विनाशाची सुरुवात...

विनाशाची सुरुवात...
==========
-राजीव उपाध्ये
सुमारे दोन वर्षांपूर्वी मी म०टा०मध्ये मेंदूचे आरोग्य आणि विवेक यांच्या संबंधावर लेख लिहिला होता. या लेखात अविकसित उपाग्रखण्ड (प्रिफ्रण्टल लोब) अविवेकी/बेपर्वा वर्तनाला कारणीभूत कसा ठरतो याबद्दल लक्ष वेधले होते.
यावर्षी जगभर सार्वत्रिक बेपर्वाईने सगळीकडेच कळस गाठला आहे. भारत मग याला अपवाद कसा असेल?
काही वर्षांपूर्वी अधिजनुकशास्त्राचा मराठीत परिचय करून देताना मी "महानगरे किडकी प्रजा निर्माण करत आहेत" असे विधा्न केले आहेत. मग मला "वेडा" ठरवायचा प्रयत्न केला गेला.
पण माझे शब्द खरे की खोटे याचा लवकरच अगदी स्पष्ट निकाल लागेल. यावर्षीच्या दिवाळीत किंवा दिवाळी अगोदर झालेल्या गर्भधारणा आणि त्या गर्भांचे जन्मानंतरचे आयुष्य याचा अभ्यास व्हायला कमीतकमी ५-१० वर्षे लोटायला हवीत...
या कालावधीत जन्माला आलेली बालके ही अनारोग्याचा, कदाचित अल्पायुष्याचा शाप घेऊन जन्माला येतील, हे मात्र नक्की. त्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवताना पालकांचे कंबरडे मोडेल. याचा परिणाम सर्व समाजाला भोगावा लागेल. जन्मानंतर लगेच सगळे परिणाम दिसतीलच असे नाही. काही परिणाम बालकांच्या शारीरिक वाढीत, मेंदूच्या विकासात, रोगप्रतिकारक क्षमतेत किंवा पुढील आयुष्यातील चयापचयविषयक आरोग्यात दिसू शकतात.
काही दिवसांपूर्वी मी रिक्षातून जात होतो. तो रिक्षावाला चालू रिक्षातून पचापचा अखण्ड थुंकत होता. मला ते असह्य झाल्यावर न राहवून सौम्य शब्दात म्हटले,
"दादा, अशामुळे देशाचे नाव खराब होते".
रिक्षावाल्याने मला अत्यंत निर्लज्जपणे प्रतिप्रश्न केला,
"साहेब, मग थुंकायचे कुठे?"
त्या रिक्षावाल्याचा निर्लज्जपणा यावर्षीच्या गणेशोत्सवात आणि दिवाळीत सर्वव्यापी बनलेला दिसला. आपण चुकत आहोत याचे भान न उरणे ही विनाशाची १ली पायरी आहे. ही पायरी ओलांडल्या नंतर परत फिरणे अधिकाधिक कठीण बनत जाते.
समाजाचा विनाश नेहमी युद्धाने, दुष्काळाने किंवा आर्थिक संकटानेच सुरू होतो असे नाही. अनेकदा तो अगदी साध्या गोष्टींपासून सुरू होतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणारा माणूस, दुसऱ्यांच्या आरोग्याची पर्वा न करता फटाके उडवणारा नागरिक, आणि स्वतःच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी परंपरेचा आधार घेणारा समाज.
या सगळ्यांत एक समान धागा आहे : स्वतःच्या कृतीचे परिणाम समजून घेण्याची आणि त्यांची जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता हळूहळू लोप पावत आहे.
आणि त्याहून भयंकर अवस्थेत आपण पोचलो आहोत. ती म्हणजे, आपली चूक हीच आपली संस्कृती आहे, असा अभिमान वाटू लागणे. एकदा ही अवस्था आली की समाजाला बाहेरून नष्ट करण्याची गरजच उरत नाही. तो स्वतःच स्वतःच्या विनाशाची व्यवस्था उभी करू लागतो.
श्री० नबा https://www.msn…
श्री० नबा
https://www.msn.com/en-in/health/diseases-and-conditions/type-2-diabete…
वरील लिंक तपासावी आणि सोबतचे चित्र बघावे. वरील लिंक तपासावी आणि सोबतचे चित्र बघावे. सांगायचे तात्पर्य - उजव्या आणि डाव्या मेंदूने एकमेकांच्या कार्यक्षेत्रात जास्त ढवळाढवळ करू नये.
…
लिंक तपासली. सोबतची चित्रेही पाहिली.
लेखासोबतची चित्रे (कृबुजनित असल्यास) दर्जाच्या दृष्टीने तितकीही भिकार/भयानक नाहीत. मात्र, तरीही काही प्रश्न उद्भवलेच.
- (पहिले चित्र:) लेख (तथा चित्रसुद्धा) मधुमेहासंबंधी आहे, हे लक्षात घेता, चित्रात ब्लड प्रेशर मॉनिटरऐवजी ब्लड ग्लूकोज मॉनिटर दाखविणे अधिक सयुक्तिक ठरले नसते काय? (लेखात ज्याअर्थी रक्तदाबाविषयी चकार शब्दही आढळला नाही, त्याअर्थी रक्तदाब हा लेखाच्या intended विषयाच्या scopeशी दूरान्वयानेही संबंधित नसावा. (चूभूद्याघ्या.))
- (दुसरे चित्र:) या चित्रात (एकदाचा!) ब्लड ग्लूकोज मॉनिटर आहे. (हुश्श!) (शिवाय, चित्रात तो ब्लड ग्लूकोज मॉनिटर वापरून कोणीतरी आपली रक्तशर्करा मोजतानाही दाखविलेले आहे.) मात्र, चित्रासोबतचे caption हे ‘Insulin is essential for people with Type 1 diabetes, but an accurate diagnosis is crucial to ensure appropriate treatment.’ असे आहे. आता, केवळ रक्तशर्करा मोजल्याने मधुमेह Type 1 आहे, की Type 2, याचे निदान कसे काय होऊ शकेल बुवा, असा प्रश्न, थोडाबहुत कॉमनसेन्स अद्याप शिल्लक असलेल्या सामान्य वकुबाच्या वाचकाससुद्धा पडू नये काय?
थोडक्यात, चित्रे लेखाच्या intended विषयाशी संबंधित नाहीत (सबब, लेखास पूरक नाहीत); बिनडोकपणे, केवळ लेखासोबत चित्रे हवीत, म्हणून (‘चित्रास चित्र’ तत्त्वावर) अंतर्भूत करण्यात आलेली आहेत, हे उघड आहे. (खुद्द लेखाच्या दर्जाबद्दल, लेख केवळ वरवर चाळलेला असल्याकारणाने, टिप्पणी करण्यास असमर्थ आहे. तूर्तास, ‘कदाचित बरा असू शकेल’ असा संशयाचा फायदा लेखास देऊ.)
अर्थात, ‘तशीही चित्रे कोण पाहणार आहे (फॉर्दॅट्मॅटर, तसाही लेखसुद्धा इथे कोण वाचायला बसले आहे), सबब, द्या ठोकून!’ अशी काही (पाट्याटाकू) धारणा चित्रांमागे (तथा लेखामागेसुद्धा) असल्यास, प्रश्न मिटला. (लेख एमएसएन नामक पोर्टलवरील असल्याकारणाने, तसाही केवळ पादपूरणार्थ असावा, अशी एक शंका केवळ आमच्या मनात डोकावते, इतकेच.)
(शिवाय, लेखासोबत चित्रे ही असलीच पाहिजेत काय, हा मूलभूत प्रश्नदेखील या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होतो, तो वेगळाच.)
असो चालायचेच.
((तुलनेने) गंभीर प्रतिसाद)
लेखातील मुद्दे हे (कदाचित) गंभीर असू शकतात. परंतु, लेखातील मजकूर तथा चित्र यांच्या परस्परसान्निध्या१मुळे, आमच्या इलाख्यात काही संस्था, ‘जगाचा अंत लवकरच येऊ घातलेला आहे, परंतु, ख्रिस्ताला शरण जाण्यातच तारणाचा खरा मार्ग आहे’ अशा प्रकारचा काही शुभसंदेशात्मक मजकूर (त्यासोबत काही भिकार तथा भयाण चित्रासहित) असलेल्या (बहुधा Watch-Tower किंवा तत्सम निरर्थक नावाच्या) आठपानी (किंवा तत्सम आकाराच्या) पुस्तिका वाटत सकाळीसकाळी दारोदार फिरतात, त्यांची (का, कोण जाणे, परंतु) आठवण झाली.
नाही, आपल्या लेखाच्या केंद्रस्थानी असलेल्या संदेशास तत्त्वतः विरोध नाही२, परंतु, लेखासोबतच्या (एआयजनित) चित्रास अंतर्भूत करण्याबाबत पुनर्विचार व्हावा; कदाचित आपल्या लेखातील मुद्दे गंभीरपणे घेतले जाण्याची शक्यता (तसूभरच कदाचित, परंतु) वाढू शकेल.
(अर्थात, स्वतःचे लिखाण गंभीरपणे घेतले जाण्या-न जाण्याने आपल्याला (आमच्याप्रमाणेच) काहीही फरक जर पडत नसेल, तर मर्जी आपली. त्या परिस्थितीत, आमचे काहीही म्हणणे नाही.)
असो चालायचेच.
तळटीपा:
१ Juxtapositionकरिता याहून बरा मराठी प्रतिशब्द आठवला नाही. क्षमस्व.
२ ऑल्दो, ख्रिस्तच काय, परंतु ख्रिस्ताचा बाप२अ जरी (आकाशातून) अवतरला, तरी तो तरी भारतास तारावयास समर्थ असेल की नाही, याबद्दल आम्ही व्यक्तिशः साशंक आहोत. (आपल्या आशावादाबद्दल आम्हांस आदर वाटतो.)
२अ यानी कि, (ख्रिस्ताच्या दाव्याप्रमाणे) साक्षात परमेश्वर. (खरेखोटे (असलाच, तर) तो एक परमेश्वरच जाणे.)
असो
AI जनित चित्रांच्या बाबतीत कलाविषयक सामान्य वकुबाच्या माणसांनी इतकी वर्षे ही कला कशी काय आम्हाला येत नव्हती ह्या भावनेतून केलेली उतमात पाहता आमच्यासारख्या चित्रकला सोडून इतर सगळ्याच बाबतीत अतिसामान्य वकुबांच्या चित्रकारांना लवकरच सोन्याचे दिवस येणार ह्याची खात्री वाटते.
बाकी सर्व ठीक, परंतु...
...
दो या तीन बसहम दो, हमारे दो" हा (पुन्हा आमच्याच लहानपणीचा) (सरकारी) संदेश, हे दोन्हीं आजमितीस धुडकावले जात असल्याचे हे द्योतक समजावे काय?१ हे (सार्वजनिक) गणपतीसमोरील दारू(कामा)चे पर्यवसान, किंवा कसे, हे कळावयास मार्ग नाही. चालायचेच.