतर: Euphemism: एक (काहीसा अश्लील) विनोद)
वरील Euphemismच्या स्पष्टीकरणावरून एक जुना, (काहीसा) अश्लील विनोद आठवला. प्रस्तुत धाग्याच्या विषयाच्या अनुषंगाने चांगलाच अवांतर आहे, परंतु, सांप्रतच्या प्रतिसादमालिकेच्या ओघात असल्याकारणाने, येथे मांडण्याचे धारिष्ट्य करतोच.
एकदा एका गावात एक अत्यंत बावळट असा, आईने अतिरेकी लाडावलेला, जगायला नालायक, बेअक्कल, Mama’s boy-टैप मुलगा असतो. वयात येतो, तसा आईने पाहून ठरविलेल्या मुलीशी निमूटपणे लग्न करून मधुचंद्रास जातो. इथवर ठीक.
आता, मधुचंद्रास तर जातो, परंतु, तेथे गेल्यावर काय करायचे असते, याची त्याला बिलकूल कल्पना नसते. मग हॉटेलातूनच तडक आईला फोन लावतो. (ट्रंक कॉल अगदी.) “आई, आई, मी इथे मधुचंद्रास तर आलोय, नि इथे काहीतरी करायचे असते, एवढे मला ठाऊक आहे. परंतु, नक्की काय करायचे असते, ते माहीत नाही. सांग ना मला!”
आई सर्वप्रथम कपाळावर हात मारून घेते, नि म्हणते, “हात् गधड्या! एवढेसुद्धा ठाऊक नाही? एवढा मोठा झालास तरी? व्यर्थ जन्म तुझा! बरे, आता जे सांगते, ते नीट, लक्षपूर्वक ऐक, नि त्याच्याप्रमाणे कर. रात्रीच्या वेळेस, तुझ्या शरीराचा सगळ्यात टणक भाग, तुझी बायको सुसू करते तिथे घुसव.” एवढे बोलून (नि “यापुढे कर्म माझे नि नशीब तुझे!” असे मनातल्या मनात म्हणत) आई फोन ठेवून देते.
त्या रात्री, हॉटेलच्या मॅनेजरचा स्थानिक आपत्कालीन सेवांना फोन जातो, की आमच्या हॉटेलात अमूकअमूक खोलीत एक मनुष्य कमोडमध्ये डोके अडकलेल्या अवस्थेत आहे, तेव्हा तातडीने या, म्हणून.
असो चालायचेच.
कंपोस्ट
परवा कंपोस्ट हलवताना गोवरीचा एक तुकडा सापडला त्यावरून या धाग्याची आठवण झाली.
बरा अर्धा कधीमधी टेलिस्कोप घेऊन तारे बघायला जातो. तिथे गायींचं शेण पडलेलं असतं असं म्हणत होता. ते कोरडं असेल आणि सहज आणता येणं शक्य असेल तर घेऊन यायला मी त्याला सांगितलं. पण ती गोवरी खूप कोरडी झाल्यामुळे मला अपेक्षित काम झालंच नाही. शेणातल्या नायट्रोजनमुळे कंपोस्टातली पानं लवकर कुजतील असं मला वाटलं होतं.
तर परवा कंपोस्ट ढवळताना गोवरीचा तुकडा तसाच राहिलेला सापडला. मग त्यात पाणी घालून पुन्हा तो कंपोस्टात टाकला.
रोज कॉफीसाठी दूध काढताना मला नाही या धाग्याची आठवण होत!
•पशुपालनाचा हवामानबदलावर कसा…
•पशुपालनाचा हवामानबदलावर कसा प्रभाव पडतो त्याची मुलाबरोबर त्याच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी शोधाशोध केली असता मिळालेली माहिती -
• जगभरात पशुपालनामुळे (गायी,म्हशी,मेंढ्या,बकऱ्या असे पाळीव प्राणी) दरवर्षी सुमारे 7.1 गिगाटन(अब्ज टन) हरितगृह वायू (Green House) उत्सर्जित होतो. तो प्रामुख्याने या प्राण्यांच्या अन्नपचन करण्याच्या आंत्र किण्वन (enteric fermentation) पद्धतीमुळे निर्माण होतो. अन्नपचन करताना हे प्राणी मिथेन (CH₄) वायू बाहेर टाकतात.
• मिथेन हा त्रासदायक हरितगृह वायू आहे. यांना हरितगृह वायू म्हणतात कारण हरितगृहात जशी उष्णता अथवा तापमान टिकवून ठेवले जाते त्या प्रमाणेच हे वायू पृथ्वीच्या वातावरणात उष्णता टिकवून धरतात आणि हे वायू वाढले की पृथ्वीचे तापमान वाढत जाते. Global warming effect त्यालाच म्हणतात. त्यामुळे दरवर्षी पृथ्वी अधिक तापत जाते आहे.
• मिथेन हा वायू कार्बन डाय ऑक्साईड पेक्षाही २८-३० पट जास्त उष्णता वातावरणात धरून ठेवतो.
• एक गाय, म्हैस किंवा त्याच आकाराचा प्राणी ७० ते १२० किलो मिथेन दरवर्षी वातावरणात उत्सर्जित करतो.
जगभरातले पाळीव प्राणी लक्षात घेतले तर एका वर्षात वातावरणात सोडल्या जाणाऱ्या एकूण हरितगृह वायूच्या १४.५% वायू हा पशुपालनामुळे तयार होतो. मग तो जनावरांनी अन्नपचन करताना बाहेर सोडलेला मिथेन असो. त्यांच्या शेणाचं विघटन होताना तयार झालेल्या नायट्रस ऑक्साईड (N₂O) असो. की पशुपालनासाठी जो चारा लागतो त्याच्या लागवडीसाठी जी जंगलतोड जगभर केली जाते, त्यामुळे झाडे कमी होतात आणि कार्बनडायऑक्साईड झाडांद्वारे शोषला जात नाही त्यामुळे CO₂चे हवेतील वाढणारे प्रमाण असो.
• हे प्रमाण जगभरातल्या संपूर्ण वाहतूक क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या (गाड्या, ट्रक, विमानं, जहाजं) प्रदूषणाइतकं आहे. जर या पशूंचे एक राष्ट्र असते तर हरितवायू उत्सर्जनात चीननंतर त्या पशू राष्ट्राचा नंबर लागला असता.
• जगातील बर्फमुक्त राहण्यायोग्य जमिनीपैकी ३०% जमीन फक्त या पाळीव जनावरांसाठी वापरली जाते.
• जगातील २७% ताजं पाणी फक्त मांस व दुग्धोत्पादनासाठी चालणाऱ्या उद्योगांसाठी आणि प्राण्यांच्या पिण्यासाठी खर्च होतं.
• सरासरी १ लिटर दुधाच्या उत्पादनात सुमारे १००० लिटर पाणी लागतं. यामध्ये जनावरासाठी लागणारा चारा पिकवताना लागणारं पाणी + जनावराला पाजलं जाणारं पाणी+ जनावरांची स्वच्छता, दुधावर प्रक्रिया यासाठी लागणारं पाणी समाविष्ट आहे.
• एका वर्षात पशुपालनामुळे ७.१ अब्ज टन CO₂e हरितगृह वायू उत्सर्जन होते. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते. प्रचंड पाणी व जमीन वाया जाते. आणि त्यातून जगभरच्या लोकसंख्येच्या अन्नातील केवळ १८% कॅलरीच्या गरजा भागतात.
• वाढत्या पशुपालनामुळे आपली पृथ्वी दरवर्षी अधिकाधिक तापत जाते आहे.
• लोकसंख्या नियंत्रण + Vegan होणे हाच यावर उपाय
बाकी सर्व अॅनालिसिस पटण्यासारखा आहे, परंतु...
बाकी सर्व अॅनालिसिस पटण्यासारखा आहे, परंतु...
• लोकसंख्या नियंत्रण + Vegan होणे हाच यावर उपाय
हे कसे काय?
व्हेगन/व्हीगन झाल्यास मनुष्ये संबंधित जनावरांचे दूध पिणार नाहीत, झालेच तर संबंधित जनावरांचे मांस खाणार नाहीत. इथवर (एक वेळ) ठीक आहे. ('एक वेळ' अशासाठी, की हा मुद्दा मला तितकासा पटलेला नाही, म्हणून.) त्याने मनुष्यांचे या प्राण्यांवरील अवलंबित्व कमी होईलही कदाचित, परंतु म्हणून (पक्षी: तुम्ही दूध प्याला नाहीत किंवा मांस खाल्ले नाहीत, म्हणून) सध्या ज्या आहेत त्या गोमाता नि महिषामावशी वातावरणात मिथेन पादायच्या थांबणार आहेत काय?
राहता राहिली गोष्ट लोकसंख्यानियंत्रणाची. मनुष्यांची लोकसंख्या तुम्ही एक वेळ (बर्यावाईट मार्गांनी) नियंत्रित करू शकाल. गाईम्हशींच्या लोकसंख्येचे काय? आफ्टर ऑल, मनुष्ये पर्यावरणात मिथेन पादत नाहीयेत; गायीम्हशी पादताहेत. (गायमातु:श्री नि म्हैसमावशीश्री म्हणणार होतो, परंतु, तो घिसापिटा मुद्दा आणखी ताणत नाही. There can be such a thing as too much of a good thing. So, let me continue on a (somewhat) more serious note.)
मनुष्यांची लोकसंख्या नियंत्रित केल्याने एक वेळ मनुष्यांचे (दूधदुभत्याकरिता किंवा मांसाकरिता) या प्राण्यांवरील अवलंबित्व कमी होईलही, नि त्यामुळे (दूधदुभते नि मांसाशी निगडित) उद्योगधंद्यांकरिता केली जाणारी या प्राण्यांची बेसुमार पैदास कदाचित (कदाचित! It is a big if.) होणार नाही. इथवर एक वेळ मान्य करू. परंतु, गायीम्हशींच्या आहे त्या लोकसंख्येचे काय? त्या तर हवेत मिथेन पादीतच राहणार ना? त्या लोकसंख्येच्या नैसर्गिक वाढीवर नियंत्रण कोण ठेवणार?
दुसराही एक मुद्दा यात आपण विचारात घेतलेला दिसत नाही. आणि, त्या मुद्द्यातून उलट दृष्टीने धोका आहे. म्हणजे असे पाहा. उद्या समजा सगळे जग जर जागतिक तापमानवाढ थांबविण्याकरिता एकत्र येऊन घाऊक भावात व्हेगन/व्हीगन झाले. आणि, त्याचबरोबर, मनुष्यांच्या लोकसंख्यावाढीवर नियंत्रणही आले. अशा परिस्थितीत, कोणीही दूधदुभते खात नाही नि कोणीही मांस खात नाही, म्हटल्यावर, पशुपालनाची (नि विशेषेकरून गायी नि म्हशी पाळण्याची) मनुष्यास गरजच कशास उरेल?
(शेतीकरिता औतास जुंपण्याकरिता बैलांची नि रेड्यांची गरज म्हणाल, तर आजकाल अशा पद्धतीने शेती किती प्रमाणात होते? नि बैलांच्या नि रेड्यांच्या पैदाशीकरितासुद्धा गायीम्हशी लागतात, नि त्यांचे दूधही (प्यायचे किंवा) विकायचे नाही नि मांसही (खायचे किंवा) विकायचे नाही, म्हटल्यावर, केवळ बैलारेड्यांच्या पैदाशीकरिता गायीम्हशी बाळगण्याचा खर्च कोण नि कशास उचलेल? फॉर्दॅट्मॅटर, केवळ औतास जुंपण्याकरिता बैलारेड्यांचा खर्च तरी कोण नि कशास उचलेल?)
त्यामुळे, एकंदरीत मनुष्यास पशुपालनाची (किंवा गेला बाजार गायीम्हशी बाळगण्याची) गरज उरणार नाही (किंवा तो आतबट्ट्याचा व्यापार ठरेल), नि त्यायोगे पशुपालन हा एक व्यवसाय म्हणून बंद होईल.
पशुपालन हा एक व्यवसाय म्हणून जर बंद झाला, तर त्याचे दु:ख नाही, परंतु, त्याचा जैववैविध्यावर (नि पर्यायाने पर्यावरणावर – करेक्ट मी इफ आय अॅम राँग, परंतु, जैववैविध्य हादेखील पर्यावरणाचाच भाग होत नाही काय?) काय विपरीत परिणाम होईल, याचा विचार कधी केला आहेत काय?
म्हणजे असे पाहा. आज पशुपालन हा एक व्यवसाय आहे, म्हणून गायीम्हशींचे प्रजाति म्हणून थोडेफार तरी संवर्धन होत आहे; मनुष्य आपल्या स्वार्थाकरिता का होईना, परंतु आपण होऊन ते करीत आहे. उद्या पशुपालन हा एक व्यवसाय म्हणून जर नष्ट झाला, तर गायीम्हशींची गणना ही ('उपयुक्त पशूं'ऐवजी) वन्य (किंवा गेला बाजार भटक्या नि विमुक्त) पशूंमध्ये होऊ लागेल. नि वन्य पशूंच्या संवर्धनाबद्दल नि संरक्षणाबद्दल एक समाज म्हणून आपण (म्हणजे, आपणच नव्हे. जगातला आजमितीस कोठलाही मानवी समाज घ्या.) कितपत जागरूक असतो, हे आपल्याला ठाऊक आहेच. (विशेषतः, वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात, वगैरे... मध्यंतरी पुण्यात चुकून साधा एक गवा आला, तर... अशा वाट चुकलेल्या गव्याचे काय होते, ते तो एक गवा जाणे, नि त्याचे नशीब जाणे! तशा आमच्या कोथरुडात बिबळ्या शिरल्याच्या बातम्याही पेपरांतून अधूनमधून छापून येत असतात, परंतु ते एक असो.)
थोडक्यात, जग जर व्हेगन/व्हीगन झाले, नि त्यामुळे पशुपालन हा एक व्यवसाय म्हणून जर नामशेष झाला, तर गायीम्हशींच्या संवर्धनाकरिता काही विशेष योजना हाती घ्याव्या लागतील. कदाचित गायीम्हशींकरिता वेगळी अभयारण्ये उभारावी लागतील. (त्या अभयारण्यातील गायीम्हशी पादल्यामुळे उत्सर्जित होणार्या मिथेनचे काय, ही समस्या तूर्तास बाजूस ठेवू, नि एका वेळेस एकाच समस्येचा विचार करू. तूर्तास आपण जैववैविध्याची समस्या मांडत आहोत.) झालेच, तर प्राणिसंग्रहालयांतून गायीम्हशींचे पिंजरे ठेवावे लागतील. अन्यथा, लवकरच गायीम्हशी नामशेष होऊन जैववैविध्यावर (नि पर्यायाने पर्यावरणावर) त्याचा गंभीर परिणाम झाल्यावाचून राहणार नाही.
(तर सांगण्याचा मतलब इतकाच, की जागतिक तापमानवाढ आणि त्या अनुषंगाने गायीम्हशींच्या मिथेन पादण्यातून त्याप्रति होणारे योगदान, यासंबंधीचा आपला अॅनालिसिस पटण्यासारखाच आहे. त्याबद्दल वाद नाही. परंतु, व्हेगन/व्हीगन होणे हा त्यावरील उपाय पटला नाही. शिवाय, भले तुम्ही किंवा मी जर व्हेगन/व्हीगन झालोच (कशाकरिता, हा मुद्दा तूर्तास बाजूस ठेवू. शिवाय, तुमच्याबद्दल ठाऊक नाही, परंतु, मला व्हेगन/व्हीगन बनवू शकणारा माईचा लाल अद्याप जन्मास यावयाचा आहे. परंतु, ते सोडून देऊ. सध्याच्या मुद्द्यापुरती तशी कल्पना करू.), तरीसुद्धा, उर्वरित जगावर त्याने ढिम्म परिणाम होणार नाही, नि त्यामुळे बेसुमार पशुपालनाचा, झालेच तर गायींनी अवाच्यासवा मिथेन पादण्याचा, नि त्यायोगे जागतिक तापमानवाढीचा प्रश्न जस्साच्या तस्सा राहील, याबद्दल मला खात्री आहे.
बाकी, (मानवी) लोकसंख्यानियंत्रणाबद्दल म्हणाल, तर तेथेसुद्धा, केवळ मी किंवा तुम्ही असे म्हणण्याने (किंवा आपापल्यापुरते अमलात आणण्यामुळे) काहीही होण्यासारखे नाही. शिवाय, लोकसंख्यावाढ ही काही ठिकाणी एक प्रचंड स्थानिक समस्या आहे, याबद्दल जरी दुमत नसले, तरीही, जागतिक पातळीवर ही समस्या आहेच, याबद्दल माझ्या मनात अद्याप द्विधा आहे. सबब, या विषयावर (निदान तूर्तास तरी, माझ्या मनाची कोठल्याही एका बाजूने खात्री पटेपर्यंत) अधिक बोलू इच्छीत नाही.
तूर्तास इतकेच. (हुश्श!))
तुम्हाला खरंच असं म्हणायचंय…
तुम्हाला खरंच असं म्हणायचंय का, की सगळे व्हेगन झाले तर मग टायसन, कार्गिल, जेबीएस वगैरे बीफसाठी गाईंचं "औद्योगिक उत्पादन" करणार्या कंपन्या त्याना पोसत रहातील? किंवा त्यानी तसं करावं म्हणून सरकारं त्याना सबसिडी देईल? सुमारे १ मिलीअन कोंबड्याना एका उन्हाळ्यात सहजगत्या सायलोमधे डांबून तपमान खूप वाढवून "किफायतशीररित्या मारणार्यांचे" चुलत भाऊ आहेत हे. सगळ्या गाईना मारून टाकतील. आणि त्या मांसाच्या विघटनातनं कार्बन डायॉक्साईड, मिथेन तयार होऊन त्यामुळे कसं जगाचं अपरिमित नुकसान होतंय याचं लॉबिंग करतील. :-(
बहुतेक +१
भारतीय लोक फार मांसाहारी नाहीत; म्हणजे अमेरिकेच्या तुलनेत माणशी मांसाहाराचं प्रमाण भारतात बरंच कमी आहे. त्यामुळे व्हेगन/व्हिगन/व्हेगान होण्याचा मुद्दा भारतीयांकरता कितपत लागू होईल, याबद्दल शंका आहे. मात्र काही झालं तरी गायी-बैल मारायचे नाहीत, भले त्यांना वयोमानामुळे, आजारपणामुळे कितीही त्रास का होत असेना, असले पुराणकालीन कायदे रद्द करायला हरकत नाही.
भारतासाठी खूपच मर्यादित प्रमाणात लागू असलेला आणखी एक मुद्दा नासाडीचा. अमेरिकेत साधारण ३०%-४०% अन्न वाया जातं. याचं कारण कुणालाही सध्या याची पडलेली नाही, हेच आहे.
भारतात अन्नाची नासाडी होण्याचं मुख्य कारण संसाधनांचा अभाव हे आहे. भाज्या, फळं वगैरे शेतातून बाजारात नेण्याआधी झटक्यात थंड (flash freeze) करून मग थंड ठेवणं गरजेचं असतं. झटक्यात थंड करणं, हा भाग भारतात बहुतेक ठिकाणी होत नाही. त्यात अन्नाची प्रत कमी होते; आणि टिकाऊपणाही कमी होतो.
हारून राव , शेवटचे वाक्य…
हारून राव ,
शेवटचे वाक्य वगळता इतर माहिती उत्तम !!
परंतु
"• लोकसंख्या नियंत्रण + Vegan होणे हाच यावर उपाय "
हा उपाय फार अध्यात्मिक वाटतो. हा कसा शक्य व्हावा ?
हे म्हणजे 'शहरातील हवा प्रदूषण नाहीसे करण्यासाठी सर्व स्वयंचलित वाहने बंद करावी '
असे म्हणण्यासारखे वाटते.
.
लोकं शाकाहारी झालेत तरी दूध, दही, लोणी, तुप, पनीर, चीज, लस्सी किती कितीवर पाणी सोडणार?
शाकाहार की मांसाहार यावर खोर्याने रिसर्च रिपोर्ट सापडतील. जे एकमेकांविरुद्ध असतील. त्यामुळे त्यावर वाद घालण्यात काही अर्थ नाही.
काही वर्ष शाकाहारी राहीलो होतो आणि व्हे प्रोटीन सप्लिमेंट म्हणून घ्यायचो. पण आता अंडी, दूध, मासे फार क्वचित चिकन खातो. दूध माझ्यासाठी रोजच्या जेवणातला प्रोटीनचा सोर्स आहे. यूस मध्ये असताना व्हाईट कॅसलचे हॅमबर्गर आवडायचे. पण रेड मिट आणि बटर मध्ये प्रोटीनच्या आवश्यक आम्लाबरोबर सॅच्युरेटेड फॅट्स पण येतात म्हणून ते शक्यतो कमी घ्यावेत.
आलिकडे टॅरीफ वॉर मुळे एक नव्याने कळले की, अमेरिकेत गायींसाठी जे खाद्य देतात (सप्लिमेंट) त्यात मासांहारी पदार्थ असतात त्यामुळे अमेरिकन डेअरी प्रोडक्टवर, आणि कॅटल फीड सप्लिमेंटवर बंदी होती. ही बंदी हटवावी हा ड्रेड डिलचा एक भाग होता. शेवटी काय ठरले ते माहीत नाही.
…
आलिकडे टॅरीफ वॉर मुळे एक नव्याने कळले की, अमेरिकेत गायींसाठी जे खाद्य देतात (सप्लिमेंट) त्यात मासांहारी पदार्थ असतात त्यामुळे अमेरिकन डेअरी प्रोडक्टवर, आणि कॅटल फीड सप्लिमेंटवर बंदी होती.
तुम्हाला हे (टॅरिफ वॉरमुळे) आत्ता कळले??????
आम्ही हे १९९५-९६च्या सुमारास, मॅड काऊ डिसीज़च्या निमित्ताने वाचले होते.
आणि, “मांसाहारी पदार्थ” बोले तो, गोमांसाचेच, मानवाला (खाण्याकरिता) विकण्याच्या दृष्टीने निकृष्ट असे उर्वरित (बचेकुचे) भाग, बारीक लगदा करून, कडब्याबरोबर बेमालूमपणे मिसळून दिलेले असतात, हा तपशीलदेखील तेव्हाच वाचण्यात आला होता.
लहानपणी शाळेत आम्हाला ‘नारळ — एक कल्पवृक्ष’ अशा आशयाचा (बहुधा हिंदी विषयाला) धडा असे. (झालेच तर, अनेकदा मराठी विषयाला याच विषयावर निबंधही पाडायला सांगत.) त्यात, झावळ्यांपासून ते करवंट्यांपर्यंत नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग कसा उपयुक्त आहे, वगैरे वगैरे नेहमीचेच यशस्वी घिसेपिटे मुद्दे असत. वरील प्रकार हा काहीसा तशातलाच झाला, नव्हे काय?
नाहीतरी, ‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे’ असे सावरकर म्हणून गेलेले आहेतच!
(अवांतर: मॅड काऊ डिसीज़च्या काळात, ते कॅटल फीडमध्ये मिसळलेले गोमांस कोठल्या गायींपासून असते, कोण जाणे, आणि त्यामुळे चांगल्या धडधाकट गायींमध्येसुद्धा या रोगाचा प्रसार होतो, अशी थियरी होती. आणि म्हणूनच, गोमांस खाणे हे (मनुष्यांनी) तूर्तास टाळावे, अशी टूम होती.)
(अतिअवांतर: या मॅड काऊ डिसीज़च्या काळातलीच गोष्ट आहे. या काळात एकदा विमानाने भारतात येऊन गेलो होतो. आता, सामान्यतः, विमानप्रवासात मी जेवणाकरिता कधीही (चुकूनदेखील) ‘स्पेशल मील’ (‘इंडियन/एशियन व्हेजिटेरियन’ किंवा अन्य) मागवीत नाही. कारणे अनेक आहेत. एक तर, मी (शाकाहारी परंपरेत वाढलेलो असलो, तरीही) व्यवहारात/आचरणात शुद्ध शाकाहारी नाही. त्यात मला गोगलगोमांसापासून ते गोमांसापर्यंत काय वाटेल ते चालते. (नव्हे, आवडते.) अशा परिस्थितीत, मिळत असताना आपल्या खाण्याच्या निवडीवर नाहक मर्यादा का आणा, या विचाराने मी विमानकंपनी सामान्यतः जे अन्न लोकांना पुरविते, ते निमूटपणे गिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे, ‘स्पेशल मील’ मागविले, तर अनेकदा हे विमानकंपनीवाले साले इतरांबरोबर आपल्याला जेवायला न वाढता, सगळ्यांच्या अगोदर समस्त ‘स्पेशल मीले’ आधी ‘उरकून’ घेतात, नि मग बाकीच्यांना वाढायला जातात. एक तर ते चमत्कारिक होते; दुसरे म्हणजे, (तुलनेने) नको तितक्या लवकर जेवायला लागून सर्व ऱ्हिदम बोंबलतो. (शिवाय, ‘स्पेशल मील’ सर्वांअगोदर देतात खरे, मात्र, जेवणाबरोबर जे पेय असते (ज्यूस/कोक/वाइन/दारू जे काही मागाल ते) ते मात्र इतरांबरोबर देतात. त्यामुळे, इतरांकरिता ते पेय जरी जेवणाअगोदर किंवा जेवणाबरोबर असले, तरी ‘स्पेशल मील’वाल्यांकरिता ते जेवणानंतर होते. अन्यथा, अगोदर वाढून आलेले असले, तरीही, इतरांचे वाढून होईपर्यंत नाहक जेवायचे थांबावे लागते.) चौथी (आणि सगळ्यात महत्त्वाची) गोष्ट म्हणजे, आधीच विमानकंपन्या जे सामान्य (‘स्पेशल’ नसलेले) अन्न देतात, ते नेहमीच फारसे उच्चकोटीचे असते, अशातला भाग नाही. (मात्र, अनेकदा त्यातल्या त्यात बरे (नि खाण्यालायक) असते.) मात्र, (काही तुरळक सन्माननीय अपवाद वगळता) विमानकंपन्या सामान्यतः ‘भारतीय शाकाहारी अन्ना’च्या नावाखाली जे काही देतात, ते (१) दयनीय असते, (२) भारतीय पाकपद्धतीचा विपर्यास असतो, तथा (३) अनेक भारतीय शाकाहारी मंडळींनासुद्धा ते फारसे झेपत नाही; केवळ नाइलाज म्हणून दोन घास कसेबसे गिळतात, झाले, अशातला प्रकार असतो, असा सामान्य अनुभव आहे. (शिवाय, जेवणातली भाजी तेवढी भारतीय शाकाहारी नि त्याबरोबर सगळ्यांना देतात तोच पावाचा तुकडा नि लोणी, असला अर्धवट प्रकार असतो. तो पावाचा तुकडा सामान्यतः हातोड्याने तोडण्याच्याच लायकीचा असला पाहिजे, असा दंडक आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करू. त्यामुळे, अगोदर पावाला सुरीने लोणी लावून तो नुसताच खाणे (किंवा पाव फेकून देणे) नि मग भाजी नुसतीच खाणे, असे काहीतरी करावे लागते. तर आहे हे असे आहे सगळे.)
असो. तर सांगण्याचा मुद्दा, विमानप्रवासात मी सहसा भारतीय शाकाहारी जेवण (किंवा कोठलेही ‘स्पेशल मील’) टाळतो, नि विमानकंपनी सर्वांना सरसकट जे जेवण देते, तेच घेतो. मात्र, या ‘मॅड काऊ’ काळातल्या प्रवासात, केवळ भीतीपोटी, मी कधी नव्हे ते भारतीय शाकाहारी जेवण मागविले. (वस्तुतः, गोमांस वगळता इतर मांसांपासून धोका असण्याचे काही कारण नव्हते, परंतु, ‘कशास उगाच रिस्क घ्या’ ही (ममव) मानसिकता. असो.) आश्चर्य म्हणजे, लंडन-मुंबई (नि परतीच्या प्रवासात मुंबई-लंडन) सेक्टरवर ब्रिटिश एअरवेज़ने उत्तम प्रतीचे पालक पनीर वगैरे पुरविले; अमेरिका-लंडन सेक्टरवर पुरविलेले तथाकथित भारतीय शाकाहारी अन्न मात्र अपेक्षेप्रमाणेच भिकार होते. चालायचेच.)
(अतिअतिअवांतर: ‘मॅड काऊ’ काळात, गोमांसापासून जरी धोका असला, तरीसुद्धा, पनीरपासून (किंवा, एकंदरीतच, (गायीच्या) दुग्धजन्य पदार्थांपासून) धोका नसावा, अशी आशा आहे. किंवा, कोण जाणे, आमचे एकंदर प्रतिसाद पाहता, ब्रिटिश एअरवेज़ने पुरविलेल्या पालक पनीरचा तो परिणाम असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येणार नाही. असो.)
.
मॅड काऊ डिसीज़ मला गेल्याच महिन्यात कळला. तेही टॅरीफच्या त्या बातमीच्या निमित्ताने शोधा शोध केली तेव्हा. तरीही एकदंर यूस एफडीए "बर्यापैकी" विश्वासार्ह असल्याने (तिथले निकष कठोर असल्याने), असल्या कॅटलफीड वर पोसलेल्या गायींचे दूध हानिकारक असते तर एव्हाना ते यूस मध्ये बॅन झालेही असते. तरीही सध्यस्थिती काय आहे हे माहीत नाही.
अपडेटः कोपायलट नुसार, "मॅड काऊ डिसीज" टाळण्यासाठी यूस एफडीएअ ने काही घटक गुरांच्या खाद्यात वापरण्यास बंदी घातली आहे (गायींचे मांस, चरबी इ.). पण रक्त रक्तजन्य पदार्थ, डुकराचे / घोड्याचे प्रथिने चालू शकतात.
अजून एक अवांतर... ही एक बातमी समजली... महाराष्ट्रात आता गाढवं २०११ च्या गणतीपेक्षा निम्म्यावर (फार फार २५००) असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागातील अधिकान्यांना आणि पशुपालकांसाठी गर्दभ व्यवस्थापन कार्यशाळा घेतल्या जात आहेत.
.
In reply to (अतिअवांतर) by 'न'वी बाजू
ज्ञानपीठ माहीत नाही पण श्रेणीव्यवस्था असती तर विनोदी श्रेण्या नक्की आल्या असत्या. प्रतिसाद वाचताना खूप हसू आले.