Skip to main content

बग्ज/ त्रुटी

या धाग्यावर संस्थळावरील तांत्रिक त्रुटींच्या तक्रारी करा.

सध्या स्मायली/इमोटीकॉन्स बंद केले आहेत. सेवादाता आणि अ-रोमन लिप्यांचे वाकडे आहे असा संशय आहे.

लिंकांचे बटण सुरू झाले आहे. टेस्ट पण त्याचा डिस्प्ले थोडा विचित्र येतो आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/10/2011 - 07:40

In reply to by प्राजु

सध्या त्यात थोडी अडचण आहे खरी. तो कोड दुरूस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तुझ्या कविता आलेल्या ट्रॅकरवरून समजेल. :-)

प्रियाली Fri, 21/10/2011 - 16:47

लॉग इन केल्यावर मी कोणाच्या नावाने लॉग इन झाले आहे (हेहेहे!) हे कळत नाही. वेगळ्या शब्दांत मला हेडरमध्ये "प्रियाली स्वागत असो" असा काहीसा मेसेज मिळाला तर आवडेल - अर्थातच याला नाइस टू हॅव असे समजून नंतर काम करता येईल.

आणखी काही त्रुटी -

  1. प्रतिसाद उलट्या क्रमाने दिसत आहेत. शेवटचा प्रतिसाद वर दिसतो.
  2. नवीन प्रतिसाद वाचण्यासाठी धाग्यावर टिचकी मारली असता "नवीन" हा शब्द दिसत नाही.

चिंतातुर जंतू Fri, 21/10/2011 - 17:45

In reply to by प्रियाली

>>प्रतिसाद उलट्या क्रमाने दिसत आहेत. शेवटचा प्रतिसाद वर दिसतो.

धाग्यात Comment viewing options जिथे दिसताहेत तिथे जा. डिस्प्ले:थ्रेडेड हा पर्याय निवडा.

>>नवीन प्रतिसाद वाचण्यासाठी धाग्यावर टिचकी मारली असता "नवीन" हा शब्द दिसत नाही

मला दिसतो आहे. तुम्ही हा प्रतिसाद दिला होता तेव्हा मी तो वाचला होता. आता संपादित केलात तो मला पुन्हा नवीन म्हणूनच दिसतो आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/10/2011 - 18:32

In reply to by प्रियाली

होय प्रियालीशी सहमत आहे. काही 'स्वागत संदेश' दिसला तर बरं होईल. डुप्लिकेट आयडीवाल्यांनाही त्रास होणार नाही. ;-) बघते काय, कुठे बदल करावे लागतील ते.

>> प्रतिसाद उलट्या क्रमाने दिसत आहेत. शेवटचा प्रतिसाद वर दिसतो.
याचा डीफॉल्ट डिस्प्ले बदलून पहाते. पण त्या आधी काढलेल्या धाग्यांमधे हे चालेलच का याची खात्री नाही. थोडक्यात या धाग्यापुरतं प्रत्येकाला 'थ्रेडेड डिस्प्ले' असं सेटींग करावं लागेल.

>> नवीन प्रतिसाद वाचण्यासाठी धाग्यावर टिचकी मारली असता "नवीन" हा शब्द दिसत नाही.
प्रतिसादाच्या विषयाच्या डाव्या बाजूला काळ्या अक्षरात 'नवीन' असं दिसतं. ते बदलून जरा भडक रंगात येण्याचा प्रयत्न करते म्हणजे चटकन दिसेल.

प्रियाली Fri, 21/10/2011 - 19:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे हो की. नवीन आहे खरा काळा. ;-) माझ्यासारख्या माणसांसाठी "नवीन" शब्द लाल अक्षरांत नाही का करता येणार? मला सर्व कसं स्पष्ट आणि रंगीबेरंगी लागतं. ;-)

चिंतातुर जंतू Fri, 21/10/2011 - 18:33

In reply to by ............सा…

ती खरड तुमच्याच खरडवहीत आहे. तो एक बग आहे असं दुसरीकडे कुठेतरी (बहुधा खपउपा करतानाच) वाचल्याचं स्मरतं.

ऐसीअक्षरे Fri, 21/10/2011 - 18:35

In reply to by चिंतातुर जंतू

सध्या स्वतःच्याच खरडवहीत खरडी लिहीता येत आहेत जे थोडं गोंधळवणारं आहे. हे बंद कसं करता येईल याचा विचार सुरू आहे.

राजेश घासकडवी Sun, 23/10/2011 - 02:56

In reply to by ऐसीअक्षरे

आता स्वतःच्या खवत लिहिता येत नाही. खरडींना छान चौकटीही आल्या आहेत. मात्र ज्या आयडीची खरड आली त्या आयडीवर क्लिक केलं तर काहीच होत नाही. आदर्श संस्थळावर आपण त्या सदस्याच्या खरडवहीत पोचता यावं. किंवा सदस्याचं मुख्य पान दिसावं.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/10/2011 - 05:30

In reply to by राजेश घासकडवी

याचं काही काम करताना चुकून जुन्या खरडी गेल्या आहेत. दोन दिवसांत या खरडवह्यांमधे अक्षरसाहित्य निर्माण झालं नसावं. तरीही सर्व सदस्य आणि खव-उपा मंडळाची क्षमाप्रार्थी आहे.

आदर्श संस्थळावर आपण त्या सदस्याच्या खरडवहीत पोचता यावं. किंवा सदस्याचं मुख्य पान दिसावं.

सहमत आहे. टेस्ट घेतली असता तिथे ही लिंक दिसते पण 'ऐसीअक्षरे'वर अशी लिंक का दिसत नाही याचा शोध सुरू आहे.

प्रियाली Fri, 21/10/2011 - 19:59

In reply to by चिंतातुर जंतू

स्वतःच स्वतःला खरड पाठवता येत आहे. ;-)

चला बरे झाले. आता ड्युप्लिकेट आयडी काढून तिला खरड पाठवून संवाद साधण्यापेक्षा स्वतःच स्वतःशी संवाद साधता येईल. :-)

वैद्य Fri, 21/10/2011 - 19:45

छानंच झाली आहे साइट. अजून तरी काही तृटी आढळल्या नाहीत. रंगसंगती मधे पार्श्वभुमीचा केशरी रंग हिरव्या रंगसंगतीला थोडा ऑड वाटला.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/10/2011 - 20:11

In reply to by वैद्य

या प्रतिसादाच्या निमित्ताने का होईना दृष्यकलांसंदर्भात काही लिखाण यावं अशी इच्छा व्यक्त करते.

(Philistine) अदिती

चिंतातुर जंतू Fri, 21/10/2011 - 22:57

In reply to by वैद्य

>>रंगसंगती मधे पार्श्वभुमीचा केशरी रंग हिरव्या रंगसंगतीला थोडा ऑड वाटला.

असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. रंगछटांमधला किंचित फरक सोडल्यास केशरी-हिरवा ही खूप भारतीय रंगसंगती आहे एवढे मात्र म्हणेन. उदा: गडद हिरवी आंब्याची पाने अन केशरी झेंडूची फुले यांनी सजलेले पारंपरिक तोरण. अर्थात, झेंडूच्या फुलांचा केशरी रंग इथे दिसला असता तर काही जणांनी 'ऑफिसात संस्थळ उघडायला कसंतरीच वाटतं कारण हे रंग फार भडक वाटतात' अशी तक्रार केली असती अशीही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे तूर्तास 'चालायचेच' एवढेच म्हणतो.

क्रेमर Fri, 21/10/2011 - 20:50

लॉगइन केलेले नसतांना प्रतिसाद वाचता येत नाहीत. हे ठरवून आहे की काही तांत्रिक अडचण आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/10/2011 - 20:54

In reply to by क्रेमर

नजरचूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रतिसादांना श्रेणी देण्याबाबतः काही ठरविक कर्म गुण साचल्याशिवाय श्रेणी देता येत नाही. ते संचित जमवण्यासाठी लिखाण करावे लागेल. धागे आणि प्रतिसाद देऊन कर्मगुणांकन वाढले की श्रेणी देता यावी. यात काही त्रुटी असल्यास कृपया या धाग्यावर कळवावे. सध्या सगळेच शिकाऊ उमेदवार आहेत.

अशोक पाटील Fri, 21/10/2011 - 21:47

नवीन शुभेच्छा....नवीन नजरचूक....नवीन स्वतःला खरड....नवीन अरे हा की....नवीन धन्यवाद चि.जं..... इ. इ. एकापाठोपाठ वाचताना निश्चित्तच अडथळ्याच्या शर्यतीतील भोजे आठवतात. या 'नवीन' फ्लॅगची काही आवश्यकता आहे असे कुणीच म्हणणार नाही. कारण सर्वच सदस्य जालीय दुनियेतील पट्टीचे पोहणारे आहे हे दिसतेच. तेव्हा थेट त्यांच्या प्रतिसादातील शीर्षकच विषय चौकटीत यावे.

बाकी डिस्प्ले ऑप्शन्स - फ्लॅट ऑर थ्रेडेड...एकदम मस्त.

क्रेमर Fri, 21/10/2011 - 21:53

In reply to by अशोक पाटील

सदस्य 'नवीन' असे नाही. काही वेळा धाग्यात एखाद्या प्रतिसादामागे इतर प्रतिसादांची तिरपी रांग लागते. त्यात आणखी उपप्रतिसादही फाटे फोडतात. मग काय वाचलेले नाही हे कळण्यासाठी 'नवीन' आहे.

............सा… Fri, 21/10/2011 - 22:52

In reply to by क्रेमर

अजून एक सूचवणी - "नवीन" हे अक्षर लाल आणि ठळक केले तर शोधणे सोपे जाइल. सध्य "नवीन" हे अक्षर शोधायला खूप प्रयास पडत आहेत :(

प्रियाली Fri, 21/10/2011 - 22:33

मी या संकेतस्थळावर हलकटपणा करण्यास उत्सुक आहे. ह.घ्या.

श्रेणी देणार्‍यांनो मला लग्गेच वाईट ठरवा बघू. हा टेस्ट प्रतिसाद आहे. कमी गुणांक मिळवण्यासाठी.

श्रावण मोडक Fri, 21/10/2011 - 22:36

In reply to by प्रियाली

मी या संकेतस्थळावर हलकटपणा करण्यास उत्सुक आहे. ह.घ्या.

आम्ही सिरियसच घेणार. तुमच्याकडून वेगळं काहीही अपेक्षीत नाही...
ए, तू सुपारी घेतेस का? मी एक संस्थळ सुरू करावं म्हणतोय. तुझ्यासारख्यांचा हलकटपणा तिथं स्वागतार्ह आहे. त्याशिवाय ते संस्थळ हॅपनिंग होणार नाही... ;)

प्रियाली Fri, 21/10/2011 - 22:37

In reply to by श्रावण मोडक

बघा अवांतर कोण करते आणि दोष कोणाला जातो?

ए, तू सुपारी घेतेस का? मी एक संस्थळ सुरू करावं म्हणतोय. तुझ्यासारख्यांचा हलकटपणा तिथं स्वागतार्ह आहे. त्याशिवाय ते संस्थळ हॅपनिंग होणार नाही... ;)

संकेतस्थळाचे नाव हलकट्.कॉम ठेवा. नारळ फोडायची व्यवस्था मी करते.

श्रावण मोडक Fri, 21/10/2011 - 22:50

In reply to by प्रियाली

माननीय ३_१४ विक्षिप्त अदिती यांच्या विनंतीस मान देऊन तूर्त संस्थळाचा बेत रद्द केला आहे.
मुख्य प्रतिसाद: प्रतिसादांना दिलेल्या श्रेणी कळत नाही. प्रियालीच्या वरील प्रतिसादाला मी खोडसाळ असे म्हटले होते. ते तिथं दिसत नाही. श्रेणीनिहाय किमान संख्या कळावी. की एकाने खोडसाळ म्हण्टल्यानंतर दुसऱ्याने सर्वसाधारण म्हटले की आधीचा खोडसाळपणा निकालात निघतो? तसे असेल तर मात्र श्रेणी पद्धती चुकते.

बिपिन कार्यकर्ते Sat, 22/10/2011 - 00:55

In reply to by प्रियाली

नारळ फोडायची व्यवस्था मी करते.

नारळ की कवटी? असं बदलू नये! कमीत कमी आपल्यातल्या लोकांनी तरी... माणसांच्या वाईट सवयी नकोत आपल्यात! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/10/2011 - 22:38

In reply to by श्रावण मोडक

श्रावण, अजून दिवाळीचा मुहुर्त आला नाही आणि तुम्ही काय नवीन संस्थळाच्या बाता करता आहात?

असो, अनेक सदस्यांना आता श्रेणी देता येते आहे असं दिसत आहे. सध्या > ४० सदस्यांना श्रेणी देण्याची सोय आहे. हा आकडा समंजस सदस्यांमुळे उत्तरोत्तर वाढत राहो ही अपेक्षा आहे.

ऋषिकेश Fri, 21/10/2011 - 22:42

अअअअरे वववा सस्सस्थळ जझझकझझझक्कास दददददददिसतंय!
ममममामात्र फफफफफफायरफफफफॉफफफफॉक्समधे टटटटटाईप कककककककरताना अअअअसं ककका टटटटटाईप हहहहहहोतंय????
:(

प्रियाली Fri, 21/10/2011 - 22:46

In reply to by ऋषिकेश

म्हणजे तुझा शाहरूख खान होतोय का?

असे गूगलक्रोमला होत असे हे माहित आहे पण मला आयईवरही बॅकस्पेस मारल्यावर वेगळीच अक्षरे उमटल्याचा अनुभव आला.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/10/2011 - 23:52

In reply to by ............सा…

कुठेतरी भाषांतर हुकलं आहे. कुठे ते पहाते.

क्रेमर, पुन्हा भाषांतर राहिलं आहे, पहाते.

अशोक पाटील Fri, 21/10/2011 - 23:20

मी देवाने निर्माण केलेल्या दुनियेतील जुना खेळाडू असलो तरी मानवाने निर्माण केलेल्या जालीय दुनियेत अजून अप्रेन्टिसच आहे आणि ज्या दिवसापासून याचा लुफ्त घेतोय त्या दिवसापासून 'लाल रंग' प्रत्येक संस्थळावर प्रकर्षाने आढळला आहे....विशेषत: "नवीन" प्रतिसाद असेल तर. ऐसी अक्षरेवर, उदाहरणार्थ, एका धाग्यावर तीन प्रतिक्रिया आल्याची नोंद झाली आणि धाग्याच्या संबंधित पानावर विविध ठिकाणी ससंदर्भानुसार त्या सरकविल्या गेल्या असतील, तर नव्याने तिथे वाचनासाठी जाणार्‍याला 'लाल रंगा' अभावी नेमक्या त्या तीन नवीन प्रतिक्रिया कुठल्या ते समजत नाही.

तर, उदाहरणार्थ तसा बदल झाला तर ते थोरच होईल !

क्रेमर Fri, 21/10/2011 - 23:21

'माझे खाते' मध्ये 'खरडवही' हा शब्द आहे. दुसर्‍यांच्या खात्यावर गेल्यास मात्र 'अमकातमका's guestbook' असे दिसते.

क्रेमर Sat, 22/10/2011 - 00:10

लेखनचौकटीची रुंदी थोडी कमी करावी असे वाटते. ओळी लांबच लांब साड्या वाळत घातल्यासारख्या दिसतात.

बिपिन कार्यकर्ते Sat, 22/10/2011 - 00:50

थ्रेशोल्ड, डिस्प्ले आणि प्रतिसाद पर पेज या तीन व्हॅल्युज एका धाग्यावर सेट केल्यावर त्या त्या सदस्यापुरत्या ग्लोबली सेट होतात. हे चांगले आहे.

श्रावण मोडक Sat, 22/10/2011 - 00:57

प्रतिसादकाची सही श्रेणींची फील्ड आणि त्याखालची प्रतिसाद ही लिंक यांच्या खाली जाते आहे. ती त्यावर हवी.

नितिन थत्ते Sat, 22/10/2011 - 11:06

स्वाक्षरी प्रतिसादात एम्बेड होते की अ‍ॅपेण्ड होते?

ती एम्बेड व्हावी असे वाटते.

म्हणजे माझी आजची स्वाक्षरी दोन वर्षापूर्वीच्या प्रतिसादात चिकटवली जावू नये.

(चिंतित) नितिन थत्ते

प्रियाली Sat, 22/10/2011 - 16:13

ललित लेखनाला वर्गीकरण हवे. एखादे लेखन ललित आहे हा त्याचा वर्ग असला तरी पोटवर्गांत अनुभव, कथा, स्फुट वगैरे वर्गीकरणे हवीत. ती सध्या दिसत नाहीत.

श्रावण मोडक Sat, 22/10/2011 - 16:37

ही एक माझी पंचाईतच झाली आहे. मी थ्रेशोल्ड ठेवला आहे +२. त्यामुळं मला +२ याच थ्रेशोल्डचे प्रतिसाद दिसतात. पण... प्रत्येक नवीन प्रतिसाद मला कळतोच कशासाठी? कारण त्यांना ती श्रेणी मिळालेली नसते. मग, मी उत्साहाने नवा प्रतिसाद पहायला जातो तेव्हा आधीचाच तशी श्रेणी मिळालेला प्रतिसाद मला दिसतो. तो मी वाचलेला असतोच. म्हणजे, थ्रेशोल्ड देऊन मी स्वतःचाच पोपट करून घेण्याची सोय केली आहे.
नवीन म्हणून जे दिसते ते सदस्याने ठरवलेल्या थ्रेशोल्डशी प्रामाणिक असणारेच असावे, असे काही करता येत नाही का? आता मला वाटतं, मी थ्रेशोल्ड पुन्हा शून्य करून ठेवावा. म्हणजे निदान ही सुविधा देते त्याच्याशी मला प्रामाणिक राहता येईल. ती माझ्याशी रहात नसली तरी चालेल. ;)

चिंतातुर जंतू Sat, 22/10/2011 - 16:45

In reply to by श्रावण मोडक

>>मला +२ याच थ्रेशोल्डचे प्रतिसाद दिसतात. पण... प्रत्येक नवीन प्रतिसाद मला कळतोच कशासाठी?

अहो ट्यार्पी वाढवायचा आहे नं ;-)

चिंतातुर जंतू Sat, 22/10/2011 - 23:52

धाग्यात 'फुल एच्टीएमएल' करून प्रतिमा टाकता आली, पण माझ्या खात्यात माझ्याविषयीच्या 'Intro text' मध्ये तसं करता येत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/10/2011 - 07:07
  • "नवीन" प्रतिसाद दिसण्यात काळ्या टॅगमुळे अडचण होत आहे. स्वाक्षरीच्या वर श्रेणी आहे. प्रतिसादांमधल्या या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • खरडवह्या आता थोड्या बर्‍या दिसत आहेत. स्वतःला खरड लिहीता येत नाही. पण नवीन खरडी आलेल्या समजत नाहीत. यावर काम सुरू आहे

.

मी थ्रेशोल्ड ठेवला आहे +२. त्यामुळं मला +२ याच थ्रेशोल्डचे प्रतिसाद दिसतात. पण... प्रत्येक नवीन प्रतिसाद मला कळतोच कशासाठी? कारण त्यांना ती श्रेणी मिळालेली नसते

यात थोडी गंमत अशी आहे की नवीन प्रतिसादांचं डीफॉल्ट गुणांकन असतं +१. कदाचित असे प्रतिसाद उत्तम असतील पण अजूनपर्यंत तुमच्यासारखा गुणग्राहक श्रेणीदाता न मिळाल्यामुळे कमी श्रेणीचा राहिला असेल. त्यामुळे असे प्रतिसाद तुम्हाला दिसलेच पाहिजेत. ;-)

श्रावण मोडक Sun, 23/10/2011 - 14:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यामुळे असे प्रतिसाद तुम्हाला दिसलेच पाहिजेत. ;-)
अडचण तीच आहे ना. असे प्रतिसाद झाकलेलेच राहतात. कारण त्यांचे गुण जमलेले नसतात. पण ट्रॅकरवर मात्र मला दिसते की, बाबा रे या धाग्यावर नवे प्रतिसाद आले आहेत. उत्सुकतेने मी धागा उघडतो (इथं काहीही आधुनिकोत्तर नाही) आणि पाहतो तर आधी वाचलेलेच प्रतिसाद तोंड वर करून उभे आहेत. हा जुलमाचा रामराम. नवं काय हे शोधून वाचावं लागतं. म्हणजेच प्रत्येक सदस्याला त्याच्या थ्रेशोल्डवरचेच नवे प्रतिसाद दिसावेत. एरवी डिफॉल्ट श्रेणीचे कितीही प्रतिसाद येऊन पडोत. ट्रॅकरवर ते त्या सदस्यासाठी नवे प्रतिसाद नसावेत. किंवा दाखवायचे असतील तर सारेच नवे दाखवा. थ्रेशोल्ड वगैरे गुंडाळून ठेवा.
आणखी एक म्हणजे, आत्ताच्या व्यवस्थेत विशिष्ट श्रेणी न मिळालेले प्रतिसाद झाकलेले असतात. प्रतिसाद झाकलेला आहे हे ठीक. पण आयडी दिसावा, म्हणजे किमान आयडी पाहून मला पुढं जायचं की थांबून वाचायचं हेही ठरवता येईल. निदान हे तरी आधी करता यावं.
आता या परिस्थितीमुळं मी विचार करतोय, प्रतिसादाना श्रेणी यापेक्षा सालं सदस्यांचंच मानांकन करता यावं. ते बरं.
उदाहरणार्थ, मला कल्पना चित्रे, कल्पक बुद्धीमत्ते, बुद्धीमान विचारे, चित्रा काल्पनिक, संचित अदमासे, गुणवान काशीघाले, सूचक लिंकाळे या सात आयडींचे लेखन - प्रतिसाद वाचायचे असतात. ते काहीही लिहोत. मी त्यांना श्रेणी देऊन टाकली. तो माझा थ्रेशोल्ड ठरवला. तर त्यांचे लेखन मला उघडून पाहावे लागणार नाही. इतरांनी त्याला काहीही श्रेणी दिलेली असो वा नसो.
आता हे सारं मी लिहितोय ते केवळ मौज म्हणून. कारण या गणिती श्रेणीपद्धतीची मर्यादा मी मान्य केली आहे. ती जरी भंपक असली तरी मानवी बुद्धीची मर्यादा म्हणून तंत्रज्ञानाची ही मर्यादा स्वीकारावी लागेलच.

अशोक पाटील Sun, 23/10/2011 - 10:29

एक जादाचा विकल्प टाकता येईल का ते पाहावे, तो म्हणजे स्क्रीनच्या उजव्या बाजूला 'चटदिशी वर - स्क्रोलिंग' जाण्याची ती बटन सुविधा. जवळपास सर्वच संस्थळावर अशी सुविधा असल्याचे दिसते म्हणून ही विनंती.

धाग्यावरील प्रतिसादांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे ('ऐसी अक्षरे'चे चांगल्या प्रगतीचे हे लक्षण आहेच) त्यामुळे आता तशा 'स्क्रोल अप बटन' ची आवश्यकता वाटत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/10/2011 - 11:29

In reply to by अशोक पाटील

हे करणं सहज शक्य असावं. वेळ मिळाला की सगळ्यात पहिले हेच करते.

धाग्यावरील प्रतिसादांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे ('ऐसी अक्षरे'चे चांगल्या प्रगतीचे हे लक्षण आहेच) त्यामुळे आता तशा 'स्क्रोल अप बटन' ची आवश्यकता वाटत आहे.

त्यातून तुमचा एकच प्रतिसाद एवढा मोठा असतो की तो संपूर्ण वाचायला दोनदा स्क्रोल करावं लागतं! ;-)
(मी तुमचे प्रतिसाद वाचते याची ही क्षीण जाहिरात आहे.)

अशोक पाटील Sun, 23/10/2011 - 11:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

व्वा व्वा ~ म्हणजे माझ्यामुळे तिथे जर ते 'बटन' अवतरणार असेल तर मग त्याचे जागतिक हक्क ( दॅट इज 'स्वामीत्व') माझ्याकडेच राहील.

(पूर्वी राजा ठाकूर, माधव शिंदे, सरस्वते, परांजपे यांचे इंदिरा चिटणीस, सुलोचना स्टारर 'बायाबापड्यांना धाय मोकलून रडायला लावणारे कौटुंबिक, तर अनंत माने, दिनकर पाटील यांचे ठरलेले पाटील+तमासगिरीण धाटणीचे मराठी चित्रपट तितक्याच उदासवाण्या थिएटरमध्ये पडदा पाहात, त्यावेळी मुख्य टायटल्स सुरू होण्यापूर्वीच "या चित्रपटाचे जागतिक वितरण हक्क 'माऊली वितरण' कडे अशी एक ठाशीव जाहिरात यायची. त्यावेळी मराठी चित्रपट पुणे-सांगली-कोल्हापूर टोलनाक्याच्या पुढेही जात नसत, तरीही 'जागतिक वितरणा' चे हक्क आपल्याकडे आहेत असे ठासून सांगणार्‍या वितरक नेमाड्यांचे कौतुक वाटायचे.)

अशोक पाटील Sun, 23/10/2011 - 12:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगं कसला जगप्रसिद्ध होणार मी ? बघ दिवाळी तीन दिवसावर येऊन ठेपलीया तर घरी गॅस नाही म्हणून किचनमध्ये शाब्दिक जाळ होत आहे आणि 'जालीय दुनियेत मोठ्ठे मोठ्ठे प्रतिसाद देणारी अशोक पाटील नावाची एक निरुपद्रवी व्यक्ती' आहे एवढी महत्वाची बातमी त्या गॅस सप्लायरच्या लेखी/तोंडी खिजगणतीतही नसावी हे किती दुर्दैव या प्रसिद्धीचे ?

तुला काय....तुझ्याकडील गॅस थेट हिलरी क्लिन्टनसौजन्याने व्हाईट हाऊसकडून होसपाईपद्वारे येत असल्यामुळे कितीही वाहत गेला तो, तरी तुझ्या खात्यावरील बॅलन्स थोडाच कमी होईल ?

श्रावण मोडक Sun, 23/10/2011 - 13:53

या धाग्यावर आलो. पाहतो, तो प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा गायब. आपल्याला असलेला हा मान काढून घेतला गेला की काय, असं वाटलं; पण म्हटलं खात्यावर जाऊन पाहू. तिथं गेलो तर... माझं कर्म! कर्म शून्य. कालपर्यंत, म्हणजे काल इंटरनेटवरून बाहेर पडेपर्यंत, कर्म १ होतं. ते आता गायब झालेलं दिसतंय. हाय रे कर्मा.
या कर्माची शून्यापासून धन दिशेनं वाटचाल कशी होते आणि तिथून ते पुन्हा शून्याकडं येतं कसं? कोणी तरी सांगा रे...

चिंतातुर जंतू Sun, 23/10/2011 - 14:14

In reply to by श्रावण मोडक

>>पाहतो, तो प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा गायब.

मोडक, माझ्या मते याचं कारण तुमचा मान काढून घेतला असं नसून या धाग्यातलं हे (अद्ययावत केलेलं) वाक्य आहे -

२. एखाद्या धाग्यावर प्रतिसाद दिल्यास आपण श्रेणी देऊ शकत नाही आणि दिलेली श्रेणी हटवली जाते. (श्रेणी देण्याची सुविधा नीट सुरू झाल्यामुळे हे पुन्हा सुरू केलं आहे. काही दिवसांनी आलेल्या फीडबॅकप्रमाणे याचा पुनर्विचार करता येईल)

श्रावण मोडक Sun, 23/10/2011 - 14:19

In reply to by चिंतातुर जंतू

छिद्रान्वेषी कुठला. मान हा शब्द मजेनं लिहिला असूनही तेवढाच पकडला. ;) असो. प्रतिसाद आणि श्रेणी हे नातं समजलं. मला ते पटत नाही, पण राहू द्या.
बाय द वे, आता माझी खव गायब झाली आहे, पण कर्म जागच्या जागी दिसतंय. पुन्हा एकदा हाय रे कर्मा म्हणायची वेळ आली आहे. म्हणजे, खवत संचित हवं, तर कर्मसंचित नाही. कर्मसंचित हवं असेल तर खवत काही मिळणार नाही.

चिंतातुर जंतू Sun, 23/10/2011 - 14:27

In reply to by श्रावण मोडक

>>मान हा शब्द मजेनं लिहिला असूनही तेवढाच पकडला. ;)

मान ना मान तू मेरा मेहमान ;-)

>>आता माझी खव गायब झाली आहे

अहो काहीतरी प्रायोगिक करता करता कोडरनं अख्ख्या संस्थळाच्या खरडवह्या उडवण्याचा पराक्रम केला आहे. सगळं जग गरीब असताना 'माझं घर ओकंबोकं का?' असं विचारू नये. हळूहळू भरेल तुमची पण खरडवही.

श्रावण मोडक Sun, 23/10/2011 - 14:49

In reply to by चिंतातुर जंतू

मान ना मान तू मेरा मेहमान ;-)

जुलमाचा रामराम. ;)

अहो काहीतरी प्रायोगिक करता करता कोडरनं अख्ख्या संस्थळाच्या खरडवह्या उडवण्याचा पराक्रम केला आहे.

प्रायोगिक! हं... कोडरला सांगण्याचं काम केलं. तुम्ही इथं हजर आहात हे माहिती नव्हतं. एरवी, सांगितलं नसतं.
एखाद्या आयडीची बोर्डावरची उपस्थितीच पुरेसं संपादन करून गेली पाहिजे, असं आमचं आवडतं मत आहे. ते इथं असं प्रत्यक्षात येतं पहा. ;)

सगळं जग गरीब असताना 'माझं घर ओकंबोकं का?' असं विचारू नये. हळूहळू भरेल तुमची पण खरडवही.

गरिबीच हो ती. तिची दुःखं संपादकांना नाही कळायची. ती फक्त बातमीदारालाच माहिती असतात नेमकी. ;) तो बिचारा सांगत राहतो, इथं गरिबी आहे, तिथं गरिबी आहे वगैरे. संपादक मात्र जगच कसं गरीब आहे हे बघत बसतात. चालायचंच. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/10/2011 - 22:44

In reply to by श्रावण मोडक

श्रावण आणि चिंतातुर जंतू या 'कर्म'ठ लोकांचा चाललेला वाद पाहून ड्वाले पानावले.

खरडी गायब झाल्यात म्हणून तक्रार करायला जागांमधेच आधीच माफीनामा जाहीर केला आहे. श्रावण, सतत नोंदी करू नका, अधूनमधून वाचनही करा! ;-)

श्रावण मोडक Sun, 23/10/2011 - 23:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रावण आणि चिंतातुर जंतू या 'कर्म'ठ लोकांचा चाललेला वाद पाहून ड्वाले पानावले.

मालक, मालक... हा वाद नाहीये. ही चर्चा आहे. समजून घ्या हो. अशानं संपादक काहीही करायचे नाहीत. ;)

खरडी गायब झाल्यात म्हणून तक्रार करायला जागांमधेच आधीच माफीनामा जाहीर केला आहे. श्रावण, सतत नोंदी करू नका, अधूनमधून वाचनही करा! ;-)

खऱ्याची दुनिया नाही साली. "संस्थळावरील तांत्रिक त्रुटींच्या तक्रारी करा" असं या धाग्यात लिहिलं आहे म्हणून आपलं गडबडी दाखवल्या तर हे असले तिरपे सल्ले. छ्या... ;)
या मुस्कटदाबीचा जाहीर निषेध. ;)

प्रियाली Sun, 23/10/2011 - 23:27

In reply to by श्रावण मोडक

कर्मण्ये वाधिकारस्ते म फलेषु कदाचना - आम्हाला फळ नकोच आहे. श्रेणीसुविधा हवी आहे.

अशोक पाटील Mon, 24/10/2011 - 20:44

लेखांची यादी दिसणारे पृष्ठ समोर आले की वाचक त्याला आवडणार्‍या लेखाकडे जाऊन क्लीकने ते पान उघडतो आणि वाचनास सुरुवात करतो. अशावेळी तिथे त्या लेखाचे नाव आणि Submitted by "अबक" on Mon, 24/10/2011 - 15:54 असा मजकुर असतो. पण आज सायंकाळपासून काही पानावर लेखकाचे नाव उमटलेले दिसत नाही. उदा. मला श्री.चेतन सुभाष गुगळे यानी लिहिलेला 'आदित्य : युद्ध अंधाराविरुद्ध' हा लेख वाचल्यानंतर त्यावर प्रतिसाद द्यावेसे वाटले; पण लिहिण्याचा भरात या लेखकाचे आडनाव विसरलो, म्हणून अपस्क्रोलने शीर्षकाकडे गेलो, तर 'आदित्य....' हे शीर्षक तिथे आहे, पण लेखकाचे नाव अदृष्य.

तांत्रिक अडचण असेल, कारण अन्य लेखकांच्या लेखाची टेस्ट घेतली तर तो Submitted by.... फ्लॅग तिथे येतो.

अशोक पाटील

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/10/2011 - 20:44

In reply to by अशोक पाटील

तांत्रिक अडचण असेल, कारण अन्य लेखकांच्या लेखाची टेस्ट घेतली तर तो Submitted by.... फ्लॅग तिथे येतो.

होय, हे माझ्याही लक्षात आलं नव्हतं, पहाते.

श्रावण मोडक Mon, 24/10/2011 - 22:01

आयडेंटिटी इन्फर्मेशन नामक प्रकार करा. ब्राऊजरच्या अॅड्रेस फील्डच्या शेजारच्या छोट्या चौकटीत ऐसीअक्षरे कळलं पाहिजे.

प्रियाली Mon, 24/10/2011 - 22:13

In reply to by श्रावण मोडक

आयडेंटिटी इन्फर्मेशन नामक प्रकार करा. ब्राऊजरच्या अॅड्रेस फील्डच्या शेजारच्या छोट्या चौकटीत ऐसीअक्षरे कळलं पाहिजे.

तिथे सदस्यनामही यावे. वेलकम मेसेज वगैरे

आयडेंटिटी इन्फर्मेशन वाचून मला वाटलं की श्रामो सदस्यनामासोबत आयपीही छोट्या चौकटीत घालून द्या असे म्हणत आहेत की काय? ;-)

नितिन थत्ते Tue, 25/10/2011 - 11:41

आत्ताच दुसर्‍या धाग्यावर एका प्रतिसादात चिंतातुर जंतु यांच्या दोन स्वाक्षर्‍या दिसल्या. (चतुष्पाद जंतु ही प्रतिसादातली खास स्वाक्षरी आणि चिंतातुर जंतु - ही जीवांची गर्दी.... अशी स्टॅण्डर्ड स्वाक्षरी.

याचा अर्थ स्वाक्षरी प्रतिसादाला अ‍ॅपेण्ड होते. तशी व्हायला नको. अन्यथा प्रासंगिक स्वाक्षर्‍या बनवणे अयोग्य/गैरेसोयीचे होईल.

ही तृटी सुधारावी असे वाटते. ड्रुपलच्या जुन्या मॉड्यूलवर चालणार्‍या (उपक्रम किंवा पूर्वीचे मिसळपाव) संकेतस्थळांवर स्वाक्षरी एम्बेड होते तशी व्हावी.
.
.
.
.
(अँक्शस) नितिन थत्ते

Nile Tue, 25/10/2011 - 11:45

In reply to by नितिन थत्ते

मॉड्युलमध्ये
अपडेट सिग्नेचर ऑन ऑल पोस्ट्स, अपडेट सिग्नेचर ऑन न्यू पोस्ट्स असे दोन पर्याय कधीकधी असतात. मॉड्युलमध्ये शोधून ही अडचण कदाचित दूर करता यावी.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/10/2011 - 03:34

In reply to by गणपा

हा बग मला दिसत नाहीये. त्यामुळे सोडवणं कठीण जाईल.

नितिन, स्वाक्षरीचं काय ते गुगलून शोधावं लागेल, पण पहाते.

खरडवह्यांमधे इमेजेस दिसायला लागल्या आहेत.

Nile Thu, 27/10/2011 - 21:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गणपाचे सदस्यत्व चुकुन कुठल्यातरी दुसर्‍याच कॅटेगरीत गेलंय का?

लॉग आउट करुन वाचयला गेलो तर हा धागा असा दिसतो.

(प्रतिसादांचं नेस्टिंग / ट्री दिसत नाही)

मोठा फोटो इथे पहा.

गणपाचा माझ्या प्रतिसादा खाली दिलेला एक प्रतिसाद तरी व्यवस्थित दिसतो आहे. (पण इतर व्यवस्थित दिसत नाहीएत, बहुतेक). यावरून सदस्य कॅटेगीरीमध्ये 'फोरम व्ह्यू' सेटिंग मध्ये बदल असावेत असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 27/10/2011 - 20:49

सदस्याचं वापरायचं नाव आणि खरडवह्यांचा दुवा उजव्या बाजूला वर दिसतो आहे. खरडवह्या, खरडवह्यांच्या स्वागताचा मजकूर यामधे इमेजेस आणि व्हीडीओ टाकणे शक्य आहे.

नितिन, स्वाक्षरीचं काय ते मी अजून पहाते आहे. काही धाग्यांमधे लेखकाचं नाव धाग्याच्या नावाखाली का दिसत नाही हे सुद्धा बघणे बाकी आहे. धाग्यावर आलेल्या नवीन प्रतिसादांचा 'नवीन' हा टॅग वेगळ्या रंगात दिसण्याचा प्रयत्नही अजून सफल झालेला नाही.

अजूनही काही तक्रारी, बग्ज असतील तर याच धाग्यावर लिहावे ही विनंती.

प्रियाली Thu, 27/10/2011 - 21:00

In reply to by Nile

कारण मग लोक पुढली तक्रार करतात.

माझ्या धाग्याची इतकी वाचनं झाली पण मला अद्याप कोणीच प्रतिसाद दिला नाही. असे कसे आहेत हे सदस्य? :प
;-)
ह. घ्या.

रमताराम Thu, 27/10/2011 - 23:13

आमची खरडवही गायब आहे बहुधा. नुस्ता टॅब दिसतो आहे.

श्रावण मोडक Thu, 27/10/2011 - 23:28

काही धाग्यांवर कमेंट व्ह्यू ऑप्शनचा ब्लॉक दोनदा येतोय. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 29/10/2011 - 00:27

In reply to by श्रावण मोडक

होय. ते बुद्ध्याच केलं आहे. तसं नको असल्यास काढता येईल, हवं असल्यास सगळीकडे करता येईल किंवा कसंही.

चित्र चिकटवायची गरज नाही, लिंकन व्हा. ;-)

मिहिर Fri, 28/10/2011 - 11:53

यात व्यावसायिक माहितीमध्ये 'शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ' मध्ये केवळ इंग्रजीतच टंकले जात आहे.
संपादनात signature च्या इथे खाली आता 'स्वाक्षरी' दिसत असले, तरी वर टायटल मध्ये अजून हस्ताक्षरच दिसते आहे. तेसुद्धा स्वाक्षरी व्हावे.
कौलांमध्ये वर 'सदस्याची माहिती' आणि 'निकाल' असे टॅब दिसतात. त्यातील 'सदस्याची माहिती' चुकीचे वाटते. कौलातील पर्याय किंवा असे काहीतरी वेगळे हवे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 29/10/2011 - 10:00

In reply to by मिहिर

यात व्यावसायिक माहितीमध्ये 'शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ' मध्ये केवळ इंग्रजीतच टंकले जात आहे.

हे झालं आहे.

संपादनात signature च्या इथे खाली आता 'स्वाक्षरी' दिसत असले, तरी वर टायटल मध्ये अजून हस्ताक्षरच दिसते आहे. तेसुद्धा स्वाक्षरी व्हावे.

बदलले

कौलांमध्ये वर 'सदस्याची माहिती' आणि 'निकाल' असे टॅब दिसतात. त्यातील 'सदस्याची माहिती' चुकीचे वाटते. कौलातील पर्याय किंवा असे काहीतरी वेगळे हवे.

कौलांवर काम सुरू आहे. सध्या कौलांची पार्श्वभूमी लिहीण्याची सोय नाही. एका कौलात अनेक पर्याय निवडण्याची सोय नाही; या सगळ्या गोष्टींवर काम सुरू आहे. तेव्हा हा प्रकारच बदलेल. त्यात शक्यतोवर जुने कौल उडणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.

limbutimbu Tue, 01/11/2011 - 16:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कौलामधे, साधारणतः पाचसहा पर्यायानन्तरच्या पर्यायामधे केवळ रोमन लिपी चालू शकते, तसेच पहिल्या दोन पर्यायानन्तर वाढीव पर्यायामधेही जोवर एकदा पूर्वदृश्य करुन बघत नाही, तोवर रोमन लिपीच चालते. दुसरीकडे देवनागरीमधे लिहून कॉपी पेस्ट करुन काम भागवता येतय, पण जमल्यास यावरही लक्ष द्यावे ही विनन्ती :)

अशोक पाटील Sat, 29/10/2011 - 19:35

हा प्रतिसाद नसून एक पृच्छा आहे, जी बग्ज्/त्रुटी संदर्भातील नसून एक जादाची सुविधा 'ऐसीअक्षरे' वर होऊ शकेल का ? या विषयी आहे.

समजा 'अ' नामक एका सदस्याने एक धागा विषय मांडला/लेख इथे दिला आणि त्यावर मत-मतांतराची अपेक्षा व्यक्त केली तर तो विषय/प्रतिसाद संस्थळाच्या वाढीच्या दृष्टीकोणातून मॉडरेटिंग टीमला ठेवावे असे वाटले तर त्यात काही गैर नाही. पण मला वैयक्तिकरिया, एक सदस्य/वाचक, म्हणून "तो" विशिष्ट धागा आणि त्यावरील प्रतिक्रियाही वाचाव्याशा वाटत नसतील तर मला तसा विकल्प आहे का ?. सध्या नव्याने 'लॉग इन' झाले की ताज्या प्रतिसादासह धागे प्रथम प्राधान्याने पडद्यावर अवतरतात. तिथे नकोसे वाटणारे विषयही साहजिक प्रकटतात.

तेव्हा ऐसी अक्षरे तांत्रिक टीमला विनंती की, त्यानी इतक्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यात आणखीन् जादाची एक म्हणजे सदस्याच्या इच्छेनुसार त्याच्यापुरता त्याला अप्रिय वाटणारा 'धागा ब्लॉक' करण्याची सोय निर्माण झाल्यास मला ज्या विषयांची आवड आहे तितपतच इथला वावर बंदिस्त करता येईल.

अशोक पाटील

गोगोल Sat, 29/10/2011 - 22:45

आवड्लेले आहे. काही काही संकेतस्थळांवर (बहूदा एस्थेटीक सेन्स च्या नावाखाली) दोन्ही बाजूला हात हात भर जागा सोडलेली असते. त्यामुळे टीच भर लेख वाचायला सुद्धा दहा वेळेला स्क्रोल डाऊन करावे लागते. अशा वेळी हात बाजूला ठेवून आरामात न वाचता आल्यामुळे चडफडाट होतो. विशेषतः वाईड स्क्रीन च्या जमान्यात हे फारच गैर सोयीचे ठरते कारण की हार्ड्वेअर सपोर्ट करत असून देखील खुळचट डिझाईन मुळे हा त्रास भोगायला लागतो. त्याच बरोबर लाल पिवळे भडक रंग न वापरता डोळ्यांना सूदिंग असे रंग वापरल्याबद्दल अनेक आभार. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून स्थळ वापरकर्त्याच्या बद्दलची आपूलकी दिसून येते.

ज्यांनी या अशा मुद्द्यांचा विचार करून स्थळ निर्मिती केली त्यांची नावे "योगदान" मध्ये समाविष्ट करण्यात यावीत म्हणजे आम्हालाही त्यांना कर्म मुल्य देता येईल.