Skip to main content

काचेरी

आजकाल मी विचार करतो
डोक्यामधल्या हजार गोष्टी
लहान मोठे लढे निरंतर

या सगळ्याचा निकाल लाउन
कल्पनेतल्या कवीप्रमाणे
धाउन जावे अवघे अंतर

समोरच्या काचेतुन दिसतो
किती भव्य हा हिरवा डोंगर

ऋषिकेश Mon, 05/08/2013 - 15:31

व्वा!! मान गये!

(अवांतरः काचेरी हा शब्द दुसर्‍यांदा ऐकतोय.. मागे (बहुदा गविंच्या) एका कथेत वाचला होता - मिपाच्या दिवाळी अंकात? -आणि आज दुसर्‍यांदा.. नवा शब्द बोचतो खास! पण हा शब्द येणारे लेखन दोन्ही वेळा आवडले आहे त्यामुळे त्याबद्दल काय बोलावे समजत नाही :) )

समीर चव्हाण Tue, 06/08/2013 - 09:22

समोरच्या काचेतुन दिसतो
किती भव्य हा हिरवा डोंगर

कविता आवडली.

विसुनाना Tue, 06/08/2013 - 15:19

कविता आवडली.

काचेच्या आतला कंडिशन्ड हवेचा थंडगार झोतही स्पर्शून गेला. :(