सरसकटीकरणाचे अभंग
anant_yaatree
अलिप्त, स्वमग्न | ऐसी ज्यांची ख्याती
पडीक असती | ऐ x वर ||१||
कुटुंबवत्सल | मनाने मोकळे
म म व लोटले | मा x वरी ||२||
उर्वरित गुण- | -दोषांनी भरले
तयांनी गाठले | मिx त्वरे ||३||
नेमका पर्याय | पा/सी/बो मधून
घाला निवडून | फुल्ली साठी ||४||
आता तुम्ही सांगा | संस्थळ कोणते
तुम्हा आवडते ? | लाजू नका ! ||५||
अनुक्रम २ - ३ - १ असा हवा ना…
अनुक्रम २ - ३ - १ असा हवा ना? शिवाय मध्ये ‘म’ राहिला!