Skip to main content

पॅरिसची बातमी

Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha - 'बोचासनवासी' हे नाव असलेल्या हिंदू धार्मिक समुदायाच्या शंभरेक (अर्थातच पुरुष) सदस्यां करता Eiffel Towers ने तिथे काम करणार्‍या बायकांना त्यांच्या नेहेमीच्या कामाच्या जागेवर येऊ दिलं नाही! टुरिस्टांच्या पैशासाठी आता हे चाळे परदेशात सुद्धा खपवून घ्यायला लागले वाटतं!
ब्रो ने ऑनलाईन मोड मधे या समुदायाच्या नवीन मंदिराच्या उद्घाटना निमित्त शुभेच्छा दिल्या. कोबी हैं तो मुमकिन हैं. पहा विश्वगुरुंच्या हिंदू अस्मितेचा डंका अटकेपार वाजला!
https://www.google.com/amp/s/timesofindia.indiatimes.com/life-style/tra…

'न'वी बाजू Tue, 08/09/2026 - 22:49

In reply to by सई केसकर

हा कल्ट म्हणा, सेक्ट म्हणा, जेथून सर्वप्रथम सुरू झाला, त्या (गुजरातमधील) गावाचे नाव 'बोचासण' (બોચાસણ, 'बोचासन' नव्हे!) आहे.

'बोचासण'चे ते 'बोचासणवासी'.

शांतादुर्गा Tue, 08/09/2026 - 23:13

In reply to by 'न'वी बाजू

'बोचासणवासी' हे तर अत्यंत LOL. आता मराठी GenZ याच्यावर मीम काय करतात ते पाहायचं.
ब्रो ची या संप्रदाया बरोबर अनेक वर्षं जवळीक आहे म्हणे. BAPS संप्रदायावर अधिक रंजक माहिती:
https://www.aljazeera.com/news/2026/9/8/what-is-baps-the-hindu-group-wh…

'न'वी बाजू Wed, 09/09/2026 - 02:20

In reply to by शांतादुर्गा

(डिस्क्लेमर: या संप्रदायाच्या अनेक गोष्टी मला व्यक्तिशः पटत नाहीत; त्या (न पटणार्‍या) गोष्टींकरिता या संप्रदायाचे मी समर्थनही करू इच्छीत नाही. परंतु तरीही...)

ब्रो ची या संप्रदाया बरोबर अनेक वर्षं जवळीक आहे म्हणे.

यात आश्चर्यजनक असे काहीही नसावे. गुजरातमध्ये/जागतिक गुजराती समाजात या संप्रदायाचे पुष्कळ मोठे प्रस्थ आहे. (त्यामुळे, ब्रो-ची जर या संप्रदायाबरोबर जवळीक नसती, तरच आश्चर्य वाटले असते.)

जगभर बराच फोफावलेला संप्रदाय आहे हा; बख्खळ पैसा आहे. जगभरात ठिकठिकाणी भव्य संगमरवरी मंदिरे आहेत. (अक्षरधामचे (दहशतवादी हल्ला फेम) मंदिर काय, झालेच तर दादर टी.टी.चे स्वामिनारायण मंदिर काय. जगभरात अन्यत्रही कित्येक आहेत. आमच्या उपनगरीय अटलांटा परिसरातदेखील आहे.)

तुम्हीआम्ही या संप्रदायाच्या श्रद्धांशी सहमत असू वा नसू, परंतु, निव्वळ स्थापत्याच्या/सौंदर्याच्या दृष्टिकोनातून यांची भव्य संगमरवरी मंदिरे ही पाहण्यालायक असतात. (बोले तो, ताजमहाल जर पाहायचा, तर हे का नाही, अशा अर्थाने. आणि, (पाहण्यालायक) का नसतील? बख्खळ पैसा ओतून, गुजरातेतील कारागिरांकरवी तपशीलवार, मेड-टू-ऑर्डर बनवून घेतलेली असतात. कोरीव काम केलेले संगमरवरी सुटे भाग गुजरातेतून येतात; अंतिम असेंब्ली तेवढी (जगात जेथे कोठे असेल तेथे) स्थानिक होते.) झालेच तर, दिवाळीच्या वेळेस यांच्या मंदिरांतील देवाच्या, झालेच तर, या संप्रदायातील पुरातन स्वामी-महंतांच्या, मूर्तींसमोर मिठाईची/फराळाची जी आरास मांडतात, ती (some — including yours truly — may personally consider it a gross waste of food and money, परंतु तरीही) प्रेक्षणीय असते. शिवाय, यांच्या मंदिरांशी संलग्न दुकानांत मिठाया, फरसाण, तथा अन्य खाद्यपदार्थ जे विक्रीस असतात, तेदेखील बरे असू शकतात.

(अटलांटाजवळील आमच्या ग्विनेट कौंटीतील लिल्बर्न गावातल्या मंदिराची गोष्ट. हे मंदिर २०००च्या दशकाच्या मध्याकडे कधीतरी बांधले गेले. जगातील इतर स्वामिनारायण मंदिरांप्रमाणेच भव्य आहे, प्रेक्षणीय आहे, खूप मोठ्या परिसरावर पसरलेले आहे, शिवाय तळी नि कारंजी नि बरेच कायकाय आहे, वगैरे वगैरे. थोडक्यात, टूरिष्ट मॅग्नेट आहे. (आणि, देशी भाविक/बिगरभाविकच नव्हे, तर व्हाइट टूरिष्ट मॅग्नेटसुद्धा आहे.) हे जेव्हा बांधले, तेव्हा त्याचा बराच गवगवा झाला होता. आधी म्हटल्याप्रमाणे, सुटे भाग गुजरातेतून, अंतिम असेंब्ली स्थानिक (आणि निदान काही अंशी तरी स्थानिक गुजराती व्हॉलंटियरफोर्सकरवी, त्यात बरीचशी एबीसीडी तरुणाई, वगैरे). उद्घाटनाकरिता त्यांचे कोणी महंत खास भारतातून आले होते, त्यांची मिरवणूक, लिल्बर्नच्या रस्त्यातून हत्ती फिरविला, वगैरे वगैरे. स्थानिक देशी लोकांतच नव्हे, परंतु एकंदरच स्थानिक प्रसिद्धी भरपूर मिळाली होती त्या प्रसंगास. अर्थात, बख्खळ पैसा आणि भक्तगणांचे बख्खळ प्रस्थ असल्याखेरीज हे होऊ शकत नाही.)

मात्र, gender segregation is rampant and systemic.

म्हणजे, अल-जझीराच्या त्या आर्टिकलात म्हटलेले आहे, की, त्यांच्या महंतांना ब्रह्मचर्य, झालेच तर स्त्रियांशी संपर्क टाळणे, वगैरे सक्तीचे आहे, परंतु भक्तांवर तितकेही कडक बंधन नाही, वगैरे वगैरे. प्रत्यक्षात, (निदान आमच्याइथल्या लिल्बर्नच्या मंदिरात तरी मी जे पाहिले, त्याप्रमाणे) आरतीच्या वेळेस पुरुष एकीकडे नि स्त्रिया एकीकडे, ही कडक विभागणी असते. इतकी, की कडेवरच्या तान्ह्या मुलांनादेखील त्यातून सूट नाही. तान्हे मूल जर मुलगा असेल, तर त्याने आईच्या कडेवर स्त्रियांच्या बाजूला, किंवा मुलगी असेल, तर वडिलांच्या कडेवर पुरुषांच्या बाजूला, जायला परवानगी नाही; लगेच यांचे व्हॉलंटियर अडवितात. (आई मुलाबरोबर एकटीच किंवा वडील मुलीबरोबर एकटेच आलेले असतील, तर काय करायचे, मुलाला किंवा मुलीला बेवारश्यासारखे सोडून द्यायचे का, असा प्रश्न विचारायचा नसतो. तुमची डोकेदुखी आहे ती. येऊ नका एवढेच असेल तर.)

ही विभागणी (माझ्या आठवणीप्रमाणे) केवळ आरतीच्याच वेळेस नसते, तर जेव्हा जेव्हा म्हणून रांग लावण्याचा प्रश्न उद्भवू शकतो, तेव्हा तेव्हा लागू होते. एकदा एका पांढर्‍या टूरिष्ट नारीने तेथील एका मंदिरकर्मचार्‍यास याबद्दल प्रश्न विचारला असता, हे तुमच्याच सुरक्षिततेकरिता आहे, असे उत्तर देण्यात आले. म्हणजे आपले भारतीय पुरुष (अगदी अमेरिकेत राहणारेसुद्धा) काय लायकीचे असतात, असा संदेश यातून इतरांना जातो, याचा विचार करायचा नसतो.

(परंतु, परंपरा!)

Having said that,

'बोचासनवासी' हे नाव असलेल्या हिंदू धार्मिक समुदायाच्या शंभरेक (अर्थातच पुरुष) सदस्यां करता Eiffel Towers ने तिथे काम करणार्‍या बायकांना त्यांच्या नेहेमीच्या कामाच्या जागेवर येऊ दिलं नाही! टुरिस्टांच्या पैशासाठी आता हे चाळे परदेशात सुद्धा खपवून घ्यायला लागले वाटतं!

हे तितकेसे पटले नाही.

'बॅप्स'च्या अटी कितीही चमत्कारिक असोत, नि तुम्हाआम्हाला न पटणार्‍या असोत (फॉर द रेकॉर्ड, मला पटत नाहीत.), परंतु, त्यांत काहीही नवीन नाही. झालेच तर, त्या जगजाहीर आहेत. झालेच तर, (माझ्या समजुतीप्रमाणे) ही खाजगी, पूर्वनियोजित भेट होती. (म्हणजे, त्या वेळेस इतर टूरिष्ट तेथे असणे अपेक्षित नव्हते.) अशा परिस्थितीत, ('बॅप्स'चे समर्थन अजिबात करीत नाही, परंतु) टॉवरच्या मॅनेजमेंटने नक्की काय करणे अपेक्षित होते?

  • एक पर्याय म्हणजे, खाजगी भेट आहे, ती (त्यासोबतच्या अटींसह) स्वीकारून गिर्‍हाइकास oblige करणे, नि त्याकरिता स्त्री-कर्मचार्‍यांना विनंती करणे, की बुवा तेवढ्या वेळापुरते (for whatever reason) कृपया उपस्थित राहू नका, म्हणून. (मला निश्चित खात्री नाही, परंतु) हे व्यवस्थापनाच्या अखत्यारीत का असू नये, ते कळत नाही. हे चमत्कारिक आहे खरे, परंतु, त्यामुळे एखाद्या स्त्री कर्मचार्‍याच्या हक्कांचे त्यामुळे उल्लंघन झाले, हा दावा कितपत सयुक्तिक आहे, याबद्दल किंचित साशंक आहे. (For the sake of the argument, समजा, येणार्‍या गटास स्त्रियांच्या उपस्थितीबद्दल काहीही घेणेदेणे नसते, परंतु, ते जर कट्टर शाकाहारी असते, तर त्या परिस्थितीत, (येणार्‍या गटाच्या पॅकेज डीलमध्ये त्यांची खानपानसरबराई अंतर्भूत आहे असे वादाच्या सोयीसाठी गृहीत धरून) मांसाहारी अन्नाचा त्यांच्याशी चुकूनही संपर्क येऊ नये, एतदर्थ शाकाहारी स्वयंपाक वेगळ्याने करून त्याकरिता शाकाहारी बावर्चीसुद्धा जर वेगळे ठेवले, तर (असे करावे, की न करावे, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा, परंतु) त्यामुळे (या शाकाहारी गटास serve करू दिले न गेल्याने) मांसाच्या पाककृती करणारे जे बावर्ची त्या आस्थापनात होते, त्यांच्या मूलभूत अधिकारांवर त्यामुळे घाला आला, हा आरोप तेथे कितपत टिकावा?)
  • दुसरा पर्याय म्हणजे, येणार्‍या गटास '(तुमच्या अटींसह) उडत जा!' म्हणून सांगणे. हेदेखील बहुधा व्यवस्थापनाच्या पूर्णपणे अखत्यारीत असावे. त्या परिस्थितीत, 'आमच्या ethnicityमुळे, आमच्या cultureमुळे आमच्याविरुद्ध discriminate केले गेले', म्हणून बोंब मारायला, आस्थापनाची बदनामी करायला, ग्राहक मोकळा! (आफ्टर ऑल, ग्राहकाचेही काही अधिकार असतात, की नाही?)


पहिला पर्याय निवडला, तर कर्मचारी बोंबलतात. दुसरा पर्याय निवडला, तर ग्राहक बोंबलतात. Damned if you do, and damned if you don't! आस्थापनाने नक्की काय करावे अशा परिस्थितीत?

(आणि, (पैसे मोजणार्‍या) गिर्‍हाइकांना सहजासहजी 'उडत जा!' म्हणून हाकलून द्यायला (आणि तेदेखील तत्त्वासाठी!), आयफेल टॉवर हे काय मराठी आस्थापन आहे काय?)

(शिवाय, हा प्रकार फ्रान्समध्ये व्हावा, हेदेखील अंमळ रोचक आहे. म्हणजे, (मुस्लिम स्त्रियांना एजन्सी नसते, हे गृहीत धरून) बुरख्यांवर, हिजाबवर बंदी घालायची होती. (मुस्लिम स्त्रियांना एजन्सी असते, की नसते, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा. परंतु, अरे, त्या बायकांना ठरवू द्या ना, त्यांना बुरखा घालायचा आहे की नाही ते? तुम्ही का ते त्यांच्यावर लादता? आणि, उगाच 'इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा' कशासाठी?) तर त्याकरिता कायदा अशा प्रकारे केला गेला, की सार्वजनिक ठिकाणी धार्मिक चिन्हांच्या दिखाव्यावर बंदी. म्हणजे, तत्त्वतः यात सरदारजींचे फेटे आले, हिंदू स्त्रियांच्या टिकल्या नि मंगळसूत्रे आली, ख्रिश्चनांचे क्रॉससुद्धा आले. (सरदारजींनी फेटे बांधावेत की नाहीत, झालेच तर हिंदू स्त्रियांनी  टिकल्या नि मंगळसूत्रे परिधान करावीत की नाहीत, किंवा ख्रिश्चनांनी क्रॉस मिरवावा की नाही, हे पूर्णपणे वेगळे प्रश्न. शिवाय, कोणास ठाऊक, या इतर धार्मिक चिन्हांविरुद्ध कारवाई होणारही नाही, कदाचित (निदान क्रॉसविरोधात तरी होणार नाही, अशी, का, कोण जाणे, परंतु, खात्री वाटते), परंतु, कोणी सांगावे? बिचार्‍या मनमोहनसिंहांना मध्यस्थी करून स्पष्टीकरण मिळवावे लागले!) शिवाय, 'आमचा देश, आमचे नियम' (अर्थात, 'इस देश में रहना होगा'), वगैरे वगैरे, हे तर आहेच. एकंदरीत काय, (फ्रान्सबद्दल एरवी आदर आहे, परंतु) फ्रान्सची ही Forced Libertyची संकल्पना काही आपल्या टाळक्यात शिरायला तयार नाही बुवा!)

(कधीकधी तर वाटते, की (त्या बॅप्स-आयफेल टॉवर प्रकरणातले) ते 'कामगारांच्या हक्का'चे दावे काय, किंवा 'स्वातंत्र्या'च्या (नि त्यापेक्षासुद्धा, 'फ्रेंच स्वातंत्र्यपरंपरे'च्या) नावाखाली सार्वजनिक ठिकाणी धार्मिक चिन्हांवर बंदी काय, हा सगळा छुपा उजवा कांगावखोर चावटपणा आहे, म्हणून. परंतु, चालायचेच.)

बाकी,

'बोचासणवासी' हे तर अत्यंत LOL. आता मराठी GenZ याच्यावर मीम काय करतात ते पाहायचं.

हेदेखील पटले नाही.

('बॅप्स'विषयी यत्किंचितही प्रेम नाही, अजिबात नाही, परंतु) एखाद्या गावाच्या अथवा आस्थापनाच्या नावाचा अर्थ तुमच्या भाषेत चमत्कारिक होतो, केवळ यावरून त्याची खिल्ली उडविणे, हे left of center sensibilityमध्ये नक्की कोठे बसते बरे?

(नक्की उदाहरण या क्षणी आठवत नाही, परंतु) एखाद्या मराठी नावाचा अर्थ दुसर्‍या भाषेत जर चमत्कारिक होत असता, तर ती दुसरी भाषा बोलणार्‍याने (केवळ) त्यावरून आपली खिल्ली उडविल्यास आपल्याला ते आवडेल काय?

मग उजव्यांनाच तेवढ्या शिव्या काय म्हणून (नि त्यापेक्षासुद्धा, कोठल्या आधारावर) द्यायच्या?

असो.

सई केसकर Wed, 09/09/2026 - 05:57

In reply to by 'न'वी बाजू

>>>एक पर्याय म्हणजे, खाजगी भेट आहे, ती (त्यासोबतच्या अटींसह) स्वीकारून गिर्‍हाइकास oblige करणे, नि त्याकरिता स्त्री-कर्मचार्‍यांना विनंती करणे, की बुवा तेवढ्या वेळापुरते (for whatever reason) कृपया उपस्थित राहू नका, म्हणून. (मला निश्चित खात्री नाही, परंतु) हे व्यवस्थापनाच्या अखत्यारीत का असू नये, ते कळत नाही. हे चमत्कारिक आहे खरे, परंतु, त्यामुळे एखाद्या स्त्री कर्मचार्‍याच्या हक्कांचे त्यामुळे उल्लंघन झाले, हा दावा कितपत सयुक्तिक आहे, याबद्दल किंचित साशंक आहे. (For the sake of the argument, समजा, येणार्‍या गटास स्त्रियांच्या उपस्थितीबद्दल काहीही घेणेदेणे नसते, परंतु, ते जर कट्टर शाकाहारी असते, तर त्या परिस्थितीत

एखादं पथक येणार आहे म्हणून स्त्रियांनी कामावर न येणं हे नक्कीच अपमानास्पद आहे. Discriminatory आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीची लहानपणापासून सवय झाली असल्यानं ती जर इतर ठिकाणी झाली तर त्यात काय विशेष नाही असं वाटणं साहजिक आहे. परंतु, उदाहरणार्थ आमचा स्टाफ ८०% महिला आहेत. अगदी उच्च टेक्निकल पासून ते हाऊस कीपिंगपर्यंत सगळ्या बायका आहेत. आमचं ऑफिस काही प्रेक्षणीय स्थळ नाही. पण समजा आमच्या डायरेक्टरपैकी कोणी यांचे भक्त असते आणि भेटायला बोलावलं असतं आणि अशा अटी घातल्या असत्या तर मी त्याला कडाडून विरोध केला असता.
तुमचे ब्रह्मचर्य जपणे म्हणजे वाटेतल्या स्त्रियांनी बाजूला होणे असे असेल, तर ते ब्रह्मचर्य चुलीत घालायला हवे. शिवाय एखाद्याचं ब्रह्मचर्य ही काही स्त्रियांची जबाबदारी नाही. आम्ही येणार आहोत त्यामुळें तुम्ही तुमच्या रोजच्या कामाच्या ठिकाणी येऊ नका हे सांगणे अत्यंत अपमानास्पद आहे.
तुम्ही याची तुलना बुरख्याशी केली तेही इथे योग्य आहे असं वाटत नाही. एखाद्या बाईला तिने बुरखा घालू नये हे सांगणे चूकच आहे. पण जगातल्या एका मोठ्या प्रेक्षणीय स्थळावर पुरुषांचा ग्रुप येतो आहे म्हणून तिथे काम करणाऱ्या बायका नकोत हे सांगणं अधिक चीड आणणारं आहे. कारण या रिक्वेस्टमध्ये स्त्रिया म्हणजे काहीतरी अपवित्र किंवा त्यांना बघताच ब्रह्मचर्य भंग होणाऱ्या अशा गोष्टी आहेत. शिवाय त्या कामाच्या ठिकाणी disposable आहेत असा संदेश जातो. आणि हे कुठेही घडू नये. शिवाय बुरखा घालायचा नाही हे जसं स्त्रियांना ठरवू द्या असं तुम्ही म्हणता तसं ही अट मान्य करायची किंवा नाही हेही स्त्रियांनी ठरवलं पाहिजे.
हे केवळ पॅरिसमध्ये झालं म्हणून बातमी झाली. एरवी पाळी चालू असलेल्या बायकांना देवळात प्रवेश नाही, काही ठिकाणी बायकांनाच प्रवेश नाही. गर्भगृहात प्रवेश नाही हे सगळे नियम असतात पण ते त्यांच्या मालमत्तेमध्ये राबवत असतात. तरीही ते चूकच आहेत. आणि मुळात असे नियम असणाऱ्या देवाला कुणी जाऊन का भेटावं पण जर कुणाला भेटायचं असेल तर तो अधिकार हवा. पण दुसऱ्याच्या आवारात जाताना स्वतःचे नियम लावायचे म्हणजे थोर आहे.
जी बाई रोज तिथे कामाला येते, जे स्थळ तिच्यासाठी महत्वाचं आहे तिथून केवळ कुणीतरी हिंदू लोक येणार आहेत म्हणून तिने जावे असं सांगणं अपमानास्पद आहे.

शांतादुर्गा Wed, 09/09/2026 - 17:56

In reply to by 'न'वी बाजू

Al Jazeera च्या बातमीतील- Has BAPS faced other controversies in the past? याखालचा मजकूर वाचून या समुदायाविषयी मनात असलेली अढी अजूनच पक्की झाली. अर्थात तुम्ही म्हणाल की हे बर्‍याच इतर धर्म/संप्रदाय यांच्यात पण 'चालतं '. पटत नसेल तर तिथे जाऊ नये. व्यक्तिशः मी जाणारही नाही. पूर्वी एकदा बिर्ला टेंपल ला दिलेली भेट वगळता तसा प्रसंग आलेला नाही. प्रार्थना स्थळापेक्षा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे टूरिस्ट अट्ट्रॅक्शन जास्त वाटलं. भारतात मोठ्या, मोकळ्या, शांत आणि प्रसन्न जागा कमी असल्याने त्या आवारात छान वाटलं होतं. पण अर्थात हे व्यक्तिगत मत झालं.
>>येणार्‍या गटाच्या पॅकेज डीलमध्ये त्यांची खानपानसरबराई अंतर्भूत आहे असे वादाच्या सोयीसाठी गृहीत धरून
- हा आहाराचा पर्याय आणि तिथे रोज कामासाठी येणार्‍या एखाद्या कर्मचाऱ्यांचं पुरुष अथवा स्त्री असणं हे तुलनात्मक दृष्टीने सारखं कसं होऊ शकेल? या गतीने उद्या इतर कुण्या एका वंशाचे लोक तिथे नकोत असा आग्रह पॅकेज डील मधे केला तर तोही ग्राह्य धरणार का? असो.एव्हाना Eiffel Towers च्या कर्मचारी संघटनेचा लाक्षणिक संप, त्यावर फ्रेंच सरकार आणि BAPS ची जर तर असलेली दिलगिरी व्यक्त करून आणि फ्रेंचांकडून त्या व्यवस्थापन कंपनीवर
कारवाईची घोषणा वगैरे झाली आहे.
सध्या ज्या पद्धतीने धर्माच्या नावाखाली अरेरावी आणि झुंडशाही भारतात चालू आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे डोके ठिकाणावर आहे का, असं (लोकमान्यांप्रमाणे) न विचारता, त्यांची अक्कल xxत आहे, असं प्रचलित पद्धतीने म्हणतात. त्यामुळे संप्रदायाचं नाव विनोदी वाटलं. त्याला बाकी विशेष सन्दर्भ नाही.

Rajesh188 Wed, 09/09/2026 - 00:26

फ्रेंच सरकार नी ह्या प्रकरणाची. गंभीर पणे दखलं घेतली असून ज्यानी अटी मान्य करून स्त्रिया नं बाजूला केले त्यांच्या वर. कारवाई केली जाणार आहे.

Rajesh188 Wed, 09/09/2026 - 13:15

स्वतः च खासगी मत, धार्मिक पणा, रितिरिबाज फक्त घरात.
सार्वजनिक जागेत नाहीत.

मुस्लिम बायका बुरखा घालतात ह्याला धार्मिक विरोध नसतो.
चेहरा नं लपवता बुरखा सार्वजनिक जागेत वापरण्यास कोणाचा विरोध नाही.

चेहरा सर्वजनिक जागेत दिसलाच पाहिजे. गुंड, गुन्हेगार सार्वजनिक जागेत असतात
मंगळसूत्र, शीख नं पगडी, ख्रिस्त लोकांचा क्रॉस चेहरा लपवत नाही.

प्रत्येक देशाचे कायदे असतात ते पाळलें च पाहिजेत.

त्या वर आक्षेप घेणे महामूर्ख पणा आहे.

फ्रान्स मध्ये स्त्रियांना पुरुषण इतकंच अधिकार आहे. त्यांचा तो कायदा आहे. आयफेल टॉवर च्या व्यवस्थापान ने तो मोडला आहे, तिथे जें हिंदू साधू ( कथित ) गेले होते हे सर्व त्या देशाचे गुन्हेगार आहे. आयफेल टॉवर मधील ज्या लोकांनी हा चावट पणा केला आहे ते बडतर्भ च होणे गरजेचे आहे. आणि तुरुंगावास must.
जें साधू गेले होते त्यांच्या वर कारवाई अटक आणि शिक्षा होणे गरजेचे आहे.

तुमच्या कडे पैसा आहे तर फुकट वाटा तुमच्या लोकात कोणी आक्षेप घेणार नाही सार्वजनिक ठिकाणी ही थेरं बिलकुल खपवून घेतली नाही पाहिजेत
सार्वजनिक ठिकाणी काही ही खासगी नसते, भेट पण खासगी नसते.

'न'वी बाजू Wed, 09/09/2026 - 17:44

In reply to by Rajesh188

आयफेल टॉवर मधील ज्या लोकांनी हा चावट पणा केला आहे ते बडतर्भ च होणे गरजेचे आहे. आणि तुरुंगावास must.

देहान्त प्रायश्चित्त का नको?

ते काही नाही. या गुन्ह्यास देहान्त प्रायश्चित्तावाचून गत्यंतर नाही!

तिथे जें हिंदू साधू ( कथित ) गेले होते हे सर्व त्या देशाचे गुन्हेगार आहे.

जें साधू गेले होते त्यांच्या वर कारवाई अटक आणि शिक्षा होणे गरजेचे आहे.

का बुवा?

भले त्यांची विनंती/मागणी आचरटपणाची आहे, हे जरी मान्य केले, तरीसुद्धा, त्यांनी गुन्हा असा काय केला?

त्यांची विनंती/मागणी साफ नाकारणे हे तर व्यवस्थापनाच्या हातात होतेच ना? सक्ती केली काय त्यांनी?

विचारणे हासुद्धा गुन्हा होऊ लागला काय आजकाल?

Rajesh188 Thu, 10/09/2026 - 20:35

In reply to by 'न'वी बाजू

जगात जितके धर्म आहेत ते जितके कट्टर धर्म वादी आहे त्यांनी मान खाली घालावी असा कट्टर धार्मिक पणा ची वृत्ती ह्या प्रकरणात आहे. आक्षेप कोणी घेतला नसता तर वर्श च्या 365 दिवसा पैकी 300 दिवस ह्यांचे ब्राह्मचार्य पाळणारे साधू तिथे गेले असते

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/09/2026 - 07:07

एरवी बोचासणावर केलेले जोक मला दुर्लक्षणीय वाटले असते. 

मात्र, या लोकांचा स्त्रीद्वेष, आणि आपल्याला आयफेल टॉवर बघायचाय म्हणून तिथल्या स्त्रियांना त्यांचं काम करू न देण्यापर्यंत आग्रह धरणं, यात भरीस भर म्हणून सध्या भारतात जे धार्मिक राजकारण सुरू आहे ते पाहता बोचासणावर जितके विनोद होतील ते कमीच आहेत. या लोकांच्या डोक्यात जेवढा अंधार आहे तेवढा या विनोदांच्या बोच्यातही नसेल!

वर अनेक हिंदुत्ववाद्यांचं म्हणणं असतं, इस्लामचं आक्रमण झालं म्हणून म्हणे भारत अंधारयुगात गेला!

आयफेल टॉवरवाल्यांनी पैशांकडे दुर्लक्ष करावं, असा अजिबात आग्रह नाही. पण असल्या बाराव्या शतकातल्या परंपरा पाळण्याबद्दल टीकाही सहन करावी. मी आता डेलॉईटमध्ये ४+ वर्षं नोकरी करत्ये; मला डेलॉईटबद्दल यत्किंचितही प्रेम नाही. मात्र डॉब्ज-वि.-जॅक्सन निर्णय आला आणि गर्भपातावर टेक्सासी बंदी लागू झाली झाली तेव्हा आम्हांला इमेल आलं होतं की हा खर्च अंकल डीच्या आरोग्यविम्यातून करता येईल; अगदी दुसऱ्या राज्यात जाऊन काही उपचार घ्यावे लागले तर प्रवासखर्चही विम्यातून मिळेल. 

सई केसकर Fri, 11/09/2026 - 08:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला त्या कमेंटवर व्हॉटअबाऊटरी करायची नव्हती म्हणून तेव्हा लिहिलं नाही. पण मागल्या वर्षी दिवाळी अंकात एका स्त्रीलिंगी नाव असलेल्या आयडीच्या लेखकाली "ही अमुक अमुक ठिकाणी मुतायला गेली" अशी कमेंट करणाऱ्या व्यक्तीला बोचावरचे विनोद बोचावेत हे नवल आहे.
अशी टिंगल करायची नसेल तर ती कुणाचीच करू नये.

शांतादुर्गा Fri, 11/09/2026 - 22:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला वाटतं की बायकांना दिलेली अवमानकारक वागणूक पुरुषांना आणि बरेचदा ( विशेषतः भारतात) बायकांना सुद्धा 'चलता है' ह्या वर्गात मोडणारी वाटते. अर्थात याला अपवाद असतील पण ते अभावाने. फ्रान्स मधे घडलेली घटना जर निव्वळ 'बाजाराची मागणी' या सदरात मोजली जात असेल तर खरोखरच अवघड आहे. हिंदू थेरडेशाहीवर तोंडसुख घेणारे देखिल याला अपवाद नाहीत.

'न'वी बाजू Mon, 14/09/2026 - 09:48

In reply to by शांतादुर्गा

हिंदू थेरडेशाहीवर तोंडसुख घेणारे देखिल याला अपवाद नाहीत.

अर्थात! 'न'बा हे (तसे पहिल्यापासूनच) वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ट!!!च आहेत. आपण त्यांचे घर उन्हात बांधू, हं!

(किंवा, (विद्याधर) बापटांच्या भाषेत सांगायचे, तर, तुम्ही आता जो प्रकार केलात, त्याला ad hominem fallacy असे नाव आहे. (अर्थात, असो बापडे!))

अर्थात, तुमच्या (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, येथील कोणाच्याच) अप्रूवलवर 'न'बांचा उदरनिर्वाह, चरितार्थ, अथवा संसार (किंबहुना, 'न'बांचे येथील अस्तित्वसुद्धा) अवलंबून नसल्याकारणाने, 'न'बांना त्यामुळे काय फरक पडावा, म्हणा! त्यामुळे, चालू द्या. 'न'बांबद्दल काय हवे तो ग्रह बनवून घ्या; पसरवासुद्धा, वाटल्यास. 'न'बा त्यांच्याबद्दल सर्व प्रकारचे ग्रह बनवून घेण्यास (आणि पसरविण्यास) खुले आहेत.

असो.

शांतादुर्गा Wed, 16/09/2026 - 22:03

In reply to by 'न'वी बाजू

कमेंटीत इतका लिखित त्रागा करून - 'न'बांना त्यामुळे काय फरक पडावा, म्हणा! - असं लिहिणं मजेशीर आहे. कुणाबद्दल ग्रह बनवणे आणि पसरवणे वगैरे अंमळ चिडचिडीकडे झुकलं आहे :-) तुमचं घर थंड हवेच्या ठिकाणीच बरं.

'न'वी बाजू Mon, 14/09/2026 - 09:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

…ते पाहता बोचासणावर जितके विनोद होतील ते कमीच आहेत.

आणि, निष्प्रभ आहेत.

त्यातून, एक तात्कालिक मीम तयार होणे, झालेच तर, असे विनोद करणाऱ्यांची/सांगणाऱ्यांची/ऐकणाऱ्यांची घटकाभर करमणूक, यापलीकडे काहीही साध्य होण्यासारखे नाही. एक लढा या दृष्टीने (म्हणजे, अशा विनोदांमागे काही लढा उभा असलाच, तर) त्यांना काडीचेही महत्त्व नाही.

या लोकांच्या डोक्यात जेवढा अंधार आहे तेवढा या विनोदांच्या बोच्यातही नसेल!

मान्य. (म्हणजे, शक्य आहे. मी काही या विनोदांच्या बोच्यांत डोकावून ते (पक्षी: या विनोदांचे बोचे) तपासायला गेलेलो नाही; त्यामुळे, I bow (and defer) to (presumably (चूभूद्याघ्या.)) expert and considered opinion.) परंतु तरीही, What exactly is the point here?

आयफेल टॉवरवाल्यांनी पैशांकडे दुर्लक्ष करावं, असा अजिबात आग्रह नाही. पण असल्या बाराव्या शतकातल्या परंपरा पाळण्याबद्दल टीकाही सहन करावी.

अवश्य. आणि, त्या टीकेने काही आयफेल टॉवरवाल्यांच्या अंगास भोके पडत नाहीत.

किंबहुना, या प्रकारानंतर आयफेल टॉवरवाल्यांच्या stanceमध्ये यदाकदाचित जर काही बदल घडला असेलच, तर तो दोनपैकी एका (किंवा यदाकदाचित दोन्हीं) कारणांमुळे(च), असे सुचविण्याचे धाडस करू इच्छितो: एक म्हणजे, अपप्रसिद्धीमुळे आयफेल टॉवरवाल्यांच्या अर्थकारणावर — बॉटमलाइनवर — फरक पडण्याची शक्यता, आणि, दुसरे म्हणजे, त्यातून काही खळ्ळ-खट्याक् वगैरे उद्भवण्याची शक्यता. अन्य कोठलीही शक्यता उद्भवत नाही.

असो चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/09/2026 - 07:03

In reply to by 'न'वी बाजू

विनोद निष्प्रभ आहेत, किंवा असतील तर कशाला दखल घेतलीत त्यांची? दखल घेतलीत याचा अर्थ किमान तुमच्यासाठी ते विनोद (जे काही असतील) ते तेवढ्यापुरते तरी निष्प्रभ नव्हते.

एक पे रहना! दोन्ही बाजूंनी बोलायला - बुरखाही घालायला लागेल आणि मोदीजी थोरही आहेत - तुम्ही किती उजवे भक्त आहात?

विवेक पटाईत Fri, 11/09/2026 - 10:06

चिंता करू नका पुढील वीस वर्षानी भारतात आणि युरोपात अधिकान्श बुरखा घालणे बंधनकारक असेल आणि कोणीही विरोध करणार नाही.

अमित.कुलकर्णी Fri, 11/09/2026 - 12:49

In reply to by विवेक पटाईत

म्हणजे हे ("अधिकान्श बुरखा घालणे बंधनकारक असेल") होऊ न देण्यासाठी जे अथक प्रयत्न चालू आहेत ते अपुरे आहेत की काय?
अजून जोमाने प्रयत्न केले पाहिजेत आपण सगळ्यांनी

शांतादुर्गा Fri, 11/09/2026 - 21:01

In reply to by अमित.कुलकर्णी

'आपण सगळ्यांनी' मधे पटाईत काका बसत नसावेत.
त्यांच्या सारख्यांचे अथक विचार असेच व्हावे या दिशेने सुरू आहेत. त्यानिमित्ताने बघा, आम्ही हिंदू पुरुष 'आमच्या बायकांना' किती 'स्वातंत्र्य' देतो असा प्रचार करता येईल.

अमित.कुलकर्णी Sun, 13/09/2026 - 19:37

In reply to by शांतादुर्गा

फक्त एक शंका अशी की ७५ वर्षांत जे झाले नाही ते पुढच्या २० वर्षात होईल हे भविष्य वर्तवण्यासारखे आता काय घडले? (नेव्हरदलेस आम्ही घाबरलो आहोतच - आणि दिसेल त्याला घाबरवून सोडू - इतके नक्की करू)

'न'वी बाजू Sun, 13/09/2026 - 20:46

In reply to by अमित.कुलकर्णी

फक्त एक शंका अशी की ७५ वर्षांत जे झाले नाही ते पुढच्या २० वर्षात होईल हे भविष्य वर्तवण्यासारखे आता काय घडले?

मोदी है, तो (साला कुछ भी) मुमकिन है, त्यामुळे… चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/09/2026 - 07:01

In reply to by विवेक पटाईत

पटाईत काका, तुम्हीच सुरुवात करा की मग बुरखा घालायची! सरशी तिथे पारशी!! मोदीजीसुद्धा छानसा फॅशनेबल बुरखा घालून येतील पाहा, तुम्ही सुरुवात केल्यावर!

Rajesh188 Wed, 16/09/2026 - 15:59

In reply to by विवेक पटाईत

हिंदू वादी पक्षाच्या सरकार च्या च्या काळात हिंदू आर्थिक दृष्ट्या पूर्ण कमजोर झाले आहेत. मुस्लिम धार्जीने काँग्रेस काळात हीहिंदू आर्थिक दृष्ट्या मजबूत होता

शांतादुर्गा Wed, 16/09/2026 - 22:19

In reply to by Rajesh188

आजच Rs. 2000 पेक्षा जास्तीच्या व्यापारी UPI transactions वर ब्रो ने 0.4% सरचार्ज लावला अशी बातमी आहे.

अमित.कुलकर्णी Thu, 17/09/2026 - 10:11

In reply to by शांतादुर्गा

"UPI आम्ही आणला" हे श्रेय ब्रो ने हल्लीच घेतले होते. आता कुठल्यातरी अगतिकतेतून surcharge लावावा लागला हा कलंक कुणाच्या माथी लावतात, की हा "surcharge एक वरदान" असे narrative सेट १ करतात ते बघू.

१. narrative सेट करणे१ अ याचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते हल्ली समजू लागले आहे. चू. भू. द्या घ्या

१. अ - दहशतवाद्यांचे फंडिंग जीपे वर होत असल्याची खबर सरकारला लागली - असा "धुरंधर-३" चा प्लॉट असेल अशी मीम्स यायला लागली आहेत

शांतादुर्गा Fri, 02/10/2026 - 00:27

शराबी को शराबी नहीं कहें तो क्या पुजारी कहें?