Skip to main content

आकांतांचे देणे

(मुलीस).....

क्षितिजे धुळीने मळतील
आयुश्याच्या सांजक्षणी
तु वळुन पहावे परतुन
माझ्या रुपेरी हिरकणी

येतील उन्हाच्या वाटा
जातील परतुनी सगळे
तुझ्या मनाच्या कुशीत
माझी चंदनपणती उजळे

सांग तुजला काय देऊ
आपला पेशा फ़किरी
मिळे तुजला एकला कबीर
व्यथित पावलांच्या परि

येता आयुश्याची सांज
तु मला साद दे
तु माझे आवर्त घे
या जगाशी झुंज दे

अनंत ढवळे Sun, 13/11/2011 - 14:42

आशय आवडला.लय/ वृत्त नीट लक्षात आले नाही, अर्थात ही माझी चूक असू शकते.

हरवलेल्या जहाज… Mon, 21/11/2011 - 11:39

In reply to by अनंत ढवळे

वृत्त विचारात घेऊन मी कविता लिहिली नव्हती. अर्थात ही कवितेची लंगडी बाजू ठरू शकते. पुढच्या वेळेस याचा नक्की विचार करेन. धन्यवाद.

रामदास Sun, 13/11/2011 - 18:47

तु माझे आवर्त घे
या जगाशी झुंज दे
ही भावले

पाषाणभेद Mon, 14/11/2011 - 03:56

कविता आवडली.
पण आकांत नायक का करतो आहे? त्याच्या भुतकाळातील काही स्मृती आकांत करण्याला कारणीभुत आहेत काय? असल्यास त्याचा उल्लेख सुरूवातीला आला पाहिजे होता.