Skip to main content

मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कारविजेते: वि.स.खांडेकर

२६ फेब्रुवारी १९७६ हा दिवस मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. कारण याच दिवशी मराठी भाषेला पहिल्यांदाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि तो मिळाला महान साहित्यिक वि. स. खांडेकर यांना. हा पुरस्कार त्यांच्या ‘ययाती’ या कालजयी कादंबरीसाठी देण्यात आला. हा सन्मान फक्त एका लेखकाचा नव्हता; तो संपूर्ण मराठी भाषेच्या सर्जनशील शक्तीचा आणि तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेचा गौरव होता. त्या क्षणी मराठी साहित्याने राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख अधिक ठळकपणे निर्माण केली. आज या महत्वाच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून हा लेख लिहित आहे. त्या निमित्ताने समस्त हत्ती परिवाराकडून वि.स.खांडेकरांना विनम्र अभिवादन.

विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म ११ जानेवारी १८९८ रोजी सांगली येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात साहित्याची बीजे रोवली गेली. पुढे शिक्षक म्हणून काम करताना समाजातील अनेक स्तरांतील लोकांशी त्यांचा संपर्क आला. माणसांच्या भावना, संघर्ष, आशा-अपेक्षा आणि अपयश यांचे त्यांनी जवळून निरीक्षण केले. या अनुभवांमुळे त्यांच्या लेखनाला जीवनाचा वास्तव स्पर्श मिळाला.

खांडेकरांनी अनेक प्रकारांत लेखन केले—कादंबऱ्या, कथा, निबंध, समीक्षा आणि चित्रपटांसाठी पटकथा. त्यांच्या साहित्यामध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान आणि मानवी मनाचा शोध यांचा सुंदर संगम दिसतो. त्यांच्या कथांमध्ये पात्रे जिवंत वाटतात कारण ती आपल्या आसपासच्या माणसांसारखीच असतात. त्यांच्या गुणदोषांसह, स्वप्नांसह आणि संघर्षांसह ती उभी राहतात.

त्यांच्या साहित्यकृतींपैकी ‘ययाती’ ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. पुराणातील ययातीची कथा त्यांनी आधुनिक दृष्टिकोनातून पुन्हा उभी केली. मानवी इच्छा, भोग, कर्तव्य आणि आत्मजागृती यांचा अत्यंत प्रभावी वेध त्यांनी घेतला. त्यामुळे ही कथा केवळ पौराणिक राहत नाही; ती आधुनिक मनुष्याच्या जीवनाशी जोडली जाते. म्हणूनच ‘ययाती’ ही मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड ठरली.

खांडेकरांच्या लेखनाची भाषा साधी, प्रवाही आणि विचारपूर्ण आहे. ते वाचकांना गुंतागुंतीचे विचारही सहजपणे समजावून सांगतात. त्यांच्या कथांमध्ये मानवी भावनांची सूक्ष्मता दिसते. त्यांनी अनेकदा माणसाच्या कमकुवतपणाकडे दोष देण्याऐवजी समजून घेण्याच्या नजरेने पाहिले. त्यांच्या साहित्यामुळे वाचक स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लागतो.

मराठी साहित्यातील आधीच्या परंपरेत समाजसुधारणा आणि आदर्शवाद यांचा प्रभाव होता. खांडेकरांनी या परंपरेला मानसशास्त्रीय आणि तत्त्वचिंतनात्मक दिशा दिली. त्यांनी माणसाच्या मनातील प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले. त्यामुळे त्यांचे साहित्य अधिक व्यापक आणि कालातीत बनले. त्यांच्या लेखनात जीवनाचा खोल अर्थ शोधण्याचा प्रयत्न दिसतो.

ज्ञानपीठ पुरस्कारामुळे मराठी साहित्याला राष्ट्रीय स्तरावर नवे स्थान मिळाले. देशभरातील वाचक आणि समीक्षकांचे लक्ष मराठी साहित्याकडे वळले. या घटनेमुळे अनेक तरुण लेखकांना प्रेरणा मिळाली. मराठी भाषेतही जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण होऊ शकते याची जाणीव सर्वांना झाली. 

वि. स. खांडेकर हे व्यक्ती म्हणून अत्यंत साधे आणि विचारशील होते. त्यांना प्रसिद्धीपेक्षा साहित्याची साधना महत्त्वाची वाटत असे. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, वाचन करणे आणि चिंतन करणे हे त्यांचे आवडते काम होते. त्यांच्या आयुष्यातील साधेपणा आणि लेखनातील खोली यांचा सुंदर समतोल दिसतो.

Vi.Sa.Khandekar

त्यांच्या साहित्यामध्ये भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. त्यांनी परंपरेला नाकारले नाही, पण तिला नवे अर्थ दिले. जुन्या कथांमधून आधुनिक जीवनाचे प्रश्न उभे करण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. त्यामुळे त्यांचे लेखन आजही तितकेच सुसंगत वाटते.

वि.स.खांडेकर हे नाव उच्चारले तरी सगळ्यांच्या मनात नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते. हत्ती जसा विशाल, स्थिर आणि स्मरणशक्तीने परिपूर्ण असतो, तसेच खांडेकरांचे साहित्य विशाल आणि दीर्घकाल टिकणारे आहे. हत्ती जंगलात शांतपणे चालत असतो पण त्याच्या पावलांनी नवी वाट तयार होते; त्याचप्रमाणे खांडेकरांनी मराठी साहित्यात नवीन मार्ग निर्माण केला. त्यांच्या विचारांचे सामर्थ्य मोठे होते, पण ते व्यक्त होताना संयम आणि संतुलन राखत असत. म्हणूनच त्यांच्या साहित्याचा प्रभाव खोल आणि दीर्घकाळ टिकणारा ठरतो. 

आज अनेक दशकांनंतरही वि. स. खांडेकरांचे साहित्य वाचताना ते तितकेच ताजे वाटते. मानवी स्वभावाचा त्यांनी केलेला अभ्यास आणि जीवनातील नैतिक प्रश्नांवरील त्यांचे चिंतन आजही मार्गदर्शक ठरते. २६ फेब्रुवारी १९७६ रोजी मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा मराठी साहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्या टप्प्याचे प्रमुख शिल्पकार म्हणजे वि. स. खांडेकर. त्यांच्या लेखनामुळे मराठी भाषेचा गौरव वाढला आणि पुढील पिढ्यांना प्रेरणेचा अमूल्य वारसा मिळाला.

पुन्हा एकदा वि.स.खांडेकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून हा लेख आवरता घेतो.

तर्कतीर्थ Thu, 26/02/2026 - 13:17

मुंबईतील रूईया कॉलेजमधील इंग्रजीचे प्राध्यापक आणि विनोदी लेखक वि० ह० कुळकर्णी माझ्या सख्ख्या आजोबांचे सख्खे आतेभाउ. त्यामुळे ही हकिकत घरातच समजलेली आहे.

त्यांच्याकडे एकदा काही लेखक मंडळी काही कार्यक्रमासाठी जमली होती. त्यात खांडेकरपण आले होते. दुपारच्या जेवणानंतर गप्पा इतक्या रंगल्या की संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली. वि० ह० कुळकर्णींच्या पत्नी इंदिराबाईंनी सगळ्यांकडे "भूक किती आहे" याची चवकशी केली. त्यावर सर्वांनी रात्री लंघनाचा मनसुबा जाहिर केला. त्यावर इंदिराकाकूनी खुंटी हलवून बळकट करण्यासाठी "नक्की ना?" म्हणून परत एकदा खात्री केली. सर्वांनी "हो, हो" केल्याने माझ्यासाठी काही तरी बघते असं म्हणून त्यांनी कुळथाचं पिठलं आणि भाताची तयारी सुरु केली.

इंदिराकाकूनी स्वत:साठी कुळथाचे पिठले करायला घेतले आणि हळूहळू घरात त्याचा घमघमाट पसरू लागला, तेव्हा १ली चलबिचल खांडेकरांची सुरु झाली. शेवटी वेळीच सांगितलेले बरे म्हणून खांडेकर उठले आणि स्वयंपाकघर गाठले. इंदिराकाकूंना म्हणाले,

"वहिनी, माझा पण थोडा जास्त भात टाका"

"बरं-बरं" म्हणून इंदिराकाकू हसल्या.

खांडेकरांच्या लंघनाचा असा भंग झाल्यावर मग बाकीच्या लेखक मंडळींचे लंघनाचे निर्धार भंग पावले आणि दबकत, ओशाळत स्वयंपाकघरात जाऊन इंदिराकाकूना आपल्यासाठी पिठलं-भात वाढवण्यास सांगितले.

असे हे कुळथाच्या पिठल्याचे माहात्म्य आमच्या घरात बरेच चघळले जाई...

'न'वी बाजू Thu, 26/02/2026 - 18:08

In reply to by तर्कतीर्थ

मुंबईतील रूईया कॉलेजमधील इंग्रजीचे प्राध्यापक आणि विनोदी लेखक वि० ह० कुळकर्णी माझ्या सख्ख्या आजोबांचे सख्खे आतेभाउ.

हे अशक्य जरी नसले, तरी (विशेषेकरून, तो काळ लक्षात घेता) अंमळ फारफेच्ड वाटते. (नपक्षी, स्पेलिंग मिष्टेक झाली असावी.)

‘कुळकर्णी’ बोले तो सीकेपी. ‘उपाध्ये’ बोले तो कऱ्हाडे ब्राह्मण.

तुम्हाला बायेनीचान्स ‘कुलकर्णी’ म्हणायचे होते काय? ‘कुळकर्णी’ आणि ‘कुलकर्णी’ यांत जमीनअस्मानाचा फरक आहे. (एखाद्या ‘कुळकर्ण्या’स ‘कुलकर्णी’ म्हणून संबोधून पाहा. तो तुम्हाला फरक in no uncertain terms — बहुधा वस्सकन अंगावर येऊन — व्यवस्थित समजावून सांगेल. (उलटपक्षी, एखाद्या ‘कुलकर्ण्या’स ‘कुळकर्णी’ म्हणून संबोधल्यास संबंधित ‘कुलकर्णी’ तुमच्या प्रमादाकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता अधिक. चालायचेच.))

तर सांगण्याचा मतलब, ‘कुळकर्णी’ बोले तो (आधी म्हटल्याप्रमाणे) सीकेपी. तर ‘कुलकर्णी’ बोले तो देशस्थ ब्राह्मण. तो काळ लक्षात घेता, ‘उपाध्ये’ कुलातल्या एखाद्या कन्येचा (जसे की, तुमच्या सख्ख्या आजोबांची सख्खी आत्या.) शुभविवाह ‘कुळकर्णी’ कुलातल्या एखाद्या वराशी (निदान त्या काळात तरी) संपन्न झालेला असणे हे (तत्त्वतः अगदी अशक्य जरी नसले, तरीही) तुलनेने असंभव वाटते.

(उलटपक्षी, कऱ्हाडे ब्राह्मण आणि देशस्थ ब्राह्मण यांच्यातील आंतरविवाह हे त्या काळातसुद्धा सर्रास होत असत. (याला माझ्या स्वतःच्या तीन पिढ्यांचा इतिहास साक्षी आहे.))

(अतिअवांतर: उलटपक्षी, कऱ्हाडे ब्राह्मण आणि कोकणस्थ ब्राह्मण (चित्पावन) यांच्यातील आंतरविवाह हे मात्र तुलनेने दुर्मिळ. याला बहुधा चित्पावनांमध्ये व्यापक प्रमाणात प्रचलित असलेली ‘कऱ्हाडे जावयास विष घालतात’ ही समजूत कारणीभूत असावी. वास्तविक, ही समजूत काही खरी नव्हे, हे मी माझ्या स्वतःच्या तीन पिढ्यांच्या अनुभवावरून मांडू इच्छितो. बोले तो, माझे सख्खे आजोबा तथा माझे सख्खे वडील हे दोघेही हृदयविकाराच्या झटक्याने वारले; विषबाधेमुळे नव्हे! (झालेच तर, दोघांच्याही मृत्युसमयी त्यांचे respective सासरेसुद्धा हयात नव्हते, त्यामुळे, दोन्हीं सासऱ्यांना समजा आपापल्या जावयांना विष घालावेसे जरी वाटले असते, तरीसुद्धा — प्लँचेटने विषबाधा करणे वगैरे शक्य असल्याखेरीज — कसे घालता आले असते, ते निदान माझ्या तरी लक्षात येत नाही. (कऱ्हाड्यांबद्दलच्या एकंदर अनुभवावरून — त्यांच्यात एखादे (अपवादात्मक) नारळीकर झाले असू शकतीलही, परंतु — कऱ्हाडे इतकेसुद्धा ingenious असू शकतील, यावर निदान माझा तरी विश्वास बसू शकत नाही. असो.)) राहता राहिली गोष्ट माझी. मी (अद्याप तरी) हयात आहे. मरेन तेव्हा कशाने मरेन, हे मरेन तेव्हाच कळू शकेल. तसे पाहिले, तर माझे सासरे(सुद्धा) तूर्तास हयात आहेत, परंतु, माझ्यातील आणि त्यांच्यातील भौगोलिक अंतर लक्षात घेता, त्यांना समजा असे काही करावेसे जरी वाटले, तरीसुद्धा, त्यांना तशी संधी मिळण्याची शक्यता अत्यल्प वाटते. (पोष्टाने विषबाधा करणे वगैरे सध्याच्या ट्रंपीय निर्बंधांच्या काळात सोपे नाही.) असो. वक़्त आने पर देखा जाएगा। तर सांगण्याचा मतलब, ‘कऱ्हाडे जावयाला विष घालतात’ यावर निदान माझा तरी विश्वास नाही. चित्पावनांमध्ये अशी समजूत कोठून आली असावी, हे मला काही केल्या समजत नाही. कदाचित, जगाच्या आजवरच्या इतिहासात कधीतरी कोठेतरी कोठल्यातरी कऱ्हाडे सासऱ्यांच्या हातून एखाद्या चित्पावन जावयास विषबाधा झाली असू शकेलही, आणि चित्पावनांनी (नेहमीच्या सवयीप्रमाणे) त्याचे सरसकटीकरण केले असू शकेल. परंतु, त्याही प्रसंगी, (कऱ्हाड्यांसंबंधीचा एकंदर अनुभव लक्षात घेता) प्रस्तुत विषबाधा हीसुद्धा त्या कऱ्हाडे सासऱ्यांच्या ठायीच्या कोठल्याही malicious intentमधून घडलेली नसून, out of sheer innate incompetence तथा completely accidental and unintentional असावी, असा आपला निदान माझा तरी कयास आहे. असो चालायचेच.)


बोले तो, आत्येवडील अथवा मावसवडील कसे असू शकतात, हे मला समजत नाही, परंतु तरीही. सख्खे वडील तर सख्खे वडील!

सई केसकर Fri, 27/02/2026 - 05:36

In reply to by 'न'वी बाजू

>>>बोले तो, आत्येवडील अथवा मावसवडील कसे असू शकतात
:D
पण सावत्र वडील असू शकतात. सख्खे या शब्दाच्या विरुद्ध सावत्रच. अर्थात वरील प्रतिसादकर्त्याने केवळ आपलं किती जवळचं नातं होतं हे सांगायला वापर केला आहे.
पण त्याही हिशेबात सावत्र असते तर बायोलॉजिकल नातं सिद्धच करता आलं नसतं.
बाकी माझी आईदेखील अर्धी कऱ्हाडे आहे. आणि माझ्या आजीचं माझ्या बाबांबद्दल काही विशेष बरं मत नव्हतं. आणि आई अर्धीच कऱ्हाडे असल्याने माझ्या नवऱ्यावर ती फक्त टीकेचे प्रयोग करते. अजून तरी विषप्रयोग केलेला नाही.
पण मी अनेक कऱ्हाडे बायकांना
"जावयाचं पोर हरामखोर" हा सुविचार सांगताना ऐकले आहे. फारच wtf! म्हण आहे ही.

सई केसकर Tue, 03/03/2026 - 09:36

In reply to by गोगोल

माझी आई अर्धी कऱ्हाडे आहे आणि अर्धी लिंगायत. माझ्या संपूर्ण कऱ्हाडे आजीने १९५७ साली लिंगायत माणसाशी लग्न केले. माझे आजोबा नुसते लिंगायत नव्हते तर आधीच्या लिंगायत बायकोपासून त्यांना तीन मुलगे होते. त्यांनी काडीमोड घेऊन आजीशी लग्न केलं. त्याचे त्या काळी काय परिणाम झाले असतील त्याची कल्पना करता येईलच. पण माझ्या आईनं ब्राह्मणाशी लग्न केलं तेव्हादेखील त्या लग्नाला खूपच विरोध होता. मी असली कटकट नको म्हणून (आणि मी नेहमी चुकीच्या लोकांच्या प्रेमात पडायचे म्हणून) एका चित्पावन ब्राह्मणाशी अरेंज मॅरेज केलं. तीन पिढ्या जाऊन आता पुन्हा ब्राम्हण+ब्राम्हण असं झालं आहे त्यामुळे माझ्या आयुष्याकडे कुणी ढुंकून बघत नाही. ही एक फार महत्त्वाची आणि जमेची गोष्ट आहे.
पण केवळ जातच नाही तर भाषेवरूनही मी पुण्यात अनेक प्रकारचे टोमणे ऐकले आहेत. कोल्हापूरला सुट्टी घालवून आल्यावर जर चुकून डब्यातल्या पोळीला चपाती म्हणलं तर बरोबर डबा खाणाऱ्या मुली "तुम्ही चपाती म्हणता पोळीला?" असा प्रश्न विचारायच्या. तेव्हा आज मी ज्याप्रकारे अशा लोकांसमोर तोंडाचा पट्टा सोडू शकते तसा तेव्हा जमायचा नाही. त्यामुळे चुपचाप चपातीची पोळी व्हायची.
माझ्या आईला उत्तम मटण करता येतं. वास्तविक ही काही तिच्या लिंगायत असण्याची लिगसी नाही कारण ते सगळे शाकाहारी आहेत. पण आमच्याकडे आवर्जून आईच्या हातचं चिकन किंवा मटण खायला येणाऱ्या ब्राम्हणांना बरोबर येणारे लोक "या माहेरच्या ब्राम्हण नाहीत ना" असं सांगायचे. म्हणजे मटण आणायचा, ते शिजवायचा, त्यांना खाऊ घालायचा मोठेपणा आम्ही करायचा आणि हे जेवता जेवता आमची जात काढणार!
पुण्यातल्या (६ पिढ्या पुण्याचे वगैरे!) लोकांचं थोडं अमेरिकन लोकांसारखं असतं. त्यांना आपलं वातावरण सोडून कशाचीही विशेष माहिती नसते. आणि ती करून घेण्यात ते विशेष वेळही घालवत नाहीत. कारण ती महत्त्वाची नसतेच.

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 18:08

In reply to by सई केसकर

माझ्या आईला उत्तम मटण करता येतं. वास्तविक ही काही तिच्या लिंगायत असण्याची लिगसी नाही कारण ते सगळे शाकाहारी आहेत.

म्हणून काय झाले? ‘पारंपरिक लिंगायत पद्धतीचे मटण’ हा एक उत्तम नॉव्हेलटी आयटम बनू शकतो! (फॉर्दॅट्मॅटर, तुमच्या आई या अर्ध्या कऱ्हाडेसुद्धा आहेत, ही बाब लक्षात घेता, ‘पारंपरिक कऱ्हाडे (ब्राह्मणी) पद्धतीचे मटण’ असेसुद्धा त्याचे मार्केटिंग करता येईल.)

(कोण म्हणतो तुमच्या आई सिंगलहँडेडली एखादी ‘परंपरा’ सुरू करू शकत नाहीत, म्हणून? आमच्यात नाही, पारंपरिक देशस्थी पद्धतीचे चिकन बनवीत? (भले ते बनविणारा नि खाणारासुद्धा (तूर्तास) मी एकटाच असलो (आणि, त्यामुळे, ते बरेवाईट कसेही झाले, तरीसुद्धा (माझ्याव्यतिरिक्त) कोणालाही फरक पडत नसला), तरीही? परंपरा महत्त्वाची! (कारण, It sells.))


माझा मुलगा (शिक्षणाच्या निमित्ताने) तूर्तास माझ्या घरात राहात नाही. परंतु, राहात जरी असता, तरीसुद्धा, त्याची परंपरा वेगळी. त्यामुळे, तो कधी जर घरी आलाच, तर (नंतर पसारा नि सावळागोंधळ निस्तरण्याव्यतिरिक्त) मी किचनमध्ये पाऊल ठेवीत नाही. (तसेही त्याला ढवळाढवळ खपत नाहीच, म्हणा! चालायचेच.)

परंपरा मसाले नव्हेत. तेही खपतात, म्हणा. परंतु, तो एक ब्येक्कार प्रकार आहे. असो बापडा.

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 16:44

In reply to by गोगोल

आई ब्राह्मण. घरी जेव्हा मामा लोक यायचे तेव्हा आवाज हळू करून मग कुणाची तरी जात काढणं हे सर्रास चालायचं. शिवाय ब्राह्मण किती श्रेष्ठ ह्याच्याही बाता चालयाच्याच.

(यापैकी कशाचेही कोठल्याही अंगाने समर्थन करण्याचा इरादा अर्थातच नाही; ते कोठल्याही अंगाने समर्थनीयही अर्थातच नाही, परंतु) तुमच्या अनुभवाबद्दल अजिबात आश्चर्य वाटले नाही, इतकेच म्हणू शकतो.

(ब्राह्मणी समाजात ही मानसिकता rampant आहे, यात नाकारण्यासारखे काहीही नाही. आणि, ही काही नवी बातमीसुद्धा नव्हे. हे तरीही निदान त्यातल्या त्यात उघड तरी झाले. याचा दुसरा प्रकार म्हणजे, ‘आपण’ ‘त्या’ लोकांना पूर्वापार वाईट वागवीत आलेलो आहोत, त्यामुळे ‘त्या’ लोकांना ‘आपल्या’बद्दल राग असणे स्वाभाविक आहे, अशा छापाची वाक्ये (‘आपल्या’च गोटातल्या) चारचौघांमधील गप्पांत फेकून आपण ‘उदारमतवादी’ वगैरे असण्याचा आव आणणे. माझ्या मते, या दुसऱ्या प्रकाराच्या तुलनेत, द्वेषाचा तो पहिला प्रकार (समर्थनीय अर्थातच जरी नसला, तरीही) निदान प्रामाणिक तरी आहे. चालायचेच.)

खूप नंतर कळालं की तो आमच्यावर टोमणा असायचा. आईने पळून जाऊन लग्न केल होत. ज्या दिवशी तो टोमणा आमच्या साठी होता ते कळलं तेव्हा एकदम अस घाण फीलिंग आलेलं ना ...

त्या लोकांचे हे वागणे अर्थातच गर्हणीय, घृणास्पद होते. तुमच्या भावना व्यवस्थितपणे समजू शकतो.

परंतु, ते लोक असे वागले, याचेही आश्चर्य अजिबात वाटले नाही. (पुन्हा: हे समर्थन नव्हे. किंबहुना, Quite the contrary.)

तेव्हा कळलं की बाबा अस्पृश्य वगैरे नव्हते, तरी देखील आपल्या स्वत:च्या किन्स ला जे लोक असे आडून आडून टोमणे मारतात ते सो कॉल्ड खालच्या जातीतल्या लोकांना कसे वागवत असतील.

ते तर झालेच. परंतु, याचा आणखीही (कमीत कमी) एक अँगल तुमच्या लक्षात येत आहे किंवा नाही, ते मला कळत नाही.

बोले तो, एक तर, जे लोक आपल्याला असे (मिळेल त्या संधीला) आडून आडून टोमणे मारतात, ते लोक ‘आपले किन्स’ नक्की कोणत्या भावाने?

दुसरे म्हणजे, या लोकांचे हे वागणे घृणास्पद नि मनस्तापजनक होते, गर्हणीय होते, याबद्दल काहीही वाद नाही. परंतु, त्याचबरोबर, तुमच्या आईंनी (आणि, कदाचित, काही अंशी तुमच्या वडिलांनीसुद्धा) ते वागणे टॉलरेट केले, मुळात या लोकांना आपल्या घरात एंटरटेन केले, म्हणूनच तर या लोकांचे हे वागणे मुळात शक्य होऊ शकले ना?

नाही, This is not an attempt to judge (let alone blame) your parents (of all the people) regarding this matter in any way. Rest assured, that would be the least of my intentions. त्यांची काय compulsions असू शकतील, याची पुसटशीसुद्धा कल्पना मला माझ्या कळफलकापाशी बसून करता येणे अशक्य आहे, आणि ती मी करूही नये.  Least of all, that would be utterly unfair to your parents.

परंतु तरीही, समजा, ‘मला, माझ्या नवऱ्याला, आणि/किंवा माझ्या मुलांना, जातीवरून किंवा अन्य कोठल्याही मार्गाने, टोमणे जर मारणे असतील, आणि/किंवा त्यांना कोठल्याही प्रकारे हीन वा तुच्छ म्हणून वागवणे असेल, तर इतःपर आपण लोकांनी माझ्या घरची पायरी चढण्याची तसदी घेण्याचे काहीही प्रयोजन नाही, आणि तरीही आपण तशी ती चढल्यास ते खपवून घेतले जाणार नाही’ असा काही स्पष्ट पवित्रा जर का तुमच्या आई (आणि, कदाचित, तुमचे वडीलसुद्धा; परंतु, प्रामुख्याने, तुमच्या आईच!) घेऊ शकल्या असत्या (and which would have been very much within her rights!), तर कदाचित या प्रकाराला मुळापासूनच आळा बसू शकला असता काय, असा विचार राहूनराहून मनात येतोच.

अर्थात, तसा पवित्रा घेता येण्याकरिता प्रचंड धैर्य लागते. आणि, तितके धैर्य गोळा करणे हे (माझ्यासकट) बहुतेकांना जमतेच, असे नाही. (किंबहुना, बहुतेकांना ते जमत नाही.) शिवाय, ‘कितीही झाले, तरी ते माझे रक्ताचे भाऊ आहेत; त्यांच्याशी नाते कसे बरे तोडावे!’  असला काही (‘संस्कारां’तून उद्भवलेला) debilitating, self-defeating विचार आड येऊ शकतोच. (आधी म्हटल्याप्रमाणे, ‘हे कसले किन्स!’ हा प्रश्न अलाहिदा. ‘संस्कारां’पुढे लॉजिक नसते.)

साधी गोष्ट घ्या. साक्षात अर्जुनसुद्धा, ‘हे माझे गुरू नि आजोबा नि चुलतभाऊ, यांच्यावर मी शस्त्र कसे उगारू!’ म्हणून भर रणांगणात शेपूट घालून बसला होता. भगवान श्रीकृष्णांस जातीने त्या गाढवापुढे गीता वाचून, ‘काप साल्यांना!’ म्हणून हाणामारीस उद्युक्त करावे लागले. अर्जुनासारख्या पराक्रमी वीराची जेथे ही गत, तेथे तुमची नि माझी काय कथा! (शिवाय, सगळ्यांनाच काही भगवान श्रीकृष्णांच्या वैयक्तिक कोचिंगसुविधेचा लाभ मिळतो, असेही नाही!)

त्यामुळे, तुमच्या मामामंडळींना आयुष्यात पुन्हा कधी तुमच्या दारात उभे न करण्याइतके धैर्य तुमचे आईवडील जर गोळा करू शकले नसतील, तर त्यांना त्याबद्दल मी अजिबात दोष देणार नाही. फक्त, ‘दुर्दैव!’ इतकेच म्हणेन.

मात्र, यातून एक गोष्ट अवश्य लक्षात येते. ‘आपल्या हिंदू संस्कृती’त भले भगवद्गीतेसारखे ‘लै भारी’ पातळीवरचे तत्त्वज्ञान असेलही कदाचित. (ऐकीव माहिती; चूभूद्याघ्या.) आणि, ते बासनात गुंडाळून showcase करायला आत्यंतिक impressive असेलही कदाचित. परंतु, आपले दैनंदिन पारंपरिक सामाजिक ‘संस्कार’ जे असतात, ते मात्र हिंदू मनुष्यास *डू बनविण्यापलीकडे कोठल्याही कामाचे नसतात; किंबहुना, हिंदू मनुष्यास *डू बनविणे हेच त्यांमागील मूलभूत प्रयोजन असावे, किंवा कसे, अशी शंका येऊ लागते. (आणि, या स्वसंस्कारजन्य *डूपणाचा फायदा घेऊन दैनंदिन आपली *ड मारू पाहणारे हे इतर हिंदूच (आपले ‘किन्स’, म्हणे!) असतात, कोणी ‘मुस्सलमान’ नव्हेत! (किंबहुना, कितीश्या सरासरी सामान्य भारतीय हिंदूंचा दैनंदिन व्यवहारात नि दैनंदिन पातळीवर कोणा ‘मुस्सलमाना’शी प्रत्यक्ष संबंध येत असेल, हे एक तो भगवान श्रीकृष्ण जाणे, नि दुसरा तो प्रेषित मुहम्मद!)) पण लक्षात कोण घेतो?

असो चालायचेच.

'न'वी बाजू Thu, 26/02/2026 - 18:51

२६ फेब्रुवारी १९७६ रोजी मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा मराठी साहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्या टप्प्याचे प्रमुख शिल्पकार म्हणजे वि. स. खांडेकर

कळले नाही.

खांडेकरांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे शिल्पकार स्वतः खांडेकरच असणार ना? नाही तर मग दुसरे कोण असणार?

(त्या काळात काही एआय वापरून लिहिण्याची प्रथा नव्हती!)

'न'वी बाजू Thu, 26/02/2026 - 19:23

त्यांच्या साहित्यकृतींपैकी ‘ययाती’ ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. पुराणातील ययातीची कथा त्यांनी आधुनिक दृष्टिकोनातून पुन्हा उभी केली. मानवी इच्छा, भोग, कर्तव्य आणि आत्मजागृती यांचा अत्यंत प्रभावी वेध त्यांनी घेतला. त्यामुळे ही कथा केवळ पौराणिक राहत नाही; ती आधुनिक मनुष्याच्या जीवनाशी जोडली जाते. म्हणूनच ‘ययाती’ ही मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड ठरली.

तुम्ही स्वतः ही कादंबरी वाचली आहे काय? (असल्यास, कृपया ष्टोरी सांगा. (पुराणातल्या ‘ययाती’ची नव्हे; खांडेकरांच्या ‘ययाती’ची.))

(To be fair, मी स्वतःदेखील ही कादंबरी वाचलेली नाही. परंतु मग, मी खांडेकरांवर लेख (नि त्यात या कादंबरीवर परिच्छेद) पाडायलासुद्धा जात नाही. असो.)

दामोदरपंत हत्ती Fri, 27/02/2026 - 12:10

In reply to by 'न'वी बाजू

आमचा उद्देश केवळ आणि केवळ मोठी व्यक्तिमत्वे आणि हत्ती यांच्यात सांगड घालणे. बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत.

सुधीर Fri, 27/02/2026 - 20:33

मी खांडेकरांची ययाती, अमृतवेल वीस एक वर्षांपूर्वी वाचली होती. काही वाचकांना त्यांच्या कथा बाळबोध किंवा अतिआदर्शवादी वाटतात, पण मला मात्र त्यांचे लेखन तेव्हा आवडले होते. खांडेकरांवर श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. कोल्हटकरांचे मी फक्त सुदाम्याचे निवडक पोहे एवढेच वाचले आहे. अलिकडे जेव्हा प्रेमचंद वाचायला सुरुवात केली, तेव्हा प्रेमचंद आणि खांडेकर यांच्यातील साम्य मात्र प्रकर्षाने जाणवले. दोघांच्या लेखणीतून भाषेचे सौंदर्य अक्षरशः ओसंडून वाहते. काही परिच्छेद तर असे असतात की त्यात अनुभवातून आलेले ज्ञान, जीवनदर्शन आणि भाषेची लय एकत्र मिसळून जाते आणि तेव्हा तो परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचावा असे वाटते.

जीपीटी ने दिलेली खांडेकर स्टाईल ..  

"संध्याकाळच्या धूसर प्रकाशात अंगणातली तुळस जणू काही गंभीर ध्यानात उभी होती. आकाशाच्या कडेला मावळणारा सूर्य रक्तिम झाला होता, आणि त्या रंगातच त्याच्या मनातील आकांक्षांची धग मिसळली होती. इच्छा ही किती विलक्षण गोष्ट आहे—तिला सीमा नाही, लाज नाही, आणि समाधान तर मुळीच नाही. कर्तव्याच्या शांत सावलीत उभा राहूनही मन मात्र वासनांच्या वादळात हेलकावत राहते. मनुष्य स्वतःपासून जितका दूर पळतो, तितकाच तो स्वतःच्या सत्याजवळ येत असतो—ही जाणीव त्याला त्या क्षणी पहिल्यांदाच चटका लावून गेली."

आणि ही जीपीटी ने दिलेली प्रेमचंद स्टाईल...

"कच्चे आँगन में धूप तिरछी पड़ रही थी और टूटी चारपाई की बुनावट से छनकर जमीन पर अजीबसी आकृतियाँ बना रही थी। रामसेवक सुबह से चौपाल के चक्कर लगा रहा था; साहूकार ने फिर दो दिन की मोहलत माँग ली थी, जैसे मोहलत से भूख भी टल जाती हो। घर के भीतर उसकी पत्नी चुपचाप अनाज की मटकी टटोल रही थी—आवाज़ से ही समझ में आ जाता था कि तली दिखने लगी है। बच्चे बाहर खेल रहे थे, उन्हें अभी हिसाब-किताब की दुनिया से क्या लेना! मगर बड़े लोगों की दुनिया भी कौनसी बहुत बड़ी थी—चार बीघा जमीन, थोड़ीसी इज़्ज़त और उससे कहीं बड़ा कर्ज़। आदमी कभी-कभी सोचता है कि दुख रोटी की तरह बाँट क्यों नहीं दिए जाते; शायद इसलिए कि हर घर की आग अलग-अलग जलती है, पर धुआँ सबका एकसा कड़वा होता है।"

मग जीपीटीला दोघांमधले साम्य वा फरक शोधायला सांगितल्यावर त्याने हे दिलं.

दोघेही मानवी वेदना, नैतिक संघर्ष आणि सामाजिक वास्तव यांवर लिहितात. प्रेमचंद माणसाच्या बाह्य परिस्थितीतील संघर्ष दाखवतात; खांडेकर माणसाच्या आंतरिक संघर्षाचे तत्त्वज्ञान शोधतात.

दामोदरपंत हत्ती Tue, 03/03/2026 - 10:38

सगळे जण इतके काही लिहित आहेत पण वि.स.खांडेकर हे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते याविषयी कोणीच काही लिहित नाही आहे.

तर्कतीर्थ Tue, 03/03/2026 - 10:54

In reply to by दामोदरपंत हत्ती

मूळ विषयाचा गंध नसला की आदळ-आपट, थयथयाट करून विषय भरकटवणे हाच पर्याय अनेकांकडे असतो.

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 17:28

In reply to by तर्कतीर्थ

मूळ विषय (माझ्या समजुतीप्रमाणे) ‘(क्षयझ आणि) हत्तीची प्रतिमा (यांच्यातील तुलना)’ असा आहे.

(येथे क्षयझ या चल पदाचे तात्कालिक मूल्य ‘वि.स. खांडेकर’ असे आहे, परंतु, ते महत्त्वाचे नाही. काल (किंवा, मागे कधीतरी) ते तात्कालिक मूल्य ‘कतरिना कैफ’ असे होते; उद्या कदाचित ते ‘अॅडॉल्फ हिटलर’ असेही असू शकेल.)

तर मूळ विषयाबद्दल: ‘हत्तीची प्रतिमा’ (मग भले ते हाताने रेखाटलेले चित्र असो, वा कॅमेऱ्याने टिपलेले छायाचित्र, वा एआयजन्य प्रतिमा) या विषयी मला काडीचाही गंध नाही, हे मी सहर्ष मान्य करतो. (फॉर्दॅट्मॅटर, वि.स. खांडेकरांविषयीही नाही. परंतु, अगोदर म्हटल्याप्रमाणे, येथे ते महत्त्वाचे नाही. वि.स. खांडेकर हे (प्रस्तुत लेखाच्या संदर्भात) निव्वळ आनुषंगिक तथा केवळ निमित्तमात्र आहेत, हे मला वाटते प्रस्तुत लेखाचा लेखकसुद्धा मान्य करेल. (चूभूद्याघ्या.))

(अवांतर चौकशी: बाकी, आपला हा प्रस्तुत प्रतिसाद हा एआयजन्य, की स्वतः हाताने लिहिलेला?)

असो चालायचेच.

तर्कतीर्थ Tue, 03/03/2026 - 19:42

In reply to by 'न'वी बाजू

(अवांतर चौकशी: बाकी, आपला हा प्रस्तुत प्रतिसाद हा एआयजन्य, की स्वतः हाताने लिहिलेला?)

या प्रश्नाचे उत्तर मला ठाऊक आहे, पण मी ते दिले तर तुमच्या डोक्याची १०० शकले होऊन तुमच्या पायाशी लोळू लागतील.

पण एक सांगतो मी ए०आय० चे मत जेव्हा मागवतो तेव्हा किंवा काही ए०आय० निर्मिती असेल तर ए०आय० ला श्रेय आवर्जून देतो. पण ए०आय० बरोबर विचारमंथन केले असेल तर ते पूर्णपणे माझ्या नियंत्रणा खाली असते, त्यामुळे तिथे फक्त मी मानवी संस्कार करतो. मजकूर टंकायला कोणतं साधन वापरले किंवा अमका रिसर्च पेपर कोणत्या ग्रंथालयात वाचला याचे श्रेय द्यायची पद्धत सध्या तरी प्रचलित नाही. तसेच हाताखालच्या लोकांनी केलेले काम मी केले म्हणून दाखवणे असा प्रघात भारतीय अकादमीक वर्तूळात सर्रास चालतो.

'न'वी बाजू Tue, 03/03/2026 - 20:10

In reply to by तर्कतीर्थ

या प्रश्नाचे उत्तर मला ठाऊक आहे, पण मी ते दिले तर तुमच्या डोक्याची १०० शकले होऊन तुमच्या पायाशी लोळू लागतील.

तुमचे गृहीतक गंडलेले आहे, एवढेच नम्रपणे सुचवून मी खाली बसतो. (इतका वाईट आरोप माझे शत्रूदेखील माझ्यावर करीत नाहीत!)

बाकी चालू द्या.

दामोदरपंत हत्ती Fri, 06/03/2026 - 23:02

In reply to by गोगोल

ययाती वाचून कधी होणार?

वि. स. खांडेकर हे नाव उच्चारले तरी नकळतपणे डोळ्यासमोर एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते हे तुमच्या लवकरच लक्षात येईल.